(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सफर सम्राट

    दैनिक रोजची पहाट’चे प्रमुख वार्ताहर काका सरधोपट बरोबर दहा वाजता ‘सफर सम्राट’ म्हणजे ज्याला आपण प्रचलित मराठीत ‘किंग ऑफ सफारी म्हणतो, त्या राघोभरारींच्या सोनेरी सफरच्या कार्यालयात म्हणजे ज्याला प्रचलित मराठीत ‘ट्रॅव्हल एजन्सी’ म्हणतो तिथे पोचले. दैनिक ‘रोजची पहाट’च्या पर्यटन विशेषांकासाठी त्यांची मुलाखत घ्यायला. मुलाखतीची वेळ सकाळी सव्वादहाची होती आणि राघोभरारी हे वेळेच्या बाबतीत फार आग्रही असतात असं संपादकांनी काकांना बजावलं होतं. शिवाय सोनेरी सफरने दोन पानी ‘संपूर्ण पानभर’ म्हणजे प्रचलित मराठीत ज्याला आपण ‘फुल पेज’ म्हणतो तशी जाहिरात दिली होती याची जाण ठेवा असा सल्लाही दिला होता. तर काकांनी सोनेरी सफरच्या कार्यालयात बरोबर दहा वाजता येण्याचं प्रयोजन काय यासाठी एवढी प्रस्तावना पुरे आहे.

     

      July 31, 2022


  • फाटक्या खिशाला वाटे (सुमंत उवाच – ७७)

    सुमंत जयंत परचुरे. 

    केवळ मोठाली घरे, गाड्या, महागातले कपडे, पायातल्या ब्रॅण्डेड चपला- शूज, हातातली महागडी घड्याळं, फोन, लॅपटॉप हे सगळे असले किचं माणूस सुखी होतो किंवा असतो असे मानणे मूर्खपणाचे आहे.

      November 19, 2021


  • अवघा रंग एक झाला !

    किशोरीताई गेल्या….. यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले….. आज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा आहे हिचा! असंच वाक्य येतं ना ? लता , अाशा काय गाते असंच येतं ना ? या सगळ्या थोर कलाकारांशी अापण अापली तुलना करुच शकणार नाहि , पण तरीहि ते सगळे एकेरी संबोधण्याएवढे जवळचे वाटतात , हो ना ? अापल्या नेहेमीच्या अायुष्यात बर्‍यावाईट प्रसंगानुरुप एक निसर्ग वगळता कुठलंच पार्श्वसंगीत नसतं , तरीही संगीताच्या साथीने अालेले सूर अायुष्य व्यापून टाकतात….. रात्री एकटं असताना मुकेश सखा असतो

      April 4, 2017


  • राजा वीरकेतू, चोर आणि रत्नवती

    त्रिविक्रमसेन राजा शिंशपवृक्षाकडे आला आणि वेताळाला पूर्वीप्रमाणेच खाद्यांवर घेऊन तो पुन्हा यायला निघाला. तेव्हा खाद्यांवरील शवातील वेताळ त्याला म्हणाला, ‘हे महाराज, तू फार दमला असशील! म्हणून तुझे श्रमपरिहार करण्यासाठी मी एक कथा सांगतो. ती ऐक.’

      October 5, 2025


  • एकनिष्ठ मित्र (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३९)

    एका सकाळी उंदीरमामा आपल्या बिळांतून चमकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होता.

      August 5, 2022


  • चिकमावगा (ॲम्ब्रोज बिअर्स याची एक कथा)

    तरूण असतांना त्याचा बाप सैनिक म्हणून पाशवी जमातींशी लढला होता व त्याने देशाचा झेंडा दूरवर फडकवला होता. मळ्यावरच्या शांत जीवनांतही त्याच्यातल्या सैनिकाची धग जिवंत होती कारण एकदा पेटलेला तो अंगार कधीच विझत नाही. त्याला युध्दाची चित्रे असलेली पुस्तक आवडत आणि ती पाहून मुलालाही इतकी समज आली होती की त्याने लाकडी फळीची तलवार केली होती; अर्थात वडिलांना कदाचित ती तलवार वाटली नसती. आता तो मुलगा त्याच्या शूर जमातीला शोभेशा धीटाईने ती तलवार हातात धरून थांबत, हवेत फिरवत, पवित्रे घेत चालला होता. त्याला सहजतेने ह्या अदृश्य शत्रुंवर विजय मिळत होता. त्यामुळे त्याने शत्रुचा पाठलाग करत पुढे पुढेच जात रहाण्याची, सर्व सेनांनीकडून नेहमीच घडणारी, चूक केली आणि तो एका उथळ ओढ्याच्या कांठावर येऊन पोहोचला; त्याच्या कल्पित शत्रुने तो ओढा सहज वाऱ्याच्या गतीने पार केला होता. समुद्र पार करणाऱ्या त्याच्या जमातीची विजिगीषु वृती त्याच्याही लहानशा हृदयात धडधडत होती. त्याने त्यात मोठे दगड वगैरे शोधून काढून त्यांच्या आधाराने धडपडत तो ओढा ओलांडला व परत शत्रुचा पाठलाग सुरू केला.

      July 22, 2022


  • सर्वात वेदनादायक दंश कोणाचा?

    एक राजा होता. एके सायंकाळी तो राजवाड्याभोवती असलेल्या बागेत फिरायला गेला. तेथे एका झाडावर मधमाशांचे पोळे होते. असंख्य मधमाशा ये-जा करत होत्या. राजा थोडा वेळ तेथे थांबून त्या
    मधमाशांचे निरीक्षण करू लागला; परंतु तेवढ्यात एकाएकी एक मधमाशी खाली आली व राजाच्या हाताला दंश करून उडून गेली. राजा कळवळला. बरोबरच्या सैनिकांची धावपळ झाली. गांधीलमाशीच्या दंशामुळे राजाचा हात सुजला. राजवैद्यांनी उपचार करून हात बरा केला, मात्र त्यात दोन दिवस गेले.
    राजाला वाटले की, एक साधी गांधीलमाशी चावल्यामुळे आपले दोन दिवस वाया गेले,मग सर्वात जास्त वेदना देणारा दंश कोणाचा असू शकेल?

    एके दिवशी राजदरबारातच त्याने हा प्रश्र्न उपस्थित केला. कोणी म्हणाले, सापाचा दंश फारच वेदनादायक असू शकतो, तर कोणी म्हणाले, फणा काढणारा नाग चावला तर तो पाणीदेखील मागू देत नाही. तर एकाने सांगितले, विंचवाचा दंश फारच वेदना निर्माण करणारा असतो; परंतु राजाला ती
    सर्व उत्तरे नेहमीची म्हणजे पुस्तकी वाटली. त्यामुळे त्याचे समाधान झाले नाही. तेव्हा राजदरबारातील वयोवृद्ध मंत्री उठून उभा राहिला व म्हणाला, महाराज, दोघांचा दंश फारच प्रखर असतो. राजाने विचारले, ते दोघे कोण? त्यावर तो मंत्री म्हणाला, हे एक स्तुतिपाठक व दुसरा निंदक, एक समोरून दंश
    करतो, तर दुसरा पाठीमागून. मात्र दोघांचे दंश तसे इतके प्रखर असतात त्यामुळे माणसाचे मन बेभान तरी होते किंवा संतापामुळे त्याचा उद्रेक तरी होतो. राजाला त्या मंत्र्यांचे उत्तर मनोमन पटले व त्याबद्दल त्या मंत्र्यांचे दरबारातच त्याने कौतुक केले.

      July 12, 2016


  • ड्रॅक्युलाचा पाहुणा (संक्षिप्त रूपांतरीत कथा १९)

    ब्रॅम स्टोकर ह्या लेखकाची ‘ड्रॅक्युला’ ही कादंबरी खूप गाजली. तीही त्याच्या मृत्यूनंतर. त्याच्या इतरही भूतांवरच्या कादंब-या आहेत. ड्रॅक्युला जेव्हां चित्रपट रूपात लोकांच्या समोर आली त्यानंतर जास्तच लोकप्रिय झाली. प्रस्तुत कथा त्याच्या पत्नीने त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित केली. ही कथा म्हणजे ड्रॅक्युला ह्या कादंबरीचं पहिलं प्रकरण आहे, असं अनेकांच म्हणणं आहे. ड्रॅक्युला जेव्हां प्रसिध्दीसाठी पाठवली तेव्हां पुस्तकाची लांबी कमी करण्यासाठी हे पहिलंच प्रकरण गाळण्याचे प्रकाशकांनी ठरवले व लेखकाने ते मान्य केले. पुढे त्यांत थोड्या सुधारणा करून ती कथा म्हणून प्रसिध्द केली गेली.
    ड्रॅक्युलाचा अर्थ ड्रॅक्युल ह्या उमरावाचा मुलगा तो ड्रॅक्युला असा आहे. पंधराव्या शतकांत ट्रान्सिल्व्हानियामधे ड्रॅक्युला राजा होता. त्याचे राज्य दोन मोठ्या राज्यांच्या मधे सांपडल्यामुळे दोघांच्या युध्दात तें भरडले जाई. १४४८ ते १४७६ पर्यंत तो तिथला राजा होता. आतां हा भाग रोमानियामधे येतो. दोनदां त्याचे सिंहासन गेले व त्याला झगडून परत मिळवावे लागले. तो अतिशय क्रूर प्रकारे शिक्षा देत असे व त्याने हजारो बळी घेतल्याचा उल्लेख आहे. परंतु ख्रिश्चॅनिटीचा तो पुरस्कार करीत असे. त्यामुळे व्हॅटीकन त्याच्याविरूध्द बोलत नसे. तो युध्दातच मारला गेला. त्याचे शव जिथे पुरले होते तिथून नाहीसे झाले. नंतर त्याचे अवशेष दुसरीकडे सांपडले ते म्युझियममध्ये ठेवण्यांत आले होते पण तेंही नाहीसे झाले (बहुदा चोरले गेले). ब्रॅम स्टोकरने कादंबरीत ड्रॅक्युला हा एकोणीसाव्या शतकांतला उमरावाच्या रूपांतील भूत म्हणून सादर केला आहे. प्रस्तुत गोष्टीत मात्र तो कथा सांगणा-याची मर्जी सांभाळण्यासाठी सुरूवातीला त्याला मदत करतांना दाखवला आहे. कथेत ड्रॅक्युलाचा तीनदा उल्लेख येतो. प्रथम तो एक उंच किडकिडीत माणसाच्या रूपांत दिसतो व नाहीसा होतो. दुस-यांदा तो काउंटेसच्या कबरीवर वीज पडते तेव्हां लेखकाला तिथून उचलून वाचवतो आणि लांडग्याच्या रूपांत थंडीत त्याचे रक्षण करतो. तिसरा उल्लेख नांवानिशी पत्रांत येतो. गूढ निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष उल्लेख मात्र केलेला नाही.

      May 11, 2022


  • बाहुलीची किंमत

    सहा वर्षांचा एक छोटा मुलगा त्याच्या चार वर्षांच्या बहिणीसोबत मार्केटमध्ये गेलेला असतो. ते दोघे बाजार बघत चाललेले असतात. थोड्यावेळाने भावाच्या लक्षात येते की आपत्री बहीण आपल्याबरोबर नाही. तो शोधाशोध करु लागतो. काही अंतर चालल्यावर एका दुकानासमोर त्याची बहीण उभी असलेली त्याला दिसले.

      April 29, 2024


  • उमलून जाते फुल (सुमंत उवाच – ६२)

    सुमंत जयंत परचुरे. 

    आपण काय म्हणून जगतो, काय म्हणून कर्म करतो, आपल्याला नक्की काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे हे सगळं विचार करण्यास भाग पाडत असलं तरी कधी कधी आपली पेक्षा आपल्यामुळे कोणाचे काही बिघडत नाही ना? याचा विचार करणे जास्त महत्वाचे ठरते.

      October 23, 2021