(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक परीस स्पर्श (भाग – २३)

    आज विजयचा पाय प्रचंड दुखत होता. त्यात मरणाच्या थंडीमुळे अधिकच त्रास होत होता. पायात थोडी सुजही होती. शरीरातील सर्व सांध्यात थोड्या थोड्या वेदना जाणवत होत्या. कशामुळे काय दुखतंय तेच कळत नव्हतं. त्यामुळे विजय लांब पाय करून खुर्चीत बसला होता.

      March 1, 2022


  • हसताना पडते तिला गोड खळी

    १९९० च्या जून महिन्यातील मुंबईची सकाळ.. आमचं ‘सूडचक्र’ चित्रपटाचं सर्व युनिट ‘किरण’ बंगल्यावर पोहोचलं. दहा वाजता मुहूर्ताचा नारळ वाढवून, शुटींगला प्रारंभ झाला.. लेडी इन्स्पेक्टरच्या गेटअपमध्ये ती कॅमेऱ्यासमोर आली आणि मी पहातच राहिलो.. ती होती चित्रपटाची डॅशिंग नायिका, वर्षा उसगांवकर!!

      March 10, 2022


  • अजब न्याय नियतीचा – भाग ३

    तोपर्यंत आरूला अंदाज आला होता की हा आता आपल्याला काय विचारणार आहे. पण ती एकदम गंभीर चेहेरा करून नीलला म्हणाली, “नील तू एक चांगला मुलगा आहेस, माझा जवळचा मित्र आहेस. आपण आपल्या आयुष्यातील खूप आनंदाचे क्षण एकमेकांसोबत शेअर केले आहेत.

      September 24, 2019


  • ओवणे, पटवणे, गाठवणे

    मंगळसूत्र मण्यांच्या आकारानुसार दोर वळली जायची. दोन पदरी साठी चार दोऱ्या व लांबी पण ठरलेली. पायाच्या पिढंरीवर पाणी लावून दोर वळली की मग चारपदरी दोर आणि ते सगळे एकत्रित करून दोन सोन्याचे मणी नंतर दोन सोन्याच्या वाट्या मध्ये एक मणी परत दोन वाट्या असे ओवून झाले की मग तीन पदर पायाच्या अंगठ्याला पीळ देऊन अडकवून एक पदरी दोऱ्या काळे मणी ओवून मग असे आळीपाळीने चार पदर ओवून झाले की देवा समोर पाट मांडून घरातील एखाद्या मोठय़ा सवाष्णी कडून त्या मंगळसूत्राला हळदीकुंकू लावून बांधून घेवून झाले की देवाच्या व त्या बाईच्या पाया पडायला लागायचे.

      July 15, 2022


  • मृत्युची चाहूल

    अनेक गंभीर व असाध्य आजार असलेल्या रोग्यांना मृत्युशयेवर असताना त्यांच्या शारीरिक व्याधी तपासण्याचा योग येत असे. तशीच त्यांची त्याक्षणाची मानसिकता समजण्याचे बरेच प्रसंग आले. एक वैद्यकीय अभ्यासक म्हणून स्वानुभवाने त्यांच्याकडे लक्ष्य केंद्रीत करीत होतो. व्यक्ती मृत्युची चाहूल लागताना, कोणते विचार करीते.? कसे वागते ? हे गंभीरपणे बघू लागलो. त्यावर लिखाण केले. अनेक रोग्यांकडे त्या दृष्टीकोणातून अभ्यास करीत गेलो. मृत्यु अचानक येतो. मृत्यु घाला घालतो. मृत्यु अनिश्चीत असतो, परंतु निश्चीत येतो. मृत्यु कोणतीही सुचना न देता येतो. अनेक अनेक ही वाक्ये ऐकतो. ती वाचलेली होती, ऐकलेली होती. कांही व्यक्तींचे मृत्यु जवळून बघण्याचे प्रसंग आले व हाताळले गेले. मृत्यु हे जीवनाचे अंतीम सत्य आहे. त्याला माणसे त्याक्षणी कशी सामोरी जातात, ह्याचे मी सतर्कतेने अवलोकन करुं लागलो. कांही टिपणी केल्या. मात्र काय खरे असेल, ह्यावर वैचारीक साराशं काढणे कठीण गेले.

      August 13, 2011


  • तुझ्या गळा, माझ्या गळा

    “तुझ्या गळा
    माझ्या गळा
    गुंफू मोत्यांच्या माळा'
    “ताई, आणखि कोणाला ?'
    “चल रे दादा चहाटळा ! ॥१॥

    “तुज कंठी
    मजअंगठी !
    “आणखि गोऽफ कोणाला?"
    “वेड लागले दादाला !'
    “मला कुणाचे ? ताईला !' ॥२॥

    “तुज पगडी
    मज चिरडी !
    “आणखि शेला कोणाला ?'
    “दादा, सांगूं बाबाला ?'
    “सांग तिकडल्या स्वारीला !' ॥1३॥

    खुसू खुसू
    गालि हंसू -
    वरवर अपुले रुसू रुसू !'
    “चल निघ, येथे नको बसू
    “घर तर माझे तसू तसू ॥४॥

    कशी कशी
    आज अशी
    गंमत ताईची खाशी !'
    “अता गट्टी फू दादाशी'
    “तर मग गट्टी कोणाशीं?' ॥ ५॥

      June 14, 2026


  • जगण्याचा आस्वाद घेणारा.. मध्यमवर्गीय!

    अजून पन्नास वर्षांनी ‘मध्यमवर्गीय’ हा शब्द गुगलमध्ये सर्च करायला गेलं तर ‘उत्तर’ मिळण्याची शक्यता फारच कमी असेल हे मात्र नक्की!!!

      November 1, 2021


  • कविता…

    त्यावर ती गोड आवाजात मी कविता ! म्हणताच मला चक्कर येऊन मी जमिनीवर कोसळलो ! जाग आली तेव्हा ती माझ्या समोर उभी होती आमच्या मागच्या जन्मातील अपूर्ण कामाची यादी हातात घेऊन… लेखक – निलेश बामणे

      July 11, 2017


  • समोरच्या खिडकीतला तो..

    सकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर यायची. कुत्रे भुंकायचे, तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंईऽकुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो.

      May 14, 2022


  • बाहुली! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’तुन – ३

    ते एक खेळण्याचे दुकान होते. काचेच्या शोकेस मध्ये खेळणी मांडून ठेवली होती. त्यात सुंदर बाहुल्या, लाकडी रंगीत घोडे, उंट, खेळातली भांडी अजून काहि काही गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. येणारी लहान मुलंच काय, मोठी माणसं पण पहाण्यात रंगून जात.दुपारची वेळ होती. दुकानात गिऱ्हाईक नव्हते. मालकाने नौकरास जेवण करून घेण्यास सांगितले. त्याचे जेवण झाल्यावर, मालक जेवायला निघून गेला.

      December 3, 2020