लेखसंग्रह

एक खांबी तंबू – एक विचार

Category:

 

गेल्या ५० वर्षात, वेळोवेळी अनेक सूक्ष्म आणि लघू उद्योजकांच्या सहवासातून जी एक जाणीव प्रकर्षाने निर्माण झाली त्याबद्दलचे हे विचार. सातत्याने वाजणाऱ्या फोनच्या घंटीमुळे मी जरा त्रासिक पणे जागा झालो. घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे दोन वाजले होते. जगदीशचा फोन होता हे स्क्रीन वरील नाव आणि चेहेरा बघून समजले. एवढ्या अवेळी फोन आला की नाही म्हंटले तरी पोटात थोडे धस्स होतेच. डोळे चोळत मी विचारले, “कायरे जग्या, तुला झोप येत नाही का? अरे ज्यांना येते त्यांना तरी शांत झोपू दे ना.” थोड्या विलंबानंतर गंभीर स्वरात आवाज आला, “अरे शर्माची बातमी समजली का?”
“का, काय झाले ? काल संध्याकाळी तो बडोद्याला परत जायच्या आधी तर त्याच्याशी बोललो ” “अरे, आत्ताच त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला होता. हायवे वर त्याची मोटार एका ट्रकला धडकून एका क्षणात सर्व काही संपले आहे.

विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/

  July 20, 2026


युवा-विश्व

आयुष्य खूप सुंदर आहे.

Category:

 

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला ते जगता यायला हवं. केवळ जगणं महत्त्वाचं नाही तर जगताना आस्वाद घेता यायला हवा. जगायला जनावरं सुद्धा जगतात पण आपल्या जगण्यात एखादी गोष्ट नीट समजून घेतली तर आनंदामध्ये कित्येक पटीने वाढ होते. केवळ गुणांची टक्केवारी करिअर, मोबाईल टास्क असल्या गोष्टीमुळे सगळ्यांचे गुंतणं वाढलं आहे इतकं की स्वतःचे भान त्यांना राहत नाही. होण्यासाठी व आनंद घेण्यासाठी स्वतःचे भान हवंच. स्वतःचं आयुष्य संपवण्या इतपत भान हरवलं तर आयुष्य आनंदी व सुंदर कसं लागेल. आनंद घेताना स्वतःचे भान ठेवणे आवश्यक असते.बऱ्याच वेळेला आनंदच्या नादात माणसे स्वतःला गमावून बसतात.

  July 20, 2026


मनोरंजन

मराठी चित्रपटसृष्टीचे ‘महाखलनायक’ निळू फुले : गाजलेले चित्रपट, अजरामर संवाद

Category:

 

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशी नावे आहेत, ज्यांच्याशिवाय हा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. या यादीत सर्वात अग्रस्थानी असणारे एक नाव म्हणजे ‘निळू फुले’. भारदस्त आवाज, डोळ्यांतील तीक्ष्ण भाव, चेहऱ्यावरील हुशार आणि धूर्त हावभाव आणि संवादफेकीची अफाट शैली यांच्या जोरावर निळू भाऊंनी तब्बल चार दशके मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी पडद्यावर साकारलेल्या खलनायकी भूमिका इतक्या जिवंत असायच्या की, चित्रपटगृहात बसलेला प्रेक्षक त्यांचा तिरस्कार करू लागायचा. हाच त्यांच्या अभिनयाचा सर्वात मोठा विजय होता.

  July 19, 2026


युवा-विश्व

प्रेरणेच्या गोष्टी

Category:

 

काही व्यक्तींचे जीवनच प्रेरणा असतं.प्रतिकुल परिस्थितीतून मार्ग काढणे म्हणजे चिखलातून पायवाट निर्माण करून इच्छित स्थळी पोहचणें.समाज सेविका आणि लेखिका सुधा मुर्ती या मुलांना नेहमी प्रोत्साहीत करत असतात. सामाजिक मुद्द्यांवर लक्ष देण्यासाठी सुधा मूर्ती ओळखल्या जातात. पद्मश्री प्राप्त सुधा मूर्ती २०२४ पासून मध्ये राज्यसभेवर आहेत.शिक्षण आणि गावाचा विकास महिलांना पुढे जाण्यात योगदान देतात. संपूर्ण जीवनाची प्रेरणा मिळते. ज्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. सुधा मुर्ती यांनी मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.
कधीच आपल्या स्वप्नांना अर्धे सोडू नका. सुधा मूर्ती सांगतात की जीवनात कधीच आपल्या स्वप्नांना अर्धवट सोडू नका. ते पूर्ण करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका. मेहनत करत राहा आणि आपली स्वप्न पूर्ण करा. तुमच्या वागण्यातील हे बदल पाहून तुम्ही लहान मोठ्या गोष्टींना घाबरणं सोडाल. नेहमी शिकत राहा.

  July 19, 2026