(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्प्रिंग रोल्स

    स्प्रिंग रोल्स – Recipe

      September 11, 2026


  • p-1018-bhajani

    आजचा विषय भाजणीचे पदार्थ

    धान्यफराळ म्हणून भाजलेल्या धान्याचे पदार्थ केले जातात. अशा वेळी या भाजणीचा उपयोग करता येतो. ही भाजणी वापरून खमंग पदार्थ तयार करता येतात.

      March 7, 2017


  • http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2016/09/nachaniche-modak-300.jpg

    नाचणीचे मोदक

    साहित्य :

    ३/४ कप नाचणी चे पीठ, १/२ कप गव्हाचे पीठ,१/४ कप ज्वारी चे पीठ, १/२ टेबलस्पून वेलची पूड,१ कप साजुक तूप,
    पिठी साखर चवीनुसार

    कृती :

    पॅन मध्ये तूप गरम करायला ठेवा ,सर्व पीठे एकत्र करून खमंग भाजून घ्या ,(तूप सुटे पर्यंत ) ताटात काढून घ्या ,पूर्ण गार होऊ द्या मग पिठी साखर आणि वेलची पूड एकत्र करून छान करुन करुन मोदकाचा आकार द्या. ह्याचेच चॉकलेट मोदक करायाचे असल्यास २ टे.स्पून कोको पावडर मिक्स करून घ्या.

    -- संजीव वेलणकर, पुणे
    ९४२२३०१७३३

    (छायाचित्र : इंटरनेटवरुन )

      September 4, 2016


  • मेथीची भजी

    साहित्य- दोन वाट्या बेसन, तिखट, मीठ, हिंगपूड, अर्धा चमचा ओवा, एक चमचा धने-जिरेपूड, एक वाटी बारीक चिरलेली मेथी, एक पिकलेले केळे, चिमूटभर खायचा सोडा.

    कृती - नेहमी भज्यासाठी कालवतो त्याप्रमाणे बेसन, तिखट, मीठ, हिंगपूड घालून कालवून घ्यावे.
    त्यात अर्धा चमचा ओवा, धने-जिरे पूड व बारीक चिरलेली मेथी मिसळावी. चिमूटभर खायचा सोडा घालावा. मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी व थोडा वेगळा स्वाद येण्यासाठी एक पिकलेले केळे कुस्करून घालावे. नंतर नेहमीप्रमाणे भजी तळावीत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 22, 2017


  • p-2317-kurkurit-bhendi

    कुरकुरीत भेंडी

    बारीक चिरलेल्या भेंडीमध्ये कॉर्नस्टार्च सोडून सर्व जिन्नस घालावे. दहा मिनिटे मुरल्यानंतर भेंडीचे बारीक लांब तुकडे कॉर्नस्टार्च व बेसनाच्या द्रावणात घोळवून डीप फ्राय करावे व त्यावर थोडा चाट मसाला घालावा. अशा प्रकारे तयार झालेली कुरकुरीत भेंडी स्नॅक्स म्हणून सुद्धा खाता येते.

      June 10, 2017


  • भरडा भरलेल्या चिंबोऱ्या

    साहित्य : मध्यम आकाराच्या ६ चिंबोऱ्या, चणाडाळ अर्धा (मध्यम आकाराचा) पेला, रवा (मध्यम आकाराचा) अर्धा पेला, चिंचेचा कोळ २ चहाचे चमचे, कांदे बारीक चिरलेले हळद, तिखट, मीठ चवीनुसार, आलं-लसुण वाटणं ३ चहाचे चमचे, तेल १ मध्यम वाटी

    मसाला : कांदे २ मध्यम आकाराचे उभे चिरलेले, अर्धी वाटी भाजलेले सुके खोबरे, धणे ४ चहाचे चमचे, बडिशेप १ चहाचा चमचा, शहाजिरे १ चहाचा चमचा, १ चहाचा चमचा मिरे, लंवगा ,दालचिनी २ इंच.

    कृती: भरडा - चणाडाळ चांगली खमंग भाजून घेणे, नंतर जाडसर दळुन घेणे (भरडा)

    मसाला : तेलावर उभा चिरलेला कांदा लालसर भाजून घेणे नंतर त्यात धणे घालून भाजणे नंतर उरलेला मसाला (बडिशेप,जीरे, शहाजिरे, लवंगा, दालचिनी) घालून थोडा वेळ भाजणे, सर्वात शेवटी खोबरे घालून गॅस बंद करणे, थंड झाल्यावर सर्व मसाला बारीक वाटून घेणे. चिंबोरीचे पाय वाटून गाळून घेणे.

    मुख्य कृती : प्रथम चिंबोरी साफ करुन घेणे कवच व पेंदा वेगळा करुन लाख असल्यास वेगळी काढून कवच साफ करुन ठेवणे. पेंदा व नांग्याना, आर्धी आलं-लसूण पेस्ट व हळद, तिखट, मिठ, लाऊन ठेवणे. चिंबोरीच्या पायाचा रस, चिंचेचा कोळ, वाटलेला मसाला, उरलेली आलं-लसूण पेस्ट एकत्र करणे. त्यात डाळीचा भरडा व रवा कालवणे. चवी नुसार हळद, तिखट, मिठ, घालून कालवणे (पाणी घालू नये) वरील मिश्रण भज्यांच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असावे.

    मिश्रणाचे ६ भाग करुन घेणे चिंबोरीच्या कवचात मसाला भरुन त्यावर पेंदा ठेऊन कच्चा दोऱ्याने गुंडाळणे. अशा रीतीने प्रत्येक चिंबोरी भरुन घेणे.

    पसरट पातेल्यात तेल तापवून घेणे, त्यात हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेणे, आता त्यात एकेक चिंबोरी, पेंदावर येईल अशा रितीने ठेवणे. नांग्या व उरलेला मसाला घालून एक वाफ आणणे. नंतर चिंबोऱ्या आसडून पाठी कडील बाजू वर येईल अशा करणे. आता पातेल्याखाली तवा व झाकणावर पाणी ठेऊन ८ ते १० मिनीटे गॅस बारीक करून ठेवणे. नंतर झाकणावरील पाणी फेकून देऊन परत पातेल्यावर झाकण ठेवणे व गॅस बंद करणे.

    हा पदार्थ र्स्टार्टर म्हणून खाऊ शकतो. चपाती, भाकरी बरोबर खायचा असल्यास थोडासा रस्सा ठेवावा.

    -संगीता अमोल कोपर्डे (फणसे)

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • ola-Khobra-Chutney-300

    ओल्या खोबर्यांची चटणी प्रकार

    ओले खोबरे, हिरवी मिरची, आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.

      February 4, 2017


  • आलू मेथी

    साहित्य- पाच-सहा बटाट्याच्या (साले काढून) चौकोनी फोडी, एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, दोन-तीन चमचे तेल, मोहरी, हिंगपूड, थोडी हळद, एक चमचा धनेपूड, आवडीप्रमाणे तिखटपूड, चवीनुसार मीठ व किंचित साखर.

    कृती - तेलात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून त्यात बटाट्याच्या फोडी घालून परताव्यात.
    थोडे शिजत आल्यावर चिरलेली मेथी धनेपूड, तिखट, मीठ, साखर घालावी. नंतर बटाटे व मेथी मिसळून शिजवावी. ही भाजी सुकीच असते. याचप्रमाणे वांगी मेथी, मुळा मेथी करतात. किंबहुना कोणत्याही भाजीत मेथीचा स्वाद छान लागतो. मांसाहार करणारे मेथी खिमा बनवतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 19, 2017


  • paratha-300

    आजचा विषय पराठा

    पराठ्याचे साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ मळून घ्या. एका पातेल्यात थोडे तूप गरम करा. त्यात आले, मिरेपूड, पनीर, मीठ व कॉर्नफ्लोअरची पेस्ट घाला. गार झाल्यावर पुदिना व कोथिंबीर चिरून घाला. हे सारण पराठ्यात भरून पराठे लाटून घ्या. तेल सोडून चांगले खरपूस भाजा.

      January 16, 2017


  • p-2219-rajma-pattice

    राजमा पॅटिस 

    दोन वाटी वाफवलेला राजमा, दोन चमचे हिरवी मिरची-आले-लसूण पेस्ट, दोन उकडलेले बटाटे, एक चमचा गरम मसाला, एक बारीक चिरलेला कांदा, मीठ, अर्धी वाटी ब्रेडचा चुरा, दोन चमचे आमचूर पावडर, तेल.

      March 18, 2017