महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
मश्रूमचा भाव देशसापेक्ष बदलत असतो. भारतात वापरले जाते ते ऑयस्टर मश्रूम सव्वाशे ते दीडशे रुपये किलोने विकले जाते. पण तेच युरोपीय देशात चौपट भावाने विकले जाते. फक्त काश्मीरमध्ये होणाऱ्या काळ्या मोरेल मश्रूमला हजार रुपये किलो द्यावे लागतात.
March 10, 2017
साहित्य- पाच-सहा बटाट्याच्या (साले काढून) चौकोनी फोडी, एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, दोन-तीन चमचे तेल, मोहरी, हिंगपूड, थोडी हळद, एक चमचा धनेपूड, आवडीप्रमाणे तिखटपूड, चवीनुसार मीठ व किंचित साखर.
कृती - तेलात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून त्यात बटाट्याच्या फोडी घालून परताव्यात.
थोडे शिजत आल्यावर चिरलेली मेथी धनेपूड, तिखट, मीठ, साखर घालावी. नंतर बटाटे व मेथी मिसळून शिजवावी. ही भाजी सुकीच असते. याचप्रमाणे वांगी मेथी, मुळा मेथी करतात. किंबहुना कोणत्याही भाजीत मेथीचा स्वाद छान लागतो. मांसाहार करणारे मेथी खिमा बनवतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 19, 2017
डेखे काढलेल्या लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या, मीठ, आवडीप्रमाणे लसून घालून जरा जाडसर वाटून घ्यावे. त्यात भरपूर लिंबाचा रस घालावा व नंतर मोहरी, हिंगपूड, मेथीपूड, हळद घालून तेलाची फोडणी करून गार झाल्यावर घालावी.
April 28, 2017
नेहमी कुठल्याही करंज्या करताना एक, दोन तरी मोदक करावेत.
नेहमी कुठलेही मोदक करताना एक-दोन तरी कानवले करावेत.
करंज्या फार गोड नको असतील तर आपल्या आवडीप्रमाणे साखर व गूळ वापरावा.
मधुमेही लोकांसाठी तसेच इतर काही कारणांनी एखाद्याला जर गोड पदार्थ खायचे नसतील तर "सुक्रालोज' (Sucralose) वापरावे. साखर व गुळाऐवजी "सुक्रालोज' वापरणे उत्तम.
करंज्यांच्या सारणात पिठीसाखर व गुळाऐवजी त्याप्रमाणात "सुक्रालोज' घातले तरीही चालते.
सारण जर दोन ते तीन वाट्यांचे असेल, तर त्यात तीस ते पन्नास ग्रॅम "सुक्रालोज' वापरावे. तेसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त घालावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
April 17, 2017
साहित्य : ताजा खवा ५०० ग्राम , काजू पाकळी १०० ग्राम (मिक्सरवर फिरवून पावडर करून घ्या) , पिठीसाखर १०० ग्राम (ज्यांना गोड मोदक आवडत असतील त्यांनी साखर जास्त घातली तरी चालेल) , स्वादासाठी एक छोटा चमचा विलायची पावडर
कृती : एका कढईत मंद गॅसवर खवा सोनेरी रंगावर चांगला खरपूस भाजून घ्या. थंड झाल्यावर त्यात काजूची पावडर,पिठीसाखर व विलायची पावडर घालून चांगले मळून घ्या व एका तसराळ्यात ठेऊन वर ताट ठेवून झाकून ठेवा. अर्ध्या तासाने पुन्हा एकदा तसराळ्यातील गोळा मळून घ्या व मोदकाच्या साच्यांत दाबून भरून मोदक काढून घ्या व एका ताटांत प्लास्टीकचा कागद पसरून त्यावर मोदक काढून वाळवून घेऊन एका डब्यात भरून ठेवा.
-- संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
September 4, 2016
साहित्य :
द्राक्षे २५० ग्रॅम, एक मोसंबी, एक लिंबू, मध तीन चमचे, साखर तीन चमचे, थोडीशी मिरपूड, एक ग्लास पाणी.
कृती :
द्राक्षे धुऊन, कोरडी करुन बिया काढून टाकाव्या. मोसंबी सोलावी, लिंबाचा रस काढावा.
नंतर द्राक्षे, मोसंबी, लिंबू रस, मध, साखर, पाणी एकत्र करुन मिक्सर मधून काढून एकजिनसी करावे. मिश्रण गाळून घ्यावे.
थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर त्यात थोडी मिरपूड व पुरेसे पाणी घाला. आणि प्यायला द्या.
April 30, 2016
साहित्य:- अगस्ताचा कोवळा पाला, चिंच, गूळ, तिखट, मीठ, डाळीचं पीठ, तळण्यासाठी तेल, तीळ आणि गरम मसाला.
कृती:- अगस्ताचा कोवळा पाला धुऊन तो बारीक चिरून घ्यावा. गरम पाण्यात चिंच तीन ते चार तासांसाठी भिजत घालायची. तिचा कोळ काढून घ्यावा. या चिंचेच्या कोळामध्ये गूळ भिजत ठेवावं. कोळामध्ये गूळ चांगलं विरघळवत ठेवावं. कोळ न शिजवता कच्चाच ठेवावा. एकीकडे डाळीचं पीठ भाजून घ्यावं. चिरलेल्या पानांमध्ये अंदाजाने डाळीचं पीठ, तिखट, मीठ, कोळ, गरम मसाला घालून कणिकेप्रमाणे पीठ मळावं. त्यांचा लांबट लोड करून तो उकडवत ठेवावा. दहा मिनिटं उकडल्यावर तो गार करण्यास ठेवावा. पूर्ण गार झाल्यावर त्यांच्या गोल गोल चकत्या करायच्या. आवडत असल्यास या चकत्या तळाव्यात नाही तर कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात चकत्या घालाव्या. झारा न लावता त्या टॉस कराव्यात. वरून भाजलेले तीळ भुरभुरावे. अशा प्रकारे अगस्ताच्या फुलांच्या पाकळय़ांच्याही वडय़ा करता येतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
January 22, 2017
एका बाऊलमध्ये तेल, लिंबाचा रस, मीठ व लाल तिखट एकत्र मिसळा. या मिश्रणात बेबी कॉर्न घोळवा व अर्धा तास तसेच ठेवा. उकडलेले बटाटे, मलई, हिरवी मिरची व मीठ मिक्ससरमध्ये फेटा.
November 28, 2016
साहित्य: अर्धा किलो चिकन, ४-५ कप चिकन स्टॉक, ५-६ बांबूशुटसचे तुकडे, ४-५ बटण मशरूम्स, १ लहान गाजर, अर्धा कप चिरलेला कोबी, अर्धा टी स्पून अजिनोमोटो, पाव टी स्पून काळेमिरे पावडर, १ टी स्पून मीठ, पाव टी स्पून किसलेले आले, पाव कप कांद्याची पात.
कृती: वेळ: ४० मिनिटे प्रथम बांबूशूटस उभे पातळ चिरावे व पुन्हा मध्ये थोडे चिरून थोडा वेळ पाण्यात भिजवावे. गाजर तिरके चिरून पुन्हा छोटे चौकोनी तुकडे करावेत. मशरूम्सचे मध्ये दोन भाग करावेत व चौकोनी बारीक तुकडे करावेत. कोबीचे बारीक चौकोनी तुकडे करावेत. चिकन बोनलेस करून चौकोनी पातळ तुकडे करावेत. पातेल्यात स्टॉक उकळत ठेवावा. प्रथम त्यात चिकनचे तुकडे घालावेत. नंतर सर्व भाज्या एकामागून एक घालत स्टॉक उकळत ठेवावा. २-३ मिनिटे चांगली उकळी आली की मीठ, मिरेपावडर, किसलेले आले इत्यादी घालावे. शेवटी चिरलेली कांद्याची पात घालावी. सूप चांगले उकळवावे व गरमागरम सर्व्ह करावे.
September 10, 2026
एका छोट्या ट्रे वर गरम (निमुळती) लाकडी प्लेट ठेवण्यात येते. लाकडी प्लेट गडद चॉकलेटी रंगाची असल्याने त्यावर टाकण्यात आलेली चॉकलेट ब्राऊनी मिळून प्लेट अत्यंत आकर्षक दिसते. चॉकलेट ब्राऊनीवर उकळतं चॉकलेट सॉस सोडण्यात येतं. चॉकलेट सॉस व ब्राऊनी मिळून लाकडाची प्लेट भरून जाते.
February 4, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti