नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एका गृहस्थांना त्यांनी नोकरी करू नकोस, कांही धंदा कर त्यात तुला नक्की यश मिळेल असं सांगितलं होतं व त्याने त्याप्रमाणे आलेल्या चांगल्या नोकऱ्या लाथाडून धंदा केला होता व कांही वर्षांतच तो लखपती झाला होता. तेव्हां श्रीमंताला लखपती म्हणत, आतांसारखं करोडपती नाही. त्यांनी पत्रिका जुळवल्यामुळे कोणा कोणाचे विवाह यशस्वी झाले होते. कुणाला त्यांनी भविष्य वर्तवल्याप्रमाणे कन्या झाली होती तर कोणी परदेशीही गेले होते. त्यामुळे शास्त्रीबुवांकडची गर्दी हटत नव्हती. एखाद दुसऱ्याचं भविष्य बरोबर नव्हतं आलं पण अशी माणसे स्वत:ला दोष देत गप्प बसत असत.
February 2, 2026
१९७९ साली पहीलं बालनाट्य लिहीलं तेंव्हापासून बालरंगभूमीशी माझं नात जुळलं. रंगदेवतेच्या कृपेने गेली ४१ वर्षे बालरंगभूमी वर कार्यरत राहून बाल मनोरंजनाचे कार्य करत आहे. बालरंगभूमीच्या सहवासात चार दशके राहील्यावर मला जे दिसलं, जाणवलं, ते माझ्या शब्दातुन मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
March 9, 2022
अनेक रोग शरीरावर आघात करतात. ते देहाला घातक वा मारक देखील असतात. मनुष्यप्राणी आपल्या बुद्धीप्रभावानें त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. दोन आघाड्यावर हे प्रयत्न झालेले जाणवतात. निश्चीत विज्ञान ज्ञान प्राप्ती व लोक अनुभवानुसार त्याची उकल करतात. कॉलरा, प्लेग, नवज्वर,धनुर्वात, क्षय आणि अशाच रोगाविषयी असेच झाले. प्रथम ते रोग अज्ञात होते, परिणामाची भिती होती. त्याच्या पासून बचाव म्हणजे, त्या वातावरणापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न. तांत्रिक द्रिष्टीने ते फार गैर सोईचे होत असे. आता त्यावर अनेक उपाय निघालेत. लसीकरण हे महत्वाचे हत्यार सापडले. प्लेग असाच जीव घेणारा रोग. त्याने प्रचंड संखेने बळी घेतले. आता तो काबूत आलेला आहे. त्यारोगाचे भयानक तांडव, त्यानी उडवलेला हाःहाःकार प्रत्यक्ष बघण्याचा, अनुभवन्याच्या दुर्दैवी काळातून आम्ही गेलो. आता विज्ञान प्रगतीमुळे सुदैवाने तो प्रसंग दुर्मिळ झाला आहे. परंतु आज देखील त्याची आठवण अंगावर शहारे आणतात.
फार जुनी गोष्ट, सत्तर वर्षा पुर्वीची. बीड जिल्ह्यातील माजलगांव हे तालुक्याच्या ठिकाण. माझे वडील शासकीय सेवेत तेथील प्रमुख आधिकारी होते. मी बालवयांत होतो. कळले की प्लेग ह्या रोगाची साथ सुरु झाली. अनेकजण मृत्युमुखी पडत होते. त्याला कारणीभुत असलेल्या उंदरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती. अर्थात उंदीर हे लक्ष्य ( Target ) केले जाते. पिसा मुळे हे होते. पिसांचा दुसरा हल्ला माणसावर होतो. ताप, अंगदुखी, वांत्या, काखेमध्ये गोळा (सुज) येऊन रोग झपाट्याने वाढत जातो. हा रोग शरीराला थोड्याच वेळांत नष्ट करतो. त्या रोगवर त्याकाळी योग्य रामबाण उपाय नव्हते. त्या काळी रोगाचा प्रतिकार करताना त्या रोगाच्या वातावरणामधून त्वरित अलिप्त होणे हे केले जात होते. हे कांही काळासाठी असे.
गांवामध्ये त्याकाळी दवंडी पिटून जनजागृण केले गेले. त्याप्रमाणे सर्वाना स्थलांतर करण्यास मार्गदर्शन केले गेले. सर्व गांव सोडून त्या दुषीत व प्लेगयुक्त वातावरणातून दूर जावे लागले. शासकीय आदेश सर्व स्थानिक जनतेला दिले गेले. स्थलांतराची प्रक्रिया त्वरीत होऊ लागली. आम्ही गावातील सर्व जनतेचे स्थलांतर, त्यांची धावपळ, कष्ट, गैरसोयी, निराशा बघीतली. लहान असलो तरी त्यांची दुःखे जवळून अनुभवली. आठवणीने आज त्याची सत्यता व गांभिर्य मनाला पिळवटून टाकते. निसर्गाच्या चक्रांत माणसे कशी हातबल होतात, हे बालपणीचे द्दष्य आजही चटका लावते. मृत्युच्या थैमानाला रोकण्यास सारे असमर्थ वाटत होते. आम्ही पण माजलगांवाच्या बाहेर २-३ मैलाच्या अंतरावर शेतामध्ये झोपड्या उभारुन राहू लागलो. वडीलांचे तेथेच ऑफिसपण उभारले गेले. सर्वजण नजदीकच राहात होते. सर्व शाळा दोन महीने बंद होत्या. तो काळ आम्ही मुलानी निसर्गाच्या सान्निध्यात घालविला. न विसरणाऱ्या त्या आठवणी होत्या. गेल्या ७५ वर्षामध्ये त्यानंतर प्लेगसाठीचे गांव स्थलांतर झाल्याचे बघण्यात वा ऐकण्यांत आले नाही. आजच्या आधुनिक वैद्यकीय विज्ञान शास्त्राने बरीच प्रगती केली आहे. बऱ्याच जुन्या रोगांना समुळ नष्ट केले आहे. अर्थात त्याच वेळी नविन नविन रोगाबद्दल माहीती पुढे येत आहे. मात्र कोणत्याही नविन रोगाची केवळ चाहूल लागताच, जगातील सर्व विद्वान वा शास्त्रज्ञ एकत्र येतात. चर्चा करतात, अभ्यास करुन, प्रयोग करुन उपाय शोधतात. निसर्ग व मानव ह्यांचा असा संघर्ष चालूच राहणार.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 12, 2017

दादासाहेब सर्वांच्या आदराचं स्थान होते. रंगभूमीवरील अनभिषिक्त राजे होते. गेली पन्नास वर्षे अथकपणे त्यांनी रंगभूमीची सेवा केली होती. असंख्य कलाकारांना घडविण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. संपूर्ण कारकीर्द यशस्वी, हाऊसफुल गर्दीनं भरलेली आणि निष्कलंक अशी होती. त्यामुळं त्यांना जीवनगौरव जाहीर झाला आणि समाजाच्या सर्वच क्षेत्रातून आदरयुक्त कौतुकाचा वर्षांव झाला होता. त्याचं प्रतिबिंब आजच्या समारंभात उमटलं होतं.
October 24, 2020
सर्व पात्रे आणि कथानक काल्पनिक असून ही कथा कुठे मिळतीजुळती निघाल्यास तो योगायोग समजावा.
July 7, 2022
मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या चटईवर टाकींत असे. जमा होणाऱ्या पक्षांची ते टीपताना गम्मत बघणे व आनंद घेणे हा हेतू. कबुतर, चिमण्या तेथे नियमीत येत असत. धान्य त्या चटईवर पडतांच, क्षणाचा विलंब न करता ते येत असे. मात्र त्यांच्या येण्याचा व दाणे टीपण्याच्या सवईमध्ये एक नैसर्गिक पद्धत निश्चीतपणे दिसून येई. पक्षी प्रथम झाडावर, पत्र्यावर, खांबावर, दोरीवर इत्यादी ठिकाणी बसत. सर्व दिशेने चौफेर द्रष्टीने बघत. सभोवतालच्या परिस्थीतीचा मागोवा घेत असत. कोठे आपला शत्रु अर्थात, मांजर, कुत्रा वा कुणा नाहीत ना ? याची चाहूल घेत असत. संपुर्ण खात्री वाटल्यावरच चटईवर येऊन सतर्कतेचे भान ठेवीत दाने टिपीत. जगण्यातील पावलोपवलीचे धोके जाणत कसे सतर्कतेने जगावे हा नैसर्गिक संदेश ते देत होते. शिवाय एक दोन दाणे टिपले की परत सुरक्षीत जागी जाऊन बसणे, पुन्हा अवलोकन करणे, व परत दाणे टिपण्यासाठीच प्रयत्न. हे चक्र असे. त्यांच्या हलचाली खुप शिस्तभद्ध व मनाला मोहून टाकणाऱ्या वाटे. भूतदयेचा ओलावा त्यांत समाधान देई.
मी एका मोठ्या पत्र्याच्या डब्यांत पक्षासाठीचे धान्य जमा ठेवित असे. व दररोज एक वाटीभरुन टाकी. कांही कारणास्तव मी दोन आठवडे बाहेर गांवी गेलो होतो. पक्षांना धान्य टाकणे ह्यांत खंड पडला. गावाहून आलो. सकाळी डब्बा उघडला तर दिसले की त्यांत खूप किडे, आळ्या, जळमटे झालेली आहेत. मी बेचैन झालो. लगेच सुप आणले व अंगणातच बसुन सर्व धान्य साफ केले. सर्व किडे आळ्या झटकून कचरा कोपऱ्यांत फेकून दिला. धान्य स्वच्छ केले. व नेहमी प्रमाणे एक वाटी भरुन ते चटईवर पसरुन टाकले. खुर्चीवर बसुन पक्षांची वाट बघत बसलो. थोड्याच वेळांत कांही चिमण्या तेथे आल्या. मात्र मला एकदम आश्चर्य वाटले. त्या चिमण्या तेथील धान्य टिपण्यापूर्वी, मी शेजीरीच फेकून दिलेल्या कचऱ्याकडे झेपावल्या. त्यातील किडे आळ्या याना वेचित त्याना खाण्याचा अस्वाद घेऊ लागल्या. मी त्या द्रष्यानी खुप प्रभावित झालो. त्या रोजच्या सवईप्रमाणेच खाण्याचा अर्थात टिपण्याचा आनंद घेत होत्या. मात्र ज्या प्रमाणे आपणास जेवणांत एखादा आवडीचा पदार्थ मिळाला तर त्यावर कसे तुटून पडतो, त्याप्रमाणे त्यानाही त्यांच्या आवडीनुसार व प्रकृती, निसर्गानुसार आवडते खाद्य प्राप्त झाले होते. निसर्गाची किमया आणि माझा दैनंदीन हिशोब ह्यातील तफावत माझ्या लक्षांत आली. अर्थात जे मला सहज व शक्य असेल तेच मी पक्षांना देणार. इतर त्यांच्या अवडीचे खाद्य, "वेगळा आहार एक ट्रीट" त्यानाच शोधू देत. हा देखील एक निसर्ग म्हणून मी त्याच्याकडे बघीतले.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 12, 2017
यंदाच्या दिवाळीची सुरुवात ३१ ऑक्टोबरला परिमल राजहंसच्या मैफिलीने झाली आणि दिवाळीचा माहोल १३ नोव्हेंबरच्या “मागे उभा मंगेश” या शांताबाई शेळकेंच्या जन्मशताब्दी निमित्त झालेल्या मैफिलीने संपुष्टात आला.
November 25, 2021
नाताळची सुटी लागली. सुटीत काय करायचे असा प्रश्न सागर, सीमा, परेश या मुलांपुढे पडला. सीमा म्हणाली, अभ्यासापेक्षा वेगळं काहीतरी करूया? परेश म्हणाला, संक्रांत येतेच आहे. आपणपतंग उडवू या. सागरने आकाशाकडे पाहिलं तर खरंच, काही मुलांनी पतंग उडवायला सुरुवातही केली होती. प्रत्येकाने पॉकेट मनीतले पैसे एकत्रित केले.
October 5, 2025
अनेक जन्मानंतर मानवी जन्म मिळतो असे म्हणतात. सृष्टितील सर्व जीवसृष्टित मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ बुद्धिजीवी जन्म मानला जातो परमेश्वराने माणसाला विवेकबुद्धी, वाचा, स्मरणशक्ती, श्रद्धा, भक्तिप्रीती, वात्सल्य, जिव्हाळा, निःस्पृहता, निर्मलता, विश्वास, त्याग, कृतज्ञता, नम्रता, परोपकार, साहस अशा अनेक सुसंस्कारी संस्कारशक्ती जन्मताच प्रदान केल्या आहेत. त्याच संस्करण होण म्हणजे संस्कार!!
संस्कार हे करून होत नाहीत ते घडावे लागतात त्यासाठी जीवनात उत्तम विवेकी सहवास लाभावा लागतो.
जन्मत:च आपल्याला मातृपितृत्वाच्या वात्सल्याचा दैवी स्पर्श होतो ही ईश्वरीय लीला आहे आणि आपले जीवन सुरु होते हे वास्तव आहे. घरात आईवडिल तर बाहेरील जगगात गुरुजन, नातेवाईक,शेजारी, पाजारी, मित्रत्व यांचा नैसर्गिक सहवास लाभतो आणि आपल्याला शिशु, शैशव, बाल्य, पौगण्ड, तारुण्य, ग्रहस्थ, वृद्धत्व ही जीवनावस्था लाभते हे वास्तव आहे.
माझी ९० वर्षाची प्रसन्न वदनी सुंदर अशी सरस्वती नावाची पणजी होती. अगदी तरतरीत पहाटे ३,, लाच उठायची. आकाशाकड़े पाहुन नमस्कार करायची, बाजेवरुन खाली जमिनीवर पाय ठेवताना रोज ' पादस्पर्शम क्षमस्वमे ' म्हणायची, तळहात चोळून चेहरा उजळून ' कराग्रे वसते लक्ष्मी ' म्हणायची.
या तिच्या संस्कारी आचरणाने तीचं सारं आयुष्य सर्वार्थानं कृतार्थ झालं..! अगदी निरोगी, निरामय सुखानंदी झालेलं हे मी स्वतः पाहिले आहे. तिची लौकर उठण्याची व तो मंत्र म्हणण्याची सवय आजही मला तिच्याच संस्कारी सहवासामुळे लागली.
तो संस्कारी सहवास मला माझ्या शिशु अवस्थेत लाभला. आजही स्मरतो आहे.
हे स्मरणीय, उदात्त अनुभव म्हणजेच संस्कार..!!
आजच्या वास्तव कलियुगात समृद्धी आहे, पण अपेक्षित मन:शांति, समाधान नाही. नाती, मैत्र, प्रेम, आस्था, जिव्हाळा काहीच उरले नाही. माणसातील माणुसपण, आज हरवले आहे. याला कारण एकच संस्कार आणि संस्कृतीचे अध:पतन, ह्रास झालेला आहे. त्यासाठी पारंपारिक संस्कारांचे बीजारोपण सर्वत्र होणे अनिवार्य आहे.
मानवी जीवनात संस्कारांच महत्व अनन्य साधारण आहे. जीवनाच्या आदर्श नीतिमुल्यांचा बीजांकुर हा सुसंस्कारातच आहे हे निर्विवाद..!!!
जीवात्म्याच्या गर्भधारणेपासुनच संस्कारांच महत्व आहे. म्हणूनच संस्कारांचे संस्करण होणं ही आपल्या सुखी जीवनातील इतिकर्तव्यता आहे.
संसारात प्रत्येकाला आपलं कुटुंब, मुलं उत्तम, कर्तुत्वसंपन्न होवून सदैव सुखऐश्वर्यात रहावित असे वाटत असते. आणि असे सुंदर उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी त्या मुलांवर उत्तम संस्कार होणेही गरजेचे असते. पूर्वी हे घडतही असे कारण पूर्वी घरातील वातावरण किंवा सहवास देखील संस्काराला पोषक असा होता.एकत्र कुटुंब पद्धती नांदत होती निश्चिंतता होती.
आजकाल विज्ञानामुळे आकाशात उंच उड़णे, सातासमुद्रापार सहज जाणे सारे जग कवेत घेणे हे आता मानवाला जमले आहे. पण कल्पनेला सहेली बनवून विवेकाच्या वाटाडयाला सोबतीला घेवून जमिनीच्या मातीवर संयमाने तोल सांभाळून चालणे देखील जमणे गरजेचे आहे. त्यासाठीच मात्र उत्तम संस्कारांची आवश्यकता आहे.
भौतिक सुखानं सारं जग आज सुखाधिन समृद्ध झाले आहे. पण माणसातली परस्पर आत्मिक आनंद देणारी ओढ़, आत्मीयता, नाती, प्रेम, वात्सल्य, संवाद पूर्णत्वाने लयास गेल्याचे जाणवते आहे. याचा विचार सर्व सुजाण व्यक्तिन्नी केला पाहिजे.
केवळ संस्कारांच्या कथा, गोष्टी ऐकुन किंवा वाचून संस्कार होत नाहीत. तर संस्कार हे सहवासातूनच घडावे लागतात. त्यासाठी उत्तम सहवास लाभणे महत्वाचे असते. हे सुंदर सत्य आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कारांचे महत्व विशद केले आहे. मानवी जीव सर्वार्थाने आदर्शभूत कसा असावा त्या साठी साऱ्या जीवनात संस्कार कोणते असावेत याचे मूल्यमापन या सोळा संस्कारातून केलेले दिसून येते.
कुठलीही व्यक्ती कधीही घाणीच्या साम्रज्यात राहू इच्छित नाही. तिला सुंदर मोहक वातारणात, सुखात रहायला आवडते हा मानवी स्वभाव प्रकृती आहे.
मग अशावेळी सर्वच दुर्गुणांचा तसेच दुष्प्रवृत्तीचा समूळ त्याग करून फक्त सगुण सदगुणांची कास धरणे हे उत्तम संस्कारांचे कल्याणकारी लक्षण आहे. द्योतक आहे. आणि असे उदात्त जीवन उत्तम सुसंस्कारित सहवासातूनच लाभते.
याचे उदाहरण देताना गुरुवर्य डॉ. न.म.जोशी सरांनी एका कार्यक्रमात सांगितलेली एक गोष्ट सांगून मी हा लेखांक थांबवीत आहे.
एका गावात, एका मोठ्या वाड्यात एक सद्गृहस्थ रहात होते. आपल्या घरातील देवपूजा ते रोज करत असत.
रोज प्रात:काळी उठायचे. स्नानग्रहात जाताना वाड्याच्याच अंगणात असलेल्या बागेतील फुले काढून आणण्यासाठी सुंदर फुलांची परडी घेवून जात असत.
शुचिर्भूत स्नान झाले की त्या परडीत पत्री, फुले,बेल, तुळस गोळा करून आपल्या वाडयातील माजघरात असलेल्या देवघरात येवून यथासांग मनोभावे देवपूजा करीत असत. ही त्यांची श्रद्धेय दिनचर्याच होती. पण एक दिवस ते अनावधानाने ते नित्याची फुलांची परडी घेवून जाण्यास विसरतात. वयस्कर असल्यामुळे पुन्हा स्नानगृहातून माजघरापर्यंत परत येवून ती फुलांची परडी घेवून येण्याचा कंटाळा करतात. पर्याय म्हणून नेहमी प्रमाणे स्नान झाल्यावर आपल्या अंगावरच्या उपरण्याचा सोगा करून त्यातच फुले, पत्री वगैरे गोळा करतात माजघरात देव्हाऱ्यापाशी येतात नेहमी प्रमाणे यथासांग पूजाही करतात. एव्हड्यात त्यांचे एक परमस्नेही घरात त्यांना भेटावयास येतात. ते मित्र दिवाणखान्यात बसलेले असतात. त्यांना सुंदर सुगंध येत असतो. तिथुनच ते त्यांच्या मित्राला विचारतात " अरे दत्ता केवढा सुंदर सुवास येतो आहे अरे कुठले अत्तर तू लावलेले आहेस? तेंव्हा दत्तोपंत म्हणतात नाही रे बाबा मी कुठलेच अत्तर लावलेले नाही.
पण अरे मी आज सकाळी आंघोळीला जाताना फुलांची परडी नेण्यास विसरलो होतो. म्हणून आज या उपरण्यातच फुले गोळा करून आणली. त्या पारिजात, गुलाब, चाफा, मोगरा, बकूळ फुलांचाच सुगंध या उपरण्याला येतो आहे, मीही आज मोहरुन गेलो आहे..
मित्रहो, त्या उपरण्यात काही क्षण फुले गोळा झाली तर त्या फुलांचा सहवास त्या उपरण्याला लागला आणि *ते उपरणं सुगंधित झालं!!!
सात्विक गंधित संस्कार त्या उपरण्यावर झाला. तेंव्हा जीवनात तुम्हाला लाभलेल्या सुंदर, विवेकी निर्मोही, निष्पाप, प्रेमळ, आणि वात्सल्यपूर्ण सहवासाचा संस्कार तुमचं जीवन सर्वार्थाने सुंदर कृतार्थ करीत असतो. म्हणून विवेकी, वैचारिक उत्तम सहवासात राहण्याचा प्रयतन मनुष्याने करावा. हे मात्र खरं.!!
असा सहवास लाभणं देखील एक दैवयोग असतो.
हेच संस्कारांचे महत्व आहे.
इति लेखन सीमा..
वि.ग.सातपुते.
(साहित्यिक, अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे)
9766544908
दिनांक : २४ - ३ - २०२२.
April 4, 2022
बालकवीची कविता वाचीत होतो.
हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणाच्या मखमालीचे
त्या मखमालीवरती
फुलराणी ही खेळत होती.
सुंदर गवतांची हिरवळ …..
October 1, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti