(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कोरडाच राहिलो सदा

      

      May 28, 2013


  • भुयारी

    पोरगं बाहेर आलं. हातातल्या मळक्या कपड्याने त्याने टेबल साफ केलं आणि उचलावी की उचलू नये असा विचार करत ती नोट त्याने गल्ल्यावर नेऊन दिली. ‘क्या गंदा काम करता है!’ एवढच पुटपुटत तो आत निघून गेला.

      June 19, 2022


  • पुरस्कार आणि सत्कार

    कोणत्याही कामाचं केलेलं कौतुक म्हणजे तो एक पुरस्कारच असतो. त्या कौतुकानं त्या व्यक्तीला उमेद मिळते. पाठीवर मिळणारी शाबासकी, हे देखील एक प्रकारचं कौतुकच असतं.

      August 20, 2021


  • मुखपुस्तिका उर्फ फेसबुक एक्सप्रेस

    या मुखपुस्तिका उर्फ फेसबुक एक्सप्रेसमुळेच कित्येक नवीन लेखक, कवी जन्माला आले, माहितीचा प्रसार त्वरित होऊ लागला, निवृत्त आणि एकाकी जेष्ठ नागरिक आणि गृहिणींना हक्काचा विरंगुळा मिळाला, नवनवीन तंत्रज्ञानाशी तोंडओळख होते, वगैरे वगैरे..

      November 18, 2019


  • नागराणीचा मुकुट

    एक होता राजा. त्याला एकुलती एक मुलगीच होती. त्या मुलीला त्यानं खूप कोडकौतुक करून वाढविलं होतं. एकदा राजा राजकुमारीला बरोबर घेऊन फिरायला बाहेर पडला. फिरता फिरता एके ठिकाणी त्यांना लोकांची गर्दी जमलेली दिसली. राजा आणि राजकुमारी दोघेही त्या गर्दीत घुसले. बघतात तर एक गारुडीण नागाला खेळवीत होती. एकदा नागाची बांगडी करून ती हातात घाली, तर एकदा कंठीसारखी त्याच्या गळ्यात घाली

      October 5, 2025


  • शब्दांची दुनिया

    शब्दांची दुनिया किती वेगळी आहे. एक एक शब्द म्हणता वाक्य तयार होते. आता मराठी मध्येच बघा एक सारखे असे किती शब्द आहेत किंवा असे म्हणता येईल एकाच शब्दाचे किती अर्थ आहेत. उदाहरणार्थ बघु.. अनंत, अंग इत्यादी. इथे अनंत म्हणजे अमर्यादित आणि परमेश्वर असे दोन अर्थ होतात. दुसरा शब्द पाहिला तर अंग म्हणजे शरीर हा एक अर्थ आणि " अरे या अंगाने वळलास ना तर दिसेल दुकान तिथेच तर आहे. " हा दुसरा अर्थ. फक्त मराठी मध्येच नाही तर इतरही भाषांमध्ये असे एक सारखे शब्द आढळतात..

    शब्द हा लिहिण्यास आणि बोलण्यास सोपा वाटतो. पण खरं पाहिले तर याची ताकद फार मोठी आहे. शब्दाचे असे एक वजन आहे जे आपण पाहिले तर अणु इतके सुक्ष्म आहे आणि नाही तर पर्वताइतकं मोठे आहे. शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात. त्याची धार मात्र बोलणाऱ्याच्या चरित्र आणि वागण्यावर अवलंबून असते.

    पुर्वीच्या काळी ऋषी मुनींचा आशिर्वाद आणि श्राप हे दोन्ही परिणामकारक होते. पण आज मात्र शब्दाची लया गेली. यातली ताकद संपली कारण काय हेच आपण दिलेल्या शब्दाला जागणं विसरलो. एका दानधर्म करणारा कर्णाची कथा इथे सांगावीशी वाटते ती सांगते, महाभारतातला कर्ण तर सगळ्यांना माहीत असेलच. त्याच्या वरुन दिलेल्या शब्दाला जागणं काय हे कळते. एकदा दान धर्माने प्रसिद्ध असलेल्या कर्णाने प्रतिज्ञा केली की जो कोणी याचक त्याच्या दाराशी येईल तो रिकाम्या हाती परत जाणार नाही. आणि मग इंद्राने एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेतले आणि कर्णा कडे त्याची कवच कुंडलांचे दान मागितले. या कवचकुंडलांमुळेच आपण युद्धात अजिंक्य आहोत हे माहीत असुन सुद्धा कर्णाने त्याची कवच कुंडलं कापून इंद्राच्या स्वाधिन केली.

    देव-देश आणि धर्म याच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या

    छत्रपती शिवाजी महाराज आणि "आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं" असं म्हणणारे तानाजी मालुसरे, महाराज गडावर सुखरूप पोहोचेपर्यंत प्राण पणाला लावून खिंड लढवणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे स्वराज्याचे असंख्य शूरवीर मावळे हे शब्दाला जागणारे होते. प्रसंगी प्राण देऊन मातृभूमीचे रक्षण करणारे होते.

    पूर्वी शब्द याला वजन होते ताकद होती. आज माणूस इतका पूढे गेलाय की मागे वळून एकदा बघ रे बाबा असे म्हणायची वेळ आली आहे. आजच्या काळात शब्दाला वजन नाही ताकद नाही. परिणामी हे कुठेतरी हरवलेले दिसत आहे.

      October 16, 2024


  • एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – ब

    भारतीय भाषांचा विचार करतांना, भारतीयांचं बहुभाषिकत्‍वही विचारात घ्‍यायला हवं. अगदी २००० वर्षांपूर्वी पाहिलं तरी, संस्‍कृतच्‍या बरोबरच पाली व अर्धमागधी व शौरसेनी, पैशाची, महाराष्‍ट्री ह्या भाषा अस्तित्‍वात होत्‍या.

      March 19, 2019


  • काळ ‘मुद्रा’

    पन्नास वर्षांपूर्वी रस्त्याने जाताना हातगाडीवर टाईपांचे खिळे जुळविलेल्या गॅली प्रिंटींग प्रेसवर घेऊन जाणारे हातगाडीवाले हमखास दिसायचे. त्यावेळी कंपोज एकीकडे तर प्रिंटींग दुसरीकडे होत असे. त्यावेळची मासिकं, पाक्षिकं, वर्तमानपत्रं इत्यादी सर्व कामं टाईपांचे खिळे जुळवून केली जायची. शिसे धातूचे टाईप तयार करणाऱ्या टाईप फाऊंड्री देखील खूप होत्या.

      July 17, 2021


  • आर्यावर्तातील प्राणत्यागी विहंग 

    अजन्मा पहाडावर बसला होता . सोबतीला बालमित्र सुदामा होता .पण तो काहीसा अंतर ठेवून बसला होता . केवढा तरी पहाड वर चढून येणं त्याला भयंकर वाटत होतं . पण अजन्म्याच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता .

      January 20, 2026


  • रुसू नको गऽ ताई (बालकाव्य)

    को रागवू ताई , होती गंमत ही खेळामधली चिडले कोणी तर डावातिल मजा निघुन जाते सगळी
    राग कधी नाकाच्या नकट्या शेंड्यावरती नये असू ।।
    फुगा फुटू दे रुसव्याचा हा, अन् ओठी येउ दे हसू ।।

      August 5, 2017