(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पिल्लू (कथा)

    कोणत्यातरी गावाचं क्रॉसींग होतं तिथे थोडा वेग कमी झाला पण परत गाडी फोर्थ गिअर मधे घेतली व वेग आणखीन वाढवला. अचानक माझ्या शेजारी को-ड्रायव्हर सीट वर बसलेली मनी स्टिअरींग ला गच्च धरत आणि डोळे मिटत अचानक ओरडली

      May 11, 2021


  • अपण्णक जातक

    वाराणशीचे राज्य. राजाचे नाव ब्रह्मदत्त. या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या
    कुळात बोधिसत्त्वाचा जन्म झाला. बोधिसत्त्व मोठा झाला. देशोदेशी हिंडून
    व्यापार करू लागला.

      December 25, 2024


  • माशी ग माशी…….!!!

    माशी ग माशी

    मानू तुझे आभार कसे?

    अशीच बसत जा तू,

    सगळ्यांना कर वेडे-पिसे…………!!!

      July 5, 2014


  • अजब न्याय नियतीचा – भाग १४

    दुसऱ्या दिवशी सकाळी, चहा नाष्टा झाल्यावर सगळ्यांनी गढीवर जायचे ठरले. वाटेत मॅनेजर केळकर आणि गढीतील विहीर बुजवायचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्यासोबत गढीवर येणार होता. ठरल्याप्रमाणे वाड्यावरून निघताना दीने केळकरांना फोन करून मंदिराच्या पायथ्याशी थांबण्यास सांगितले. थोड्याच वेळात ते पायथ्याशी पोहोचले. केळकर दुसरी गाडी घेवून आले होतेच. मग सगळेजण बरोबर गढीच्या दिशेने निघाले. आरूला आणि नीलला कधी एकदा गढीपाशी जातो असे झाले होते. थोड्याच वेळात ते सगळे गढीच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचले. लांबून पाहून गढी किती मोठ्ठी असेल याचा काहीच अंदाज आला नव्हता. पण मुख्य दार आणि बाजूची तटबंदी पाहिल्यावर गढीची भव्यता नजरेत मावत नव्हती. भिंतीच्या टोकाला दोन्ही बाजूला मोट्ठे भक्कम ३५ ते ४० फूट उंचीचे बुरूज होते. गढीची दर्शनी भिंत आणि बुरूज यांचे २० फुटा पर्यंतचे बांधकाम दगडी होते आणि त्यावर उरलेले बांधकाम विटातील केलेले दिसत होते. गढीच्या तटबंदीवर आणि बुरुजावरील सज्जात बंदुकी ठेवायला केलेल्या जंग्या दिसत होत्या. काही ठिकाणी कोनाडे दिसत होते. तटबंदीच्या कपारींमधून लहान मोठी झुडुपे डोकावत होती.

      September 28, 2019


  • वरुणपुत्र भृगची गोष्ट

    वृक्षतोड हेच महान पाप आहे असे सांगणारी एक कथा ‘शतपथ ब्राह्मणात’ आली आहे. भृगुऋषी हा वरुणाचा मुलगा होता. त्याला आपल्या विद्येचा इतका गर्व झाला की, वरुणापेक्षाही आपण जास्त विद्वान आहोत असे त्याला वाटू लागले.

      November 15, 2025


  • माझे आजोळ – भाग २ – शिस्तप्रिय आजोबा (आठवणींची मिसळ ३०)

    पणजोबा असतांना एकदा सुप्रसिध्द सरन्यायाधीश श्री छागला हे त्यांना भेटायला घरी आले. न्यायमूर्ती तेंडोलकरांचे ते मित्र आणि सहकारी. कोल्हापूरात काही कामानिमित्त आले होते. ते आवर्जून पणजोबांच्या भेटीला येणार होते. मग आजोबांनी आम्हा मुलांना कामाला लावले. कचेरी आणि बैठकीची खोली यांतली मोठी जाजमे ब्रशने साफ करून घेतली. दोन्ही खोल्यांमधे अनेक सुंदर तैलचित्रे मोठ्या मोठ्या फ्रेम्समधे लावलेली होती. त्यांच्याकडे आता दुर्लक्षच झालेली होतं. त्या उघडून चित्रं पूसून घेतली. मग ओल्या फडक्याने कांचा स्वच्छ करून घेतल्या. हे काम आम्हा तीन-चार मुलांना चार दिवस पुरलं.

      September 27, 2022


  • बेभान

    जेमतेम पाच फूट उंची . स्वच्छ पॅन्टशर्ट . डोक्यावर कॅप . मधूनच ती कॅप हातात घेऊन हलवण्याची मग डोक्यावर किंचित तिरपी ठेवण्याची सवय . कॅप काढल्यावर दिसणारे पांढरे शुभ्र केस आणि मिश्किल चेहरा …

      January 30, 2023


  • स्वॅब

    सकाळची नीरव शांतता. पक्ष्यांचा किलकिलाट सुरू झाला होता. सहा-सव्वासहा झाले होते. सूर्योदय व्हायचा होता. प्रकाश व अंधाराच्या सीमेवरील तेवढा संधिप्रकाश होता. रस्त्यावर अजूनही तशी वर्दळ नव्हतीच.

      February 10, 2024


  • मनाची श्रीमंती

    उत्तर प्रदेशातला एका नदीच्या खोऱ्यातला एक कुविख्यात दरोडेखोर. त्याचं सगळं आयुष्य दरोडेखोरीतच गेलं. त्याचा मुलगा पंधरा वर्षांचा झाल्यावर तो त्याला दरोडेखोरीचे प्रशिक्षण देऊ लागला. तसेच त्या व्यवसायाचे काही गुपित त्याने आपल्या मुलाला शिकवायला सुरुवात केली. शिकवताना तो आपल्या मुलास सांगत असे, “अरे, तुझ्या चोरीची सुरुवात चांगली व्हायला हवी. कुठेतरी जाऊन दरोडा घालशील आणि नवीन असल्यामुळे पोलिसांच्या हाती सापडून खडी फोडायला जाशील. असं होऊ नये म्हणून मी सांगतो त्याच ठिकाणी तू आयुष्यातली पहिली चोरी कर." असे म्हणून त्य दरोडेखोराने आपल्या मुलास एका जंगलात नेते व समोरच असलेली एका साधूची झोपडी त्याला दाखविली आणि म्हणाला, "हे तुझ्या पहल्या चोरीचं ठिकाण.” ती झोपडी पाहू मुलाने आश्चर्याने विचारले, "या झोपडीत गरी करून काय मिळणार?" त्यावर दरोडेखोर म्हणाला, "अरे, त्या झोपडीत चोरी केलीस तर तिथे पोलीस येत नाहीत. आणि दुसरं म्हणजे त्या साधूला लोकं सोनं, चांदी, फळं, पैसे इ. भरपूर भेटवस्तू देतात आणि तो साधू त्या वस्तू लोकांना वाटत असतो. जर तो सगळं लोकांना वाटणारच आहे तर त्या आपण का चोरून आणू नये? गेली पस्तीस वर्षे मी तिथे चोरी करतो आहे तरीही त्या साधूने कधीही पोलिसात तक्रार केली नाही.” हे ऐकून मुलाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "म्हणजे तुम्ही पस्तीस वर्षे चोरी करूनही त्या साधूला काहीही कमी पडलेले नाही. आणि तुम्हाला मात्र इतकी वर्षे झाली तरी अजूनही चोरी करावी लागते. याचा अर्थ असाच होतो की, सज्जनपणाने जगल्यानेच श्रीमंती प्राप्त होते. मग हा चोरीचा व्यवसाय करण्यापेक्षा मी त्या सांधूकडेच जाऊन राहतो.” असे म्हणत तो मुलगा साधूच्या झोपडीकडे चालायला लागला.

    तात्पर्य: कोणत्याही संकटात सज्जनांचे समाधान, श्रीमंती कधीच कमी होत नाही कारण ते मनाने श्रीमंत असतात.

      December 30, 2024


  • “वय” इथले संपत नाही

    “आपल्या खऱ्या वयापेक्षा कमी वयाचं दिसायचंय ?? कुठल्याही वयात असताना योग्य जोडीदार मिळवायचाय ?? .. नियमित “योग” करा , फीट रहा… “योग” केल्याचा असाही एक फायदा… “

      February 4, 2026