वड्याचे सांबार

साहित्य: २ वाट्या डाळीचे पीठ, अर्ध इंच आले, ४-५ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, हळद तीखट, मीठ, अर्धा चमचा साखर, १ चमचा धणे, लवंग, दालचिनी पूड, १ चमचा बडीशेप, १ कांदा, पाव वाटी खोबरे, खोबरे, कोथिंबीर

रस्सा: १ कांदा, अर्धी वाटी नारळाचे दूध, २ वेलची, दालचिनी तुकडे, २ चमचे डाळीचे पीठ, विवाह, मीठ, हळद.

कृती: १ कांदा बारीक चिरुन थोड्या तेलावर परतून घ्यावा नंतर आले, लसुण, खोबर, मिरच्या, है बडीशेप सर्व एकत्र करुन वाटून घ्यावे. कढईत दीड वाटी पाणी घेऊन त्यात वरील अर्थ वाहण मीठ,१ चमचा गरम मसाला पावडर व दोन वाट्या डाळीचे पीठ टाकून ढवळावे व झाकण ठेवू वाफ येऊ द्यावी, पीठाचा वड्या थापण्या इतपत गोळा झाल्यावर आच बंद करावी. एका ताटलीत तेलाचा हात फिरवावा व पीठ थापून त्याच्या वड्या कापाव्यात. दुसऱ्या पातेल्यात तेल टाकू लवंग, वेलची, हिंग, हळद, मोहरी याची फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, वाटण घालून परतावे. (अधिक चव व रंगासाठी वाटण करताना त्यात एक टोमॅटोही टाकल्यास उत्तम ) नंतर त्यात दीडवाटी पाणी, अर्धा वाटी नारळाचे दूध, मीठ, गरम मसाला पावडर चवीनुसार साखर, दोन चमचे डाळीचे पीठ घालावे व चांगली उकळ येऊ द्यावी. पीठाच्या या पाण्यात सोडाव्यात व अलगद ढवळावे. मंद आचेवर दोन-तीन मिनीटे शिजू द्याव्यात व आ बंद करावी. वरुन कोथिंबीर पेरावी. (पिठाच्या वड्या थोड्या तेलात तळून घेतल्यास जात रुचकर लागतात) असा हा वड्यांचे सांबार हा प्रकार आयत्या वेळी झटपट वीस ते ५ मिनीटात होऊ शकतो व भात, चपाती, फुलके कशा बरोबरही खाता येतो.

-सौ. सुविधा सुबोध वैद्य

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

Author