साहित्य: अर्धा किलो कोलंबी, २ टे. स्पून तेल, २ टे.स्पून लोणी, अर्धा टी स्पून आले-लसूण पेस्ट, वेळ: ४० मिनिटे ३ पातीच्या कांद्यांतले कांदे चिरून, १ गाजर सोलून व चिरून, ३ मोठे लाल टोमॅटो, १ स्लाईस ब्रेड, २ टे. स्पून तांदूळ, कोथींबीर (ऐच्छिक), २ कप कोलंबीचा स्टॉक, चवीपुरते मीठ, मिरेपूड, २ टे. स्पून व्हाईट वाईन (आवडत असल्यास)
कृती: कोलंबी सोलून स्वच्छ धुऊन एका पातेल्यात घ्यावी. त्यावर तीन कप पाणी घालावे. उकळी आल्यावर दोन कप पाणी राहील इतकेच उकळवावे. त्यातील कोलंबी बाजूला काढून ठेवावी. हा कोलंबीचा स्टॉक तयार झाला. जाड बुडाच्या पातेल्यात तेलावर कोलंबी गुलाबी होईपर्यंत परतावी. त्यावर आले-लसूण पेस्ट, मीठ घालून चांगले परतावे. ती कोलंबी बाजूला काढून ठेवावी. त्याच पातेल्यात लोणी वितळवून, त्यात चिरलेले कांदे मंद गॅसवर परतावेत. त्याच वेळी त्यात गाजर, टोमॅटोचे तुकडे, तांदूळ व ब्रेडच्या स्लाईस घालाव्यात. सर्व परतून कोलंबीचा स्टॉक घालावा व मंद गॅसवर तांदूळ शिजेपर्यंत उकळत ठेवावे. नंतर सर्व मिश्रण मिक्सरमधून जरा जाडसर वाटून घ्यावे. पुन्हा पातेल्यात काढून उकळत ठेवावे. चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड घालावी. कोलंबी घालावी व शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.