महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
सर्वसाधारणपणे सगळ्यांकडे गणेश चतुर्थीच्या दिवशी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य असतोच असतो..
साहित्य :
२ भांडी बासमती तांदूळ पीठ, २ भांडी पाणी, चिमूटभर मीठ, १ चमचा लोणी किंवा साजूक तूप, अर्धा चमचा साखर
पुरणाचे साहित्य :
१ नारळ, पाव किलो गूळ, ५० ग्रॅम खवा (आवडीनुसार)
कृती :
पुरणासाठी असणारा नारळ थोडा भाजून घ्यावा (पाणी सुटू नये म्हणून) त्यात गूळ, खवा व १ चमचा तांदूळ पीठी घालावी. याप्रमाणे पुरण आधीच तयार करून ठेवावे. २ भांडी पाणी उकळत ठेवावे.पातेल्यातील पाण्याला अर्धवट उकळी आल्यावर त्यात लोणी, साखर घालावी. नंतर पाणी ढवळून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने एकाच बाजूने ढवळावे. झाकण ठेवून वाफ आणावी. पंचा ओला करून तयार झालेली उकड गरम असतानाच मळून घ्यावी. तयार झालेल्या उकडीची पारी करुन त्यात पुरण भरावे व मोदकाचा आकार द्यावा. असे मोदक तयार करून १५-२० मिनिटे वाफवावेत.
टीप : हळदीच्या पानात वाफवल्यास स्वाद चांगला येतो.
-- संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
September 4, 2016
नुकतीच कोजागिरी झाली आता घरोघरी सुरु झाली तयारी फराळाची.
आश्विन व कार्तिक महिन्यात आपला अग्नि प्रदिप्त झालेला असल्याने असे सर्व पदार्थ पचवण्याची शरीराची क्षमता असते. बाहेरील वातावरण थंड असल्याने भूक वाढलेली असते व शरीरासही अशा पौष्टिक पदार्थांची गरज असते. सणवारांच्या यादीमधील दिवाळी हा शेवटचा मोठा सण. दिवाळी म्हटले की नवीन कपडे, नवीन वस्तू व दागिन्यांची खरेदी आणि त्यासोबत विविध पदार्थ पोटभर खाण्याची एक संधीच. विविध पदार्थयुक्त फराळ हे महाराष्ट्रातील दिवाळीचे एक वैशिष्ट्य होय. फराळाचे पदार्थ बनवताना कारंजी, बेसन लाडू, रवा-नारळ लाडू, चंपाकळी, चकली, चिवडा, गोड शंकरपाळे, खारे शंकरपाळे, शेव, अनारसे, बर्फी ई पदार्थ बनवले जातात. आजकाल अनेकदा हे फराळाचे पदार्थ वेळे अभावी आयते मागवले जातात. पण घरी केलेल्या फराळाची मजा काही औरच दिवाळीच्या फराळाची तयारी आगोदरच करावी म्हणजे आयत्यावेळी काही गडबड होणार नाही. आपल्याला फराळाचे कोणते पदार्थ बनवायचे आहेत ते ठरवा व त्यासाठी कोणकोणते जिन्नस लागणार आहेत ह्याची अगोदरच यादी करा व त्याप्रमाणे जिन्नस आणून ठेवा. या वेळेला घरीच फराळ करायचे निश्चित करा...
उदा.
वेलचीपूड : वेलदोडे आणून तवा गरम करून वेलदोडे थोडेसे गरम करून घेवून साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. मग पूड घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी व फराळ जेव्हा बनवायचा तेव्हा वेलचीपूड वापरावी म्हणजे त्याच्या सुवास तसाच राहील.
बेसन : चण्याची डाळ आणून त्याचे डोळे असतील तर काढावे व चांगले ऊन देऊन डाळ दळून आणून बेसन घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावे.
करंजीचे सारण : नारळ खोवून करंजीचे सारण आधल्या दिवशीच बनवून ठेवावे.
चकलीची भाजणी : चकलीची भाजणी बनवून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावी.
चिवडा बनवण्यासाठी : कुठला चिवडा करणार हे आधी ठरवावे, शेंगदाणे भाजून सोलून ठेवावेत. गोटा खोबऱ्याचे पातळ काप करून ठेवावेत. चिवड्याचा मसाला बनवून ठेवावा.
पिठीसाखर : लाडू बनवण्यासाठी साखर बारीक करून ठेवावी.
