नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
टळटळीत दुपारी तेनालीरामने एका व्यक्तीला त्याच्या डोक्यावर सूर्यापासून आडोसा करताना पाहून उत्सुकतेने विचारले, “मित्रा तू हे काय करतो आहेस?”
December 21, 2023
आत्तापर्यंतच्या धाडसाचे आणि मेहनतीचे चांगलेच फळ मला मिळाले होते. टेलिव्हिजनवर पूर्वी मी युवदर्शनमध्ये गायलो होतो. आता मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम मिळाला. या कार्यक्रमात श्रीकांत ठाकरे यांची दोन नवी गाणी मी सादर केली. कार्यक्रम मिळत होते. आत्मविश्वास वाढत होता. आता एक संपूर्ण कॅसेट गाण्यासाठी प्रयत्न करायचे मी ठरवले.
July 9, 2022
आणखीन एका पक्षाने आमचं लक्ष वेधून घेतले आणि तो म्हणजे फ्लेमिंगो! त्यांचे रंग, लाल, गुलाबी आणि अबोली. त्याचा मुलाचा रंग राखाडी असतो. परंतु, (कॅरटोनॉइड) गाजरासारख्या कंदमुळाच्या खाण्यातून त्यांना असे विविध छटांचे रंग प्राप्त होतात.
July 22, 2021
राजकपूर ही खरंतर एक संस्थाच ! निर्विवाद अधिराज्य करणारी, पूर्णतेचा ध्यास घेणारी. कोठलीही तडजोड न करणारी. तो स्वतःच एक पांढरा रुपेरी पडदा होता – बाह्यतः सारं काही मिरविणारा, पण आतमध्ये कुठेतरी खोलवर एक धुमसत्या कलागुणांचा ज्वालामुखी घेऊन हिंडणारा ! “जोकर ” च्या नेमक्या अपयशापाशीच खरंतर राज कपूर संपला. हे मरण जिव्हारी बाळगत त्याने ” बॉबी “, ” सत्यम शिवम ” सारखी आपल्या पराभवाची थडगी बांधली.
April 6, 2021
हे सगळे लिहावे की नाही, तुझ्यापर्यंत माझ्या भावना पोचवाव्यात की नाही, यावर खुप विचार केला. मी अनेकदा लिहिलं. फाडून फेकून दिलं. पुन्हा लिहिलं.माझं मलाच ठरविता येते नव्हतं, तुला हे सगळं सांगावं की नाही.पण मग मी निश्चय केला.माझा मलाच धीर दिला ठरवलं एकदाचं, आतलं सगळं ओकून टाकायचं. आतली मळमळ काढून टाकायची.तरच मन स्थिरावेल. डोकं शांत होईल. ह्या तणावातून मुक्ती मिळेल. तसं हे सगळं स्पष्ट सांगणं सोपं नाहीय. एका मुलीसाठी, तेही चौदा वर्षाच्या कळीसाठी, तुम्हा सर्वांच्या। तुलनेत काहीच अनुभव नसलेल्या लेकीसाठी तर खरंच सोपं नाहीय.
January 28, 2022
या ग्रामीण भागामध्ये 1969सालि करमणुकीची साधने अतिशय कमी होती. आमच्या लक्ष्मीच्या देवळामध्ये प्रत्येक एकादशीला भजनाचा कार्यक्रम ठरलेला असायचा. त्यावेळी एकतारी भजन किर्तन पोवाडे भेदिक असे कार्यक्रम असायचे. आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच्या शेतामध्ये किंवा दुसऱ्याच्या बांधावर रोजंदारी करीत होती.
January 12, 2023
‘“केव्हाच करून झालाय माझा होमवर्क. पण काय रे दादा तुला आज बरं नाही वाटत का?”
“सानू ! आता मी तुला एक गोष्ट सांगतो; पण अगदी आपल्यातच ठेवायची हं ती. कुणाला सांगितलीस तर बघ, माझी शप्पथ आहे तुला.
July 14, 2026

आपल्या दु:खी जीवनाकडे संगीता तटस्थ वृत्तीने पाहू लागली होती. आपल्या कामात तिने झोकून दिले होते, आपल्या एकाकी जीवनात कोणताही बदल होणार नाही हे तिच्या मनानी पचविले होते, आपल्या नशीबाचे भोग आपण एकट्यानेच भोगले पाहिजेत हा वैचारिक बदल घडत चालला होता.
January 7, 2022
या तलावाच्या परिसरात विलक्षण शांत निसर्ग पसरलेला आहे. तेथे या तलावाबाबत काही गूढ आख्यायिका आहेत. पूर्वी येथील देवीला प्रार्थना केली की एखाद्या गरीब मुलीच्या विवाहासाठी, तलावातून दागिन्यांची परडी वर येत असे. लग्न झाले की हे दागिने परडीत भरून पुन्हा तळ्यात सोडून दिले जात. पण कुणालातरी दागिने परत न करण्याचा मोह झाला आणि नंतर हे दागिने येणे थांबले. दुसरे असे ऐकायला मिळाले की या तलावाला तळच नाही. तलावातील पाण्यात तुम्ही कितीही खाली गेलात तरी तळ सापडत नाही. इथे प्रसादासाठी जेवण आणले असेल तर ते येथेच संपवायचे किंवा वाटून टाकायचे पण घरी परत न्यायचे नाही. या श्रद्धा की अंधश्रद्धा याची तपासणी करण्याचे माझे काम नसल्याने मी हा सर्व सुंदर परिसर फिरून छान आनंद घेतला. भगवती देवीचे साधे पण प्रशस्त मंदिर आणि परिसर मुक्त निसर्ग सौन्दर्याचे एक कोकण लेणे आहे !
-- मकरंद करंदीकर.
May 28, 2017
आपली संस्कृती अशी आहे की जेवणाआधी ताटाभोवती पाणी फिरवून भाताची शितं तीन ठिकाणी ठेवून मगच जेवण करतात. जगा आणि जगू द्या प्राणिमात्रांना यासाठी.
December 21, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti