(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

  • Kombadi-Wade-300

    कोंबडी वडे

    या पदार्थाला कोंबडी वडा म्हणत असतील तरी बटाटावडय़ा सारखा हा नसतो, तर विशिष्ट प्रकारे केलेल्या वडय़ासोबत ही कोंबडी खाल्ली जाते, म्हणून ह्याला कोंबडीवडा म्हणतात.

  • p-2974-Sweet-Corn-Soup-300

    स्वीट कॉर्न सूप

    साहित्य :- १ टिन स्वीट कॉर्न, २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर, २ मोठे चमचे लोणी, १/२ छोटा चमचा अजीनोमोटो पावडर, १/२ कप पत्ता कोबी, १ गाजर, १ कांदा, २ चीज क्यूब.

    पाककृती :- कोबी, गाजर व कांदा बारीक चिरुन घ्या. १/२ कप पाण्यात कॉर्नफ्लावर टाका. एका भांड्यात टिनमधील स्वीट कॉर्न, कॉर्नफ्लावर व ६ कप पाणी टाकून गॅसवर ठेवा. उकळी आल्यावर लोणी, अजीनोमोटो पावडर टाकून १० मिनीटे शिजवा. कांदा, गाजर, व कोबी टाकून ५ मिनीटे शिजवा गॅस बंद करून किसलेले चीज टाका. गरम-गरम वाढा.

  • खमंग दडपे पोहे करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत

    ह्या डिशचे वैशिट्य असे की या प्रक्रिये मद्धे कोठेही पाणी वापरले नाही. टोमॅटो, लिंबू व फोडणीच्या ओलाव्यावर पोहे केले आहेत.

  • लुक्मीव

    लुक्मीव

    साहित्य:- २ वाट्या मैदा, १ वाटी रवा, साजूक तूप, २ वाट्या खवा, दीड वाटी पिठीसाखर, केशर-वेलची पूड, १ वाटी सुकामेवा पूड.
    कृती:- मैदा, रवा, मीठ व अर्धा चमचा पिठीसाखर एकत्र करावी. त्यात अर्धी वाटी तुपाचे मोहन घालून कालवून घ्यावे व नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून घट्ट कालवावे. 2 वाट्या खवा तांबूस परतून त्यात पिठीसाखर मिसळून छान मऊसर करून घ्यावा. त्यात वेलची पूड, केशर व काजू-बदामाची जाडसर पूड मिसळावी. रवा - मैदा तासभर भिजल्यावर पुन्हा चांगले मळून घ्यावे. लुक्मीी चौकोनी आकाराची असते. पुरीला घेतो तेवढीच लाटी घेऊन लांबट लाटावे. अर्ध्या भागात सारण भरून दुसरा अर्धा भाग त्यावर दाबून चौकोनी आकार द्यावा. नंतर लुक्मी साजूक तुपात तळून गरमागरम वाढाव्यात.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • p-1722-kajjikayal

    कज्जीकायल

    मैदा आणि तूप मिसळून घ्या. त्यात पाणी मिसळून मळून घ्या. एका भांडय़ात तूप घाला. ते गरम करा. त्यात खोवलेला नारळ घालून तो चांगला परतून घ्या. तो बाहेर काढून ठेवा आणि त्याच भांडय़ात रवा परतून घ्या. रव्यात साखर, नारळ, वेलदोडे आणि सुका मेवा मिसळा. आता मळलेल्या मैद्याच्या लहान लहान पुऱ्या करून घ्या. त्यात खोबऱ्याचे मिश्रण भरा. त्या करंज्यासारख्या आकार द्या. तळा आणि गरम गरम खायला द्या.

  • Cream-Based-Gravy-300

    क्रीम बेस ड्राय ग्रेव्ही (पनीर बेस भाज्या / मलई कोफ्ता)

    धने जीरे पावडर १ चमचा, काजू पावडर अर्धा वाटी, मीठ चवीनुसार, कस्तुरी मेथी अर्धा चमचा, हळद छोटा अर्धा चमचा, सुंठ पावडर अर्धा चमचा, लसूण पावडर अर्धा चमचा, दूध पावडर १ वाटी,सायट्रीक ऍसिड पाव चमचा, साखर अर्धा चमचा हळद तिखट चवीनुसार.
    हे सर्व भाजून बारीक करून ठेवावे.

