संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्याआल्या माझ्या मुलाने जाहीर केले, “ मला आता ब्रेकची फारच गरज आहे. २ महिने झाले, एक पण ब्रेक घेतला नाही.” गेल्याच आठवड्यात माझा एक मित्र त्याने घेतलेल्या ब्रेक वरून परत आला आणि एव्हढा दमलेला का दिसतो आहेस असे विचारल्यावर म्हणाला की “गेले ४ दिवस रग्गड चाललो, वाटेल तिथे मिळेल तेव्हा मिळेल ते खाल्ले. रोज काही ना काही कारणांमुळे जागरणे झाली. वेगळ्या जागेमुळे झोप पण नीट झाली नाही. शिवाय विमानप्रवासाची दगदग पण खूप झाली. कधी एकदा घरी पोहोचतो आणि स्वच्छ आंघोळ करून घरचे जेवतो असे झाले होते.” मनात आले की असला त्रासदायक ब्रेक घ्यायचाच कशाला.
July 22, 2026
छिन्नी हे हरीश बोढारे यांचे दोन अंकी नाटक समाजातील वास्तवाचे दर्शन घडविते. छिन्नी शिवाय जशी सुंदर मूर्ती घडत नाही, तसेच माणसाला घडविण्यासाठी काही माणसांची केवळ उपस्थितीही आयुष्याला वेगळं वळन देते, जसे घाव घालून सुंदर मूर्ती अवतरतें, तसेंच.काही माणसें, छिन्नी प्रमाणे आपल्यावर योग्य संस्कार करून आपल्यातलं सुंदर व्यक्तिमत्त्व साकार करतात.छिन्नी दगडावर घाव घालून मूर्ती घडतें.
July 22, 2026
अंगणात उभी तुळस
ईश्वराचे दुजे रूप आई
वात्सल्याची प्रेमळ मूर्ती
जगात सुंदर भासते आई..
उदरात सांभाळते बाळ
अमृताचा फुटतो पान्हा..
डोळ्याआड जाताच बाळ
कासावीस जीव त्या वीणा...
जगण्याचा घडवते पाया
आई आधार भक्कम...
बोट धरून चालवते
आयुष्य करते संस्कारक्षम..
निस्वार्थी करूणा सागर
आशीर्वाद तिचा पाठी..
फिरून जन्माला यावे
आईचे पांग फेडण्यासाठी..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
July 22, 2026
तुझ्या ओढीने आले इथवर
सांग जायचे आता कुठवर...
ओंजळ भरण्यासाठी एकदा
दान टाकशील का रे मूठभर..
बांध फुटतो सांग कितीदा
अश्रू ओघळे ह्या बांधावर ..
कवेत घ्यावे मला कुणीतरी
श्वासातून जीव माझा झरझर..
मुकेच गाते जीवन सरिता
सूर आळवण्या नाही प्रियकर..
दऱ्या खोऱ्यात आटली नाही
पाणी पिते स्वतः च घोटभर..
फुलली वनराई मळे बहरले
लाट उसळली अंतिम टप्प्यावर
चिरंतन तप करून युगांचे
समिप आला अनंत रत्नाकर
July 22, 2026
संथ निळेशार पाणी
लाट खोल उसळली...
जीव रंगला तुझ्यात
ओढ अशीही लागली...
थेंब थेंब बरसला
घन ओथंबून आज...
शहारली काया पुन्हा
सागराची आर्त गाज..
देह तुझाच राहिला
मनोमनी दाटे हर्ष..
किरणांची सोनछाया
जाणवितो तुझा स्पर्श..
मनामध्ये उतरावी
छाया आठवांची दाट...
बरसून मेघ आला
पुन्हा पाहण्यास वाट..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
July 22, 2026
साक्षीदार तो साऱ्याचा । ईश्वर अंतर्यामी ॥
मनातील भाव जाणे । सत्याचा तो स्वामी ॥
कर्मांचा लेखा सारा । त्याच्या हाती राहे ॥
उशीर जरी भासे । न्याय कधी न वाहे ॥
खोट्याचा हा डामडौल । क्षणभंगुर ठरे ॥
सत्याच्या एका किरणे । अंधार दूर सरे ॥
अहंकाराचे मनोरे । काळच मोडून टाके ॥
नम्रतेच्या त्या वाटे । ईश्वर भेटी येके ॥
विश्वासाची ठेव मना । नाम स्मरा रे ॥
साक्षीदार तो साऱ्याचा । ईश्वरच कैवारी ॥
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 21, 2026
आयुष्यभर मुल्यां वर आयुष्य जगणारे नकळत एक प्रेरणेची पायवाट निर्माण करतात.गुलझारीलाल नंदा यांच्या जीवनाविषयी जाणून घेऊया, जे दोन वेळा देशाचे कार्यवाहक पंतप्रधान होते. केंद्रात मंत्री होते. ते आयुष्यभर लेखन आणि अध्यापनाशी जोडले गेले, परंतु त्यांचे शेवटचे दिवस गरिबीत गेले. गुलझारीलाल नंदा यांच्यासारख्या लोकांची राजकारणात सध्या कमतरता आहे. देशात जेव्हा जेव्हा राजकारण आणि राजकारण्यांची चर्चा होते तेव्हा सामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल द्वेषाची भावना निर्माण होते. लोकांच्या दृष्टीने राजकारण हे आता कमाईचे साधन बनले आहे. सेवा, समर्पण, त्याग आणि प्रामाणिकपणा हे गुण पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये होते ते आता पूर्णपणे हरवले आहेत. स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांना ५०० रुपये पेन्शन मंजूर करण्यात आली. पेन्शनसाठी संघर्ष केला नसल्याचे सांगत त्यांनी ते घेण्यास नकार दिला होता. नंतर त्याच्या मित्रांनी भाड्याच्या घरात राहिलो तर भाडे कसे देणार, असे समजावल्यानंतर त्याने पेन्शन स्वीकारली. भाड्याच्या थकबाकीमुळे घरमालकाने त्याला घराबाहेर हाकलून दिले होते.एकदा घरमालकाने भाड्याच्या थकबाकीमुळे त्याला घरातून हाकलून दिले होते. नंतर ही बातमी वृत्तपत्रात छापून आल्यावर सरकारी अधिकारी आले आणि जमीनदाराला कळले की त्याने किती मोठी चूक केली होती. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री असूनही स्वत:साठी घर बांधू न शकलेल्या आणि भाड्याच्या घरात आयुष्य घालवणाऱ्या अशा राजकारण्याला राजकारणाचे रत्न म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. नंदा यांनी सियालकोट, लाहोर आणि अलाहाबाद येथे शिक्षण घेतले.
July 21, 2026
अतूट मैत्रीचे बंध
मनाचे धागे जुळताना..
मनमोकळ्या जीवांचे
मैत्रसौख्य फुलताना..
श्वासा समिप मैत्री
काळजात जपताना..
मैत्रीची हाक येताच
धावत जाताना..
आशा निराशेच्या
वादळी हरवताना..
मैत्रीनेच सावरले
जीवन जगताना...
सुवर्ण कोंदणात
हिरे जडवताना..
आयुष्य सुदर ते
मैत्री निभवताना.
July 21, 2026
शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांतील धडे नव्हे; शिक्षण म्हणजे आयुष्य घडवण्याची, विचारांना दिशा देण्याची आणि माणूस घडवण्याची अखंड प्रक्रिया. अशा या शिक्षणविश्वात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे, नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे आणि आपल्या असामान्य योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले आदरणीय श्री. सुरेंद्र दिघे सर आज आपल्या पॉडकास्टमध्ये उपस्थित आहेत. शालेय अभ्यासक्रमाच्या चौकटीपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सर्जनशीलता, नेतृत्व, सामाजिक जाणीव आणि जीवनमूल्ये रुजवण्यासाठी त्यांनी अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवले. त्यांच्या शिक्षणाकडे पाहण्याच्या व्यापक दृष्टीकोनामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध झाले आहे.
July 21, 2026
(मुखडा)
घडू नये ते घडले, स्वप्न सारे विझले,
हातातल्या रेषांनी, नशीब वेगळे लिहिले.
हसण्यामागच्या अश्रूंना, कुणीच नाही ओळखले,
घडू नये ते घडले... मन मात्र तुटून गेले.
(अंतरा १)
कालपर्यंत सोबतीला, तुझ्या शब्दांचा आधार,
आज उरल्या फक्त आठवणी, आणि विरहाचा भार.
ओठांवरच थांबले, कितीतरी अपुरे बोल,
श्वासांत अजूनही दडले, तुझ्या नावाचे मोल.
तुझ्या पावलांच्या खुणा, अजून दारी थांबल्या,
विरलेल्या त्या स्वप्नांना, आठवणींनी कवटाळल्या.
(मुखडा)
घडू नये ते घडले, स्वप्न सारे विझले,
मनाच्या मंदिरातील, दिवे सारे विझले.
आसवांच्या सरींमध्ये, आयुष्य सारे भिजले,
घडू नये ते घडले... शब्दही आता निःशब्द झाले.
(अंतरा २)
चांदण्यांनी विचारले, कुठे हरवली ती वाट,
उत्तर देताना डोळ्यांनी, लिहिली दुःखाची बात.
जखमांना वेळ म्हणे, हळूहळू भरून काढ,
पण तुझ्याविना प्रत्येक क्षण, वाटतो अख्खा पहाड.
सावल्यांशी बोलताना, तुझाच भास भेटतो,
प्रत्येक धडधडीत अजून, तुझाच श्वास ऐकू येतो.
(ब्रिज)
नशिबाशी भांडताना, शब्द सारे हरवले,
प्रेमाच्या त्या पाखराचे, पंखच कुठे तुटले.
तरीही मनाच्या कोपऱ्यात, एक दिवा जळत राहील,
तुझ्या सुखासाठी माझा, प्रत्येक श्वास प्रार्थना करील.
(शेवट)
घडू नये ते घडले, तरी प्रेम संपणार नाही,
तू नसलीस जवळ माझ्या, आठवण दूर जाणार नाही.
काळ पुढे सरकेल, जखमाही कधीतरी भरतील,
पण तुझ्या नावानेच माझ्या, भावना कायम धडधडतील.
जर पुन्हा कधीतरी भेट झाली, नजरा काही बोलतील,
घडू नये ते घडले... तरी प्रेम अमरच राहील.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 20, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti