साहित्य: १ जुडी पालकाची पाने, २ टोमॅटो, १ टी स्पून लिंबाचा रस, ५ कप पाणी, ५-६ लसणाच्या पाकळ्या, १ लहान हिरवी मिरची, फोडणीसाठी तूप १ टी स्पून साखर मीठ.
कृती: वेळ: २५ मिनिटे पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरा. त्यात टोमॅटो व पाणी घालून सर्व मऊ होईपर्यंत शिजवा. हे सर्व मिश्रण थंड झाले की मिक्सरमध्ये फिरवा, गाळून घ्या. फार दाटसर असू नये. गाळलेल्या मिश्रणात मीठ टाकून उकळत ठेवल्यावर लसणाच्या पाकळ्या व मिरची ठेचून चांगल्या तुपावर थोडा हिंग व लसूण घालून फोडणी तयार करा व ही फोडणी उकळत्या पालकाच्या सूपावर ओता. गॅस बंद करा. झाकण ठेवा. शेवटी लिंबाचा रस व थोडी साखर घाला. हे चटपटीत सूप गरमागरम प्यायला द्यावे.