शेवळाच्या रुमाली वड्या

साहित्य: शेवळ २५ ते ३०, काकडं ७-८, २ मोठे बारीक चिरलेले कांदे, २ टि. स्पून तिखट, हळद, चिंच कोळ रटि. स्पून, अर्धा टि. स्पून हिंग, ३ वाट्या बेसन, तेल २-३ टेबल स्पून, मीठ, गुळ चवीनुसार

कृती : हिरवाटण: २ मिरच्या, कोथिंबीर, आलं १ इंच, लसुण ५-६ पाकळ्या एकत्र वाटलेलं

तळला मसाला: सुखे खोबरे १ वाटी, १ मोठा कांदा उभा चिरुन, दालचिनी १ इंच, लवंगा ५-6, पणे २ टि. स्पून सर्व थोड्या तेलावर भाजून एकत्र वाटून घेणे.

सारण : २ वाटया ओले खोबरे, अर्धी वाटी भाजलेली खसखस, १ चमचा लिंबाचा रस, थोडी चिरलेली कोथिंबीर, सर्व एकत्र करणे.

शेवळ सोलून त्याचा वरचा नारंगी शेंडा तोडून टाकणे नंतर स्वच्छ धुवून एकदम कोरडी करणे बारीक चिरून घेणे. एका मोठ्या कढईत तेल गरम करून त्यात हिंग व चिरलेला कांदा माणे कांदा लालसर झाल्यावर त्यात चिरलेली शेवळं टाकणे व खुप वेळ परतत राहणे नंतर ताक चिरुन त्यातली बी काढून त्याची पेस्ट करुन घालणे. नंतर हिरव वाटण व तळला माला घालून व्यवस्थीत परतुन घेणे. नंतर त्यात तिखट व हळद घालून ३-४ वाट्या पाणी चालूल बारीक गॅसवर शिजवून घेणे. भाजी नीट शिजल्यावर त्यात मीठ व चिंचेचा कोळ व गुळ घालून छान परतवुन घेणे. त्यात चण्याच्या डाळीचे पिठ घालून सर्व एकत्र ढवळत रहाणे. पीठ होत आले की पिठाला वाफ आणण्यासाठी गॅस बारीक करुन झाकण ठेवणे. चांगली जीत वाफ आल्यावर गॅस बंद करणे.

१ मोठा सुती रुमाल ओला करुन घेणे तो पसरवून त्यावर हे मिश्रण गरम असतानाच गोल चपाती सारखे पसरवून घेणे. त्यावर सारणाचं साहित्य पसरवावे. नंतर रुमालाने त्याची घट्ट करून त्याला त्रिकोणी आकार देणे. गुंडाळी थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून शैलो फ्राय करणे. गरम गरम सर्व्ह करणे.

- सौ. रंजना विजय गुप्ते

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

– सौ. रंजना विजय गुप्ते

Author