नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
विनोदी लेख
November 1, 2010
December 12, 2022
मुकुंद अमेरिकेहून सुट्टीसाठी घरी आला होता. त्याला जेमतेम पंधरा दिवसांची सुट्टी मिळाली होती. घरात त्याचे आई वडील दोघेच होते. तो बघत होता की आई वडील घरातली सगळी कामे स्वतःच करत होते. रोज दूध आणणे, भाजीपाला आणणे, इस्त्रीचे कपडे टाकणे आणि घेऊन येणे आणि बँकेत जाणे.
August 19, 2024

महानगरातली रात्र. लखलखणाऱ्या दिव्यांची दिवाळी असल्यासारखी सजलेली. पण त्या सर्व गजबजाटापासून दूर असलेला, समुद्र किनाऱ्यालगत असलेला, श्रीमंत समजल्या जाणाऱ्या वस्तीतला एक बंगला. या बंगल्याला असलेली अखंड सोबत समुद्राच्या गाजेची.
December 23, 2025
शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कोणीच कामाला सुरवात करत नाही . तसा तो खाऊन आम्ही रोजच्या प्रमाणे आजही सुरवात केली . पण आज काहीसा वेगळाच दिवस होता .
April 1, 2018
ठरल्याप्रमाणे मी खाँसाहेबांच्या टीम बरोबर गोव्याला गेलो. त्या समारंभासाठी खाँसाहेबांनी माझ्यासाठी अन्वरसारखाच सुंदर जोधपुरी ड्रेस घेतला होता. विमानतळावर उतरल्यापासून आमचा ताबा ‘पंचरंग’च्या गोवा शाखेने घेतला होता.
आणि इथेच, माझा वासंतीशी परिचय झाला. पाहता क्षणीच माझ्या मनीची राजकुमारी, हीच असे मला वाटले. अत्यंत तरतरीत, बोलके डोळे, गोरीपान, हसतमुख असे तिचे व्यक्तिमत्त्व पाहता क्षणीच प्रेमात पडावे असे होते. गोव्याच्या सर्व व्यवस्थापनाचे काम तिच्याकडेच होते. संपूर्ण कार्यक्रमात खाँसाहेबांच्या आग्रहानुसार माझ्याकडे खास लक्ष पुरविऱ्यात येत होते. मला अगदी लाजल्यासारखे झाले पण त्यामुळे एक मात्र झाले वासंतीचा सहवास मला पदोपदी मिळत होता. खाँसाहेबां
July 19, 2022
युरोपात फिरण्यासाठी सिझन चांगला म्हणून मे महिन्यात,हा एकच हेतू ठेवून केलेली टूर पण यथावकाश तारखा बघितल्यानंतर आमच्यासाठी ‘सोने पे सुहागा’ अशी ठरली. आत्तापर्यंतच्या आयुष्यात लग्नाच्या वाढदिवसाला कधीच ठरवून असे मुद्दाम कुठेही गेलो नव्हतो आम्ही. पण यावेळी योगायोगाने थेट स्वित्झर्लंड मध्येच.आणि तेही माउंट टिटलिस ला!माझा विश्वासच बसत नव्हता,पण खरे होते हे!
January 5, 2019
उन्हाळी सुट्टीत गावी गेल्यावर पुण्यात यायला जून उजडायचा.. पहिला वळीव पाऊस अनुभवताना, अतोनात आनंद मिळायचा. त्या पावसात गाईचं वासरुं शेपटी वर करुन हुंदडताना पाहिलेलं आठवतंय.. पाऊस उघडल्यावर सवंगड्यांसोबत हनुमान झऱ्यातून खेकडे पकडायला लांबवर गेलेलो आहे.. शेतातून चालताना चिखलाचा थर, जाडजूड चप्पल घातल्यासारखा पावलांना लागायचा…
July 5, 2022
एक राजा होता. तो खूपच पराक्रमी होता. जेवढा पराक्रमी तेवढाच प्रजाहितदक्ष. प्रजेच्या फायद्यासाठी त्याचे सारखे प्रयत्न चालू असायचे. त्यामुळे प्रजाही राजावर खूश होती. असा राजा जन्मोजन्मी मिळो अशीच प्रार्थना प्रजा करीत होती. राजा पराक्रमी असल्यामुळे त्याने अनेक राजांना आपले मांडलिक बनवले होते. त्या मांडलिक राजांकडून राजाला वेळोवेळी धन व संपत्तीचा पुरवठा होत असे. त्यामुळे राजाचा खजिना नेहमीच भरलेला असे. राजाची आर्थिक बाजू भरभराटीला असल्यामुळे राज्यात सुबत्ता होती. दुष्काळातही प्रजेचे फारसे हाल होत नसत. राजाच्या राज्यात एकूणच सर्वत्र आबादीआबाद होते. राजाला याच गोष्टीचा फार अभिमान होता. या अभिमानाचे रूपांतर हळूहळू अहंकारात व नंतर गर्वात झाले. पुढे पुढे हा गर्व राजाच्या आचरणातही दिसू लागला. एकदा राजधानीत एक मोठे साधूमहाराज कोठून तरी आले. साधूमहाराज अतिशय निरिच्छ वृत्तीचे होते.दर्शनासाठी वा भेटायला आलेल्या लोकांकडून ते काहीही घेत नव्हते.
राजधानीत त्यांची प्रसिद्धी वाहू लागली व त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची रांगही वाढू लागली. या साधूमहाराजांची महती राजाच्याही कानावर गेली. त्यामुळे एकदा राजाही त्या साधूला भेटायला गेला व म्हणाला, 'तुम्ही मागाल ते मी द्यायला तयार आहे; मात्र तुम्ही ते स्वीकारले पाहिजे. माझा सारा खजिना, सारे राजवैभव इतकेच काय माझे शरीरही तुम्हाला द्यायला तयार आहे. यापैकी तुम्ही काहीही स्वीकारू शकता ?' त्यावर साधूमहाराज राजाला म्हणाले, ' राज्याचा खजिना तर
प्रजेच्या मालकीचा आहे. त्याचा तू केवळ राखणदार आहेस. तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नीचा तसेच तुझ्या मुलाबाळांचा हक्क आहे. ' साधूच्या या उत्तरामुळे राजा गोंधळला व म्हणाला, ' 'मग माझी स्वतःची अशी कोणती भेटवस्तू तुम्हाला देऊ हे तुम्हीच मला सांगा. ' त्यावर साधूमहाराज राजाला म्हणाले, ' 'तुझ्या मनातील अहंकार हा सर्वस्वी तुझाच आहे. त्याचे दान तू मला करू शकतोस. '' साधुमहाराजांच्या या
उत्तराचे मर्म राजाला समजले व त्याने अहंकार सोडून देण्याचा निश्चय केला.
January 3, 2018
सदुसष्ट वर्षांच्या या जीवन प्रवासात प्रसंगी पुण्यातील फुटपाथवर झोपलेला हा माणूस अमेरिकेत जाऊ शकतो हे कुणाला सांगितलं तर, खरं वाटेल का? जर माणसाच्या अंगी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम करण्याची तयारी, दृढ आत्मविश्वास आणि जिवलग मित्रांचा सहवास असेल तर सर्व काही शक्य आहे.
October 30, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti