नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कपड्या बद्दल तर एवढी मोठी क्रांती झाली आहे की एक स्वतंत्र ग्रंथ होईल. वारेमाप कपडे. पण धुण्याचा अजिबात त्रास नाही. वॉशिंगमशिन तयार आहेच. डाग काढायला सोयीचे झाले आहे. त्यामुळे दाग अच्छे है असे म्हणत आई हसतमुखाने लेकराचे कपडे धुते. शिवाय हे लेस ते लेस सगळेच यूजलेस असलेले तोकडे कपडे पाहून वाटते की मूलभूत गरज आहे की मूलभूत सुविधा आहे. आणि एक फायदा म्हणजे जीन्स. टिशर्टस कुणीही कुणाचे घालू शकतात. म्हणजे हे मला नक्की माहीत नाही पण ऐकले आहे म्हणून लिहिण्याचे धाडस केले आहे.
June 10, 2022
कुणा आवडतो मोर पिसाऱ्याचा
असे कोणाला छंद कोकिळेचा,
कुणी असतो नादिष्ट पोपटाचा
मला आहे परि नाद कोंबड्याचा ।।१॥।
किती माझा कोंबडा ऐटदार
चाल त्याची किति बरे डौलदार
शिरोभागी छानसा तुरा हाले
जणू जास्वंदी फूल उमललेले ।।२॥।
पिसारा त्याचा किती झोकदार
चोच त्याची चिमुकली बाकदार
अर्धपायी पांढरीशी विजार
गमे विहगातिल बडा फौजदार ।1३।।
“उठा मूर्खांनो ! झोप काय घेता ?
अरुण उदयाचा काळ असे झाला
करा काही तरि आळसा त्यजून”
उष:काली सांगतो ओरडून ।।४।।
किती माझा कोंबडा हो शहाणा
लोक कल्याणा झटतसे पहाना !
मोर, पोपट, कोकिळा, राजहंस
रिकाम्यांचा या बडेजाव खास ।।५।।
अति परिचय जाहला कोंबड्याचा
म्हणुनि करिता का मानभंग त्याचा ?
जरी आवडला नाही तो तुम्हाला
सदा देई आनंद मन्मनाला ।॥६॥
June 11, 2026
“मास्क” या शब्दाशी आणि वस्तूशी “सामान्य माणसाचा“ दुरदुरपर्यंत संबंध नसायचा . पण आता काळाची चक्र अशी काही फिरली की “मास्क” हा शब्द तर परवलीचा झालाचं आणि तो वापरणं एक मुख्य गरजही होऊन बसली
September 8, 2021
सचिन तेंडुलकरच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे “जागत्या स्वप्नाचा प्रवास....” हे पुस्तक आता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी इ-बुक स्वरुपात केवळ रु.९९/- मध्ये उपलब्ध आहे.
डबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल ४८० पानी पुस्तकात सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने. सचिन संदर्भातल्या शेकडो व्हिडिओ लिंक्स हे या इ-बुकचं आणखी एक आकर्षण आहे.
आपण आमच्या वेबसाईट समूहाचे एक सन्माननीय वाचक आहात. आपल्यासाठी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात आणलंय केवळ रुपये ९९/- मध्ये. ही खास ऑफर अत्यंत मर्यादित काळापर्यंतच आणि फक्त पहिल्या ५००० ग्राहकांसाठीच आहे.
आपल्याला या पुस्तकाची छापील आवृत्ती हवी असल्यास ती उपलब्ध आहे फक्त रुपये ४००/- मध्ये महाराष्ट्रात कोठेही अगदी घरपोच! आणि याबरोबर इ-बुक मोफत!
हे पुस्तक कोणत्याही क्रिकेट रसिकाला आपल्या संग्रही ठेवावेसे वाटेलच. सचिनच्या मैदानावरच्या प्रत्येक विक्रमाची नोंदही या पुस्तकात आहे. आपल्याला माहित नसलेल्या अनेक बाबी या पुस्तकातून आपल्यासमोर येतात.
आपण जरुर या सवलतीचा लाभ घ्यावा!
खरेदीसाठी क्लिक करा....
<!-- सचिन तेंडुलकरच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे “जागत्या स्वप्नाचा प्रवास....” हे पुस्तक आता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी इ-बुक स्वरुपात केवळ रु.९९/- मध्ये उपलब्ध आहे. डबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल ४८० पानी पुस्तकात सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने. सचिन संदर्भातल्या शेकडो व्हिडिओ लिंक्स हे या इ-बुकचं आणखी एक आकर्षण आहे. आपण आमच्या वेबसाईट समूहाचे एक सन्माननीय वाचक आहात. आपल्यासाठी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात आणलंय केवळ रुपये ९९/- मध्ये. ही खास ऑफर अत्यंत मर्यादित काळापर्यंतच आणि फक्त पहिल्या ५००० ग्राहकांसाठीच आहे. आपल्याला या पुस्तकाची छापील आवृत्ती हवी असल्यास ती उपलब्ध आहे फक्त रुपये ४००/- मध्ये महाराष्ट्रात कोठेही अगदी घरपोच! आणि याबरोबर इ-बुक मोफत! हे पुस्तक कोणत्याही क्रिकेट रसिकाला आपल्या संग्रही ठेवावेसे वाटेलच. सचिनच्या मैदानावरच्या प्रत्येक विक्रमाची नोंदही या पुस्तकात आहे. आपल्याला माहित नसलेल्या अनेक बाबी या पुस्तकातून आपल्यासमोर येतात. आपण जरुर या सवलतीचा लाभ घ्यावा! खरेदीसाठी क्लिक करा....
-->
July 18, 2015
गोष्ट अगदी खरीखुरी आहे. एका बाईला खूप प्रयत्नांनी बाळ होते. परंतु जन्मतःच त्याच्या हृदयामध्ये छिद्र असल्याचे डॉक्टरांना जाणवते. डॉक्टर त्या बाईला जेवढी मदत करता येईल तेवढी करतात. परंतु बाळाची तब्येत सुधारत नाही. डॉक्टर तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन जाण्याचा सल्ला देतात.
July 17, 2024
त्याचा आईस काय माहिती, इथली झाडे एका स्वार्थी माणसाने कापून टाकली आहेत. त्याची आई इथे आली – झाड व वेली दिसली नाहीत – पण अंडी घालण्याची वेळ झाली असल्या मुळे त्याचा आईला गमल्यातल्या एका रोपट्यावरच अंडी घालावी लागली असेल. झाडा एवजी बैठकीच्या खोलीत त्याचा जन्म झाला. एखाद रात्र आपल्या जन्मस्थानी घालवून तो पुढच्या प्रवासासाठी निघून केला असता. जिवंत राहीला असता तर पुढच्या पिढी साठी अंडी घालण्यास परत इथआला असता. पण ते होण आता शक्य नाही. भारी मनाने फुलपाखराला उचलले आणि बाहेर फेकले. पुन्हा वाश बेसिन वर येऊन हात धुऊ लागलो. लेडी मेकबेथची आठवण आली. कितीही हात धुतले तरी आपण या पापातून मुक्त होऊ शकतो का? असा विचार मनात आला.
May 29, 2011

माणूस मुंबईत पाय ठेवतो. तो एकदा या सापळ्यात अडकला की खाऊन-पिऊन इतका गब्बर होतो की, सापळ्यात माणसं अडकतात, उंदीर नाहीत. ते रुळावर बसून गंमत बघतात.
May 6, 2022
माहिती म्हणून सांगतो, मालगाडीच्या गार्डची कॅबिन ही सुविधा शून्य कॅबिन असते. त्यात ना लाईट असतो, ना फॅन असतो, ना बर्थ असतं इतकंच काय त्या कॅबिन मध्ये वॉशरूम च्या नावाखाली फक्त भलं मोठं छिद्र असतं, रुळा कडे उघडणारं, पाणी सुद्धा नसतं हो त्या कॅबिन मधे…..
September 9, 2018
आज नवरात्रीचा दुसरा दिवस..देवी ब्रह्मचारिणीचा.. देवी ब्रह्मचारिणी म्हणजे देवी पार्वती. शंकरदेवांना प्राप्त करण्यासाठी पार्वतीने घोर तपश्चर्या केली..साहजिकच या काळात ती शुभ्रवस्त्र परीधान करीत असे.. म्हणूनच आजच्या दिवशी महिला पांढरेवस्त्र परीधान करून देवी ब्रह्मचारिणीची पूजा करत आहेत..
October 23, 2023
१० मार्च २००१ ही गडकरी रंगायतनची तारीख कार्यक्रमासाठी नक्की केल्यावर अतिशय वेगाने कामाला सुरुवात झाली. अनेक नामवंत कलाकार कार्यक्रमाला येणार होते. त्यामुळे प्रायोजकही मिळाले. गिरीश प्रभू, अजय दामले, अमेय ठाकुरदेसाई, सागर टेमघरे आणि इतर वादक कलाकार मित्रांबरोबर रात्रीच्या रिहल्सल सुरू झाल्या. अनेक कार्यक्रमांच्या आठवणी आणि गिरीशचे हास्यविनोद यात अनेक रात्री रंगल्या. कार्यक्रमाची तारीख उजाडली. ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर लोकप्रिय गायक अजित कडकडे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. संगीतकार यशवंत देव, प्रभाकर पंडित, कौशल इनामदार, गायक रविंद्र साठे, मिलींद जोशी, गायिका रंजना जोगळेकर, मनीषा पवार, विनायक जोशी, संगीतकार सलील सावरकर, अभिनेते प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आमच्या ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.य. गोखलेसाहेब आणि उपाध्यक्ष उत्तमराव जोशी असे अनेक नामवंत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. संगीतकार यशवंत देव यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या खुमासदार शैलीत भाषण केले. 'माझी पत्नी करुणा देव आणि मी अनिरुद्धला आमच्या घरचाच सदस्य मानतो. तो गाण्याचा अर्थ नीट समजून मग गातो. त्यामुळे माझ्या अनेक रचना त्याच्या आवाजात लोकप्रिय झाल्या आहेत.' यशवंत देवांचे हे आपुलकीचे शब्द ऐकून माझे डोळे पाणावले. कार्यक्रमाचे निवेदन वासंती वर्तक यांनी केले. कार्यक्रमाला माझी आई उपस्थित होती. तिच्या प्रोत्साहनामुळे आणि मदतीनेच मी गाण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यामुळे आज ती अत्यंत आनंदात होती. भाऊंची अनुपस्थिती मात्र मला फार जाणवत होती. माझ्या पहिल्या कार्यक्रमाला सभागृहात प्रेक्षक किती असतील याची काळजी भाऊ करत होते. आज ५००व्या कार्यक्रमाला गडकरी रंगायतनच्या ११०० सीटस् हाऊसफुल असून अनेक रसिक प्रेक्षक आणि कार्यकर्ते दोन्ही बाजूला उभे होते. माझ्या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी दिलेला हा उदंड प्रतिसाद पाहून ते नक्कीच सुखावले असते. पण त्याचबरोबर मला नक्की म्हणाले असते, अनिरुद्ध ५०० कार्यक्रम झाले म्हणून फार खूष होऊ नकोस. पुढील ५०० कार्यक्रमांच्या तयारीला केव्हा बसायचे?
५०० कार्यक्रम पूर्ण केल्यावर मला विश्रांतीसाठी एक दिवसही मिळाला नाही. कारण १० मार्च २००१ रोजी ५००वा कार्यक्रम केल्यावर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे ११ मार्च २००१ रोजी ठाण्यातील सुप्रसिद्ध कर्नावट क्लासेसच्या श्री. कर्नावट यांच्यासाठी रेझॉर्ट हॉटेल, अक्सा बीच, मुंबई येथे गझलचा कार्यक्रम मी सादर केला. १५ मार्च २००१ रोजी लायन्स क्लबसाठी शांग्रिला रिसॉर्टस्, शहापूर येथे गझलचा कार्यक्रम झाला. एका आठवड्यातच २३ मार्च २००१ रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या गाजलेल्या कवितांवरील 'कुसुमांजली' हा कार्यक्रम आम्ही सादर केला. कार्यक्रमाचे संगीत सलील सावरकर याने केले होते.
- अनिरुद्ध जोशी
July 22, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti