(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भरडा भरलेल्या चिंबोऱ्या

    साहित्य : मध्यम आकाराच्या ६ चिंबोऱ्या, चणाडाळ अर्धा (मध्यम आकाराचा) पेला, रवा (मध्यम आकाराचा) अर्धा पेला, चिंचेचा कोळ २ चहाचे चमचे, कांदे बारीक चिरलेले हळद, तिखट, मीठ चवीनुसार, आलं-लसुण वाटणं ३ चहाचे चमचे, तेल १ मध्यम वाटी

    मसाला : कांदे २ मध्यम आकाराचे उभे चिरलेले, अर्धी वाटी भाजलेले सुके खोबरे, धणे ४ चहाचे चमचे, बडिशेप १ चहाचा चमचा, शहाजिरे १ चहाचा चमचा, १ चहाचा चमचा मिरे, लंवगा ,दालचिनी २ इंच.

    कृती: भरडा - चणाडाळ चांगली खमंग भाजून घेणे, नंतर जाडसर दळुन घेणे (भरडा)

    मसाला : तेलावर उभा चिरलेला कांदा लालसर भाजून घेणे नंतर त्यात धणे घालून भाजणे नंतर उरलेला मसाला (बडिशेप,जीरे, शहाजिरे, लवंगा, दालचिनी) घालून थोडा वेळ भाजणे, सर्वात शेवटी खोबरे घालून गॅस बंद करणे, थंड झाल्यावर सर्व मसाला बारीक वाटून घेणे. चिंबोरीचे पाय वाटून गाळून घेणे.

    मुख्य कृती : प्रथम चिंबोरी साफ करुन घेणे कवच व पेंदा वेगळा करुन लाख असल्यास वेगळी काढून कवच साफ करुन ठेवणे. पेंदा व नांग्याना, आर्धी आलं-लसूण पेस्ट व हळद, तिखट, मिठ, लाऊन ठेवणे. चिंबोरीच्या पायाचा रस, चिंचेचा कोळ, वाटलेला मसाला, उरलेली आलं-लसूण पेस्ट एकत्र करणे. त्यात डाळीचा भरडा व रवा कालवणे. चवी नुसार हळद, तिखट, मिठ, घालून कालवणे (पाणी घालू नये) वरील मिश्रण भज्यांच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असावे.

    मिश्रणाचे ६ भाग करुन घेणे चिंबोरीच्या कवचात मसाला भरुन त्यावर पेंदा ठेऊन कच्चा दोऱ्याने गुंडाळणे. अशा रीतीने प्रत्येक चिंबोरी भरुन घेणे.

    पसरट पातेल्यात तेल तापवून घेणे, त्यात हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेणे, आता त्यात एकेक चिंबोरी, पेंदावर येईल अशा रितीने ठेवणे. नांग्या व उरलेला मसाला घालून एक वाफ आणणे. नंतर चिंबोऱ्या आसडून पाठी कडील बाजू वर येईल अशा करणे. आता पातेल्याखाली तवा व झाकणावर पाणी ठेऊन ८ ते १० मिनीटे गॅस बारीक करून ठेवणे. नंतर झाकणावरील पाणी फेकून देऊन परत पातेल्यावर झाकण ठेवणे व गॅस बंद करणे.

    हा पदार्थ र्स्टार्टर म्हणून खाऊ शकतो. चपाती, भाकरी बरोबर खायचा असल्यास थोडासा रस्सा ठेवावा.

    -संगीता अमोल कोपर्डे (फणसे)

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • जीवाची (की जिभेची?) मुंबई

    मुंबईत खाबुगिरीसाठी जागांची कमतरता नाही. वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या चवींच्या अक्षरश: सगळ्या खाद्यपदार्थांची उपलब्धता मला वाटते मुंबईशिवाय भारतातल्या कोणत्याही शहरात नसेल.

      April 20, 2016


  • टोफू टिक्का

    साहित्य:- टोफू २५० ग्रॅम, दही घट्ट १ वाटी (नसल्यास दही कापडात बांधून पाणी काढून घेणे.), आलं लसूण पेस्ट २ चमचे, धणे-जिरे पावडर २ चमचे
    तिखट, मीठ चवीनुसार, हळद, कस्तुरीमेथी चवीनुसार, चाटमसाला थोडा, तेल २ ते ३ चमचे, मैदा किंवा कणीक १ ते २ चमचे, सिमला मिरची, टोमॅटो, कांदे (मोठय़ा तुकडय़ांमध्ये)
    कृती:- दह्यात सगळे मसाले कणीक घालून एकजीव करावे. नंतर त्यात टोकू शिमला मिरचीचे तुकडे टोमॅटो, कांदे घालावे. ३० ते ४० मिनिटे ते तसेच ठेवावे. नंतर एका सळईला प्रथम कांदा, मग टोकू - सिमला मिरची, टोमॅटो, परत टोकू या क्रमाने टोचून रुंद कोळश्याच्या भट्टीवर किंवा गॅसवर भाजून थोडा तेलाचा हात लावून चाटमसाला टाकून चटणी कचुंबरबरोबर सव्‍‌र्ह करावे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 27, 2017


  • मोड आलेल्या मेथीचे सॅलड

    साहित्य : चार चमचे मोड आलेली मेथी, एक वाटी किसलेले गाजर, एक वाटी बारीक चिरलेली भोपळी मिरची, एक वाटी कॉर्न, एक वाटी डाळिंबाचे दाणे, मेयोनीज, मिरेपूड, लिंबाचा रस.

    कृती : मेथी, गाजर, भोपळी मिरची, कॉर्न व डाळिंबाचे दाणे एकत्र कालवा. त्यात आवश्य कतेनुसार मेयोनीज घाला आणि चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड व लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 21, 2017


  • p-1682-kelicha-saalitil-gar

    केळीच्या सालीतील गराची चटणी

    प्रथम केळी सोलून सालींना चिकटललेला पांढरा गर चमच्याने खरवडून घ्यावा. खजुराचे बारीक तुकडे करावेत. हे सर्व साहित्य एकत्र करून त्याची मिक्सारमध्ये चटणी करावी. ही चटणी पोळीबरोबर खाता येईल. केळ्याची कोशिंबर, शिकरण करता येईल.

      March 14, 2017


  • http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2018/05/p-3134-sweet-sandwich.jpg

    गोड सँडविच

    साहित्य : ब्रेडचे ८ स्लाइस, अमूल बटर चहाचे तीन चमचे भरून, ४ चमचे मध

    कृती : ब्रेडच्या स्लाइसला एका बाजूने अमूल बटर लावून नीट पसरवून घ्या. थंडीचे दिवस असेल तर अमूल बटर एका वाटीत घालून ती वाटी गरम पाण्यात ठेवा म्हणजे ते पातळ होऊन सर्व ब्रेडला नीट लावता येते. ब्रेडचा दुसरा स्लाइस घेऊन त्याला एक चमचा मध सगळीकडे एकसारखा पसरून नीट लावा. आता अमूल लावलेल्या स्लाइसवर मध लावलेला स्लाइसच्या कोरडया बाजू बाहेर येतील. सुरीने सॅडविचचे एकसारखे दोन किंवा दोन त्रिकोण होतील अशारितीने तुकडे करा.

      August 3, 2018


  • http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2018/05/paanipuri.png

    पाणीपुरी

    साहित्य : पाणीपुरीच्या पुर्‍या एक पाकिट (सुमारे ५० पुर्‍या) मीठ घालून उकडलेले पांढरे वाटाणे २ वाटया, ८-१० वाटया भरून चिंचेचे पाणी (कृती खाली दिली आहे.)

    कृती : एका प्लेटमध्ये पुर्‍या घेऊन त्याला हाताने वरून फोडा. त्यात एक चमचाभर पांढरे वाटाणे घाला. पाणी एका वेगळया वाटीत घ्या. जो तो आपापल्या पुर्‍यांमध्ये पाणी घालून पुर्‍या खाईल.

    पाणीपुरीचे पाणी -

    साहित्य : अर्धी वाटी चिंच उकळून, कोळून त्याचा गर, ७-८ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, १५ काडया पुदिना, एक वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, ५ लवंगा, ६-७ काळे मिरे, शेंदेलोण-पादेलोण यांची एकत्रित पूड, ३ चहाचे चमचे भरून, ४-५ चमचे गूळ, अर्धा चमचा लाल तिखट.

    कृती : यासाठी तुम्हाला आई किंवा काकूची मदत लागणार आहे. तुम्ही आईकडून चिंच उकळून घेऊ शकता. मग ती गार झाली की हाताने चोळून तिचा सर्व गर काढायचा. नंतर आईकडून लवंगा तव्यावर किंवा कढईत भाजून घ्यायच्या. त्या भाजतांना धुर निघू लागतो व लवंगा फुगतात आणि काळया होतात. पुदिना धुवून घेऊन त्याची पाने बाजूला काढा व मिरच्यांचे बारीक तुकडे करा. आले किसून घ्या, एका ताटात कोथिंबीरख्‍ पुदिन्याची पाने, मिरचीचे तुकडे, काळी मिरी, जिरे, भाजलेल्या लवंगा, २ चमचे शेंदेलोण-पादेंलोण पूड, आले हे सर्व घेऊन एकत्र कालवा व आईकडून मिक्सरमध्ये एकदम बारीक गुळगुळीत चटणी वाटून घ्या. आता ही चटणी साधारण मध्यम आकाराच्या पातेलीभर पाण्यात (सुमारे १ लिटर पाण्यात) मिसळा, त्यात गूळ घाला व हलवा. झाले पाणी तयार, चव घेऊन पहा, मीठ कमी वाटत असेल तर उरलेली एक चमचा शेंदेलोण-पादेलोण पूड या पाण्यात मिसळा. अजून तिखट पाणी हवे असेल तर अर्धा चमचा तिखट त्यात घालून सर्व नीट ढवळा.

      August 3, 2018


  • ओनिअन सूप वुईथ नूडल्स

    साहित्य: ५-६ मध्यम कांदे, २ टी स्पून लोणी, २ टी स्पून कॉर्नफ्लोअर, २ कप दूध, २ कप पाणी, वेळ ३० मिनिटे अर्धी मिरची + मीठ + ३-४ मिरे + थोडे आले सर्व एकत्र वाटून घेणे, १ अंडे फेटून + १ कप दूध, अर्धा कप उकडलेल्या नूडल्स,

    कृती: प्रथम कांदा उभा व पातळ चिरावा. लोण्यावर गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतावा. वाटलेली मीठ-मिरची परतावी. त्यावर दूध व कॉर्नफ्लोअर याची पेस्ट करून घालावी. थोडे पाणी घालून ढवळत राहावे व सूप चांगले उकळवावे. शेवटी फेटलेले अंडे दुधात मिसळून गरम सुपात घालून ढवळावे. बाऊलमध्ये गरम सूप घातल्यावर त्यावर उकडलेल्या नूडल्स घालाव्या. अंडे घातल्यावर सूप पुन्हा उकळवू नये.

      September 10, 2026


  • स्टफ्ड पापलेट विथ प्रॉन्स

    साहित्य : १ मध्यम आकाराचे पापलेट, १ वाटा मध्यम आकाराची कोलंबी, १ कांदा, आलं-लसूण मिरची, कोथिंबीरीचे कोलंबीसाठी वाटण, (२-३ चमचे टेबलस्पून) २ टेबलस्पून आलं व लसणाचे वेगळे वाटण, अर्धे लिंबू, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, १ चमचा चिंचेचा कोळ, १ अंड, ब्रेड क्रम्ब्स, चवीनुसार मीठ, सजावटीसाठी अंड्याचे काप, केळीचे पान

    कृती : प्रथम पापलेट स्वच्छ धुऊन त्याचा मधला काटा काढून घ्यावा व त्याला वरुन अलगद ३-४ खाचा कराव्यात. पापलेट थोडे मीठ, हळद, लिंबू व आलं-लसणाची पेस्ट आतून व वरुन लावून घ्यावी. १५ मिनीटे त्याचे मॅरिनेशन होऊ द्यावे. नंतर कोलंबी दोरे काढून स्वच्छ धुऊन घ्यावी. कोलंबीला आलं-लसूण, मिरची, कोथिंबीरीचे वाटण, हळद, तिखट, मीठ व चिंचेचा कोळ लावून घ्यावा. एका कढईत तेल टाकून त्यावर कांदा परतावा त्यावर कोलंबी घालून ती सुखी होई पर्यंत परतावी, मॅरिनेट झालेल्या पापलेटमध्ये कोलंबी थंड झाल्यावर व्यवस्थित भरावी. नंतर पापलेटला तळताना कोलंबी बाहेर येऊ नये म्हणून दोरा बांधून किंवा सुई दोऱ्याने शिवावे.

    पापलेटला वरुन ब्रशने अंड लावून घ्यावे व ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करावे. केळीच्या पानात अंड्यांच्या चकत्यांची सजावट करुन सर्व्ह करावे.

    सोबत अन्नपूर्णेची मूर्ती व सुगरणीचा वसा घेऊन आलेल्या गृहिणीकडील हि कृती म्हणजे खानाखजिना अशी नजाकतीने केळीच्या पानावरील हा सागरी नजराणा पाहताच अस्सल खवय्यांची भूक खवळते व त्याचा आस्वाद घेतल्यावर तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने रसिकांकडून जी दिलखुलास दाद मिळते त्याहून मोठे इनाम कुठले !

    - सौ. शर्मिला आदित्य गुप्ते

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • पास्ता इन रेड सॉस

    इटालियन पास्ताची प्लेट बघितल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटतेच ना? मग बघूया घरच्या घरी पास्ता कसा बनवायचा ते.

      March 30, 2016