नाऊरू – एक छोटेसे स्वतंत्र राष्ट्र
शहरे आणि गावे

नाऊरू – एक छोटेसे स्वतंत्र राष्ट्र

Category:

 

नाउरू हे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-पूर्वेकडील एक छोटेसे बेट. इंग्रज प्रवासी नाऊरुमध्ये येण्यापूर्वी प्रशांत महासागरातील बेटवासीयांची येथे वस्ती होती. ब्रिटिश प्रवाशांनी त्यांचे `Pleasant Island’ असे नामकरण केले.

 

दक्षिण कोरिया
शहरे आणि गावे

दक्षिण कोरिया

Category:

 

दक्षिण कोरिया हा पूर्व आशियामधील एक देश आहे. हा देश कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस उत्तर कोरिया हा देश तर पश्चिमेस पिवळा समुद्र, पूर्वेस जपानचा समुद्र व दक्षिणेस पूर्व चीन समुद्र हे प्रशांत महासागराचे उप-समुद्र आहेत. दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख चौरस किमी तर लोकसंख्या ५ कोटी असून सोल हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे.

दरवाजा नसलेली पहिली बॅंक
शहरे आणि गावे

दरवाजा नसलेली पहिली बॅंक

Category:

 

अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील युको बॅंक ही देशातील पहिली दरवाजा नसलेली बॅंक आहे. या बॅंकेच्या सुरुवातीलाच दोनशे खाती उघडली गेली आहेत. शनि शिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत. त्यामुळे या गावातील बॅंकेलाही दरवाजा ठेवण्यात आलेला नाही. भक्तांच्या श्रध्देला तडा न जाऊ देता युको बॅंकेने पहिल्यांदाच दरवाजा नसलेली बॅंक उघडली आहे.

नागपूरची दीक्षाभूमी – बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान
शहरे आणि गावे

नागपूरची दीक्षाभूमी – बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान

Category:

 

बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान असलेली दीक्षाभूमी नागपूर येथे आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील समाजबांधवांना बौध्द धम्माची दिक्षा दिली.

दक्षिण सुदान
शहरे आणि गावे

दक्षिण सुदान

Category:

 

दक्षिण सुदान हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. दक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले. दक्षिण सुदानच्या उत्तरेला सुदान, पूर्वेला इथियोपिया, आग्नेयेला केनिया, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक तर पश्चिमेला मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हे देश आहेत. पांढरी नाईल ही नाईल नदीची प्रमुख उपनदी दक्षिण सुदानच्या मध्यभागातून वाहते. जुबा ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव
शहरे आणि गावे

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

Category:

 

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर पाहण्यासाठी भक्त लांबून येत असतात. मुंबई-पुणे लोहमार्गावरील कर्जत रेल्वे स्टेशन पासून ८ किमी. अंतरावर कडाव गांव आहे. कर्जतहून कडावला जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे.

 

नागपूरची वेधशाळा
शहरे आणि गावे

नागपूरची वेधशाळा

Category:

 

वेधशाळेची स्थापना प्रथम मेयो इस्तितळात करण्यात आली. भारत सरकारच्या हवामान विभागाच्या नियंत्रणाखाली १९ एप्रिल १९४३ ला सोनेगाव (विमानतळ )येथे वेधशाळा सुरु झाली.