साहित्य: १ वाटी कणीक, १ वाटी साजुक तुप, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी पाणी, थोडी वेलची पुड
कृती: प्रथम कढईमध्ये अर्धीवाटी तुप घालून कणीक चांगली खरपूस भाजून घेणे. कणीक भाजून झाल्यानंतर त्यात पाऊणवाटी साखर व पाऊण वाटी गरमपाणी घालून मिश्रण एकजीव करून त्यावर झाकण ठेवावे. एक चांगली वाफ आल्यावर त्यावर अर्धीवाटी तुप सोडावे व चांगले ढवळून घ्यावे व वरुन वेलची पुड घालावी असा हा लज्जतदार शिरा खाण्यास तयार झाला !
टीप: हा शिरा पौष्टीक आहे व झटपट तयार होतो. मांसाहारी पदार्थाबरोबरही खायला छान लागतो.
- सौ. शुभांगी संजय दिये
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन