नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
या सर्व प्रकारच्या तयारीनंतर कार्यक्रम करण्यासाठी मी अगदी अधीर या झालो होतो. पण भाऊंनी एक वेगळीच कल्पना माझ्यासमोर मांडली. त्यांचे म्हणणे होते की माझा स्वतःचा कार्यक्रम आयोजित करण्याअगोदर मी वेगळ्या कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करावा आणि केवळ आयोजनाचा अनुभव घ्यावा. कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी किती मोठी असते, याची मला थोडी देखील कल्पना नव्हती. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वतःच्या बॅनरचीही आवश्यकता होती. अनेक महिने परिश्रम करून १९८६ साली स्वर-मंच या कंपनीची स्थापना झाली. यात माझ्याबरोबर काम करण्यासाठी विवेक दातारसारखे अनेक मित्र मदतीला आले आणि माझे मित्र संगीतकार आणि सुप्रसिद्ध सतारवादक श्री. शशांक कट्टी (संगीतकार शांक-नीलपैकी एक) यांच्या सतारवादनाचा कार्यक्रम आम्ही गडकरी रंगायतनच्या भव्य सभागृहात आयोजित केला. कार्यक्रमाची तारीख, थिएटर मिळवण्यापासून, विविध सरकारी परवाने, पोलीस परवाने मिळवून तिकिटे छापण्यापासून ती विकण्यापर्यंत सगळी कामे करता करता एक गोष्ट लक्षात आली की कोणताही कार्यक्रम आयोजित करणे खूपच कठीण काम आहे. मला गायक म्हणून लोकांसमोर यायचे असेल तर सुरुवातीला मला नाव नसल्यामुळे कोणताही मोठा आयोजक माझा कार्यक्रम लावणार नाही आणि त्यात गैर काहीच नाही. म्हणजे आता मला दोन जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. एक म्हणजे माझा कार्यक्रम आयोजित करणे आणि दोन म्हणजे तो संपूर्ण कार्यक्रम कलाकार म्हणून स्टेजवर सादर करणे. एकूण कार्यक्रम या शब्दाची व्याप्ती मला नीट समजली आणि हे सगळे भाऊंनी मला कामातूनच समजावून दिले. भाऊंनी आणि आईने स्थापन केलेल्या 'निशिगंध प्रकाशन'तर्फे त्यांनी पं. कुमार गंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पद्मभूषण किशोरी आमोणकरांपासून माणिक वर्मांपर्यंत अनेक कलाकारांचे कार्यक्रम निशिगंध प्रकाशन संगीत महोत्सवात आयोजित केले होते. भाऊंची शिकविण्याची पद्धत अत्यंत कडक, पण अतिशय परिणामकारक होती. काहीही शिकविताना वडील म्हणून ते कोणतीही सवलत मला देत नसत. मुलगा म्हणून मला काही बाबतीत तरी सवलतीची अपेक्षा असे. कोणत्याही खर्चाच्या बाबतीत पैशांचा हिशोब शेवटच्या रुपयापर्यंत काटेकोरपणे द्यावा लागत असे. मग अनेक वेळा आमचे वादविवाद होत. शिस्तीच्या बाबतीत माझे दोन्ही गुरूही खूपच कडक होते. त्या तरुण वयात ही शिस्त मला त्रासदायक वाटत होती. पण मी शिकत राहिलो आणि त्या शिस्तीचा आणि शिकण्याचा प्रचंड फायदा मला आज होत आहे. या कडक शिस्तीबरोबरच माझे वडील आणि दोन्ही गुरु प्रेमळही होते. त्या वयात शिस्तीचा त्रास झाला, पण त्यांचे प्रेम आज मला जाणवते.
त्या काळात ऑल इंडिया रेडिओसाठी मी अनेक गाणी गायली होती. रेडिओच्या संगीत विभागाचे प्रमुख म्हणून संगीतकार यशवंत देव आणि संगीतकार प्रभाकर पंडित तेव्हा काम पहात होते. माझी गाणी ऐकून एक दिवस संगीतकार प्रभाकर पंडितांनी मला बोलावले आणि माझे माहेर पंढरी ह्या म्युझिकल फीचरमध्ये गाण्याची संधी दिली. ज्येष्ठ गायक वसंत आजगावकरही या फीचरमध्ये गायले. या फीचरमुळे संगीतकार प्रभाकर पंडितांशी चांगली ओळख झाली. त्यांचा मुलगा उत्कृष्ट तबलावादक आणि संगीतकार केदार पंडित याच्याशी मैत्री झाली. अनेक बाबतीत मला संगीतकार प्रभाकर पंडितांचे मार्गदर्शन लाभले. त्यावेळी म्युझिक कॅसेट व्यवसाय जोरात होता. मराठी भाषेतील अभंगांमध्ये यात सर्वाधिक लोकप्रिय नाव होते श्री. अजित कडकडे. त्यांच्या अनेक कॅसेटचे संगीतकार होते प्रभाकर पंडित. प्रभाकरजींनी रेडिओबरोबरच अनेक प्रायव्हेट कॅसेटसूसाठी गाण्याची संधी मला दिली. त्यामुळेच अजित कडकडे, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, रंजना पेठे-जोगळेकर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर माझी गाणी बाजारात आली.
- अनिरुद्ध जोशी
July 6, 2022
प्रतिभाने स्वतःला सावरले आणि ती विजयच्या बिछाण्याच्या दिशेने चोर पावले टाकू लागली. पावलागणिक तिच्या हृदयाची धडधड वाढत होती.
September 1, 2021
अन्यायाच्या आणि अत्याचारांच्या निर्दयी पाषाणांनी बांधलेल्या उंच उंच भिंतींमुळे माझ्या मनातल्या आशा गुदमरुन पडल्यात. तिची अस्पष्ट साद भिंतींआडून माझ्या कानावर येऊन आदळते आणि माझे दुःख अनावर होतात. माझी ताई…. माझी ताई… आई बाबा वारल्यानंतर माझ्या ताईनेच माझा सांभाळ केला. माझं शिक्षण पूर्ण केलं, एवढंच नाही तर माझं लग्नही लावून दिलं. माझ्यासाठी तिने स्वतः लग्न नाही केलं. पुष्कळ त्याग केला रे तिने आमच्यासाठी. आम्ही सगळे सुखी होतो आणि एक दिवस आमच्या सुखाला कुणाची तरी नजर लागली.
August 13, 2013
तुम्हाला नवल वाटेल की फक्त फारसीतूनच भारतीय भाषांमध्ये शब्द आले आहेत असं नाहीं, तर संस्कृतमधूनही फारसीत अनेक शब्द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्वतःसुद्धां ).
March 9, 2019
बसलो होतो एक दिवस
नदीत पाय सोडून झाडा खाली,
भन्नाट कल्पनांच्या राज्यात
आठवणींचे गाठोडे सोडून !
October 10, 2014
मी घरी आलो तेंव्हा खूप उशीर झाला होता. आईला काळजी वाटत होती. आप्पांना (माझ्या व़़डलांना)ही काळजी वाटत असावी. मी आईला सांगून गेलो होतो असं म्हणट्ल्यावर त्यांचं समाधान झालं.
June 4, 2018
पोपट नामक एका तरुणाचे लग्न झाले होते . (येथून पुढे याला पोपट्या म्हणायचे . लग्न झालेल्यांना फारशी किंमत द्यायची नसते . जेष्ठ नागरिक झाल्यावर पोपटराव वगैरे म्हणता येईल . तोवर पोपट्याच ! )साधारण चार सहा महिन्यांनी त्याचा ‘नव्या लग्नाचे ‘नऊ दिवस संपले . आणि त्याला आपल्या बायकोतले काही दोष जाणवू लागले .
July 14, 2018

दुसऱ्या दिवशी सकाळी, चहा नाष्टा झाल्यावर सगळ्यांनी गढीवर जायचे ठरले. वाटेत मॅनेजर केळकर आणि गढीतील विहीर बुजवायचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्यासोबत गढीवर येणार होता. ठरल्याप्रमाणे वाड्यावरून निघताना दीने केळकरांना फोन करून मंदिराच्या पायथ्याशी थांबण्यास सांगितले. थोड्याच वेळात ते पायथ्याशी पोहोचले. केळकर दुसरी गाडी घेवून आले होतेच. मग सगळेजण बरोबर गढीच्या दिशेने निघाले. आरूला आणि नीलला कधी एकदा गढीपाशी जातो असे झाले होते. थोड्याच वेळात ते सगळे गढीच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचले. लांबून पाहून गढी किती मोठ्ठी असेल याचा काहीच अंदाज आला नव्हता. पण मुख्य दार आणि बाजूची तटबंदी पाहिल्यावर गढीची भव्यता नजरेत मावत नव्हती. भिंतीच्या टोकाला दोन्ही बाजूला मोट्ठे भक्कम ३५ ते ४० फूट उंचीचे बुरूज होते. गढीची दर्शनी भिंत आणि बुरूज यांचे २० फुटा पर्यंतचे बांधकाम दगडी होते आणि त्यावर उरलेले बांधकाम विटातील केलेले दिसत होते. गढीच्या तटबंदीवर आणि बुरुजावरील सज्जात बंदुकी ठेवायला केलेल्या जंग्या दिसत होत्या. काही ठिकाणी कोनाडे दिसत होते. तटबंदीच्या कपारींमधून लहान मोठी झुडुपे डोकावत होती.
September 28, 2019
एका ब्राम्हणाने पत्नीला विचारले...
" पाणी छान आणि थंड आहे..
आपल्या घरात फ्रिज नाही, कुठुन आणलेस..?"
पत्नी म्हणाली - "शेजारच्या कुंभारा कडुन.!"
ब्राम्हण - काय..? त्या शुद्राचे पाणी मला पाजलेस,
तुला लाज वाटत नाही...? आपण ब्राम्हण आहोत...
आपल्याला शुद्राचे काही चालत नाही..?"
पत्नी म्हणाली - ( घाबरली व म्हणाली )" मला माफ करा, या पुढे अशी चुक होणार नाही....
दुस-या दिवशी...
ब्राम्हण म्हणाला ; "अग... जेवायला वाढ..!"
पत्नी म्हणाली - काही नाही..!"
ब्राम्हण म्हणाला - "काय...? पोळी केली नाही..?"
पत्नी म्हणाली - " नाही....! कारण...
तवा व चुल शुद्र लोहाराने व चुल कुंभाराने बनवलेली असल्याने मी त्या वस्तू फेकून दिल्या..!"
ब्राम्हण म्हणाला- "वेडी आहेस काय..? बरं दुध आण..!"
पत्नी म्हणाली - "मी दुध फेकुन दिले कारण....
ते शुद्र गवळ्याने दिले.
ब्राम्हण म्हणाला- मी म्हटले 'उद्या पासुन दुध आणू नकाे'
आम्हांला शुद्रांचे काही चालत नाही..!"
ब्राम्हण म्हणाला- (किंचाळला..) " काय...?"
ब्राम्हण म्हणाला- "बरं..बर" .. झोपायला खाट लाव..!"
पत्नी म्हणाली - "मी खाट तोडून टाकली व लाकडे जाळुन टाकली. मेलं शुद्राचं काहीच नको आपल्याला..!!"
ब्राम्हणाने डोक्याला हात लावला..
ब्राम्हण म्हणाला :- "अरे... ईथली धान्याची पोती कुठ आहेत..?''
पत्नी म्हणाली -"मी धान्य लोकांना वाटून टाकले कारण...ते आपण कुणबी शुद्रां कडुन घेतले होते. नकोच ते आपल्याला ..!"
ब्राम्हणाला भाेवळ आली व म्हणाला, " माझे आई... घरात काहीच दिसत नाही. वस्तू कुठं गेल्या..?"
ब्राम्हणाची पत्नी म्हणाली - "नाथ... घरातली प्रत्येक वस्तू कुण्यातरी शुद्रांनेच बनवली आहे.त्यामुळे मी त्या तोडून- मोडून जाळून टाकल्या..!" ब्राम्हण मोठयाने ओरडला म्हणाला," अरे आपण पार भिकारी झालो...एवढे घरंच काय ते उरले आता...!"
पत्नी म्हणाली," नाथ... चिंता करू नका, मी आपल्या आज्ञे पुढे नाही, मी हे घर दान करून टाकले आहे.
कारण... हे घर त्या शुद्र गवंडी वडार व शुद्र मजुरांनी बांधले होते, नकोच बाई आपल्याला शुद्राचे."
"नाथ.... चला आपण जंगलात जावू
कारण...इथे सर्व शुद्र आहेत, भिक्षा काय शुद्राला मागायची..? नको नको..!"
ब्राम्हण चक्कर येवुन खाली पडला, "हे देवा...
मी तर पार शुद्रापेक्षा अतिशुद्र आहे. माझ्याकडे कांहीच नाही, मीच खरा शुद्र आहे, माझे पानही शुद्रा शिवाय हालत नाही...
देवा...!! खरे उच्च शेतकरी...
सर्व अठरा पगडं जातीच महान व वंदनीय आहेत,
मी मात्र काहीच कामाचा नाही..!"
September 13, 2017
1950 साली सानेगुरुजींच्या निधनानंतर, सानेगुरुजी स्मारकाच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी सपांमधील नाटककार जागा झाला. गुरुजींच्या ‘आंतरभारती’ संकल्पनेवर आधारित ‘जीवनकला’ या सपांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रथम प्रयोग डोंबिवलीच्या स. पां. जोशी विद्यालयाच्या प्रांगणात 9 जानेवारी 1951 रोजी झाला. याच नाटकाचा दुसरा प्रयोग 11 फेब्रुवारी 1951 रोजी झाला. त्यावेळी ‘नवशक्तिकार’ प्रभाकर पाध्ये यांच्या हस्ते नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या नाटकास आचार्य अत्र्यांची प्रस्तावना लाभली होती. शं. दि. डोंगरे कृत हिंदी अनुवादाचे प्रकाशन ऑक्टोबर 1951 मध्ये झाले.
June 27, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti