महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
पोंक वड्याप्रमाणे हुरडा वाटून त्यात रगडलेला बटाटा जरुरीप्रमाणे थोडंसं बेसन (ऐच्छिक) घालून भरपूर मनुका, काजू, आलं, मिरची (लसूण, खोबरं ऐच्छिक) याचं वाटण घालून त्यात चवीनुसार मीठ, साखर घालून आपल्याकडच्या उपवासाच्या कचोरीप्रमाणे गोल वळून तळतात. कित्येकदा बटाटा, मैदा यांचं आवरण करून आत वाटलेला हुरडा, मसाला, मनुका, चवीनुसार मीठ, साखर, लिंबू एकत्र करून त्यांचं सारण बनवूनही पॅटिस करतात. अर्थात घरगुती बनवताना घरोघरी गृहिणी आपल्या सवडी-आवडीनुसार व कल्पकतेप्रमाणे त्यात थोडाफार बदल करतात. महाराष्ट्रात हुरड्याबरोबर गूळ, लसणाची चटणी वगैरे खातात. तशी ही मंडळी हुरड्याबरोबर नाना प्रकारची शेव व साखरफुटाणेही खातात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
बर्फ घालुन थोडा वेळ फिरवा. ग्लास मध्ये घ्या. त्यावर आपली मस्त घरगुती दाट साय घाला. किंवा क्रीम घाला. एखाद्या पुदीन्याच्या पानाने मस्त गार्निश करा
साहित्य :- १ कप बटाटे :- उकडून, साले काढून आणि फोडी करुन, १/२ कप उकडलेले कॉर्न (मका दाणे), १/२ कप डाळिंबाचे दाणे, १/२ कप बारीक कापलेल्या सफरचंदाच्या फोडी, १/२ कप बारीक कापलेल्या संत्र्याच्या फोडी, १/४ कप उकडलेले शेंगदाणे, १/४ कप किसलेले गाजर, २ कप कुरमुरे, १ कप शेव, १/२ कप खजूर, चिंचेची चटणी, २ टेबल स्पून हिरवी चटणी, मीठ चवीनुसार.
कृती :- वरील सर्व पदार्थ एकत्र व्यवस्थित कालवून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य :
२ वाटी ओल्या नारळाचं खोबरं, २ वाटी साखर, १ चमचा वेलदोडे पुड, ४-५ कुसकरलेले पेढे, २-३ केळी, ६ वाट्या रवा, ७ वाट्या पाणी, १ चमचा डालडा, अर्धा चमचा मीठ.
कृती :
ओल्या नारळाचं खोबरं, साखर वेलदोडे पुड, पेढे आणि केळी यांचं सारण बनवून घ्यावं. एका भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ आणि डालडा टाकावा. एक उकळी आल्यावर त्यात रवा घालून नीट एकत्र करावं. ५-६ मिनिटं मंद गॅसवर झाकण लावून वाफवा. मग एका परातीत काढून नीट मळून घ्यावा.
साच्यामध्ये छोटा गोळा टाकून मध्ये खोलगट करून खालच्या आणि बाजूच्या बाजूने दाब द्यावा. त्यात सारण भरून अलगद वरून बंद करावा. हे मोदक झाल्यावर मोदक पात्रात उकडून घ्यावेत. मोदक पात्रात ठेवताना पाण्याला उकळी आल्यावरच ठेवावेत. जर घरी मोदकपात्र नसेल तर एका मोठ्या पातेल्यात पाणी टाकून दोन वाट्या टाकाव्यात पाणी वाट्यांच्या काठापर्यंत येईल इतकं टाकावं. त्यावर पितळेची किंवा अॅल्युमिनिअमची चाळण ठेवून त्यावर पातळ कपडा असावा. त्यात मोदक घालून झाकण लावूनपण उकडता येतात. हे चवीला खूप छान लागतात.
रव्याऐवजी जोंधळ्याचं पीठपण वापरू शकता. हे मोदक एकदम पांढरे शुभ्र दिसतात. हे मोदक चवीला छान लागतात. यासाठी पांढरे जोंधळे धुऊन मग दळून घ्यावेत.
-- संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
स्वयंपाकासाठी नवनवीन टिप्स व डिशेशची माहिती मिळावी म्हणून स्वयंपाक करतांना काही खास टिप्स. ज्यांचा वापर तूम्ही सहजपणे आपल्या किचन मध्ये करू शकता. ह्याचा उपयोग नवविवाहित व नवतरुण ललनांना होईल अशी आशा आहे.

साहित्य:- ३/४ कप तांदूळ, १/४ कप तूर डाळ, १ टेस्पून चिंच, दीड कप चिरलेल्या भाज्या, मध्यम चौकोनी (बटाटा, फरसबी, वांगं, गाजर, कॉलीफ्लॉवर), मसाले: १ इंच दालचिनीचा तुकडा, २ वेलच्या, २ तमालपत्र, फोडणीसाठी: १ टेस्पून तूप, १/२ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून हिंग, १४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, १ टेस्पून सांबार मसाला (शक्यतो घरगुती), चवीपुरते मीठ.
स्पेशल तडका :- २ टेस्पून तूप, १/४ टीस्पून हिंग, २ ते ३ टेस्पून शेंगदाणे, ७ ते८ कढीपत्ता पाने.
कृती:- तूरडाळ धुवून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावी. चिंच १/४ कप गरम पाण्यात भिजत ठेवावी. १० मिनिटांनी चिंच कुस्करून कोळ वेगळा काढावा.
पातेल्यात १ टेस्पून तूप गरम करावे. त्यात दालचीनी, वेलची, तमालपत्र घालून ५-७ सेकंद परतावे. जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. या फोडणीत वांगे सोडून चिरलेल्या सर्व भाज्या घालाव्यात. झाकण ठेवून २ मिनिटे वाफ काढावी. आता तांदूळ आणि ३ कप पाणी घालावे. चिंच कोळ आणि सांबार मसाला घालावा. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्यावे. आपल्याला एकदम मऊ आणि अगदी थोडा पातळसर भात शिजवायचा आहे त्यासाठी लागल्यास पाणी घालावे. भात ६०% शिजला कि शिजवलेली तूरडाळ आणि वांगी घालावी. १० मिनिटे झाकण ठेवून किंवा भात पूर्ण शिजेस्तोवर शिजवावे. भात ताटामध्ये वाढावा. लगेच कढल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. त्यात हिंग आणि शेंगदाणे घालावेत. शेंगदाणे लालसर होईस्तोवर परतावे. शेंगदाणे लालसर झाले कि कढीपत्ता घालावा. हि फोडणी वाढलेल्या भातावर १-२ चमचाभर घालावी. हि फोडणी फार महत्त्वाची आहे आणि यामुळे भाताची चव अजून खुलते.
टीप:- तूरडाळ शिजल्यावर प्रेशरकुकरमधून बाहेर काढावी. आमटीसाठी जशी रवीने डाळ मोडतो तशी डाळ रवीने घुसळू नये. अशीच वापरावी. घुसळलेली डाळ भातात घातल्यावर भाताचे टेक्स्चर बदलते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सर्वप्रथम कणकेत थोडसं मोहन टाकून कणीक मळून घ्या. त्यानंतर कढईत बुंदीला चांगल्याप्रकारे गरम करून त्यावर पाणी शिंपडून बूंदी चांगल्याप्रमाणे एकजीव करून घ्या
चवळी साधारण ३ तास कोमट पाण्यात भिजवावी. कूकरमध्ये १ ते २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावी. कढईमध्ये ३ पैकी २ टिस्पून तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून फोडणी करावी. काही सेकंद परतून कांदा घालावा. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावा. कांदा परतल्यावर टोमॅटो प्युरी घालावी.
सर्व कडधान्ये एकत्र करून पाण्यात ८ ते १० तास भिजवावीत. कडधान्ये नीट भिजली की त्यातील न भिजलेली, कडक राहिलेली कडधान्ये वेचून काढून टाकावीत. स्वच्छ केलेली कडधान्ये कापडात बांधून मोड यायला उबदार जागी ठेवावी. ७ ते १० तासांनी मोड येतील.
Copyright © 2025 | Marathisrushti