(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मेरी

    मला मुलगी असती तर तिने असेच केले असते ! माझ्या मनात विचार चमकून गेला. या चार दिवसातल्या दवाखान्याच्या वास्तवातला हा सर्वात सुंदर क्षण ! कारण माझ्या नजरेतला ‘बाप ‘ खोटा नव्हता ,आणि तिचे ते स्माईल ’कॉर्पोरेट‘ नव्हते .

      May 25, 2018


  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – २१

    IC131 दिल्ली मुंबई विमान सांताक्रूझ विमानतळा वर उतरत होते. संगीता, आजी, व विजय स्वागत कक्षातून विमानातून बाहेर पडणाऱ्या प्रयेक प्रवाशाकडे आतुरतेने पाहात होते.

      January 11, 2022


  • अमेरिकन गाठुडं – १

    छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय हवाईअड्डा’ गाठले तेव्हा आठ वाजून गेले होते. एका गोष्टीची मला नेहमीच गंमत वाटते, विमानतळाला हवाईआड्डा का म्हणतात? ‘अड्डा ‘ म्हणला की, अंगात आडव्या काळ्या पट्ट्याचे टी शर्ट घातलेले, तोंडात सिगारेट धरून धूर सोडणारे चार-सहा गुंड एखाद्या गोदामात पत्ते खेळात बसल्याचे, दृश्य माझ्या नजरेसमोरयेते! तेव्हा ‘अड्डा’ गुंडाचा हि संकल्पना काही डोक्यातून जात नाही.  

      November 15, 2020


  • गझल रेकॉर्डिंग आणि ४०० वा कार्यक्रम

    या संपूर्ण काळात पं. विनायकरावजी काळे आणि श्रीकांत ठाकरे गाण्याचे शिक्षण या गुरुंकडे माझे सुरूच होते. माझ्या गझल गायकीतील प्रगतीबद्दल श्रीकांतजी खूष होते.

      July 19, 2022


  • शेवटी जातीने घात केला ….

    सूर्याची किरणे खिडकीतून प्रवेश करत प्रत्येक घरातील सदस्यांना साद घालत होती. उठा आता पहाट झाली कामाला निघायची वेळ आली .उत्साहीत होऊन रात्रभर आडोशाला गुढाळून घेतलेली निवांतपणाची चादर दुर करत पक्षी ही भुकेसाठी अन्नाचा शोधार्थ उडू लागले .

      August 19, 2018


  • लेझीम

    दिवस सुगीचे सुरू जाहले
    ओला चारा, बैल माजले
    शेतकरी-मन प्रफुल्ल झाले
    छन्‌ खळ खळ छन्‌
    ढुम्‌ ढुम्‌ पट ढुम्‌ । लेझिम चाले जोरात !

    दिवटी फुरफुर करु लागली
    पटक्यांची वर टोके डुलली
    रांग खेळण्या सज्ज जहाली
    छन्‌ खळ खळ.छन्‌
    ढुम ढुम्‌ पट ढुम्‌ । लेझिम चाले जोरात !

    भरभर डफ तो बोले घुमुनी
    लेझिम चाले मंडल धरुनी
    बाजुस, मागे, पुढे वाकुनी
    छन्‌ खळ खळ छन्‌
    ढुम्‌ ढुम्‌ पट ढुम्‌ । लेझिम चाले जोरात !

    पहाट झाली, तारा थकल्या
    मावळतीला चंद्र उतरला

    परी न थकला लेझिम-मेळा
    छन्‌ खळ खळ छन्‌
    ढुम्‌ ढुम्‌ पट ढुम्‌ । लेझिम चाले जोरात !

      June 11, 2026


  • जगतविख्यात तत्वचिंतक जे. कृष्णमूर्ती

    त्यांच्या भाषणातून अनेक मुद्द्यांना ते हात घालत असत आणि तो अर्धवट सोडून देत असत कारण यापुढील विचार ,त्याचा निर्णय तुमचा हवा एक थिंकर म्हणून .. ते नेहमी म्हणत जर कुठला प्रॉब्लेम आला तर त्याचे व्यवस्थित विचारपूर्वक पोस्टमार्टेम करा तुम्हाला तुमच्या प्रोब्लेमचे उत्तर सापडेल. सर्व दुःखाचे मूळ आहे ते म्हणजे अटॅचमेन्ट , तुम्हाला डिटॅच होता आले पाहिजे. ते अत्यंत साध्या सोप्या भाषेत समजवत असत.

      July 14, 2021


  • माणुसकीचा झरा

    मला 24 नोव्हेंबर, 1990ची ती उत्तररात्र आजही आठवतेय. रात्रीचा सव्वादोन-अडीचचा सुमार असेल. माझ्या पत्नीला दुसऱयांदा दिवस गेले होते. प्रसृतीची तारीख 30 नोव्हेंबर होती. एक पाच वर्षांचा मुलगा आधी होता. आता तो 21 वर्षांचा आहे.
    माझ्या पत्नीला सहा दिवस अगोदरच प्रसृतीवेदना होत होत्या. मी माझ्या आईला व पत्नीला तयार राहण्यास सांगितले. एखाद्या वाहनाची व्यवस्था होते काय, हे बघण्यास घराबाहेर पडलो. तेव्हा आम्ही मुलुंड (पू.) मध्ये रहायचो. आम्ही नाव नोंदविलेले प्रसृतीगृह मुलुंड (प.) ला होते. मला रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी मिळाली नाही. शेवटी आसपासच्या दोन-तीन रिक्षावाल्यांच्या घरी गेलो; पण त्यातील दोघे जण गावाला गेले होते. तिसरा म्हणाला, की त्याची रिक्षा नादुरुस्त आहे. मला खूपच दडपण आले. शेवटी मी पूर्व महामार्गावर उभा राहिलो. दिसेल त्या वाहनाला थांबण्याची विनंती करीत होतो; पण कोणीही आपले वाहन थांबविण्यास तयार नव्हता. त्यात त्यांची तरी काय चूक होती म्हणा! त्या उत्तररात्री वाहन थांबविण्याचा धोका कोण पत्करेल? इकडे माझ्या पत्नीचा व आईचा काळजीयुक्त, वेदनायुक्त चेहरा दिसत होता. इतक्यात मुलुंड चेक नाक्यावरून एक मारुती मोटर आली. मी तिला हात केला. आश्चर्य म्हणजे ती थांबली. मी त्यांना माझी असहाय्य व अगतिक परिस्थिती विशद केली. ते गाडी घेऊन माझ्या घरी आले.

    घरी आई व पत्नी डोळ्यांत प्राण आणून माझीच वाट पाहात होत्या. मी त्यांच्यासह गाडीने प्रसृतीगृह गाठले. तिथले प्रवेशाचे सोपस्कार पार पडले. खाली येऊन गाडीवाल्याचे आभार मानले व किती पैसे द्यायचे अशी विचारणा केली; पण तो भला मनुष्य होता. तो म्हणाला, ``मी माझ्या बहिणीला दवाखान्यात दाखल केलं असं समजतो. तेव्हा त्याचे कसले पैसे? उलट काही गरज भासली, तर मला

    केव्हाही हाक मारा.'' माझ्या स्वतवर विश्वासच

    बसला नाही. सध्याच्या काळात माणुसकीचा गहिवर असणारी अशीही माणसे असतात. बोलण्याच्या ओघात त्याने मला सांगितले, की त्याचे नाव शेट्टी असून, चेकनाक्यावर त्याचे हॉटेल आहे. ते बंद करून घरी जात असताना माझी भेट झाली. तो म्हणाला, ``करायचं असेल तर एकच करा. जेव्हा तुमची पत्नी बाळंत होईल, तेव्हा मला हॉटेलमध्ये येऊन पेढे द्या.'' दुसर्‍याच दिवशी, म्हणजे 25 नोव्हेंबर 1990 ला मला सकाळी आठ वाजता कन्यारत्न झाले. मी लगेच त्याला मिठाई नेऊन दिली.

    मनात विचार केला, की तो जर देवरूपाने मला भेटला नसता, तर आमची काय अवस्था झाली असती? तेव्हाच मी ठरविले, की आपल्याला संधी मिळाली तर आपणही दुसऱयांच्या अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी निरपेक्षपणे मदत करून सात्विक समाधान प्राप्त करून घ्यायचे.

    -- किशोर कुलकर्णी

      May 19, 2006


  • मुंबापुरीच्या झुकझुक गाडीतले प्रवासी

    लेखाचे शीर्षक वाचून म्हटलं असाल ना की काय पोरकटपणा आहे म्हणुन? अहो, आपला लोकल प्रवास जर शांतपणे आठवाल तर तुम्हांला जाणवेल की लहानपणी जे आपण जगायचो तेच बालपण आपण लोकल प्रवासात पण जगतो.

      October 21, 2023


  • झेन गुरु बोकोजू आणि राजपुत्र

    झेन गुरु बोकोजू आपल्या शिष्यांना ध्यानधारणा शिकविण्यासाठी जी पद्धत वापरीत असत ती लोकांना थोडी विचित्र वाटे.

    एकदा एक राजपुत्र त्यांच्याकडे ध्यानधारणा शिकण्यासाठी आला. बोकोजूंनी त्याला एका उंच झाडावर चढायला सांगितलं.

    राजपुत्राचं सारं आयुष्य महालात गेलेलं. झाडावर वगैरे तो कधी चढला नव्हता. शिवाय गुरूने ज्या झाडावर चढायला सांगितले त्याची उंची पाहून तो घाबरला.

    बोकोजूंना तो म्हणाला, 'मला झाडावर चढता येत नाही. पडलो तर?'

    बोकोजू त्याला म्हणाले, 'झाडावर चढता येणार्‍यांना झाडावरून पडताना मी काही वेळा पाहिलंय, पण झाडावर न चढता येणार्‍यांना झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना पडलेलं मी अजून पाहिलं नाही. तू चढ बिनधास्त.'

    चढावंच लागेल हे लक्षात आल्यावर राजपुत्र झाडावर चढू लागला.

    शे-सव्वाशे फूट उंचीचं झाड होतं ते. गुरुजींनी त्याला पार शेंड्यापर्यंत चढायला सांगितलं होतं. अतिशय सावधपणे तो हळू हळू चढू लागला. त्याला वाटलं होतं की आपल्याला चढताना गुरू मार्गदर्शन करतील. असं कर, तसं करू नको असं सांगत राहातील. पण अधून-मधून जेव्हा त्याची नजर खाली जमिनीवर जाई तेव्हा गुरुचं आपल्याकडे लक्षच नाही हे त्याला जाणवे.

    शेवटी एकदाचा तो शेंड्यापर्यंत पोहोचला. मग पुन्हा खाली उतरू लागला. गुरु अजूनही डोळे मिटूनच बसले होते.

    राजपुत्र जमिनीपासून साधारण पंचवीसेक फुटांवर आला तेव्हा गुरुंनी त्याला सूचना केली, 'जपून उतर रे!'
    राजपुत्र खाली उतरला आणि गुरुजींना त्यानं आपली शंका विचारली.

    बोकोजू त्याला म्हणाले, 'तू जेव्हा बिनधास्त होताना दिसलास तेव्हाच मी तुला सावध केलं. जमीन आता जवळ आली असं जेव्हा तुला वाटलं तेव्हाच तुझा तोल जाण्याची शक्यता वाढली होती. झाडाच्या शेंड्याजवळ असताना तू स्वतःच अतिशय सावध होतास. त्यावेळी तुला माझी गरज नव्हती. जमीन जवळ येऊ लागली तेव्हा तुझी एकाग्रता थोडी ढळू लागली. त्यावेळीच तुझ्याकडून चूक होण्याची शक्यता होती. म्हणून मी तुला सावध केलं.'

    राजपुत्राला आठवलं, बोकोजूंचं म्हणणं अगदी बरोबर होतं. झाडावर चढताना,शेंड्याजवळ पोहोचताना आणि उतरावयास सुरवात करताना तो अतिशय सावध होता. जमीन जवळ दिसू लागली आणि त्याचा जीव थोडा फुशारला. आता आपली जीत पक्की असं त्याच्या मनाला वाटलं. उतरल्यानंतर गुरुंना काय काय विचारायचं याबद्दलचे विचार त्याच्या मनात येऊ लागले होते आणि झाडावरून उतरण्याच्या क्रियेकडे त्याचं क्षणकाल दुर्लक्ष होऊ लागलं होतं. त्याच वेळी गुरुजींचा आवाज त्याच्या कानांवर आला आणि इकडे-तिकडे भरकटणारं त्याचं मन पुन्हा कामावर केंद्रीत झालं होतं.

    हे उमजलं अन गुरुजींबद्दल त्याच्या मनातले सारे प्रश्न विरघळून गेले.

    -- दीपक गायकवाड

      March 14, 2017