(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • oatleli bhakri-300

    ओतलेली भाकरी

    हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुनही करता येते.

      November 9, 2016


  • http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2016/09/sabudana-khichadi.jpg

    साबुदाणा खिचडी करण्यासाठी काही टिप्स

    साबुदाणा --टपोरा ,गोल दाणे असलेला साबुदाणा चांगला --वेडावाकडा /हाताळल्यावर फुटणारा साबुदाणा घेऊ नये --आणि घ्यावा लागलाच तर चांगला चाळून घ्यावा आणि थोडा भाजून घ्यावा.

    साबुदाणा भिजवताना---साबुदाणा चांगला दोन/तीन वेळा पाण्याने धुवून घ्या आणि नंतर साबुदाणा पूर्ण भिजेल एव्हढे आणि वर अर्धा सेंटीमीटर पाणी राहील हे बघा. साबुदाणा एखाद्या उंच आणि झाकण वाल्या डब्यात भिजवावा. आणि एका तासाने तो डबा उलटा करून ठेवण म्हणजे वरून कोरडा पडणारा साबुदाणा देखील चांगला भिजतो --कमीतकमी ४ ते ६ तास भिजवणे

    शेंगदाणे कुट करताना --शेंगदाणे मायक्रोवेव मध्ये एका वेळी पाव ते अर्धा किलो पसरट काचेच्या भांड्यात (मायक्रोवेव योग्य ) – २+२+१+१ मिनिटे हाय वर भाजावेत -- + चा अर्थ मायक्रोवेव बंद करून भांडे बाहेर काढून दाणे ढवळावे आणि दाणे किती भाजले गेलेत हे पाहणे आणि परत भांडे आत टाकून मायक्रोवेव चालू करणे-( तुमच्या मायक्रोवेव च्या पावर प्रमाणे वेळ कमी जास्त लागेल ) भाजलेले शेंगदाणे साला सकट मिक्सर मध्ये भरड दळणे

    बटाट्याच्या फोडी घालायच्या असल्यास अगोदर शिजवून घेता येईल किवा साबुदाण्या अगोदर जिरे तूप हिरव्या मिरच्यांचे तुकडे असलेल्या फोडणी मध्ये घालून शिजवता येईल --फक्त प्रत्येकाचा शिजण्याचा वेळ वेगवेगळा असेल

    इतर पूर्व तयारी -- तूप (साजूक किवा वनस्पती ) किवा शेंगदाणा तेल , जिरे ,हिरव्या /लाल मिरच्या चे तुकडे --एक ते दीड सेंटीमीटर ,आल्याचे बारीक तुकडे /किसून ,कढीपत्ता (चालत असेल तर ) , लाल तिखट ,मीठ ,साखर , जीरापुड
    भिजवलेला साबुदाणा एखाद्या ताटात /पराती मध्ये काढून मोकळा करून घ्या . त्या मध्ये मीठ ,साखर ,लाल तिखट , दाणा कुट ,, जीरापुड ,आल्याचे तुकडे /कीस घालून चांगले मिक्स करा --चव बघा --खिचडी ची चव लागली पाहिजे -जे कमी वाटेल ते घाला आणि मिक्स करून ठेवा

    मोठ्या पातेल्यात /कढई मध्ये जास्त तूप /तेल घालून तापत ठेवा , त्या मध्ये जिरे घाला , ते तडतडले की हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून परता , त्या वर बटाटा फोडणी मध्ये घाला --अगोदर शिजलेले नसेल तर झाकण ठेऊन थोडे पाणी शिंपडून शिजवून घ्या ( थोडे करकरीत राहूदे जास्त लगदा होई पर्यंत शिजवू नका ) नंतर साखर , मीठ दाणा कुट घालून ढवळा

    दोन पर्याय करता येतील --एक या शिजलेल्या बटाट्यात वरील साबुदाणा मिश्रण घाला आणि चांगले ढवळा किवा --दोन- हे परतलेले व्यंजन ताटा /परातीतील साबुदाणा मिश्रणात ओता आणि नीट मिक्स करा --साबुदाणा खिचडीचे रेडीमिक्स तयार --या पुढे अनेक पर्याय - (एक) -वर कढई /पातेल्यात साबुदाणा घातलेला आहे ती झाकण ठेऊन एक वाफ आणून खिचडी करा.

    विशेष टिप्स -साबुदाणा भिजवताना थोडे ताक घाला --साबुदाणा मोकळा राहून खिचडी मोकळी होते

    शेंगदाण्याचे कूट जास्त असेल तर साबुदाणा मोकळा तर राहतोच पण खिचडीची चव देखील वाढते , शेंगदाण्याचे कूट नसेल तर खिचडी चिकट गोळा होते.

    खिचडी परत गरम करताना जर खिचडीवर दुधचा /ताकचा हबका मारून गरम केली तर मोकळी होते -(पाण्या पेक्षा )

    फ्रीज मध्ये साबुदाणा वाळत जातो त्यामुळे परत गरम करताना खिचडीवर पाणी /दुध /ताक चा हबका मारणे आवश्यक असते.

    वनस्पती तुपातील खिचडी साजुक तुपा पेक्षा जास्त खमंग लागते --कदाचित सढळ हस्ते तूप वापरल्या मुळे असेल.

    -- संजीव वेलणकर, पुणे
    ९४२२३०१७३३

      September 4, 2016


  • सांबार मसाला

    सांबार मसाला

    साहित्य :- धणे पाव किलो, जिरे 100 ग्रॅम, चणा डाळ 100 ग्रॅम, उडीद डाळ 100 ग्रॅम, 1 टी स्पून काळे मिरे, हळद 2 टी स्पून, सुक्‍या मिरच्या 50 ग्रॅम, पाव वाटी कढीपत्त्याची पाने, अर्धा वाटी सुके खोबरे.

    कृती :- प्रथम डाळी वेगवेगळ्या भाजून घ्या. (करपू देऊ नका.) उरलेले सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. थंड झाल्यावर सर्व एकत्र करून मिक्सरवर बारीक करा व हवाबंद बरणीत भरून ठेवा.

      July 10, 2019


  • Malvani-Gravy-300

    मालवणी ग्रेव्ही

    वरील सर्व मसाले मंद आचेवर भाजून त्याची पावडर करावी. उभे कापलेले कांदे कडकडीत तळून त्याची पूड करावी. एकत्र करून ठेवा. एका पातेल्यात अर्धी वाटी तेल घेऊन त्यामध्ये ४ चमचे आलंलसूण पेस्ट छान परतून घ्या. नंतर यात १ वाटी मालवणी मसाला घालून थोडं पाणी घाला व चांगले परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला.

      February 3, 2017


  • मनचाव सूप

    साहित्य: ५ कप चिकन स्टॉक, ४-५ बटण मशरुम्स, १ मध्यम गाजर, अर्धी भोपळी मिरची, १ छोटे टॉमॅटो, २ टे. स्पून बांबूशूट बारीक चिरून, ३ टे. स्पून कोबी बारीक चिरून, टे. स्पून किसलेले आले, १ १ टे.स्पून किसलेला लसूण, वेळ: ३५ मिनीटे २ टे. स्पून सोयासॉस, अर्धा टी स्पून मीठ, साखर, अजिनोमोटो, व मिरे पावडर प्रत्येकी १ टे. स्पून लाल तिखट १ टे. स्पून तेल ३ टे. स्पून कॉर्नफ्लोअर

    कृती: प्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घेणे. एका पातेल्यात तेल गरम करून, त्यावर लसूण, आले परता. त्यावर सर्व भाज्या घालून थोड्या परता. त्यांत तिखट व टोमॅटो घालून स्टॉक ओता. झाकण ठेऊन पाच मिनीटे मंद गॅसवर उकळत ठेवा. नंतर सोयासॉस, मीठ, अजिनोमाटो, साखर, मिरेपावडर घाला. एक उकळी आल्यावर त्यांत कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घाला. चमच्याने ढवळत राहून एक-दोन उकळ्या घ्या म्हणजे, कॉर्नफ्लोअर शिजेल. गरम गरम सूप बाऊलमध्ये घातल्यावर वरून तळलेले नूडल्स घाला.

      September 10, 2026


  • brinjal-300

    वांग्याचे लोणचे

    आले-लसूण बारीक वाटून घ्यावे. लाल मिरच्या चमचाभर व्हिनीगरमधे बारीक वाटाव्या.
    • गूळ व्हिनीगरमध्ये विरघळवून ठेवावा. वांगी धुवून पुसून ठेवावी. व त्यांचे १ सें.मी. जाड काप चिरून ठेवावे.
    • कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मोहरी व हळद घालून त्यावर आले-लसूण तांबूस होईपर्यंत परतावी.

      January 2, 2017


  • ललिका पंचमी

    नवरात्रीमध्ये ललिता पंचमीच्या दिवशी काही घरी हे घारगे आणि तांदुळाचे वडे करतात.
    काकडीचे घारगे
    साहित्य:- १) काकडीचा कीस (काकडी जून असावी), २) गूळ, मीठ, ३) तांदळाचे पीठ, ४) गोडे जिरे, हळद.

    कृती:- भोपळ्याच्या घारग्याप्रमाणे पीठ तयार करून हे घारगे करावेत. येथे फक्त भोपळ्याच्या किसाऐवजी काकडीचा कीस वापरावा. घारगे (नारळाचे)

    साहित्य – १) १ नारळाचे खोबरे, २) खोबर्याीइतकाच गूळ, ३) तांदळाचे पीठ, ४) गोड जिरे, हळद, मीठ. कृती – नारळाच्या चवात गूळ घालून त्याचा पाक तयार करावा. त्यात जिरे, मीठ व हळद वाटून घालावी व त्याचा घट्ट असा पाक झाला की खाली उतरावा व त्यात मावेल एवढेच पीठ घालावे व भिजवून ठेवावे व १ तासानंतर वडे करावेत.

    सूचना – नारळाच्या चवात गूळ, जिरे, हळद घालून मिक्सरमधून चव काढला तरी चालतो. त्यात नंतर गूळ व मीठ घालून पाक करावा व त्यात पीठ घालावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    लाल भोपळ्याचे घारगे
    साहित्य:- २ वाटया भोपळा सोलून कीस करून, १ वाटी किसलेला गूळ, तांदुळाचे पिठ, १/२ चमचा तेल, तळणासाठी तेल.
    कृती:- प्रथम एका भांडयात भोपळा उकड्ण्यासाठी ठेवावा झाकण ठेवावे भोपळा वाफेवर शिजवावा. भोपळा शिजला की त्यात गूळ घालावा व गूळ पुर्ण एकजीव झाला कि त्यात मावेल एवढे तांदळाचे पिठ घालावे. मिश्रण छान चमच्याने एकजीव करावे. आणि झाकण लावून वाफवून घ्यावे. थंड झाले की छान मळून घ्यावे. थोडेसे तेल लावावे. एका प्लास्टिक पेपर वर तेल लावून छान थापुन पुऱ्या कराव्या. गरम तेलात छान खरपुस तळून काढाव्या.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    तांदळाचे वडे
    साहित्य :- ३ वाट्या तांदूळ, ५०० ग्रॅम गूळ, ४ वेलदोडे पूड, ३ चमचे खोबऱ्याचे काप, ३ चमचे पांढरी चवळी, अर्धा चमचा हळद.
    कृती :- तांदूळ तासभर भिजत ठेवावेत. पाणी बदलून चाळणीवर तांदूळ निथळत ठेवावे. वाटल्यास फडक्यावर पसरून ठेवावे. कोरडे होऊ लागले की खलात घालून कुटून घ्यावे. हे तांदळाचे पीठ फिक्या बदामी रंगावर येईपर्यंत भाजावे. भाजून झाले की पीठ मापून घ्यावे. तितकाच गूळ मापून घेऊन बारीक चिरावा. एका पातेल्यात अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात गूळ घालावा. पातेले चुलीवर ठेवावे. एकीकडे चवळी कोरडी भाजून घ्यावी. गूळ पातळ होऊन विरघळला की त्यात कुटलेले पीठ, हळद व भाजलेली चवळी घालावी. मिश्रण घट्टसर होईपर्यंत चुलीवर ढवळावे. घट्ट झाले की खाली उतरवून त्यावर वेलचीपूड घालावी. मिश्रण निवाले की त्याचे बेताच्या आकाराचे वडे तळून ठेवावे. कुकरमध्ये चाळणीवर केळीचे (किंवा कर्दळीचे) पान धुवून ठेवावे. त्यावर हे वडे ७-८ मिनिटे वाफवावे. गार झाले की लोण्याशी खावे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      March 7, 2017


  • http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2016/12/p-929-corny-kebab.jpg

    कॉर्नी कबाब

    प्रथम उकळून घेतलेले कॉर्न जाडसर बारीक करून घ्यावे. त्यात कुस्करलेले बटाटे, पालक, भात, पनीर, कोथिंबीर, मिरची, तिखट, धने-जिरे पूड, मीरे पावडर टाकावी. ब्रेड स्लाईस मिक्सरमधून फिरवून बाजूला काढून ठेवावे.

      June 6, 2017


  • Aamrasache-modak

    आंब्याच्या रसाचे (आमरसाचे) मोदक

    आंबे फक्त सिझनमध्ये मिळतात त्यामुळे हल्ली बाजारात आमरसाचे डबे मिळतात. त्यात अवधूत ह्या नावाचा डबा घ्यावा. ताजे आंबे व डब्यातील रस ह्यामध्ये फरक असतो. परंतु त्यातील रसाचे पण मोदक चांगले होतात. सीझनमध्ये हा रस आटवून ठेवला की वर्ष-दोन वर्षे सुध्दा चांगला राहतो. मग आपल्याला केव्हाही त्याचा उपयोग करुन घेता येतो. फक्त पिठीसाखर मोदक तयार करताना मिक्स करायची.

      June 17, 2017


  • leafy-veg-300

    हिरव्या पालेभाज्या

    हिरव्या पालेभाज्या असे नुसते नाव घेतल तरी मुलांच्याच काय पण मोठ्यांचे चेहेरे पण जरा तिरकेच होतात. कोणत्याही दुसऱ्या भाजीमध्ये नसतील एवढी पोषणतत्वे या पालेभाज्यांमध्ये असतात. हिरव्या रंगामध्ये जीवनसत्त्व अ, ब, क, ई जीवनसत्त्व आढळून येतात. यात लोह, खनिजे, झिंक मुबलक प्रमाणात असल्यामुळे डॉक्टर आपल्या रोजच्या जेवणात जास्तीत जास्त पालेभाज्यांचा वापर करा असे सांगतात.

      January 24, 2017