ग्रीन पीज चीज पॅटिस

कढईत तेल गरम करून त्यात मटार परतून घ्या. खोबऱ्याचा चव, मीठ, साखर, हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबूरस घालून पुन्हा परता; मात्र मटार जास्त कडक होता कामा नयेत.



p-2234-green-peas-cheese-patties
p-2234-green-peas-cheese-patties

साहित्य :- एक वाटी मटार, एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चव, पाव वाटी कोथिंबीर, दोन चमचे आले-मिरची पेस्ट, सहा उकडलेले बटाटे, तीन चमचे कॉर्नफ्लोअर, लिंबूरस, मीठ, साखर चवीनुसार.

कृती :- कढईत तेल गरम करून त्यात मटार परतून घ्या. खोबऱ्याचा चव, मीठ, साखर, हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबूरस घालून पुन्हा परता; मात्र मटार जास्त कडक होता कामा नयेत. त्यात किसलेले चीज घाला व पुन्हा थोडेसे परता. गॅस बंद करा. बटाटे उकडून घ्या. त्यात मीठ व कॉर्नफ्लोअर घालून मळून गोळा तयार करा. त्यात मटार-चीजचे सारण भरा. पारीचे तोंड बंद करून त्याला चपटा आकार देऊन गरम तेलात तळा. सॉसबरोबर सर्व्ह करा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →