ताटवे फुलांचे..

नाजूक कोमल कांती
लाजाळू मिटते स्पर्शाने...
नजरेत भरते अबोली
अधरातील स्मित हास्याने...
चाफा वाऱ्याने डोलतो
गर्द हिरव्या राईत...
मोगरा गंधात उरतो
शुभ्र कळ्या वेलीत...
गुलाब उधळतो रंग
अडून बसतो मनात...
सदाफुली सांगते
गुपित सदाबहार..
फुलाफुलांचे ताटवे
ह्रदयी गुंफलेला हार..



नाजूक कोमल कांती
लाजाळू मिटते स्पर्शाने…
नजरेत भरते अबोली
अधरातील स्मित हास्याने…
चाफा वाऱ्याने डोलतो
गर्द हिरव्या राईत…
मोगरा गंधात उरतो
शुभ्र कळ्या वेलीत…
गुलाब उधळतो रंग
अडून बसतो मनात…
सदाफुली सांगते
गुपित सदाबहार..
फुलाफुलांचे ताटवे
ह्रदयी गुंफलेला हार..

Author