  • लुक्मीव

    आजचा विषय कटलेट

    कटलेट हे गरमागरमच सर्व्ह केले जातात. कटलेट हा पदार्थ बहुधा मोठय़ा हॉटेलमध्ये चाखायला मिळतो किंवा एखाद्या लग्न समारंभात. पण आपण स्टार्टर म्हणून किंवा सकाळ-संध्याकाळचा नाश्ताे म्हणून कटलेट करायला काहीच हरकत नाही.
    काही कृती कटलेटच्या
    राइस कटलेट
    साहित्य : दोन वाट्या शिजवलेला भात, अर्धी वाटी भाजणी किंवा डाळीचे पीठ, एक उकडलेला बटाटा, एक कांदा, दोन ते तीन चमचे हिरवी मिरची पेस्ट, दोन ब्रेडचे स्लाइस, चवीपुरती साखर, मीठ, जिरेपूड, एक चमचा तेल.
    कृती : बटाटा किसून घ्या व कांदा बारीक चिरून घ्या. भात एकसारखा करून त्यात बटाटा, कांदा, जिरेपूड, मिरची पेस्ट, मीठ, साखर, भाजणी, पाण्यात भिजवून चुरा करून ब्रेडचे स्लाइस हे सर्व घाला व एकजीव करून घ्या. आता तयार मिश्रणाचे हव्या त्या आकारात कटलेट बनवून तळा किंवा ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करा. सॉस बरोबर गरमागरम सर्व्ह करा.
    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    छोले कटलेट
    साहित्य : एक वाटी भिजवलेले छोले, एक उकडलेला बटाटा, अर्धी वाटी पुदिन्याची पाने, थोडी कोथिंबीर, तीन ते चार हिरव्या मिरच्या, दोन ब्रेडचे स्लाइस, मीठ, लाल मिरची, साखर, लिंबूरस, चवीनुसार, अर्धा चमचा गरम मसाला, तेल.
    कृती : भिजवलेले छोले कुकरमध्ये वाफवून घ्या. त्यात पुदिना, मिरची, कोथिंबीर घालून वाटून घ्या. छोले मिश्रणात उकडलेला बटाटा कुस्करून, कुस्करलेले ब्रेड स्लाइस घालून, गरम मसाला, मीठ, साखर, लिंबूरस घाला व एकजीव करा. या मिश्रणाचे कटलेट करून गरम तेलात तळा किंवा शॅलो फ्राय करा. तयार कटलेट चटणीबरोबर सर्व्ह करा.
    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    पौष्टिक कटलेट
    पिठाचे साहित्य : ज्वारी, गहू, बाजरी, सोयाबीन, तांदूळ, नाचणी, हिरवे मूग, हरभरे, मटकी, मसूर, धने-जिरे प्रत्येकी एक वाटी, एक मोठा चमचा मेथी दाणे, हे सर्व वेगवेगळे भाजून घ्या व एकत्र करून दळून आणा. पीठ तयार असल्यास कटलेट लवकर होतात.
    कटलेटचे साहित्य : वरील पीठ दोन ते तीन वाट्या, गाजर, बीट व कोबी कीस पाव वाटी, एक उकडलेला बटाटा, दोन ते तीन ब्रेड स्लाइस, पाव वाटी बारीक चिरलेला पालक, कोथिंबीर, दोन चमचे हिरवी मिरची-लसूण पेस्ट, एक चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ व साखर, लिंबूरस, दोन चमचे तेलाचे मोहन, तळण्यास तेल.
    कृती : पिठामध्ये सर्व भाज्या, उकडलेला बटाटा, ब्रेड स्लाइसचा चुरा, साखर, मीठ, लिंबूरस, हिरवी मिरची पेस्ट, तेल हे घालून भिजवून घट्ट गोळा बनवावा. त्याला आकार देऊन तेलात बदामी रंगावर तळावे. चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करावे.
    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    चिली मिली कटलेट
    साहित्य : चार मक्यासची कणसे, एक उकडलेला बटाटा, चार ब्रेड स्लाइस, दोन चमचे आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, मीठ, साखर चवीनुसार, लिंबूरस, तेल.
    कृती : कणसे किसून घ्या. उकडलेल्या बटाट्याचा कीस, हिरवी मिरची पेस्ट, लिंबूरस, मीठ, साखर, ब्रेड पाण्यात भिजवून चुरून त्यात घाला. तयार मिश्रणाचा गोळा करा व हव्या त्या आकारात कटलेट करून घ्या. हे कटलेट गरम तेलात तळा किंवा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून शॅलो फ्राय करा. ब्रेड क्रम्सऐवजी बटर कुटून त्याचाही चुरा वापरता येतो.
    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    हरभरा कटलेट
    साहित्य : एक वाटी मोड आलेले आणि वाफवलेले हिरवे हरभरे किंवा ताजे ओले हिरवे हरभरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक उकडलेला बटाटा, लसूण-आले-हिरवी मिरची पेस्ट, पाव वाटी बेसन, पाव वाटी किसलेला कांदा, चवीनुसार लिंबूरस, मीठ, साखर, तेल, ब्रेडक्रम्स.
    कृती : वाफवलेले हरभरे मिक्सदरमधून भरड काढून घ्या. त्या मिश्रणात वरील सर्व पदार्थ एकत्र करून घट्ट मळा. या मिश्रणाचे कटलेट तयार करून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून शॅलो फ्राय करा. पुदिन्याची चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.
    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    ब्रेड कटलेट
    साहित्य: १० स्लाइस ब्रेड, ४ हिरव्या मिरची, १/२ कप कोथिंबीर,१ तुकडा आले,मीठ चवीनुसार,१०० ग्रॅम चीज,तळण्याकरता तेल
    कृतीः हिरवी मिरची व आले बारीक वाटून घ्या. कोथिंबीर बारीक चिरा, १ चीज किसणीने किसून घ्या.
    ब्रेड चे स्लाइस पाण्यात बुडवून लगेच काढून घ्या. हाताने दाबुन त्याचे पाणी काढून त्यांना हातने कुचकरा त्याच्यात हिरव्या मिरची, कोथिंबीर, आल, मीठ, मिसळून एकत्र करा.
    आता थोडेसे मिश्रण हातावर घ्या त्याच्या मधोमध चीज ठेऊन परत बंद करा. चपटे लहान-लहान कटलेट तयार करा. एका कढईत तेल गरम करून कटलेट तळून घ्या. गरम-गरम कटलेट टमाटर सॉस व हिरव्या चटणी बरोबर वाढा.
    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    मिश्र डाळींचे कटलेट
    साहित्य : भिजलेले मूग, मटकी व मसूर मोड आलेले प्रत्येकी अर्धी वाटी, पाव वाटी हिरवे वाटाणे, दोन बटाटे उकडून कुस्करून, हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमचे, 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा तिखट, मीठ चवीनुसार, 1 चमचा चाट मसाला, चिमूटभर साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ब्रेडचा चुरा, तेल.
    कृती : कडधान्ये वाफवून घ्या व मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात कुस्करलेला बटाटा, हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण, तिखट, मीठ, चाटमसाला, साखर कोथिंबीर घाला. एकत्र कालवून गोळा बनवा. ताटात ब्रेडचा चुरा पसरा. मिश्रणाचे लहान लहान गोळे करून त्याला हाताने चपटे करा व ब्रेडच्या चुऱ्यावर त्यांना गुंडाळून घ्या. पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्यावर टिक्क्या ठेवा. दोन्ही बाजूंनी थोडे तेल सोडून खमंग भाजा. टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.
    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

  • लुक्मीव

    काजू

    काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात. काजूमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आढळून येते. काजू लवकर पचतात.

    काजुमध्ये आयर्न जस्त प्रमाणात असते. यामुळे ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे, त्यांनी नियमित काजू खावेत.काजू पाण्यात भिजवून बारीक करून याचा उपयोग मसाज करण्यासाठी केल्यास त्वचा उजळेल. काजू तेलकट, शुष्क इ. प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी लाभप्रद आहे. तुमची त्वचा तेलकट असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा.

    सकाळी काजी बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती, लिंबू किवा दही थोड्या प्रमाणात मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.काजूमध्ये प्रोटिन्स अधिक प्रमाणात आढळतात. काजू दररोज खाल्याने हाडे मजबूत होतात. काजूमुळे दात आणि हिरड्याही सशक्त राहतात. तसेच ह्दयविकारावरही काजूही रामबाण औषण सिद्ध झाले आहे. काजूमध्ये एंटी ऑक्सिडेंट असल्याने शरीराचे वजन संतुलित ठेवले जाते.कुज उर्जेचा उत्तम स्रोत मानले जाते.

    काजू खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती काजूचे सेवन करू शकतो. अनेकवेळा व्यक्तीला काही कष्ट न करता थकवा जाणवतो, अशावेळी २-३ काजू खाऊन पाहा, फरक जाणवेल. तुमचा मूड चांगला राहील. काजू खाल्ल्याने थकवा दूर होण्यास मदत होते. काजुमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. याच्या सेवनाने केस आणि त्वचा स्वस्थ आणि सुंदर होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • लुक्मीव

    अळीवाचे लाडू

    साहित्य:- १ वाटी अळीव, २ नारळ, अर्धा किलो गूळ, १० बदाम बारीक़ चिरलेले, किंवा जाडसर पूड करून, काजू आवडीनुसार बारीक किंवा जाडसर पूड करून, २ मोठे चमचे मनुके, १/२ छोटा चमचा वेलची पूड.

    कृती:- नारळाच्या पाण्यात किंवा १ वाटी दुधात अळीव २ तास भिजत ठेवा. अळीव भिजल्यावर अळीव, ओले खोबरे व गूळ एकत्र करून मंद आचेवर शिजायला ठेवावे. नीट मिसळले की काजू पूड, बदाम पूड व वेलची पावडर घालून ढवळावे. पाण्याचा अंश आटून खुटखुटीत होईपर्यंत शिजवावे.
    गोळा झाला की मिश्रण गॅस बंद करावा. मिश्रण थंड होऊ दयावे. थंड झाल्यावर हव्या त्या आकारात लाडू वळावेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • p-3006-kothimbir-paratha

    कोथिंबिरीचे पराठे

    साहित्य: कोथिंबिरीच्या २-३ मोठ्या जुड्या, ३-४ वाट्या कणीक, दोन टेबलस्पून बेसन (चणा डाळीचे) पीठ, चवीनुसार निरव्या मिरच्या, ५-७ लसूण पाकळ्या, पेरभर आले, चवीनुसार मीठ, एकचमचा जिरेपूड, पावचमचा हळद, एक टेबलस्पून पांढरे तीळ अथवा खसखस, एक वाटी तेल कींवा वनस्पती तूप, सारणाचा मसाला परतण्यासाथी एक टेबलस्पून तेल.

    कृती : प्रथम कोथिंबीर चांगली निवडून, स्वच्छ धुवून, निथळून सूती कपड्याने चांगली कोरडी करून घ्या. आले - लसूण – मिरच्या व पांढरे तीळ अथवा खसखस (भाजून घेऊन) एकत्र वाटून घ्यावे. त्यातचजिरेपूड घालावी. आता थोड्या तेलावर कोथिंबीर चुरचुरीत होईतो परतावी. मग त्यात मिक्सरवर केलेले मसाल्याचे वाटण व चवीनुसार मीठ घालून पुन्हा परतावे. बेसन (चणा डाळीचे) पीठ थोड्या तेलावर खमंगभाजून कोथिंबीरीच्या तयार केलेल्या मसाल्यात घालावे. चांगले कालवून हा बाकर – मसाला सारण एका बाऊलमध्ये काढून ठेवा.एका परातीत पराठ्याची कणीक,एक टेबलस्पून तेलाचे मोहन व चवीला मीठ घालून घट्ट पीठ भिजवून दोन तासओल्या सूती कपड्याखाली मुरण्यासाठी झाकून ठेवावे. आता पराठे करतेवेळी लाडवा एव्हढा कणकेचा गोळा घेऊन हाताने द्रोणाचा आकार द्यावा किंवा छोटी पुरी लाटुन्न व त्याचाद्रोण करावा. त्यात सुमारे दोन टेबलस्पून कोथिंबिरीचा बाकर(सारण)भरावा. द्रोणाच्या कडा जुळवून गोल कचोरीसारखी गोळा वळावा.पोळपाटावर कणीक भुरभुरून त्यावर हा गोळा ठेवून हलक्या हाताने पराठे लाटून तेल वा तूप सोडून भाजावे. हे कोथिंबिरीचे पराठे आठवडाभर छान टिकतात.लोणी व पुदिना चटणी सोबत सर्व्ह करावे. खूपच स्वादिष्ट लागतात.