कसं हुईन तं हू माय…
परिचय – परिक्षण

कसं हुईन तं हू माय…

Category:

 

अमृता खंडेराव यांचं हे कथासंग्रह म्हणजे विदर्भाच्या मातीतून उगम पावलेलं, चुलीवर शिजवलेलं आणि बोलीभाषेच्या फोडणीने झणझणीत झालेलं साहित्यिक जेवण आहे. हे पुस्तक वाचताना वाटतं, आपण एखाद्या खेड्यातल्या अंगणात बसलो आहोत, समोर चुलीवर भाकरी भाजतेय, आणि आजूबाजूच्या बायका आपापल्या कहाण्या सांगतायत—कधी हसवणाऱ्या, कधी डोळ्यांत पाणी आणणाऱ्या, पण नेहमीच मनात घर करणाऱ्या.

  July 16, 2026


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

पुस्तके बदलायची आहेत तुम्हाला!

Category:

 

अनिल कार्की यांची ही कविता अत्यंत हृदयस्पर्शी आणि सामाजिक वास्तवावर भाष्य करणारी आहे. या कवितेचा मराठी अनुवाद:

  July 16, 2026


युवा-विश्व

तरुण वयात मनू भाकर

Category:

 

रँकिंगद्वारे भारताची नेमबाजी स्टार बनली. सुप्त गुण वेळीच न ओळखले गेल्यामुळे त्यांची गळचेपी होते पण आयुष्याच्या प्रवासात कधी कधी ते उफाळून येतात. सुप्तगुण फक्त संधीची वाट पाहत असतात.भारताचे हरियाणा राज्य बॉक्सर आणि कुस्तीपटूंसाठी ओळखले जाते, येथे जन्मलेल्या खेळाडूंनी जगभरात आपला ठसा उमटवला आहे. मनू भाकर चा जन्म हरियाणातील झज्जर येथे झाला. मनू भाकरने शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. याशिवाय ‘थान टा’ नावाच्या मार्शल आर्टमध्येही भाग घेऊन राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली.रिओ ऑलिम्पिक 2016 नुकतेच संपले असताना वयाच्या 14 व्या वर्षी तिने नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आठवडाभरात तिने वडिलांना शूटिंग पिस्तूल आणायला सांगितले.तिचे सदैव साथ देणारे वडील राम किशन भाकर यांनी तिला बंदूक विकत घेतली आणि याच निर्णयाने एके दिवशी मनू भाकरला ऑलिम्पियन बनवले.2017 च्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये, मनू भाकरने ऑलिम्पियन आणि माजी जागतिक नंबर-1 हीना सिद्धूला चकित केले आणि 242.3 गुणांसह नवीन विक्रम केला. यामुळे त्याने 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम फेरीत हीनाचा परभव केला. मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले व भारताच्या मनू भाकरने पॅरिस 2024 मध्ये नेमबाजीत अजून एक ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले. अशा रीतीने ऑलिंपिक मध्ये दोन पदके मिळविण्याचा तिने विक्रम केला.

  July 16, 2026


लेखसंग्रह

त्यात काय अवघड आहे?

Category:

 

मी निवृत्त झाल्यानंतरच्या दिवसातील एक आठवण. निलय बऱ्याच दिवसांनी भेटायला आला होता. सुरुवातीला जरा हवापाण्याची चर्चा झाल्यावर त्याने एक चांगली बातमी दिली आणि पेढ्याचा पुडा माझ्यासमोर ठेवला. तो त्याच्या नवीन कामावर वरिष्ठ अधिकारी झाला होता. कामाच्या व्यापामध्ये बरेच दिवस भेटायला पण येऊ शकला नव्हता. मग म्हणाला, “ साहेब, एक प्रश्न विचारू का? माझ्यावर आता पूर्ण धंद्याची जबाबदारी आहे. रोज कितीही काम केले तरी दिवस पुरत नाही. संध्याकाळी दमतो पण समाधान झाल्यासारखे वाटत नाही. काही वेळा तर गोष्टी हाताबाहेर गेल्यासारख्या वाटतात आणि उद्विग्नता येते. तुम्ही मात्र तुमच्यावेळी धंदा अगदी सहजपणे साम्भाळल्यासारखे वाटे. सहसा उशीरा काम करत नसत. तुम्हाला वेळ अपुरा पडल्यासारखे दिसत नसे. बऱ्याचवेळा आम्हाला वाटे की तुम्ही तुमच्या कामात आनंदी आहात. मला जरा समजावून सांगा की हे कसे शक्य होते.”

  July 15, 2026


युवा-विश्व

प्रेरणादायी हलधर नाग

Category:

 

जन्मापासून पायात नाही घातली चप्पल, तिसरीतून ड्रॉप आऊट. हलधर नाग या कवीवर पाच Ph.D जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात आपण कसं स्वतःला उमलऊ शकू याचा विचार आपण करायला हवा. अंध मूकबधिर अपंग यांनी हार न मानता अनेक विक्रम केले आहेत जे धडधाकट माणसालाही लाजवतील.काही ही संसाधने नसतांना अनेकांनी यशश्री खेचून आणली आहे. अनेकांनी रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास केला आहे. काही जणांना शाळेत जाण्यासाठी नदी पोहून पार करावी लागत होती. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शाळा उघडण्यासाठी फू्लें‌ दांपत्याने अंगावर शेण झेलत‌ लोकांचा रोष पत्करून त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

  July 15, 2026