महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
सोयाबीन हे डाळवर्गीय पीक मूळचे चीन देशातले. चिनी लोक आपल्या रोजच्या आहारात सोयाबीनचा समावेश करतात. महाराष्ट्रात सोयाबीनचे पीक लाखो शेतकरी घेतात. हे पीक दलालांमार्फत तेलगिरण्यांना जाते. तेथे त्यापासून खाद्यतेल व पेंड मिळते. पेंडीचा उपयोग कोंबडय़ांचे खाद्य म्हणून होतो. सोयाबीनपासून दुधाला पर्याय असे दूध बनवता येते.
रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी आल्यास ती ताजी असतात, लाल पाणी आल्यास ती पापलेट शिळी असतात.तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो.
साहित्य : मुगाचे पीठ, साजूक तूप, साखर, वेलची, केशर, दूध, चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम दूध, तूप एकत्र करुन ते गरम करणे. थंड झाल्यावर त्यात भिजेल एवढे मुगाचे पीठ घेणे. व ते चांगले मळून एक तासभर ठेवणे. नंतर त्याचे गोळे करुन साजूक तूपातून तळून बाजूला काढणे.
साखरेचा एकतारी पाक करुन त्यात केशर आणि वेलची घालणे. आणि हा पाक त्या तळलेल्या गोळ्यावंर ओतणे.
एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत,मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा.
गॅसवर कढई ठेवा. तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात १ कप गव्हाचे पीठ घाला. मंदाग्नीवर पीठ चांगले भाजून घ्या. मग त्यात १ कप साखर घाला.
साहित्य - १ वाटी मैदा - मीठ, अर्धी वाटी मटार, दोन बटाटे उकडून व कुस्करून, एक ते दीड चीजची क्युचब किसून, पाव चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, तळणीसाठी तेल.
कृती - प्रथम १ वाटी मैदा, १ चमचा तेल व मीठ व पाणी घालून घट्टसर मळून घ्या. अर्धी वाटी मटार उकळत्या पाण्यात मऊ शिजवून घ्या. बाहेर काढून मॅश करून घ्या. दोन बटाटे उकडून मॅश करा. दोन्ही एकत्र करून त्यात मीठ, मिरची पेस्ट व चीज किसून घाला व मळून छान गोळा करून घ्या. भिजवलेला मैद्याच्या गोळ्यापैकी लिंबाएवढा गोळा घ्या व छोटी चौकोनी पोळी लाटा. त्यावर वरील सारण घालून रोल तयार करा. रोलच्या कडेच्या दोन्ही बाजू पाण्याचा अलगद हात लावून बंद करा. साधारण दोन ते अडीच इंचाचा एक रोल झाला पाहिजे. कढईत तेल गरम करा व हे रोल त्यात गुलाबी रंगावर खरपूस तळून घ्या. सॉसबरोबर सर्व्ह करा. वरील रोल्स तयार करून झिपलॉक बॅगमध्ये ठेवून वरच्या डी-फ्रॉस्टच्या कप्प्यात ७-८ दिवस आरामात राहतात. ऐनवेळी तेल गरम करून तळता येतात. चीजमुळे हे मटार रोल्स खूपच चवदार लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कोणत्याही देशाची सांस्कृतिक उत्क्रान्ती कशी झाली हे पाहताना तिथल्या समाजाच्या अन्नांबद्दलच्या कल्पना आणि अन्नपदार्थ बनविण्यासंबंधीच्या कल्पना कशा आणि का बदलल्या गेल्या हे बघणं अत्यंत महत्वावं आणि मनोरंजकही असतं. आपल्या देशासारखा भला मोठा इतिहास असलेल्या देशाच्या बाबतीत तर ते आवश्यकही असतं.
कांदा, कोथंबीर, टोमाटो बारीक चिरून घ्यावे. काकडी चोचून घ्यावी किंवा बारीक चिरून घ्यावी. हिरवी मिरची वाटून घ्यावी. एका भांड्यात चिरलेले कांदा, कोथंबीर, काकडी व टोमाटो घेवून हिरवी मिरची घालावी व मोड आलेली मटकी घालावी. वरतून मीठ, फरसाण, घालून मिक्स करून मग त्यामध्ये लिंबू रस व साखर घालून हलक्या हाताने हलवून घ्यावे.
एका स्वच्छ भांड्यात दूध घेऊन उकळवायला ठेवा. काजू आणि पिस्त्याचे बारीक तुकडे करून घ्या. हिरव्या वेलचीचे दाणे काढून भरडसर कुटून घ्या. प्रत्येक एक-दोन मिनिटांनी दूध ढवळत राहा. दूध चांगले आटेपर्यंत अथवा भांड्यात अर्ध्यावर येईपर्यंत उकळवा. आता काजू आणि पिस्त्याचे तुकडे आटवलेल्या दूधात घाला.
साहित्य- दोन वाट्या बासमती तांदूळ, एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, दोन तमालपत्रे, एक इंच दालचिनी, 10-12 मिरे, चार लवंगा, दोन-तीन वेलदोडे, दोन चमचे आले, लसूण व हिरवी मिरची पेस्ट, एक चमचा धने-जिरेपूड, एक वाटी मटार, चार चमचे साजूक तूप, चवीनुसार मीठ, साखर, दोन कांदे तळून व थोडे काजू.
कृती- तांदूळ धुवून अर्धा तास निथळत ठेवावेत. जाड बुडाच्या पातेल्यात चार चमचे तूप घालून त्यात तमालपत्र-दालचिनी-मिरे, लवंगा, वेलदोडे घालून परतावे. नंतर चिरलेली मेथी व मटार घालून परतावे.
त्यात आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट व धने-जिरेपूड घालावी. नंतर धुवून ठेवलेले तांदूळ घालून परतावे. अंदाजे मीठ व चवीला थोडी साखर घालावी. नंतर चार वाट्या आधण पाणी घालून पुलाव शिजवून घ्यावा. (हवे तर कुकरमध्ये शिजवून घ्यावे) पुलाव वाढताना वर तळलेला कांदा व तळलेले काजू घालावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti