माशी ग माशी…….!!!

माशी ग माशी

मानू तुझे आभार कसे?

अशीच बसत जा तू,

सगळ्यांना कर वेडे-पिसे…………!!!



ज्याच्या नावाच्या चिठ्ठीवर माशी बसेल, तो उपसरपंच!

(संदर्भ आणि चित्र सौजन्य : एबीपी माझाची बातमी)

माशी ग माशी,

तू अशी ग कशी?

जेथे बसशी,

तेथे तू घाणच करीशी,

प्रख्यात तू अशी,

झालीच तू कशी?

आज मात्र तू

कमालच केलीस

माझ्या नावाच्या

कागदावर काय बसलीस

माझे भाग्यच उजळले,

झाले मी उपसरपंच,

तुझ्या बसण्यामुळे………..

माशी ग माशी

मानू तुझे आभार कसे?

अशीच बसत जा तू,

सगळ्यांना कर वेडे-पिसे…………!!!

………………………….मयुर तोंडवळकर

— मयुर तोंडवळकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →