संजय बेलोसे

बेलोसे, संजय

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात यशाची पहाट फुलत असावी आणि त्याच वेळी त्याचे आयुष्य संपावे, हा दैवदुर्विलास शनिवारी रात्री घडला. यावेळी काळाचा घाला पडला तो संजय बेलोसे या कल्पक लेखकावर! यांच्या प्रतिभेने नुकती कुठे भरारीला सुरुवात केली असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

कोकणातल्या दापोली तालुक्यात, ‘सानेगुरुजींचे गाव’ अशी ख्याती असलेल्या पालगड या गावी संजय यांचे बालपण गेले. दापोली येथे त्यांचे शिक्षण झाले. मुंबईत आल्यानंतर संजय बेलोसे यांनी अभिनयाचे विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या विजया मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली काही नाटकांत कामे केली. त्यांनी अभिनय केलेले ‘नागमंडल’ हे नाटक विशेष गाजले. या काळात त्यांच्यावर बाईंच्या दिग्दर्शनाचा प्रभाव पडला नसता तरच नवल! संजय बेलोसे यांनी या कालावधीत प्रचंड निरीक्षण केले. ‘पगला घोडा’ हे नाटकही त्याच काळातले. त्यानंतर ‘लफडं सोळातलं’ आणि ‘खरंच, माझ्यासाठी?’ या दोन नाटकांसाठी तर त्यांना अभिनयासाठीचा नाटय़दर्पण पुरस्कारही मिळाला. संजय बेलोसे यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी केवळ अभिनय एके अभिनय न करता आपल्या प्रतिभेला इतर मार्गानीही वाव दिला. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेली अनेक नाटके गाजली. ‘घर आईचं’, ‘लढ बापू लढ’, ‘मोस्ट वॉण्टेड’ ही काही नाटके वानगीदाखल सांगता येतील. ही नाटके प्रेक्षकांच्या पसंतीला तर उतरलीच, पण त्यातील गुणात्मक मूल्यामुळे त्यांनी समीक्षकांचीही पसंती मिळवली. ‘भैरू पहेलवान..’ या चित्रपटाच्या संवादलेखनात त्यांचा सहभाग होता. त्यात त्यांनी छोटी भूमिकाही केली होती. याच दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीही त्यांचा दरवाजा ठोठावत होती. नीरज व्होरा यांच्यासाठी त्यांनी ‘फिर हेराफेरी’ आणि ‘खट्टामिठा’ हे दोन चित्रपटही केले. नुकताच त्यांचा ‘काय करू नि कसं करू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एका मोठय़ा संघर्षांनंतर आयुष्यात स्थैर्य येत असतानाच अपघाताने गाठले आणि या कलाकाराची अनपेक्षित एग्झिट झाली.

Author