नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मैत्र पत्रांचे हा विषय घेतल्यावर आत्तापर्यंत आलेली सगळीच पत्रं, मी पहिल्यांदा, मी पहिल्यांदा करत फाईल्स मधून बाहेर डोकावू लागली. मग थोडा वेळ शांत बसलो आणि अचानक एका पत्रानं लक्ष वेधून घेतलं.
ते पत्र फार वेगळं होतं. मोत्यांची माळ गुंफावी तसं अक्षर होतं.
April 21, 2021
सहा दशकांची नाट्यपरंपरा लाभलेल्या ठाणे शहरात होऊन गेलेल्या आणि सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱया सर्व अभिनेत्यांची दखल घ्यायची तर त्यासाठी स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. नाट्यसंमेलनाच्या स्मरणिकेच्या माध्यमातून ठाण्यातील काही निवडक, प्रातिनिधीक अभिनेत्यांचा घेतलेला हा ओझरता आढावा.
August 1, 2022
इस्पितळातून तेथील ड्यूटी कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यात फोन येतो. हवालदार मेसेज रीतसर लिहून घेऊन ड्यूटी ऑफिसरला थोडक्यात सांगतात . " सर, xxxxxx हॉस्पिटल मधून डेथ बिफोर अँडमिशनचा मेसेज आहे ."ड्यूटी ऑफिसर मेसेज वाचतो . पोलिस स्टेशन डायरी मधे , त्याच्यासोबत जात असलेल्या हवालदारांचा बकल क्रमांक नमूद करून " xxxx इस्पितळात रवाना " झाल्याची नोंद करतो आणि तातडीने निघतो.घटना मृत्युसंबंधी असेल तर स्वाभाविकपणे अधिकारी वेळ दवडत नाहीत.
पोलिस अधिकारी आल्याचे पाहून डॉक्टर वॉर्ड बॉयला इशारा करतात. वॉर्ड बॉय ऑफिसरला कॅजुअल्टी विभागाच्या बाजूच्या खोलीत नेतो . तिथे एकांतात एका स्ट्रेचरवर डोक्यापर्यंत पांढऱ्या चादरीत झाकलेली डेड बॉडी असते. डॉक्टरसुद्धा हाताशी असलेला पेशंट तपासून तिथे येतात. मृत चाळीस बेचाळीस वर्षाची पुरुष व्यक्ती असते. " मासिव अटॅक " . डॉक्टर हलक्या आवाजात शक्यता बोलून दाखवतात. हवालदार डेड बॉडीच्या पंचनाम्यासाठी पंच म्हणून काम करण्यास तयार होणारे कोणी व्यक्ती तिथेच आढळतंत का याचा अंदाज घेत जवळच वावरत असतात. मृताचा एक शेजारी स्वतः पुढे येऊन हवालदाराना आपली ओळख करून देतो. चला ! एक पंच साक्षीदार मिळाला.
काही अंतरावर एका बाकावर ३५/३६ वर्ष वयाची , रडून रडून भग्न झालेल्या चेहेऱ्याची एक स्त्री बसलेली असते. ती मृताची पत्नी. काळोखातून एखादा मोठा दगड येऊन डोक्यावर लागावा असा अनपेक्षित आघात तासा दीड तासापूर्वी पतिच्या निधनाने तिच्यावर झालेला असतो. दु:खातिरेकाने तिचे अश्रू थिजून गेलेले असतात. एकीकडे पति वियोगाचे अनावर दु:ख आणि दुसरीकडे आयुष्याची घडी क्षणात पार विस्कटून टाकणाऱ्या या घटनेमुळे निर्माण झालेल्या भविष्यातील चिंतेचे विचार यांचे एक अभद्र मिश्रण तिच्या चेहेऱ्यावर असते. तिची नजर समोर असली तरी तिचे डोळे भविष्यातील तिला स्वतःलाच पहात असतात. इतर सर्व बाबतीत समर्थ आणि हौशी नवऱ्याची साथ असल्याने घरात आतापर्यंत गृहिणीच्या कर्तव्यापलिकडे तिच्यावर कोणतीही जबाबदारी नसते. बारा तेरा वर्षाचा एरवी वडिलांचा धाक असलेला मुलगा शाळेत जाणारा. येत्या काळात त्याचं शिक्षण , वळण , कामधंदा सगळं तिला तिच्या आवाक्या बाहेरचं वाटतं आणि त्यात ती मनाने पूर्ण खचून जाते.
एक एक करून काही शेजारी आणि मृताचे मित्र इस्पितळात जमा होऊ लागतात. कोणी शेजारी मुलाला शाळेतून घरी आणतो. तो इस्पितळात जाण्याचा हट्ट करत असताना वडील गेल्याचे त्याला कोणी सांगत नसले तरी आईला लावलेल्या फोन कॉलवर त्याचा आवाज ऐकताच तिने फोडलेल्या हंबरड्याने त्याला सर्व काही कळून चुकते.
पंचनामा पूर्ण करून ऑफिसर मृताच्या पत्नीचा जबाब घेतो. तिला काही म्हणायचे नसतेच. ऑफिसर ने विचारलेल्या आवश्यक प्रश्नांना शून्यात नजर लावून बसलेली ती पुटपुटत उत्तरे देते. पोलिस जबाब , पंचनामा अशा रुक्ष गोष्टींमुळे तिचे क्लेष आणखी वाढतात.
त्यांचे जवळचे असे कोणीही नातेवाईक आसपास नाहीत हे ऑफिसरला जाणवते. नातेवाईक आणि शेजारी यांची पुढच्या तयारी विषयीची कुजबूज तिच्या कानावर पडत असते. काही वेळापूर्वी हसत्या खेळत्या असलेल्या तिच्या जीवनसाथीचा उल्लेख आता प्रत्येकजणाकडून "बॉडी" म्हणून एखाद्या वस्तू सारखा केला जात असतो. त्याने तिच्या वेदनेत भर पडत राहते. अधिकारी जबाब पूर्ण करतो.
दुपारी जेवण झाल्यावर वामकुक्षी घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. पाठीत कळ येऊन दरदरून घाम सुटला. अचानक उलटी झाली. चक्कर आल्यासारखे वाटले म्हणून पुन्हा गादीवर आडवे झाले. चादर घामाने भिजली. शेजाऱ्यांना हाक मारून बोलावण्यात आले. त्यांनी टॅक्सी आणली आणि इस्पितळाच्या वाटेवर त्यांनी पत्नीच्या खांद्यावर मान टाकली. डॉक्टरांनी तातडीने तपासले परंतु तो पर्यन्त प्राणज्योत मालवली होती.
मृत्यूपूर्व लक्षणे हृदरोगाची असण्याची शक्यता समजून आल्याने डॉक्टर मृताच्या पत्नीकडे त्याच्या पूर्वीच्या काळातील उपचारांची फाईल मागतात. ती उपलब्ध नसते. पतीला चार पाच वर्षांपूर्वी रक्तदाबाचा त्रास झाला होता आणि त्यासाठी ते काही महिने गोळ्या घेत होते . मात्र नंतर त्यांनी गोळी घेणे सोडून दिले असल्याचे तिला आठवते.
पंचनामा पूर्ण झाल्याचे पाहून मृताचे शेजारी , बॉडी घरी नेण्यासाठी अँब्युलन्स बोलावण्याची गडबड सुरू करतात. ऑफिसर मृताचे शवविच्छेदन अजून बाकी असल्याचे त्यांना सांगतो. कायद्याने आवश्यक अशी ती प्रक्रिया अजून बाकी असल्याचे त्यांच्या गावीही नसते.
त्यांचा गोंधळ उडतो. काही आप्त तावातावाने घरच्यांची काही तक्रार नसताना , कोणावरही संशय नसताना पी. एम. ची जरूरच काय ?असा मुद्दा मांडत ऑफिसरशी वाद घालतात.
आपला चालता बोलता , एरवी कोणताही आजार नसलेला पती अचानक जग सोडून गेला आणि आता आणखी त्याच्या देहाची चिरफाड होऊन विटंबना कशाला ? या विचाराने मृताची पत्नी आणखीनच विव्हळ होते . एव्हाना इस्पितळात पोचलेले त्यांच्या कुटुंबियांचे नातेवाईक पोलिसांशी वाद घालायला सुरुवात करतात.
मृत व्यक्तीचा , मृत्यू पूर्वीचा कोणताही वैद्यकीय इतिहास उपलब्ध नसल्याने मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक याबाबत रीतसर चौकशी होणे अत्यावश्यक असते. तिचाच एक भाग म्हणून शवविच्छेदन करून मृताच्या शरीरात अंतर्गत जखमा आहेत काय हे तपासणे आणि एखाद्या विषाच्या परिणामाने मृत्यू झाला आहे काय याची शहानिशा करण्यासाठी पचन संस्थेतील शिल्लक अन्नाचे नमुने म्हणजेच व्हीसेरा 'न्याय सहाय्यक प्रयोगशाळेत' तपासणी साठी पाठवून देणे हे पोलिसांना कायद्याने बंधनकारक असते. त्यामुळे मृत व्यक्तिंच्या जवळच्या मंडळींनी कितीही आर्जवं किंवा त्रागा केला तरी अशा प्रसंगी शव विच्छेदन अटळ असते.
वेळ न दवडता आवश्यक ते फॉर्म्स भरून ऑफिसर प्रक्रिया पूर्ण करतो. काही वेळा मृताचे अगदी जवळचे कुणीही नातेवाईक उपस्थित नसतात. मृताचे अपत्यही अगदी कुमार वयातील असते .अशा परिस्थितीत शवविच्छेदन झाल्यावर , देह पत्नीच्या ताब्यात देण्याबद्दल लिहून देण्याखेरीज ऑफिसरला गत्यंतर नसते.
हे सर्व सोपस्कार पार पाडत असताना , आयुष्यातील तिचा सर्वात मोठा आधार ध्यानी मनी नसताना गमावल्याने आभाळ कोसळल्यासारख्या परिस्थितीत अगोदरच विदीर्ण मनस्थितीत असलेल्या मृताच्या पत्नीच्या मनाची अवस्था काय होऊ घातलेली असेल याची ऑफीसरला पूर्ण कल्पना असते. ऑफिसरच्या मनाची अशीच घालमेल , एखाद्या अपघाती निधन झालेल्या आपल्या हातातोंडाशी आलेल्या तरण्याबांड मुलाचे शव जेव्हा त्याचे वडील ताब्यात घेतात तेव्हा होते. मन सहानुभूतीने भरलेले असले तरीही हृदय हेलावून टाकणाऱ्या अशा अनेकविध घटनांचा साक्षीदार होताना ऑफिसरला आपल्या भावना व्यक्तही करता येत नाहीत. कायद्याने आखून दिलेले चाकोरीबद्ध काम करताना त्याला आपली हतबलता निर्विकारतेचा मुखवटा घालून लपवावी लागते .
अजित देशमुख ,
( नि ) अप्पर पोलीस उपायुक्त,
9892944007
April 4, 2023
‘“केव्हाच करून झालाय माझा होमवर्क. पण काय रे दादा तुला आज बरं नाही वाटत का?”
“सानू ! आता मी तुला एक गोष्ट सांगतो; पण अगदी आपल्यातच ठेवायची हं ती. कुणाला सांगितलीस तर बघ, माझी शप्पथ आहे तुला.
July 14, 2026
मला तेथे प्रत्यक्षात आला. माझ्या मित्राने सोबत आणलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन वगैरे झाल्यावर आंम्ही आमची प्रकाशित पुस्तके त्यांना भेट म्ह्णून दिली आणि दुसर्या पुस्तकांवर त्यांची स्वाक्षरी ही घेतली त्यांच्या भेटीची आठवण म्ह्णून . त्यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली या चर्चे दरम्यान त्यांनी आंम्हालाही बोलत केल. सुरूवातीला आंम्ही त्यांच्याशी बोलताना चाचपडत होतो पण नंतर त्यांनीच आंम्हाला बोलतं केलं.
January 16, 2014
June 12, 2022
ऐका साती देवांनो तुमची कहाणी. एके दिवशी दिवशी शंकर पार्वती पृथ्वीप्रदक्षिणा करण्यास निघाले. एका आटपाट नगरात मुक्कामी उतरले. पार्वती शंकराची पादसेवा करू लागली. तिचे हात कठीण लागले. शंकराने तिला एका गरिबाच्या बायकोचे बाळंतपण करायला सांगितले. तुझे हाथ कमळासारखे मऊ होतील, असे सांगितले.
July 19, 2023
सरंजामशाही, हुकूमशाही, राजे शाही वा जमिनदारी या सर्वच शोषणावर उभ्या असतात. त्यामुळे या व्यवस्थेतील माणसे बहूतांशी संवेदनहीन असतात… हे एक वैश्विक सत्य आहे आणि हे वास्तव आपण नाकारण्यात अर्थ नाही. प्राचीन काळा पासून भारतीय समाज या सर्वाचाचं अनुभवही घेत आला आहे. ब्रिटीश वसाहतवादी होते व त्यांना आपले साम्राज्य जगभर पसरवायचे होते. ते दूरदर्शी व चलाखही होते त्यामुळे भारतावर राज्य करतानां येथील पारंपारीक व्यवस्थेची वीण विस्कटणार नाही याचीही त्यांनी काळजी घेतली. पण हे घडत असतानां जगातील आधुनिक शिक्षणाच्या वाऱ्यानां त्यांनी पायबंद केला नाही. चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ ब्रिटीशांमुळे होऊ शकली हे एक सत्य आहे. दुसऱ्या महायुद्धाचा सर्व जगावर प्रचंड प्रभाव पडला होता. जागतिक स्तरावर १९४०च्या आसपास “इटालियन न्यूओ-रिअलॅस्टिक सिनेमा” ची चळवळ जोमात सुरू झाली होती आणि भारतात या कालखंडात अनेक नामवंत चित्रपट संस्था जोमाने काम करू लागल्या होत्या. यामध्ये उच्च शिक्षित वर्गातले असंख्य तरूण ओढले गेले होते. अशा तरूणांत अनेक भारतीय तरूणही होते. यापैकी एक म्हणले बिमल रॉय. भारतीय चित्रपटसृष्टतले बारकावे आत्मसात करत असतानां त्यावेळी युरोपात जोमात असलेल्या “इटालियन न्यूओ-रिअलॅस्टिक सिनेमा”चा प्रचंड प्रभाव पडला त्यांच्यावर पडला. यातुनच पूढे त्यांच्या अमर कलाकृती जन्माला आल्या.
हा एक योगायोग म्हणावा की नियती? खरं तर बिमल रॉयचा जन्म श्रीमंत जमिनदार घराण्यातला. ऐषेरामात जगता येईल अशी श्रीमंती असताना ते या मायावीनगरीकडे ओढले गेले. नुसते ओढले गेले नाही तर जे चित्रपट त्यांनी केले ते त्यावेळच्या समाज व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले. मला व्यक्तीश: म्हणूनच हा माणूस खूप मोठा वाटतो. जमिनदारीमुळे सर्वसामान्य भरडली जाणारी माणसे आणि जाती व्यवस्थेमुळे हीन दिन झालेला एक फार मोठा समूह या जमिनदाराच्या पोराला अस्वस्थ् करू शकतो यावरून हा तरूण संवेदनशिल होता आणि आपल्या चित्रपटात ही संवेदनशिलता त्याने जपली देखील. कदाचित म्हणूनच वास्तवादी व सामाजिक भान असलेले चित्रपट ते तयार करू शकले. सध्याच्या बागंला देशमधील ढाका जवळच्या सुआपूर येथील जमिनदारच्या घरात ते जन्मले. चित्रपट माध्यमाच्या ओढीने ते कलकत्यात आले. त्यावेळी “न्यू थिएटर्स प्रायव्हेट लिमीटेड” ही मात्तब्बर चित्रपट संस्था कलकत्त्यात चित्रपट निर्मिती करत होती. बिमलादा इथे रूजू झाले. संस्थेचे दिग्दर्शक पी.सी. बरूआ यांच्या कडे ते पब्लिसिटी फोटोग्राफर म्हणून काम करू लागले. या संस्थेचा “देवदास” त्यावेळी प्रंचड गाजत होता. बिमलदाच्या डोक्यात या देवदासने पूर्ण शिरकाव केला होता आणि भविष्यात ते याच विषयावर चित्रपट बनवणार होते. न्यू थिएटर्स मध्ये असतानां ते समातंर चित्रपटाच्या चळवळीत पण संक्रिय होते. मग हळूहळू न्यू थिएटर ओसरणीला लागली. बिमलादा यानां आत मुंबई शिवाय पर्याय नव्हता. १९५० मध्ये त्यांनी हृषिकेश मुखर्जी (संकलक),नवेंदू घोष (पटकथाकार), असित सेन (सहाय्यक दिग्दर्शक),कमल बोस (कॅमेरा मन) यानां घेऊन मुंबई गाठली. नंतर काही महिन्याने सलील चौधरी (संगीतकार) हे ही त्यानां सामिल झाले. विशेष म्हणजे बिमलदा चे हे सर्वच सोबती कालातंराने चित्रपटसृष्टीतील दिग्गज बनले. यात हृषिदा चे सहाय्यक गुलजार ही होते.
१९५२ मध्ये बिमल रॉय यांनी आपली दुसरी इनिंग सुरू केली. आगोदरच्या चित्रपटा बाबत अधिक चर्चा मी टाळत आहे कारण बिमल दा चे अत्यंत महत्वाचे चित्रपट हे १९५२ ते १९६६ या कालखंडातले आहेत. दिग्दर्शक म्हणून जागतिक पातळीवर जे त्यांचा लौकिक झाला तो याच काळात. बिमल दा नी या काळात माँ (१९५२), परिणीता (१९५३), दो बिघा जमिन (१९५३), नोकरी (१९५४), बीराज बहू (१९५४), बाप बेटी (१९५४) देवदास (१९५५), यहूदी (१९५८), मधूमती (१९५८), सुजाता (१९५९), परख (१९६०), प्रेमपत्र (१९६२), बंदीनी (१९६३) असे १३ चित्रपट केले. पैकी परिणीता, दो बिघा जमिन, बीराज बहू, देवदास, यहूदी, मधूमती, सुजाता, बंदीनी हे त्यांचे असे चित्रपट आहेत की ज्यामुळे त्यांची दखल जागतिक चित्रपटसृष्टीला देखील घ्यावी लागली. प्रत्येक चित्रपटाचा विषय तसा वेगळा जरी असला तरी पण त्यांची सामाजिक भानाची पकड मात्र विलक्षण होती. “दो बिघा जमीन” हा त्यांनी अनुभवलेल्या जमिनदार व्यवस्थेचा परीपाकच होता. एखादे वाहन ओढण्यासाठी पशुचा वापर करणे यात कोणालाच वावगे वाटण्याचे कारण नाही पण माणसाने एखादे वाहन पशू सारखे ओढत न्यावे आणि त्या वाहनावर माणसांनी स्वार व्हावे हा अमानुष प्रकार आजही मन काळवंडून टाकतो. “दो बिघा जमीन” मध्ये एका प्रसंगात घोडागाडी आणि माणूस गाडी याच्यातील एक रेस आहे. शंभू महातो (बलराज सहानी) आपल्या दो बिघा जमीनीचा तुकडा जमिनदाराच्या तावडीतुन सोडविण्यासाठी कलकत्त्यात येऊन रिक्षा ओढण्याचे काम करू लागतो. एकदा एक पैसेवाली आसामी याच्या रिक्षात बसते. शंभू रिक्षा ओढत असतानां एक घोडागाडी त्याला ओव्हरटेक करते. ते बघून ती आसामी शंभूला म्हणते- तू जर या घोडा गाडीच्या पूढे गेलास तर तुला जास्त पैसे देईन. आणि मग सुरू होते ती माणूस आणि पशू याच्यातील रेस..खरं तर आजही ही रेस कुठे थाबंलीय? ती सुरूच आहे. वाहनं बदलली असतील माणस बदलली असतील पण रेस कायम आहेच. बलराज सहानी या अभिनेत्याने या प्रसंगात अक्षरश: कमाल केली आहे. त्यांनी स्वत: खरोखरच ही रिक्षा ओढली. कलकत्त्याच्या सिंमेट रोड वरून भर दुपारी ते अनवाणी पायाने रिक्षा ओढत होते आणि कुणालाच हे समजले नाही की हा माणूस बलराज सहानी आहे. आपल्या कामाप्रती अशी निष्ठावान माणसे होती म्हणूनच आमच्या चित्रपटांचा डंका परदेशा पर्यंत वाजू शकला. बा…बलराज.. तुझ्यातल्या शंभूला माझा त्रिवार सलाम…
“निचा नगर” या चित्रपटा नंतर कान्स फिल्म फेस्टीव्हल मध्ये पुरस्कार प्राप्त करणारा “दो बिघा जमिन”हा दुसरा चित्रपट ठरला. बॉलिवूड मधील पहिल्या सर्वोत्कृष्ट २५ चित्रपटात या चित्रपटाची गणणा होते. सुजाता आणि बंदीनी हे दोन्ही चित्रपट स्त्री प्रधान व्यक्तीरेखा असलेले. दोन्हीमध्ये नूतनचा उत्कृष्ट अभिनय आहे. “सुजाता” ही एका अनाथ् अस्पृश्य मुलीची कथा. अत्यंत टोकदार पणे बिमलदाने ही कथा हाताळली. त्या काळची समाज व्यवस्था बघता अस्पृश्यता हा विषय खूपच कमी लोकांनी हाताळला आहे. कदाचित व्यवसाय डोळ्या समोर असावा. “बंदिनी” हा विषय देखिल असाच. एक तरूण स्त्री खूनाच्या आरोपात तुरूंगवास भोगत आहे. फ्लॅश बॅक पद्धतीचा अत्यंत सुंदर वापर करत ही बंदिनी बिमलदा नी उलगडून दाखविली आहे. या चित्रपटाने उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शन, छायाकार,ध्वनी संयोजक अणि कथा असे पाच फिल्म फेअर पुरस्कार मिळवले. १९६३ चा राष्ट्रीय पुरस्कार पण या चित्रपटाने मिळवला. नुतनच्या अभिनय क्षमतेचे सर्व पैलू बिमलदाने यात उलगडून दाखविले आहेत.
“मधूमती” हा तसा एका अर्थी सुंदर आदर्श व्यवसायिक चित्रपट. ऋत्विक घटक यांची कथा पटकथा असलेल्या या चित्रपटात पूर्नजन्माची कथा अत्यंत वेगळया पद्धतीने सादर केली गेली. मात्र या चित्रपटात सर्वात मोठा वाटा सलील चौधरी यांच्या संगीताचा होता. सर्वच गाणी एकापेक्ष एक सरस आहेत. हा चित्रपट आणखी एका वेगळ्या कारणांनी गाजला. त्या वर्षी या चित्रपटाला ७ राष्ट्रीय तर ६ फिल्म फेअर असे तब्बल १३ पुरस्कार मिळाले. फिल्मफेअर पुरस्काराचे हे रेकॉर्ड तर ३७ वर्षे अबाधित होते. १९९५ मध्ये प्रदर्शीत झालेल्या “दिलवाले दुल्हनिया ले जाएगें” या चित्रपटाने मग हे रेकॉर्ड तोडले. यातील सर्व गाणी शैलेंद्र यानी लिहली होती. बिमलदाची जागतिक चित्रपटसृष्टीवर बारीक नजर होती. शिवाय तंत्रज्ञानाचा अभ्यासही सूक्ष्म होता. कृष्णधवल चित्रपटात प्रकाश योजनेला खूप महत्व असते. शॉडो अन्ड शेड चे अचूक ज्ञान त्यांचे चित्रपट बघताना लक्षात येतं. चित्रपटात छोट्या छोट्या प्रतिकांचा खूपच सुंदर वापर ते करीत असत. नुतनच्या चेहऱ्याचे अतिशय सुंदर क्लोजअप्स “सुजाता” आणि “बंदीनी” मध्ये बघायला मिळतात. गुलजार यांना बंदीनी मध्ये सर्वप्रथम गीत लेखनाची संधी बिमलदा नी दिली….मोरा गोरा अंग लै ले…
सर्वात मोठी मुलगी रिंकी हीने प्रसिद्ध दिग्दर्शक बासू भट्टायार्च यांच्यांशी दोन्ही कुटूंबाचा विरोध पत्करून लग्न केले. दूर्देवाने हा प्रतिभावान दिग्दर्शकी ही अल्पायुषी ठरला. पत्नी मनोबिना आणि रिंकी, यशोधरा, अपराजिता या तीन मुली व जॉय रॉय या मुलांना मागे ठेवून ८ जानेवारी १९६६ ला वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी पॅकअप केले. आज त्यांचा वाढ दिवस….त्यांना विनम्र अभिवादन
-दासू भगत (१२ जुलै २०१७)
July 12, 2017

सातारला प्राचीन तसेच ऐतिहासिक शिवकालीन पार्श्वभूमी आहे हे सर्वश्रुत आहे. राष्ट्रसंत प.पू. रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, ब्रह्मेन्द्र स्वामी, गोपाळनाथ महाराज त्रिपुटी, गोंदवलेकर महाराज अशा अनेक संतविभूतींची साहित्य ग्रंथ संपदा लाभली आहे आणि तोच अध्यात्मिक साहित्य, कला, संस्कृतीचा देखील प्राचीन वारसा लाभला आहे हे मागील ३३ व्या भागातून प्रत्ययास येते.
June 28, 2021
हे सगळे जे घडले होते, ते माझ्या कल्पना शक्तीच्या पलीकडे होते. माझा माझ्यावरच विश्वास नव्हता कि, मी अशा कुठल्या अस्तित्वात असलेल्या स्वामींना मनोभावे नमस्कार करेन. कुठले योग होते हे दत्तगुरुच जाणे!!
May 29, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti