नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
खेळण्यातला लाकडी ट्रक घेऊन धावत येणाऱ्या सावलीला बघून बाबा थांबला . डोक्यावरचे मक्याच्या कणसांचे पोते खाली ठेवले आणि घाम पुसत उभा राहिला . सावलीने त्या पोत्यातली तीन कणसे ट्रकमध्ये ठेवली आणि दोरीने बांधलेला ट्रक घेऊन ती निघाली . बाबा तिथेच थांबलेला बघून तिने कमरेवर हात ठेवले आणि ठसक्यात म्हणाली , ” दमतोस ना म्हणून म्हणते एकट्याने काम करू नको , आता मी करते मदत . तू ये हळूहळू. “
June 30, 2025
मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता .
वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती .
December 15, 2022

अयोध्या नगरीचा अवघा आसमंत रंगीत दीप आणि दीपमालांनी प्रकाशमान झाला होता. आकाशातील द्वितीयेचा चंद्र आज जरा जास्तच तेजस्वी जाणवत होता. शरयूच्या तीरावरून येणाऱ्या सुखद गारव्यामुळं वातावरण प्रसन्न वाटत होतं. सर्वत्र उभारलेल्या राहुट्यातून , मंदिरांच्या प्रांगणातून , शरयू नदीच्या किनाऱ्यावरून केवळ आणि केवळ राम धून ऐकू येत होती.
October 4, 2020
१९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘गरीबाघरची लेक’ या चित्रपटापासून कमलाकर तोरणे यांची कारकिर्द सुरु झाली. त्यांचं वाचन दांडगं होतं. पन्नासच्या दशकातील ‘वुई आर नो एंजल्स’ या गाजलेल्या इंग्रजी चित्रपटावरुन मराठी चित्रपट करण्याचे त्यांनी ठरविले. १९६८ साली त्यांचं ते स्वप्नं ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ द्वारे प्रत्यक्षात उतरलं..
May 30, 2022
“बळींचा प्रवाहो चालला !” या नावाची कथा मी लिहिली होती – माझ्या वालचंदच्या मित्रावर ! सरकारी नोकरीच्या बरबटलेल्या व्यवस्थेने घुसमट झालेल्या माझ्या कविमित्रावर – जो कालांतराने शेवटी या व्यवस्थेचा भाग झाला . त्याच्याकडे पर्याय नव्हता.
June 4, 2021
काल बागेत फिरताना आमच्या सोसायटीतील एका शेजर्याने मला संगितले की त्याचा मुलगा एका महागड्या शाळेत शिकतो. त्या शाळेच्या बसेस ही एसी आहेत. तरीही त्याला कोचिंग लावावे लागले आहे. आश्चर्य म्हणजे त्या कोचिंग इंस्टीट्यूट मध्ये तोच शिक्षक शिकवतो जो शाळेत शिकवतो. – त्या वरुन सुचलेली कथा
April 25, 2026
माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते? तसे काहीच झाले नसते. माईक नव्हता तेव्हा सभा, बैठक होतच होत्या की! महाभारताच्या युध्दात माईक नसतानाही इकडचे सेनापती आणि तिकडचे सेनापती आपआपल्या बाजूंच्या सैनिकांना इन्स्ट्रक्शन देतच होते की! त्यामुळे माईकचा शोध लागला नसता तरी काहीच फरक झाला नसता..
October 28, 2013
अजूनही पुढे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या टाटांच्या ‘मोती’ साबणाशिवाय भारतीय नागरिकाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटणारच नाही.. हीच तर खरी ‘स्वदेशी’ची जादू आहे!!!
November 5, 2021
अटक स्त्रीला आपल्याला अटक झाल्याबद्दल सोयर सुतक काहीही नसे. आपण उघड्यावर पडलो नाही यावरच ती समाधानी. दिवसभरात जामिनावर कोणीतरी सोडवायला येइल याची तिला खात्री असायची.
त्यावेळी स्त्री अरोपींसाठी कुर्ला पोलिस ठाण्यात पोलिस कोठडी नव्हती.
January 13, 2023

गोष्ट, खरं तर घटना आहे १९८६ मधली. आम्ही तेंव्हा बदलापूरला रहात होतो, आणि मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वडाळा येथील एका कार्यालयात तीन शिफ्ट मधे काम करत होतो. ही घटना घडली त्या दिवशी मला सकाळी आठ ते रात्री आठ अशी दिवस पाळी होती. संध्याकाळचे सात वाजून गेले होते. दिवसभराच काम आटोपून आणि लॉगबुक पूर्ण करून मी फ्रेश होऊन मला सोडवायला येणाऱ्या सहकार्याची वाट पहात होतो. सोबतीला असलेल्या चार्जमनने केलेल्या चहाचे घुटके घेत चार्जमन बरोबर गप्पा मारत होतो.
July 3, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti