(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • देवभूमीतील पंचबद्री  – विशालबद्री किंवा बद्रीनाथ – भाग 2

    हे मूळ मंदीर कोणी व कधी बांधले याचे उल्लेख सापडत नाहीत. पण मिळालेल्या एका शिलालेखानुसार हे मंदीर २५०० वर्षांचे पुरातन आहे असा एक अंदाज निघतो. शंकराचार्यांनी या मंदिराचा बद्रीनाथाची मूर्ती स्थापन केल्यावर जीर्णोद्धार केला असावा. आजचे हे मंदीर कत्युरी राजाने बांधले व तिथे पूजा-अर्चा सुरू केली. त्यासाठी मंदिराला त्यांनी काही जमिनी इनाम दिल्या, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. पंधराव्या शतकात लिहिलेल्या आनंद रामायणात, "बद्रीकाश्रमे रामः केदारेश्वरः विलोक्यसः" असे उल्लेख आहेत तर इ.स. १६९५ सालातील मिळालेल्या राजमुद्रांवर "बद्रीनाथो दिग्विजयते सर्वदा” असे लिहिले आहे. काहीही असो, हे स्थान पुरातन आहे हे निश्चित. सर्वसाधारण या स्थानाचा उल्लेख 'बद्री-विशाल' असा केला जातो. या नावामागे वराह पुराणात एक कथा सांगितली आहे. सूर्यवंशी राजा विशाल शत्रूकडून पराजित झाला. दुःखीकष्टी राजा हिमालयात आला. त्याने भक्तिभावाने बद्रीनाथाचे पूजन केले व गंधमादन पर्वतावर जाऊन तो बद्रीनाथाची तपश्चर्या करू लागला. त्याची भक्ती पाहून बद्रीनाथाने त्याला दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. राजाने 'आपले राज्य परत मिळावे' अशी प्रार्थना केली. बद्रीनाथाने राजाला सामर्थ्य दिले. तसेच तुझ्या भक्तिमुळे लोक माझ्या नावापुढे तुझे नाव लावतील व जयजयकार करतील असाही वर दिला. बद्रीनाथाच्या वर प्रसादाने राजाला आपले राज्य परत मिळाले व बद्रीनाथाच्या वरप्रसादाप्रमाणे तेव्हापासून 'जय बदरी-विशाल' असा जयघोष सुरू झाला.

    मंदिरातून बाहेर पडल्यावर अलकनंदेच्या काठावर थोडी सपाट जागा आहे. त्याला 'ब्रह्मकपाल' असे म्हणतात. या ठिकाणी पितरांचे श्राद्ध केले जाते. 'या ठिकाणी श्राद्ध केल्यास भविष्यात श्राद्ध तर्पण करण्याची गरज नाही, पितरांना अक्षयमुक्ती मिळते' असे सांगितले जाते. एवढेच कशाला जिवंतपणी आपण आपले स्वतःचे श्राद्धसुद्धा या ठिकाणी करू शकतो असे सांगितले जाते. स्वत:चे श्राद्ध करण्याचीही पद्धत फक्त याच ठिकाणी पहायला मिळते. कोठियाल जातीचे ब्राह्मण हे विधी करतात.

    या परिसरातील पाच पाषाण खंड गरूडशिला, नारदशिला, मार्कण्डेय शिला, नृसिंहशिला व वराहशिला या नावान ओळखल्या जातात.

    मंदिराच्या बाहेर गरम पाण्याचे कुंड आहे. ते तप्तकुंड किंवा अग्निकुंड म्हणून ओळखले जाते. महाभारत काळात श्रीकृष्ण व अर्जुनाच्या मदतीने अग्नीने खांडववन जाळून वृक्षलता, पशुपक्ष्यांची हत्या केली. तेव्हा श्रीविष्णूने हिमालयातील यात्रेकरूंची सेवा करून तू पापमुक्त हो असे अग्निला सांगितले. श्रीविष्णूच्या आदेशानुसार अग्नी येथे गरम पाण्याच्या रूपात प्रगट झाला, अशी आख्यायिका सांगतात.

    गंधकमिश्रित या गरम पाण्याचे तापमान १२८° फॅरनहाईट आहे. हे बारमाही गरम पाण्याची झरे आहेत. हे गरम पाणी नळाद्वारे बाहेर आणून यात्रेकरूंच्या स्नानाची इथे चांगली सोय केली आहे. गंधकाच्या वासामुळे मुख्य कुंडाजवळ जास्त वेळ उभे राहिल्यास चक्कर येण्याची शक्यता असते. या शिवाय आणखी नारदकुंड, सत्यपथकुड, त्रिकोणकुंड व भानुषीकुंड अशी चार कुंडे ही पवित्र कुंडे या ठिकाणी आहेत, असे सांगितले जाते. वराह पुराणात सुद्धा या ठिकाणी पाच पवित्र कुंडे आहेत असा उल्लेख आहे.

    पुराणात या बदरीवनांचा विस्तार बारा योजने लांब व तीन योजने रुंद असा सांगितला आहे. (एक योजन म्हणजे चार मैल) हे ऐश्वर्य, सुखशांती देणारे पापक्षालन करणारे तीर्थस्थान, असे या स्थानाचे माहात्म्य पुराणात सांगितले आहे. बद्रीनाथ हे गढवाल नरेशांचे कुलदैवत समजले जाते व गढवाल नरेश ‘गढवालची राजगादी ही भगवान बद्रीनाथाची आहे,' या भावनेने राज्यकारभार करत. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना त्यांनी 'रावळ' असा किताब बहाल केला आहे. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी १४० गावांतील सरकारी जमिनी त्यांनी मंदिराला भेट म्हणून दिल्या आहेत.

    अति बर्फवृष्टीमुळे दिवाळीनंतर हे मंदीर बंद केले जाते. मंदीर बंद करतेवेळी गाईचे शुद्ध एक किलो तूप घेतात. त्यातील काही तूप मूर्तीवर चोळले जाते व मूर्तीवर पातळ वस्त्र चिकटवले जाते. राहिलेल्या तूपात एक किलो तांदुळ मिसळून कापसाची वात बाहेर काढून ते एका डब्यात भरतात. वात प्रज्वलित करून आरती केली जाते व मंदीर बंद करतात.

    साधारण अक्षयतृतीयेनंतर हे मंदीर भाविकांसाठी परत उघडले जाते. उघडण्यापूर्वी सैन्यदलातर्फे सर्व परिसर, रस्त्यांची पाहणी करून, रस्ते-पूल दुरुस्त करून, सुरक्षिततेची खात्री झाल्यावर एक मुहूर्त निश्चित केला जातो व त्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वी मंदीर बंद करताना लावलेला दिवा, मंदीर उघडल्यावर सुद्धा तसाच्या तसा तेवत असतो. मूर्तीवरील फुले टवटवीत असतात. जेव्हा हे मंदीर बंद असते त्या काळात नारदमुनी गुप्त रूपाने रोज बद्रीनाथाची पूजा करतात तर लक्ष्मीदेवी दिवा लावते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. जेव्हा मंदीर बंद असते तेव्हा बद्रीनाथाची गादी जोशीमठ या ठिकाणी असते. जोशीमठ येथील नृसिंह मंदिरात बद्रीनाथाची पूजा होते. भाविक या ठिकाणी बद्रीनाथाचे दर्शन घेतात.

    बद्रीनाथमध्ये अनेक धर्मशाळा तसेच राहण्याच्या व इतर प्रवासी सुविधा उपलब्ध आहेत. हरिद्वार-ऋषीकेशपासून नियमित बस सेवा सुद्धा उपलब्ध आहे.

    -प्रकाश लेले

      July 22, 2022


  • सावज

    सन सेट ‘पाहण्यासाठी साक्षी रिसोर्ट मधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते . रिसॉर्ट पासून समुद्र किनारा फक्त दोन किलोमीटर होता . संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रा पर्यंत जात . रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता . मध्ये खूप झाडी होती पण रात्री सात -आठ पर्यंत माणसांची वर्दळ चालू असे . पाचव्या मजल्यावरून साक्षी ग्राउंड फ्लोअरला अली तेव्हा तिच्या लक्षात आले कि मोबाईल रूम मधेच विसरलाय . ती परत लिफ्ट कडे गेली तर लिफ्ट बंद होती . लाईट गुल झाले होते ! . आता पुन्हा पाच मजले चढायचे आणि उतरायचे तिच्या जीवावर आले .’ तासा दीड तासांचा तर प्रश्न होता . साडे सहाला जरी परत निघालोतरी सात सव्वासात पर्यंत रिसॉर्टला परतु . मग निवांत ग्यालरीत बसून कोल्डकॉफी एन्जॉय करू . इथली कॉफी मात्र भन्नाट असते !’ असा काहीसा विचार करत साक्षी झाडीच्या रस्त्याला लागली .

      March 2, 2018


  • सुट्टी

    सुट्टीचं नाव निघालं की छोटयांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटतात. सुट्टी म्हणजे आराम, सुट्टी म्हणजे रोजच्या धावपळीपासून सुटका, सुट्टी म्हणजे विरंगुळा ही समीकरणं सर्वांच्याच मनात रुजलेली असतात. रोजची कामे उरकत असताना देखील सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात सुट्टीच्या तारखेकडे. आठवडयात शनिवार रविवारच्या मध्ये एखाद्या आडवारी सुट्टी आली की तो आठवडा मजेत जातो. आणि शनिवार रविवारला लागून सुट्टी आली की आनंदाची पर्वणीच.

    लहानपणी शाळेत असताना मे महिन्याची सुट्टी दिवाळीची सुट्टी या दोन मोठया सुट्टया आणि नाताळची एक आठवड्याची सुट्टी ठरलेली असायची. आता मराठी शाळांमध्ये नाताळऐवजी गणपतीची सुट्टी दिली जाते. मे महिन्याच्या मोठया सुट्टीत काय करायचं याचा निर्णय आईवडील घेत. या मोठया सुट्टीत बरेचदा परगावी जाण्याचा बेत असे. दिवाळीची सुट्टी मात्र आपली हक्काची. या सुट्टीत शाळेच्या हस्तलिखिताची तयारी करणे, दिवाळीसाठी कंदील बनवणे. आईला फराळ बनवण्यात मदत करणे असे अनेक व्याप सांभाळावे लागत. याशिवाय सुट्टीतला अभ्यासही उरकावा लागे. सुट्टी पडताच प्रथम अभ्यासाचं ओझं उरकून मग उरलेली सुट्टी केवळ मजेत घालविण्याची सवय मी अंगवळणी पाडली होती. पहिल्या चारपाच दिवसात अभ्यास उरकला की पुढचे दहा पंधरा दिवस मजेत जात. स्टॅम्पचा आल्बम बनविणे, क्रिकेटपटूंचे फोटो जमवणे, गाण्याची वही तयार करणे असले उपद्व्याप उत्साहाने उरकताना सुट्टी अंगावर येई. लहानपणी दिवाळीच्या सुट्टीचा लुटलेला आनंद नंतर पुन्हा कधीच अनुभवता आला नाही.

    कॉलेजात मोठया सुट्टीचा मुख्य उद्देश सिनेमा बघणे हाच असे. अभ्यासामुळे आणि परीक्षांमुळे पाहायचे राहून गेलेले चित्रपट सुट्टीत पाहिले जात. या सुट्टीत संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे मित्रांबरोबर केलेली भटकंती. आम्ही परळला राहात असताना सर्व मित्र एकत्र जमून शिवाजीपार्कला राऊंड मारायला जात असू. परळ ते शिवाजीपार्क चालणे त्यानंतर शिवाजीपार्कला दोन तीन फेऱ्या मारणे आणि पुन्हा चालत घरी परतणे हा व्यायाम मित्रांच्या संगतीत अगदी हसतखेळत पार पडे. आज फक्त शिवाजीपार्कला एक राऊंड मारली की मोठा व्यायाम केल्यासारखं वाटतं. सुट्टीतला तारुण्याचा उत्साह अवर्णनीयच म्हणावा लागेल.

    कामधंद्यात अडकल्यानंतर मात्र सुट्टी हा विषय हळूहळू मागे पडत गेला. कधी आजारपणानिमित्त तर कधी घरची कामे उरकण्यासाठी सुट्टी घेतली खरी परंतु त्या सुट्टीची तुलना आधीच्या सुट्टयांशी होऊच शकत नाही. एकाद्या कामानिमित्त घेतलेल्या सुट्टीला सुट्टी म्हणता येत नाही. खरी सुट्टी म्हणजे काहीही न करण्याची मुभा. अशी सुट्टी अनेक वर्षात अनुभवली नव्हती. ह्यावर्षी अचानक अमेरिकेला महिनाभर राहण्याची संधी चालून आली आणि हरवलेला सुट्टीचा आनंद पुन्हा एकदा गवसला. अमेरिकेतील महिन्याभराचं वास्तव्य सुट्टी विषयावर फार मोठी टिपण्णी करुन गेलं.

    अमेरिका हा एक कल्पनाही करता येणार नाही असा अवाढव्य देश. अवाढव्य सर्वच अर्थानी. आकाराने आणि सुबत्तेने देखील. इथले डोळे दिपविणारे वैभव पाहिलं की आपण थक्क होऊन जातो. जगात व्यवसायाच्या, कामधंद्याच्या किती अभुतपूर्व संधी आहेत याची झलक आपल्याला इथे अनुभवता येते. याशिवाय इथे नाना देशातले, नाना वंशातले लोक गुण्यगोविंदाने एकत्र नांदत असतात. या लोकांमध्ये मिसळताना जगाचा पसारा किती विस्तीर्ण आहे याची जाणीव होत राहाते.

    हे सर्व अनोखं विश्व न्याहाळत असताना आपल्या दैनंदिन दिनचर्येचा आपल्याला पार विसर पडतो. रोजचं कामकाज, कामकाजातले ताणतणाव, अमका कसा वागतो आणि तमक्याशी कसं वागायचं- अशी सारी सारी गणितं आपण पार विसरुन जातो. मनातली कोळीष्टकं स्वच्छ होऊन जातात. अमाप संधींची दालने आपल्यासमोर खुली आहेत हा विश्वास अमेरिका आपल्या मनात रुजवते. अमेरिकेत घालविलेली सुट्टी म्हणूनच मनाला उभारी देऊन जाते. नव्या हिंमतीने, नव्या उत्साहाने आपण घरी परततो. मन ताजेतवानं होण्याची ही प्रचिती सुट्टी सार्थकीम लागल्याची पावती देऊन जाते.

    खरी सुट्टी ही अशी असावी. कामकाजापासून दूर पळायला लावणारी सुट्टी क्षणभंगूर ठरते. अशी सुट्टी संपायला आली की मनावरचं मळभ पुन्हा गडद होऊ लागतं. पुन्हा आता आपण रोजच्या रामरगाडयात गुंतून जाणार हा विचार सुट्टीच्या आनंदावर विरजण टाकून जातो. याउलट अमेरिकेतील वास्तव्यासारखी सुट्टी उत्साहाचं माप पदरी पाडून जाते. अशी सुट्टी रोजच्या जगण्याला अर्थ देऊन जाते. अशी सुट्टी रोजच्या जगण्यातील ताणतणाव हलके करण्याचं बळ देऊन जाते.

    प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी अशी सुट्टी अवश्य अनुभवावी. प्रत्येकालाच सुट्टीसाठी अमेरिका गाठणं शक्य नाही. मात्र जिथे कुठे जाऊ तिथल्या वातावरणाशी, चालरितींशी, संस्कृतीशी समरस होणं सहजशक्य असतं. असं वेगळया विश्वात मन रमवणं म्हणजे सुट्टी. वर्षातून एकदा जरी अशी सुट्टी अनुभवता आली की जीवनाला नवा अर्थ प्राप्त होतो.

    -सुनील रेगे

      September 17, 2022


  • ती’ असता ईश्वर ‘ती’ नसता नश्वर

    म्हणूनच या तिन्ही जवळ असतील तर, ‘ईश्वर’च सोबत आहे.. आणि यांपैकी एक जरी नसेल तर जीवन ‘नश्वर’ आहे.

      October 2, 2021


  • पुस्तकांचे देणे, पुस्तकांवर बंदी !

    पुस्तके असतात सोबती-एकाकी असताना ! अबोलपणे खुणावत असतात-मी आहे. केव्हढा धीर येतो मग. घरातल्या पुस्तकांनी ओथंबून चाललेल्या कपाटांकडे अभिमानाने नजर टाकता येते खरी पण त्याचवेळी सकाळी टीव्ही वर पाहिलेली दिवाळी अंकांच्या संचाची जाहिरात खुणावते, मित्रांच्या पुस्तक-प्रकाशनाची आवतणे येत असतात, प्रदर्शनांकडे पावले वळतात आणि काही काळाने कपाटांची “श्रीमंती” अधिक वाढते.

      October 15, 2022


  • ज्युबिली वास्तु

    बैजु बावरा’ चित्रपटाचा कधी उल्लेख झाला की, त्यातील शांत व निर्विकार चेहऱ्याचा नायक, भारत भूषण सर्वांना आठवतोच… या नशीबवान भारत भूषणला, मधुबाला व मीना कुमारी सारख्या सुंदर नायिका मिळाल्या.. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वांद्रे येथील कार्टर रोडवरील समुद्रकिनारी एक बंगला खरेदी केला. पुढे हाच बंगला राजेंद्र कुमार यांनी भारत भूषण यांचेकडून अवघ्या साठ हजार रुपयांत खरेदी केला व त्याला नाव दिले, ‘डिंपल’!!

      July 25, 2023


  • बस…

      November 3, 2014


  • वो भारत देश है मेरा

    आज सकाळीच सोसायटीच्या मैदानावर, झेंडावदनाची तयारी चालू झालेली दिसली. ते पाहून मला माझे शाळेचे दिवस आठवले. पहिली ते चौथी, मी सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेत होतो. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला, सकाळी सात वाजता गणवेशामध्ये झेंडावंदन होत असे. कार्यक्रम संपल्यावर मुलांना चाॅकलेट्स वाटली जात असत. शाळेच्या फाटकातून बाहेर पडताना. झेंडे, खिशाला लावायचे बॅज, झेंड्याची भिरभिरं विकणारे उभे असायचे. घ्यायची इच्छा असूनही खिशात पैसे नसायचे. मन खट्टू व्हायचं.

      January 26, 2022


  • फास

    श्री शांतपणे सोफ्यावर कॉफीचा मग घेऊन बसला होता . ‘मानसी इंडस्ट्री’चा मालक श्रीकांत, हजारो नसली तरी शेकडो कोटीची उलाढाल असलेली स्टील इंडस्ट्री . वय फक्त सत्तावीस ! स्वप्नांच्या मागे धावणारा एक वेडा , अशी त्याच्या मित्रात त्याची ओळख होती .

      December 31, 2017


  • शास्त्रीबुवा

    झिरमिळ्यांची पगडी घालून शास्त्रीबुवा आणखीच उंच वाटत. पावणे सहा फुट उंच, साठीनंतरही प्रकृती ठणठणीत असणारे, लांब, काळ्या बटणांचा पांढरा डगला घालणारे, कपाळावर गंध लावणारे, काळा चष्मा घातलेले, शास्त्रीबुवा नेहमी धीर गंभीर वाटत.
    त्यांचे खरे आडनाव काय होते, ते तिथे कोणालाच ठाऊक नव्हते. लोक त्यांना शास्त्रीबुवा म्हणूनच ओळखत. त्यांचे शिक्षण कुठे झाले होते, शास्त्री हे त्यांचे नाव होते की पदवी होती.

    हे कांही कुणाला माहीत नव्हते. वाड्यांतील एका छोट्या खोलीत ते रहात पण नेहमी ते ह्याच वेशांत लोकांना दिसत. शास्त्रीबुवांच्या दरवाजावर “इथे जन्मकुंडली, हस्तरेषा, चेहरा, यांवरून भविष्य सांगितले जाईल.” घरावर अशी छोटी पाटी असली तरी मोठ्या रस्त्यावर एका छानशा दुकानांत शास्त्रीबुवांच ‘ॲाफीस’ होतं.

      January 2, 2024