ड्राय फ्रुट : काजू-बदामचे पातळ काप करून ठेवावे. लाडू बनवण्यासाठी थोडे कुटून ठेवावेत.
अनारसा : अनारसे बनवण्यासाठी आगोदरच अनारसाचे पीठ बनवून ठेवावे. पोहे, रवा, मैदा, पिठीसाखर हे ताजे आणूनच वापरावे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
April 17, 2017
साहित्य - १ पेला हरभऱ्याची डाळ, तेल, फोडणीचं साहित्य, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, २ चमचे साखर, चवीपुरतं मीठ, लिंबू, नारळ.
कृती - हरभऱ्याची डाळ रात्री पाण्यात भिजत घालावी. सकाळी पाणी काढून मिक्सरवर खरबरीत वाटावी. वाटताना त्यात २-३ हिरव्या मिरच्या घालाव्या. मिश्रण कुकरच्या भांड्यात ठेवून कुकरच्या दोन तीन शिट्ट्या कराव्यात. डाळ बाहेर काढून ताटात पसरून हातानं मोकळी करावी. कढईत २ डाव तेल घेऊन मोहरी, जिरे, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात मोकळे केलेल्या वाटलेल्या डाळीचं मिश्रण घालावं. २ चमचे साखर, चवीपुरतं मीठ घालून मिश्रण थोडं परतावं. त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालावा. मिश्रण नीट हलवून घ्यावं. वरून कोथिंबीर आणि खोवलेला नारळ घालावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
February 3, 2017
साहित्य: १ वाटी वालाची डाळ, १ मध्यम कांदा, ४ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, मुठभर कोथिंबीर, हिंग, चिमुटभर, पाव चमचा हळद, चवीपुरते मीठ
कृती: वालाची डाळ धुवून थोड्या पाण्यात एक तास भिजत घालावी. त्यात हिंग, हळद घालून चांगली शिजवावी. शिजल्यावर डाळ मोडून घ्यावी. कांदा, मिरची, जिरे व कोथिंबीर यांचे वाटण डाळीला लावावे. वाटीभर पाणी घालावे व चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित उकळवावे वरुन
कोथिंबीर घालावी.
• सौ. नीता अतुल गडकरी
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
डोशाचं पीठ उरलं असेल तर फ्रीजमध्ये ठेवताना त्यात विड्याचे पान घालून ठेवा. पीठ आंबट होत नाही.
इडली उरली तर फ्रीजमध्ये झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी एक-एक इडली पाण्यात बुडवून वाफवा. इडली मुलायम होते.
मटारदाणे उकडायला ठेवा. एक उकळी आली की, त्यात चिमूटभर हळद घालून गॅसवरुन उतरवा. ते हिरवेगार राहतात.
पालकाची पाने मिठाच्या पाण्यात भिजवून दोन मिनिटे ठेवा. मग त्याची पुरी करून फ्रीजमध्ये ठेवा. पुढील ८ दिवसांकरिता त्याचा वापर करता येतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
April 17, 2017
आपल्या जिभेचे कौतुक पुरवण्याचे काम आपण सर्वच जण करतो. आणि त्यात दाक्षिणात्य पदार्थ अतिशय उपयोगी ठरतात. ब्रेकफास्टला किंवा कधीतरी हलके अन्न म्हणून डोसा, इडली असे पदार्थ खातच असतो. यातही पौष्टीक असे दाक्षिणात्य पदार्थ आपण घरच्या घरी करु शकतो. त्यातील एक म्हणजे मिश्र डाळींच्या इडल्या. त्याचे साहित्य आणि कृती..
August 8, 2013
साहित्य : नवलकोल (अलकोल) २, हिरव्या मिरच्या ३ ते ४, शेंगदाण्याचे कूट २ चमचे भरुन, १ लिंबाचा रस, साखर, जिरे, तूप, हिंग फोडणीसाठी, खोबरे, कोथिंबीर
कृती : नवलकोलच्या (अलकालच्या) साली काढून घ्यावात व किसून घ्यावे. एका बाऊलमध्ये मीठ, साखर, दाण्याचे कूट, ओले खोबरे, लिंबाचा रस घालावे व फोडणीच्या पळीत तूप, जिरे, हिंग पालावे व वरील मिश्रणाला फोडणी द्यावी. व एकत्र करावे वरुन कोथिंबीर घालावी.
- सौ. शैला अरविंद खरे (खारकर)
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
तामिळ पद्धतीचे जेवण म्हणजे तांदुळ, विविध डाळी,शेंगा यांचा सुरेख संगम आहे. तामिळनाडूला डोसा, पोंगल ,इडली आणि सांबर ,मसालेदार पुलिओगरे, यांची भूमी समजले जाते .तामिळ लोकांना भात खूप आवडतो. दिवसातील प्रत्येक जेवणासाठी ते भाताचा वापर करतात. भाता सोबतच मसुरीची डाळ आणि शेंगाचाही वापर केला जातो. चिंच ,मिरे ,हिरवी ,लाल मिरची ह्यांचा जेवण स्वादिष्ट आणि मसालेदार करण्यासाठी वापर केला जातो. सढळ हाताने कढीपत्याचा वापर तमिळ जेवणात केला जातो मिरची आणि मसाल्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच पदार्थ पचनास सुलभ व्हावेत म्हणून दह्याचाही खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मोहरी,लसूण,जिरे आणि मसाले ह्यांचा फोडणीसाठी वापर केला जातो.नारळा चा प्रत्येक पदार्थात वापर आणि लवंग जायफळ कोशिंबीर गुलाब पाण्याचा जेवणात वापर होतो इडली डोसा आदि मेदू वडा या तिन्ही पदार्थानी भारताच्या सीमाही पार केल्या आहेत.
तामिळनाडू म्हटलं की समोर येतात ते वेगवेगळया नावाचे भात. तांदळाच्या राज्यामध्ये आपल्याला मुरुक्कू, इडिअप्पम असे तांदळाचे विविध पदार्थ पाहायला मिळतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
July 20, 2018
हिरव्या पालेभाज्या असे नुसते नाव घेतल तरी मुलांच्याच काय पण मोठ्यांचे चेहेरे पण जरा तिरकेच होतात. कोणत्याही दुसऱ्या भाजीमध्ये नसतील एवढी पोषणतत्वे या पालेभाज्यांमध्ये असतात. हिरव्या रंगामध्ये जीवनसत्त्व अ, ब, क, ई जीवनसत्त्व आढळून येतात. यात लोह, खनिजे, झिंक मुबलक प्रमाणात असल्यामुळे डॉक्टर आपल्या रोजच्या जेवणात जास्तीत जास्त पालेभाज्यांचा वापर करा असे सांगतात.
January 24, 2017
रवा म्हटलं की सामान्यत: बऱ्याच लोकांची परिसीमा ही शीरा, उपमा इतपतच असते. पण हाच रवा 'कवा कवा' असंही रूप धारण करू शकतो..
ही डिश आहे मटार आणि रव्याचे देशी मोमोज...
ते ही तेलाचा थेंबभरही वापर न करता. ही डिश काहीजणांना ठाऊक नसेल तर काहींना ठाऊक असेलही. ज्यांना ठाऊक नाहीयं त्यांच्या सेवेत हा एक छोटासा प्रयत्न. बघा जमलाय का !!
कृती :
एका बाऊलमधे वाटीदीडवाटी रवा घेऊन तो भिजेल इतपतच पाणी टाकून, मळून ५/७ मिनिटासाठी झाकून ठेवा.
मिक्सरमधे अर्धी वाटी ओले मटार, इंचभर आले, २/३ हि. मिरच्या, ३/४ लसूण पाकळ्या ग्राईंड करून घ्याव्यात. ही पेस्ट एका बाऊलमधे घेऊन त्यात मीठ, हिंग व जिरे टाकून पेस्ट एकजीव करावी. हे झाले आपले स्टफींग तयार.
नंतर रव्याचे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यावे. त्याचा लिंबाएवढा गोळा करून तो पुरीच्या आकाराचा लाटून, त्यात मटारचे स्टफींग भरावे व चारीबाजूने बंद करून हलक्या हाताने दाबून घ्यावे.
दुसरीकडे पँनमधे पाणी उकळत ठेवावे व या पाण्यात वरील स्टफींग भरलेले मोमोज अलगद सोडावेत. ४/५ मिनिटाने त्याची दुसरी बाजूही तेवढ्याच वेळेसाठी शिजवावी. मग हे मोमोज एका डिशमधे काढून मधोमध कापावेत. वरून अगदी प्रेमाने कुटलेली काळी मिरी शिंपडावी. केचअप याचा जोडीदार असेल बरं !!
आपले इंडीयन रवा मटार मोमोज मग खायला तयार..
August 29, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti