(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आणीबाणी

    पुण्यातल्या तरुण भारत या दैनिकामध्ये त्यावेळी मी काम करीत होतो. नेमकेपणानं सांगायचं तर २६ जून १९७५ रोजी रात्रपाळीचा उपसंपादक म्हणून माझं काम सुरू होतं. त्याआदल्या दिवशी पहाटे चारपर्यंत ऑफिसमध्येच होतो. इंदिरा गांधींनी काही विरोधी नेत्यांची धरपकड केल्याचं छोटं वृत्त त्यादिवशीच्या अंकात प्रसिद्धही केलं होतं; पण खरी सुरुवात झाली ती २६ जून रोजी. देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. अटकसत्र सुरू होतं. घटना अत्यंत वेगानं घडत होत्या. आता विचार केला तर वाटतं आणीबाणीचं गांभीर्य त्यावेळी तरी तेवढ्या प्रमाणात जाणवलेलं नव्हतं. लोकशाहीवर संकट, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा याबाबी कळत होत्या; पण त्याहीपेक्षा आपण पत्रकारितेत आहोत आणि या सर्वांचा थेट अनुभव घेत आहोत याचं थ्रील अधिक होतं. कामापेक्षाही गप्पा, चर्चा, प्रतिक्रिया अधिक येत होत्या. मी ज्या दैनिकात काम करीत होतो त्याच्या ध्येयधोरणाला पाठिंबा द्यावा किवा विरोध करावा. अशी मानसिकताही नव्हती. मात्र, देशातल्या या घडामोडीमुळं सार्वत्रिक अस्वस्थता मात्र होती. आणीबाणीचा पत्रकारितेवरचा थेट परिणाम म्हणून सेन्सॉरशिपचा विषय पुढे येत होता आणि आता बातम्या द्यायच्या काय, कशा अन् किती असे प्रश्न पुढे येत होते. त्यावेळी मी या क्षेत्रामध्ये इतका नवा होतो, की त्याच्या परिणामाची कल्पना करता येऊ नये. मला आठवतं त्यादिवशी एस. एस. सी.चा निकाल होता आणि आणीबाणीतल्या घटना-घडामोडी होत्या. जयप्रकाशांपासून अडवाणींपर्यंत अन् जॉर्ज फर्नांडिसांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अटकसत्र सुरू होतं. बातम्यांना कमतरता नव्हती. आणीबाणीचा निषेध म्हणून अग्रलेखाची जागा कोरी ठेवण्याचा निर्णय घेतला गेला होता. एकूण काम सुरू होतं. रात्री अकरा-साडेअकराची वेळ असावी, एक फोन आला की सेन्सॉरचं काम आजपासूनु सुरू होणार. रात्री बारानंतर त्यावेळचे पोलीस उपायुक्त वसंतराव पारसनीस आपल्या ताफ्यासह कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी सोलापूरसाठीचा अंक छापून तयार होता. तो अंक त्यांनी पाहिला अन् कोणत्या बातम्या द्यायला नकोत याच्या खुणा ते करू लागले. एक, दोन, तीन, पाच अशा विविध बातम्यांवर लाल रेघा उमटत होत्या. आपल्या अधिकार्‍यांना सूचना देऊन ते निघून गेले. रात्रीच्या वेळी माझ्या दोन ज्येष्ठ सहकार्‍यांशिवाय अन्य कोणी नव्हते. या बातम्या काढून टाका, असा आदेश अधिकार्‍यांनी दिला. या बातम्या काढून टाकणं अशक्य आहे, कारण त्या बातम्या काढल्या, तर तिथे कोणत्या बातम्या टाकणार, हा प्रश्न होता. त्यावेळी मोनो किवा लायनो कास्टिंग पद्धतीनं कंपोज तयार केला जायचा. या बातम्या एकमेकाजवळ एका पानात रचून त्याचा छाप एका जाडसर कागदावर घेतला जायचा अन् त्यानंतर मशीनवर बसविता येईल असा अर्धगोलाकार साचा तयार व्हायचा. फ्लाँग, स्टिरिओ अशी नावं त्याला होती. या बातम्या काढून टाकणं किती अवघड आहे हे सांगण्याचं काम माझ्यावर आलं. पोलीस अधिकार्‍याला यंत्रणा आणि वास्तव मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. त्या बातम्या काढल्या नाही तर अंक प्रसिद्ध होऊ देणार नाही अशी त्याची भूमिका होती. याचवेळी मला राऊटिग यंत्राची आठवण आली. मी म्हणालो, ‘‘जो अंकाचा, पानाचा साचा तयार झाला आहे. तेथून या बातम्या काढून टाकता येतील. एका अर्थाने पानात लिहिलेला मजकूर नको असेल तो खोडता येईल.’’ झाले, अधिकार्‍याला त्या बातम्या येऊ नयेत एवढेच हवे होते. त्याचे काम झाले होते. त्यानं माझ्या समवेत उभं राहून नको त्या बातम्या खोडायला सांगितल्या. राऊटिग मशीनमधला खोडकाम करणारा भाग त्या सयार्‍यावरची उमटणारी अक्षरं खोडत गेला आणि असं पान तयार झालं की जे प्रसिद्ध होणं सरकारला नको होतं. दुसर्‍या दिवशी विविध अंक प्रकाशित झाले ते तरुण भारतपेक्षा वेगळे नव्हते. त्यात एस. एस. सी.चा निकाला होता; पण दिल्लीतील वीज गायब हे वृत्त नव्हतं. सेन्सॉरशिपची चौकट होती; पण धरपकडीतलं नाट्य नव्हतं. २६ जून रोजी दिल्लीत किवा भारतात काय घडलं. याचं चित्रण पूर्णपणे पुसलं गेलं होतं. मात्र, अंकाचा तो चेहरा पाहून या रिकाम्या जागांवर काय, काय असू शकेल याचा अंदाज येत होता. आणीबाणीचा विरोध लोकांपर्यंत जाऊ नये असं शासनाला वाटत होतं अन् तो रिकाम्या जागातून अधिक तीव्रपणे व्यक्त होत होता. आणीबाणीच्या पहिल्या टप्प्यात सहभागी होतांना आपण वृत्तपत्राच्या इतिहासातल्या महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार झालो याचा आनंद होता. आज जाणवतं, मौन हा केवळ रुकार असत नाही, तो नकारही असतो. निषेधही असतो अन् क्षोभही! त्यादिवशी सर्वच वृत्तपत्रे यार्‍या अर्थानं अभिव्यक्त झाली होती. काहीही न सांगता रिकामी असतानाही!

    -- किशोर कुलकर्णी

      March 4, 2006


  • साहित्य सुगंधासारखं घरात घुसलं पाहिजे

    १९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री व. पु. काळे यांनी लिहिलेला लेख 

      August 24, 2023


  • झुरळाने काटा काढला! – भाग 2

    दोन वर्षांनी मला मशीदबंदरला एका सहकारी बँकेत नोकरी लागली. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून मी अर्धापाऊण तास आधीच गेलो तेव्हा वॉचमन बँकेचं दार उघडत होता. मला पाहून तो म्हणाला, “साहेब! बँक उघडायला अजून वेळ आहे, काय नवीन खातंबितं खोलायचंय का?”

    “नाही मी इथं नोकरीसाठी आलोय. आजपासून हजर व्हायचं आहे.” “असं का मग बसा आत, थोड्या वेळाने गोरेसाहेब येतील त्यांना भेटा. ते आले म्हणजे मी सांगतो तुम्हाला.” असे म्हणून त्याने दरवाजा उघडला आणि मी आत जाऊ बसलो.

      June 24, 2022


  • चित्त शांत झोप देई (सुमंत उवाच – ४८)

    सुमंत जयंत परचुरे. 

    स्वभाव हा कोणालाच चुकलेला नाही अगदी देव-देवता ही यातून सुटलेले नाहीत.

      October 9, 2021


  • देव ही संकल्पना

    अनेक योनी ही निसर्गाची निर्मिती आहे. सजीव प्राण्यांमध्ये झाडे, वनस्पती, क्रिमी, किटक, पक्षी, जनावरे इत्यादी अनेक प्रकारचे सजीव आहेत. यांची चक्रमय योजना …..

      October 7, 2017


  • जोडीदार

    एक दिवस सकाळी बायको नवऱ्याला नाश्ता देत असते. नवरा नाश्ता खाता खाता तिला शांतपणे म्हणतो “मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. आपले नाते आता शिळे झाले आहे. माझे माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम आहे. मी तिच्याशी लग्न करणार आहे.”

      June 21, 2024


  • इष्ट-अरिष्ट

    पावसाळ्यातल्या एका संध्याकाळी तो निवांत बाल्कनीतल्या खुर्चीत बसला होता.. पाऊसही सगळ्या परिसीमा ओलांडून बरसत होता.. अगदी त्या रात्री सारखाच !!…त्यामुळे तो जुना प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहणं सहाजिकंच होतं …

      February 4, 2026


  • बनगरवाडीचा लेखक – व्यंकटेश माडगुळकर

    मी वाचन सुरु केल्यानंतर पहिल्या उत्साहात खूप पुस्तकं वाचली. खुप म्हणजे बरीच पुस्तकं वाचली. अक्षरशः एका दिवसात चारचाराशे- पाचपाचशे पानाची पुस्तकं मी संपवली आहेत. तो उत्साह आता कुठे गेलं कळत नाही. असंच एक दिवसात मी एका बैठकीत ‘बनगरवाडी’ हे पुस्तक वाचून काढलं होतं. जी अनेक पुस्तकं कायम लक्षात राहतात त्यापैकी बनगरवाडी हे आहे. मल वाटत नाही कि ती कादंबरी वाचताना लागलेला वेळ आणि मिळालेला आनंद कधी विसरला जाईल. सगळं आयुष्य लहानपणापासून शहरात गेलेलं आहे. आणि बनगरवाडीची सगळी गोष्ट त्या ग्रामीण भाषेत आहे. त्यामुळे सुरवातीला ती भाषा आणि ते जीवन अनभिज्ञ वाटत राहतं. पुस्तकातल्या जीवनामध्ये जो जिवंतपणा आहे तसाच आपल्या रोजच्या जगण्यातही आहे.

      April 3, 2017


  • भोगीची शिकवण

    माझ्या लक्षात आले की परिस्थिती बदलली की आपण बदलतोच. आता कोरोना मुळे सगळीच परिस्थिती बदलली आहे म्हणून एक सूपवाण देण्या ऐवजी आपण एका घरातील सर्व माणसांना पुरेल एवढे हेच सामान दिले तर… बऱ्याच जणांना नोकरी. व्यवसाय बंद झाले आहेत म्हणून..

      January 31, 2022


  • अशी अद्दल घडली

    एक राजा होता. त्याला मासे खाण्याची प्रचंड आवड होती. एक दिवसही मासे खायला मिळाले नाही तर तो अस्वस्थ व्हायचा. त्यामुळे त्याच्या भोजनात रोज मासळी असायचीच. काशीराम नावाचा एक गरीब मच्छिमार रोज समुद्रावर जायचा व ताजी मासळी पकडून राजवाड्यात घेऊन जायचा व राजाच्या आचार्याला द्यायचा. मात्र पहाऱ्यावर असलेला कोतवाल फार लबाड व भ्रष्ट होता. तो राजवाड्यात जाण्यासाठी काशीरामकडून रोज थोडेतरी का होईना पैसे घ्यायचा. कोतवालाच्या या मुजोरीला काशीराम कंटाळला होता, परंतु कोतवालाविरुद्ध तक्रार कशी करायची? म्हणून त्याचा नाईलाज झाला होता. एकदा मासे पकडण्यासाठी काशीराम नेहमीप्रमाणे समुद्रावर गेला. मात्र समुद्र खवळला होता. त्यामुळे तो मासेमारी न करताच घरी परतला. त्या दिवशी राजाच्या भोजनात ताजी मासळी नव्हती त्वामुळे राजा खूपच संतप्त झाला होता. दुसऱ्या दिवशीही तीच परिस्थिती कायम होती. त्यामुळे राजा आणखीनच अस्वस्थ झाला. काशीरामला हे कळताच तो तिसऱ्या दिवशी पुन्हा समुद्रावर गेला. समुद्र खवळलेलाच होता. तरीही त्याने जीव धोक्यात घालून मासेमारी केली व ताजी मासळी घेऊन राजवाड्यात गेला. कोतवालाने त्याला अडविले व तो त्याला म्हणाला, तुझ्याजवळची ताजी मासळी पाहून राजा खुश होईल व तो तुला नक्कीच बक्षीस देईल त्यातले निमे बक्षीस मला द्यावे लागेल हे तू लक्षात ठेव. भ्रष्ट कोतवालाला अद्दल घडविण्याची हीच संधी आहे, हे ओळखून काशीरामने कोतवालाची मागणी मान्य केली. कोतवालाबरोबर आलेल्या काशीरामला पाहून राजा खुश झाला व त्याने त्याला बक्षीस मागण्यास सांगितले. त्यावर काशीरामने बक्षीस म्हणून चाबकाचे वीस फटकारे मारा, अशी राजाकडे विनंती केली. राजाने त्याची ही विचित्र मागणी मान्य केली. दहा फटके खाल्यावर काशीरामने आता उरलेले फटके कोतवालाला मारा अशी राजाला विनंती केली. तेव्हा राजाच्या लक्षात खरा प्रकार आला. त्याने उरलेले दहा फटके कोतवालाला मारण्याचा आदेश दिला. शिवाय त्याला नोकरीवरून काढून टाकले व काशीरामला बक्षीस म्हणून सुवर्णमोहोराची थैली दिली.

      February 14, 2017