महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
पिठलं वाटीबीटीत वाढणं आणि ते चमच्याने खाणं हा पिठल्याचा महान अपमान आहे. त्याची जागा पानात उजवीकडेच. पिठलं म्हटलं की चण्याचं पण बदल म्हणून कुळथाचे हा अतिशय उत्तम पर्याय, कधी केलं तर तसं सांगायचं. अगदी रोज खाऊन ही त्याचा कंटाळा येत नाही .
March 8, 2017
साहित्य : १ मध्यम आकाराचे पापलेट, १ वाटा मध्यम आकाराची कोलंबी, १ कांदा, आलं-लसूण मिरची, कोथिंबीरीचे कोलंबीसाठी वाटण, (२-३ चमचे टेबलस्पून) २ टेबलस्पून आलं व लसणाचे वेगळे वाटण, अर्धे लिंबू, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, १ चमचा चिंचेचा कोळ, १ अंड, ब्रेड क्रम्ब्स, चवीनुसार मीठ, सजावटीसाठी अंड्याचे काप, केळीचे पान
कृती : प्रथम पापलेट स्वच्छ धुऊन त्याचा मधला काटा काढून घ्यावा व त्याला वरुन अलगद ३-४ खाचा कराव्यात. पापलेट थोडे मीठ, हळद, लिंबू व आलं-लसणाची पेस्ट आतून व वरुन लावून घ्यावी. १५ मिनीटे त्याचे मॅरिनेशन होऊ द्यावे. नंतर कोलंबी दोरे काढून स्वच्छ धुऊन घ्यावी. कोलंबीला आलं-लसूण, मिरची, कोथिंबीरीचे वाटण, हळद, तिखट, मीठ व चिंचेचा कोळ लावून घ्यावा. एका कढईत तेल टाकून त्यावर कांदा परतावा त्यावर कोलंबी घालून ती सुखी होई पर्यंत परतावी, मॅरिनेट झालेल्या पापलेटमध्ये कोलंबी थंड झाल्यावर व्यवस्थित भरावी. नंतर पापलेटला तळताना कोलंबी बाहेर येऊ नये म्हणून दोरा बांधून किंवा सुई दोऱ्याने शिवावे.
पापलेटला वरुन ब्रशने अंड लावून घ्यावे व ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करावे. केळीच्या पानात अंड्यांच्या चकत्यांची सजावट करुन सर्व्ह करावे.
सोबत अन्नपूर्णेची मूर्ती व सुगरणीचा वसा घेऊन आलेल्या गृहिणीकडील हि कृती म्हणजे खानाखजिना अशी नजाकतीने केळीच्या पानावरील हा सागरी नजराणा पाहताच अस्सल खवय्यांची भूक खवळते व त्याचा आस्वाद घेतल्यावर तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने रसिकांकडून जी दिलखुलास दाद मिळते त्याहून मोठे इनाम कुठले !
- सौ. शर्मिला आदित्य गुप्ते
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
वरील सर्व मसाले मंद आचेवर भाजून त्याची पावडर करावी. उभे कापलेले कांदे कडकडीत तळून त्याची पूड करावी. एकत्र करून ठेवा. एका पातेल्यात अर्धी वाटी तेल घेऊन त्यामध्ये ४ चमचे आलंलसूण पेस्ट छान परतून घ्या. नंतर यात १ वाटी मालवणी मसाला घालून थोडं पाणी घाला व चांगले परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला.
February 3, 2017
एका भांडय़ात चीज, बटर, चिरलेली हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर मीठ टाकून नीट मिक्स करून ब्रेड स्लाइसवर स्पेड करून घ्यावे. पसरट काचेच्या भांडय़ात हे टोस्ट ठेवून मायक्रो मीडियमवर ८ मिनिटे ठेवावे. ब्रेड स्लाइस नरम वाटल्यास मायक्रो मीडियमवर अजून २-३ मिनिटे ठेवावे. ब्रेड स्लाइसचे त्रिकोणी काप करून गरम सव्र्ह करावेत.
March 15, 2017
फ्रेंच फ्राईज – Recipe
September 11, 2026
साहित्य :-
एका लिंबाचा रस, पाणी दोन ग्लास, साखर, मीठ चवीनुसार, ताजा पुदिना पाने चार, आंब्याचा रस अर्धा लहान चमचा, जिरपूड चिमूटभर, मिरेपूड चिमूटभर, बर्फ
कृती :-
बर्फ न घालता इतर सर्व पदार्थ मिक्सरमधून काढा. मिश्रण भांड्यात काढा.
थंड करण्यास ठेवा किंवा ग्लासात बर्फाचा चुरा लावून त्यात सरबत ओता आणि प्यायला द्या.
September 8, 2016
साहित्य :- १०० मिली गरम पाणी, ३०० मिली दूध, २ चमचे इन्स्टंट कॉफी, २ चमचे व्हॅनिला एक्सट्रॅक्ट, १ चमचा मध, १ चमचा साखर, १ वाटी बर्फाचे तुकडे.
कृती :- दोन चमचे इन्स्टंट कॉफी आणि १०० मिली गरम पाणी एकत्र करून ते मिक्सरच्या साह्याने छान घुसळून घ्या. जोपर्यंत कॉफी पूर्णपणे विरघळत नाही, तोपर्यंत घुसळा. त्यानंतर त्यामध्ये साखर, मध आणि व्हॅनिला एक्सट्रॅक्ट घाला. हे मिश्रण पुन्हा एकदा घुसळून घ्या आणि त्यामध्ये दूध घाला. दूध घातल्यावर पुन्हा घुसळा आणि त्यात बर्फाचे तुकडे आवश्यकतेप्रमाणे घाला. यानंतर पूर्ण मिश्रण पुन्हा एकदा घुसळा. तुमची कोल्ड कॉफी तयार झाली आहे. काचेच्या ग्लासमधून तुम्ही ती सर्व्ह करू शकता.
August 20, 2018
सर्व प्रथम 200 ग्रँ. पनिर घ्या. त्याचे तुकडे करून त्याला मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद लावून बाजूला ठेवून द्या.
1/2 तासाने एका पँन मध्ये 3 चमचे तेल आणि एक चमचा तुप घाला. ढाबा स्टाईल मध्ये तेला तुपाचा वापर सढळ हस्ते असतो आपल्याला आवडत नसेल तर प्रमाण कमी करा. त्यात मँरिनेट केलेलं पनिर टाँस करून घ्या. थोडं साँफ्ट होईपर्यंत. मग पनिर वेगळं काढून ठेवून त्याच पँन मध्ये अनुक्रमे जिरं,मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र घाला. प्रमाण आपल्या तिखट आवडेल त्याप्रमाणे मग 2 मोठे कांदे बारीक चिरलेले घाला. रंग हलका ब्राऊन होईपर्यंत परता. मग त्यात 3 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 2 चमचे धना जिरं पूड, आणि 2 चमचे बेसन घालून चांगलं परतून घ्या. खरपूस.... मसाला चिकटतोय असं वाटलं तर पाण्याचा हबका मारा. मग त्यात 3 मध्यम टोमँटो प्युरी टाका आणि पुन्हा तेल सुटे पर्यंत परतून घ्या. मीठ आणि बारिक चिरलेली कोथिंबिर घाला. शेवटी बाजूला ठेवलेलं पनिर आणि ग्रेव्ही नुसार पाणी घालून झाकण लावून 2 मिनिटं ठेवा....... झालं आपलं ढाबा स्टाईल पनिर मसाला.....
टिप : ढाबा स्टाईल रेसिपित काही जणं फक्त तुपाचा वापर करतात, काही तेलाचा तर काही दोन्हीचा आणि जरा जास्तच..... तसच जेवढे आपण मसाले परतू तेवढी टेस्ट वाढते....
November 28, 2024
साहित्य: १ वाटी वालाची डाळ, १ मध्यम कांदा, ४ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, मुठभर कोथिंबीर, हिंग, चिमुटभर, पाव चमचा हळद, चवीपुरते मीठ
कृती: वालाची डाळ धुवून थोड्या पाण्यात एक तास भिजत घालावी. त्यात हिंग, हळद घालून चांगली शिजवावी. शिजल्यावर डाळ मोडून घ्यावी. कांदा, मिरची, जिरे व कोथिंबीर यांचे वाटण डाळीला लावावे. वाटीभर पाणी घालावे व चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित उकळवावे वरुन
कोथिंबीर घालावी.
• सौ. नीता अतुल गडकरी
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
आपल्या रोजच्या जेवणातील कोशिंबिर हा एक नियमित पदार्थ. काकडी आणि कांदा हे तर त्याचे मुख्य घटक..
September 8, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti