मोझ्झरेल्ला वेजिटेबल टोस्ट सॅन्डविच

प्रथम तिन्ही प्रकारच्या भोपळी मिरच्या, ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स किसलेल्या मोझ्झरेल्ला चिझ मध्ये तेलावर मंद आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ व चिली फ्लेक्स, ओरिगानो टाकावे.



mozzarella-vegetable-toast-sandwich
mozzarella-vegetable-toast-sandwich

साहित्य : ब्रेड, भोपळी मिरची (हिरवी, लाल व पिवळी), ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स, चिझ स्लाईज किंवा मोझ्झरेल्ला चिझ, चिली फ्लेक्स, ओरिगानो, मीठ

कृती : प्रथम तिन्ही प्रकारच्या भोपळी मिरच्या, ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स किसलेल्या मोझ्झरेल्ला चिझ मध्ये तेलावर मंद आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ व चिली फ्लेक्स, ओरिगानो टाकावे. नंतर ब्रेड वर टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी लावून त्यावर चिझ स्लाईज ठेवावे. आणि त्यावर वरील मिश्रण नीट पसरवावे. परत वरच्या बाजुस चिझ स्लाईज ठेवून वरील ब्रेडला टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी लावून ठेवणे. नंतर टोस्टर मध्ये टोस्ट करून किंवा तव्यावर भाजून सर्व्ह करणे.

— पूजा प्रधान

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →