(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आज सोचा तो…’ – वाताहतीचे अर्काइव्ह !

    “आत” मध्ये कोलाहल सतत सुरु असतात. दरवेळी नव्या सूर्याच्या स्वागताला बाहेरच्या अंगणात जाणं जमतंच असं नाही. तो सूर्यही तसा झाकोळलेलाच असतो. मागच्या परसदारातील किंचित काळोख्या तुळशीवृंदावनापाशी तिचा संयत सूर सापडतो. काल-परवा घडून गेलेल्या, पुसट न झालेल्या काळाच्या गोधड्या पुकारत असतात आणि त्यांच्या घट्ट उबेत बरंच काही पुनःपुन्हा साचत असतं, सापडतही असतं. “हसणाऱ्या जखमा” नामक काव्यात्म नांव घेऊन आलेला चित्रपट बघायलाच पाहिजे या श्रेणीतला त्या काळात वाटला नाही.

      January 1, 2021


  • छत्री (मी आणि ती कथा)

    पाणी अंगावर उसळत होते . पण कमी भिजण्याचा नादात… पार एकत्र झालो होतो.

      September 10, 2021


  • शेजारधर्म

    प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ याने सर्वप्रथम पृथ्वी हीच सूर्याभोवती फिरते असा शोध लावला. त्याच्या आधी 'सूर्य हाच पृथ्वीभोवती फिरतो' हाच सार्वत्रिक समज होता. त्यामुळे गॅलिलिओच्या था शोधाला अर्थातच प्रचंड विरोध झाला. त्या काळच्या धर्ममार्तंडांनी तसेच कर्मठ लोकांनी गॅलिलिओविरुद्ध मोहीमच उघडली.

    सामान्य नागरिकही गॅलिलिओला शिव्या देण्यात तसेच त्याची निंदानालस्ती करण्यात आघाडीवर होते. त्यामध्ये गॅलिलिओचा शेजारीही होता. त्याने तर गॅलिलिओवर बहिष्कारच टाकला होता. त्या शेजाऱ्याचा तरुण मुलगा आजारी पडला व दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली. गॅलिलिओला हे कळल्यावर त्याने त्याच्या ओळखीच्या नामांकित डॉक्टरची भेट घेतली व त्याला घेऊन तो शेजाऱ्याच्या घरी आला. दरवाजा ठोठावल्यानंतर त्या शेजाऱ्यानेच दार उघडले व गलिलिओला पाहिल्यावर कसलाही न विचार करता त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली.

    त्याच्या शिव्या संपल्यानंतर गॅलिलिओ शांतपणे त्याला म्हणाले, 'मी तुझ्या मुलाचा गंभीर आजार ऐकून त्याच्यावर उपचार करण्यासाठी एक नामांकित डॉक्टर घेऊन आलो आहे.'

    ते ऐकून तो शेजारी वरमला व त्याचवेळी त्याला हीही जाणीव झाली, की आपण त्या नामांकित डॉक्टरचे बिल देण्यास असमर्थ आहोत, शेजाऱ्याने आपणास डॉक्टरची फी परवडणार नाही म्हणून उपचार नकोत असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅलिलिओ त्याला लगेच म्हणाला, 'तुम्ही पैशाची काळजी करू नका कारण तुमचा मुलगा आजारातून वाचणे हे महत्त्वाचे आहे व शेजारधर्म म्हणून माझे ते कर्तव्य आहे. त्यामुळे डॉक्टरांची फीज व औषधाचा खर्च मीच करणार आहे.'

    ते ऐकून तो शेजारी फारच खजिल झाला व गॅलिलिओला म्हणाला, 'मी तुम्हाला रोज शिव्या देऊनही तुम्ही माझ्या मुलाला वाचविण्यासाठी एवढा खर्च करायला कसे तयार झालात?'

    त्यावर गॅलिलिओ म्हणाला, 'सूर्य पृथ्वीभोवती फिरी की पृथ्वी सूर्याभोवती फिरो' हे आपल्या शेजाऱ्यामधील वैर निर्माण होण्याचे कारण होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने चांगला शेजारधर्म पाळणे आवश्यक आहे व तो पाळण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही तुमचा शेजारधर्म (शिव्या देण्याचा) पुढेही पाळलात तरी त्याला माझी हरकत नाही. ''

      February 25, 2017


  • समर्थ विचार/ (१) (नेतृत्व गुण)/ पराजयाची कारणे

    बिजापुरचा सरदार अफजलखान शिवाजीवर चालून आला. शिवाजीने घाबरण्याचे सोंग घेतले. अफजलखानास खूष करण्यासाठी सोने-चांदी, हिरे- जवाहराताने भरलेले नजराण्यांचे ताटे अफजलखानास पेश केले. अफजलखानास वाटले शिवाजी घाबरला. त्याला शत्रूचे मनोगत कळले नाही. तो शिवाजीस भेटण्यास प्रतापगड्याच्या पायथ्याशी येऊन पोहचला. पुढे काय झाले हे सांगण्याची गरज नाही. असाच काहीसा प्रकार त्या योगीपुरुषा बरोबर दिल्लीत घडला. आधी आदर-सत्कार नंतर …

      June 25, 2011


  • श्री देवेंद्रनाथ महाराज – एक महान विभूती

    आपली भारतभूमी ही साधुसंतांच्या वास्तव्याने पावन झालेली मंगलभूमी आहे. ईश्वरी साक्षात्कार हेच सर्वोच्च मूल्य मानून त्याच्या प्राप्तीसाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले अशा हजारो सत्पुरुषांची ही कर्मभूमी आहे.

      August 20, 2024


  • निसर्गाची अशी ही खेळी

    क आमेरिकेच्या वैद्यकीय मासिकांत, वैद्यकीय जीवशास्त्र Biomedical Science ह्याच्यावर आधारीत एक अहवाल वजा लेख वाचण्यांत आला. लेख मनोरंजक परंतु खुप माहीतीपर होता.

      March 15, 2013


  • उगाच काहीतरी – ११ (भारतीय शालेय वर्ष – एक (रिकामटेकडा) विचार)

    भारतातील शिक्षण व्यवस्था ही इंग्रजांनी बनवलेल्या प्रमाणे चालते आहे. त्यात आपले शालेय वर्षाचा कालावधी पण येतो जसं पावसाळा ते हिवाळा शाळा आणि उन्हाळ्यात सुट्ट्या. तसं पाहायला गेलं तर अशी रचना त्यांनी त्यांच्या सोयीसाठी बनवली होती त्याला माझ्या माहिती प्रमाणे एक प्रमुख कारण होतं भारतातील कडक उन जे इंग्रजांना सहन होत नव्हते. त्यासाठी ते भर उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी मुक्काम ठोकत आणि त्याच प्रमाणे त्यांनी शालेय वर्ष पण योजले होते.

      August 27, 2022


  • फेका’डे भाऊजी

    मल्टी लेव्हल मार्केटिंग’ म्हणजेच ‘मला लोंबकळलेली माणसं’.. अशा स्किममध्ये आपल्याला अडकवणारे, नंबर एकचे ‘फेकाडे’ असतात.. माझा इयत्ता पहिलीतला मित्र, माझ्या पन्नाशीत मला भेटला. त्यानं जनरल चौकशीनंतर, विषयाला हात घातला. तो म्हणाला, ‘आतापर्यंत खरं तर तू, तुझ्या कारमधून फिरायला हवा होतास.. अजूनही वेळ गेलेली नाही.. तू माझ्या स्किममध्ये सहभागी हो.. काही महिन्यांतच कारमधून फिरशील..’ मला ओशाळल्यासारखे झाले.. एवढं कळकळीनं सांगतोय, तर प्रयत्न करुन बघू.. म्हणून मी सहभागी झालो.. आठवड्यातून तीन वेळा सेमिनारला जाऊ लागलो. कळसूत्री बाहुलीप्रमाणे, लेक्चर देणाऱ्याच्या इशाऱ्यावर टाळ्या वाजवू लागलो.. दरवेळी एखाद्या नवीन मित्राला, ‘बकरा’ करुन घेऊन जाऊ लागलो.. महिन्याभरातच, माझ्याखाली कुणालाही जोडू न शकल्याने स्किममधील पैसे वाया गेले आणि मी नैराश्यात गेलो..

      June 5, 2022


  • भय अजून संपत नाही

    आता हे सगळे प्रश्न भिती पोटीच निर्माण झाले असतील. ऑनलाईन शिक्षण चालू होते तेव्हा या गोष्टींना मुकलेले विद्यार्थी असेच विचार करत असतील असे मला वाटते. घरातील एका ठिकाणी बसून मोबाईल वर बसून शिकणे. थोडा वेळ झाला की काही तरी खाणे. थोडे उशिरा उठणे. घरातील लोकांबरोबर जेवणे. अभ्यास करणे. लिहिणे. आणि बऱ्याच गोष्टी करतांना काही तरी सांगायच होत त्याला पण तो बोलत नव्हता.

      July 12, 2022


  • उंची त्याने गाठून पाहिली (सुमंत उवाच – १०६)

    सुमंत जयंत परचुरे. 

    संभाजी महाराजांच्या काळात म्हणजेच १६८० मार्च नंतर ते १६८९ सुरुवातीपर्यंत अनेक लढाया झाल्या. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर जणू डोलत होते. औरंगजेब सारखा विषारी सर्प स्वराज्याला चारही बाजूने विळखा घालून बसला होता.

      December 26, 2021