महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
आंब्याचे तुकडे करून घ्या, एका पॅनमध्ये आंबा आणि १ कप पाणी घाला. एक उकळी आणा, आणि 5-8 मिनिटे आंबा शिजू द्या. दुसऱ्या पॅनमध्ये मेथी, जिरे आणि सुक्या लाल मिरच्या, डाळ भाजून घ्या. एका प्लेट हे सगळे काढून त्यांना पूर्णपणे थंड करण्यास ठेवा.
March 14, 2017
साहित्य: १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, २ टोमॅटो, २ लहान गाजरं, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार
कृती: पालक, बटाटा, टोमॅटो, गाजरं एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला शिजवा. थंड झाल्यावर मिक्सरला वाटून मग गाळून घ्या. मीठ-मिरपूड-दूध घालून उकळी काढा.
September 1, 2018
प्रथम रवा चांगला भाजून घ्यावा. एका कढईत तेल तापवत ठेवावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, कडीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. १ लहान चमचा मीठ घालावे व कांदा चांगला शिजू द्यावा. कांदा नीट शिजला की त्यात रवा घालावा.
दुसर्या भांड्यात पाणी तापवत ठेवावे. रवा थोडावेळ कांद्याबरोबर परतावा. पाणी उकळले की भाजलेल्या रव्यात ओतावे. नीट मिक्स करावे. त्यात साखर व आवश्यकतेनुसार मीठ घालावे. एक वाफ काढावी. अशाप्रकारे तिखट मीठाचा सांजा तयार. यावर सजावटीसाठी आपण कोथिंबीर व खोवलेला नारळ घालू शकतो.
April 30, 2016
भारतीय रेसीपीज इतर कोणत्याही रेसीपीज पेक्षा कलात्मक आहेत, चविष्ट आहेत आणि आरोग्यदायी सुद्धा आहेत यात शंकाच नाही, फक्त भारतीयांना स्वतःला प्रोजेक्ट करता येत नाही इतकेच.
July 25, 2023
दाक्षिणात्य पदार्थांचा मनापासून आस्वाद घेण्यात, दाक्षिणात्यांच्या खालोखाल महाराष्ट्रीय लोकच सगळ्यात पुढे असतील असं मला नेहमी वाटतं. महाराष्ट्रात हल्ली घरोघरी इडली-सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा आदी पदार्थ नियमितपणे होत असतात. हे पदार्थ तसे करायला सोपे तर असतातच शिवाय चवदारही लागतात. त्यातीलच एक सगळ्याचाच आवडता पदार्थ म्हणजे उत्तपा.
January 11, 2017
साहित्य: एका लहान कोबीच्या चार फोडी, २ गाजरे चिरून, ४-५ टोमॅटो, ३ कांदे, १५-२० फरसबी बारीक चिरून, २ लसूण पाकळ्या, वेळ: ३० मिनिटे २ बटाटे, १ टी चीज, स्पून २ चमचे लोणी, मीठ व मिरेपूड चवीपुरते.
कृती: सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. पातेल्यात थोडे लोणी घेऊन ते गरम होताच त्यात कांदा, लसूण, गाजर घालून परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये कोबी, फरसबी, टोमॅटो, बटाटा घालावा.
साधारण पाच कप पाणी घालून चांगले शिजवून घ्यावे. पुरण यंत्रामधून किंवा मिक्सरमधून काढून गाळून घ्यावे. त्यात मीठ, मिरेपूड घालावी. थोडा वेळ उकळवावे. चिरलेली कोथिंबीर व चीज पसरवावे व वेळेवर गरमच वाढावे.
September 10, 2026
साहित्य: ७-८ मध्यम गाजराचे काप, ३ मध्यम बारीक चिरलेले कांदे, ४ कप व्हेज स्टॉक किंवा पाणी, २ कप दूध, २ टे. स्पून लोणी, अर्धा कप घोटलेली मलई, १ टी स्पून कॉर्नफ्लोअर, १ टे.
स्पून किसलेले चीज, वेळ: ३० मिनिटे मीठ, मिरेपूड चवीप्रमाणे.
कृती: पातेल्यात प्रथम लोणी वितळवून घ्यावे. त्यात गाजर आणि चिरलेला कांदा चांगले परता. थोडे मऊ करून घ्यावे. त्यात व्हेज स्टॉक घालावा. झाकण ठेऊन मंद गॅसवर शिजवावे. नंतर त्यातील थोडे गाजर काढून घ्या व उरलेले मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून उकळत ठेवा. या मिश्रणात दूध आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट करुन घाला. मीठ, मिरे पावडर घाला व चमच्याने सूप चांगले ढवळत सूप चांगले उकळवा. गरम गरम सूप बाऊलमध्ये ओतावे. त्यावर किसलेले चीज घाला. त्यावर किसलेले चीज घाला.
September 10, 2026
प्रथम बटाटे व मक्याचा कोवळ्या कणसाचे दाणे उकडून घ्या. उकडलेल्या कणसाच्या दाण्यात आले व हिरवी मिरची पेस्ट, मीठ, साखर घालून सुकी भाजी परतून घ्या.
June 7, 2017
गेले दोन दिवस पिठलं हा विषय झाला,त्यामुळे त्या पाठोपाठ भाकरी हा विषय लगेचच आला पाहिजे. भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ आहे.
March 7, 2017
साहित्य :
१ वाटी मध्यम जाड रवा, पाऊण वाटी साखर, १ डाव तूप, १ अष्टमांश चमचा पीठ, १ वाटी उकळीचे पाणी, २ वेलदोड्याची पूड.
कृती :
प्रथम पातेल्यात तूप घालून गॅसवर ठेवावे. तूप तापले की त्यात रवा घालून मंदाग्नीवर चांगला भाजावा. त्यात मीठ घालावे. रवा भाजल्याचा चांगला वास येईल व भाजताना हाताला हलके वाटू लागेल.
नंतर त्यात उकळीचे पाणी घालून उलथन्याने चांगले ढवळावे. सर्व पाणी आटले की पुन्हा एकदा ढवळून साखर घालावी. सर्व मिश्रण जरा पातळ झाल्यासारखे होईल; पण ढवळत राहावे. जर वेळाने मिश्रण घट्ट होईल.
नंतर त्यात वेलदोड्यांची पूड घालून उतरवावे. कडेने १ चमचा साजूक तूप सोडावे.
September 8, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti