सुधीर माईणकर

माईणकर, सुधीर

‘तबला वादन : कला और शास्त्र’ हे हिंदी पुस्तक आज देशभरच्या हिंदुस्थानी संगीत विद्यालयांत क्रमिक पुस्तकाच्या दर्जाचे ठरले आहे. त्याचे लेखक म्हणजे पं. सुधीर माईणकर. पंच्याहत्तरीनिमित्त उद्याच्या शनिवारी त्यांचा होणारा सत्कार, हा त्यांना ‘प्रसिद्धी’ देणारा अपवादात्मकच सोहळा ठरेल. एरवी, प्रसिद्धी आणि ‘कीर्ती’ या किती निरनिराळय़ा गोष्टी आहेत, हे पाहायचे असेल तर सुधीर माईणकर यांच्या कारकीर्दीकडे पाहावे! तबलावादक म्हणून नाव कमावण्याची संधी असूनही सांगीतिक विद्वत्ता वाढवण्याची अवघड वाट माईणकर यांनी स्वीकारली.

‘अनेकांना ऐकता आले, त्यांनी संगीतात शोधलेली सौंदर्यस्थळे तबल्यात शोधून पाहाता आली,’ याचेच समाधान पं. माईणकर यांना अधिक आहे.. असे समाधान मिळवणारा गुरू विद्यार्थ्यांना थोडक्या काळातही किती भरभरून देऊ शकतो, याचा प्रत्यय मुंबईच्या राष्ट्रीय संगीत नाटय़ केंद्रात (एनसीपीए) माईणकर यांच्या तबला कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या अनेक तरुण वादकांना तसेच देशभरच्या विद्यापीठांत संगीताचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनेकांना आला आहे. ‘तबल्याचे व्याकरण, भाषा आणि सौंदर्यशास्त्र यांचा सखोल अभ्यासक’ ही माईणकर यांची प्रसिद्धी नव्हे, तर सिद्धीतून आलेली कीर्ती आहे. ‘..कला और शास्त्र’च्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळय़ाला झाकीर हुसेन मुद्दामहून आले, ते त्यांना ही कीर्ती जवळून माहीत होती, म्हणूनच. वडील विष्णुपंत यांचा तबल्याचा नाद शालेय वयातच अंगी मुरलेल्या सुधीर यांनी बडम्े गुलाम अली, डी. व्ही. पलुस्कर, ॐकारनाथ ठाकुर, केशरबाई केरकर आणि आमीर हुसेनखाँ यांसारख्या दिग्गजांना ऐकले. तरुणपणी तबल्याची ‘गत’ हा त्यांचा खास अभ्यासविषय झाला, तो तबल्यातील दिल्ली घराण्याचे खलीफा इनाम अली खान यांची शागिर्दी केल्यानंतर. अजराडा, बनारस आदी घराण्यांचा बाजही त्यांनी अभ्यासला, पण ‘दाया’वर केवळ तर्जनी व शेजारचे बोट ठेवून तालाचे चापल्य आणि शुद्धता राखणारा दिल्ली घराण्याचा ‘चटिका बाज’ ही माईणकरांची खास शैली. गुरू म्हणून त्यांचे इनेगिने शागिद आहेत. परंतु अनेक विद्यार्थी आणि अभ्यासक यांनाही पं. माईणकर गुरुस्थानीच आहेत व राहतील.

Author