(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • chocolate-smoothie

    चॉकलेट स्मूदी

    खजूर आणि काजु(बदाम) एक तासभर पाण्यात भिजत ठेवावे. तासाने केळ, भिजवलेले काजू, खजूर, कोको पावडर, कॉफी, इच्छा असेल तर बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून बारीक करावे. काजु नीट बारीक होतील इतपत बारीक करावे. गरजेप्रमाणे पातळ करण्यासाठी खजूर भिजवलेले पाणी वापरावे.

      February 28, 2017


  • सुरणपाक

    सुरणपाक करण्यासाठी सुरणाच्या फोडी कुकरमध्ये शिजवाव्यात. त्यांचे पाणी निथळू द्यावे. ते बाजूला काढून त्यातच साखरेचा गोळीबंद पाक करावा. आत त्यात फोडी टाकून ढवळावे. फोडी मोडू देऊ नयेत. सगळ्या फोडींना वरून साखरेचा थर बसल्याची खात्री करावी व मग गॅस बंद करावा. पोळीबरोबर हा सुरणपाक छान लागतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 23, 2017


  • http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2017/09/p-2854-Kaju-Paneer-Barfi-300.jpg

    काजू – पनीर बर्फी

    साहित्य : २०० ग्रॅम काजू , ३०० ग्रॅम पनीर , २०० ग्रॅम साखर, १ कप दूध, ३ चमचे तूप, १/२ चमचे वेलची पावडर , २ चमचे टुकडे केलेले पिस्ते.

    कृती :

    १) काजू पनीर बर्फी बनवण्यासाठी काजू दोन तास दूधात भिजवून ठेवा.
    २) दोन तासानंतर दूध आणि काजू मिक्सर मध्ये बारीक करुन,एकत्र करुन त्याची पेस्ट करुन घ्या.
    ३) या पेस्टमध्ये साखर व बारीक केलेले पनीर एकत्र करुन मिक्सर मध्ये पुन्हा एकदा एकत्र करुन त्याची बारीक पेस्ट करुन घ्या.
    ४) आता एक नॉनस्टिक पॅन गरम करुन घ्या व त्यात दोन चमचे तूप घाला. या पॅनमध्ये काजू, साखर, पनीर यांची पेस्ट घाला.
    ५) आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. आता तुमचे मिश्रण तय्यार आहे.
    ६) आता या मिश्रणात वेलची पावडर घालून गॅस बंद करा व टुकडे केलेले पिस्ते घाला.
    ७) दोन ते तीन तासात बर्फी तयार होईल. तयार झालेल्या बर्फीचे तुम्हाला हवे तसे काप करुन सर्व्ह करा.
    ८) तुमची स्वादिष्ट काजू पनीर बर्फी तयार आहे.

      August 23, 2018


  • p-128-kanheri

    कण्हेरी

    साहित्य:

    २ वाट्या - जुने, सुवासिक आंबेमोहोर तांदूळ
    थोडे तूप
    मीठ
    अर्धा टी स्पून - जिरे पूड
    २-३ मिरी दाणे

    कृती:

    तांदूळ स्वच्छ धुवुन घ्या. फडक्यावर पसरा व सावलीत वाळवत ठेवा. वाळल्यानंतर अर्धवट कुटा. एका पातेल्यात तूप गरम करा. त्यात मिरी दाणे घालून तांदूळ, मीठ, जिरे पूड व पाणी घालून उकळी काढा. मऊसर शिजवा.

    आजारी व्यक्तीसाठी कण्हेरी हे उत्तम व पचायला हलके अन्न आहे.

      July 20, 2018


  • मिक्स परांठा- गाजर+ वाटाणे+ चुकुंदर (बीट)

    हिवाळ्यात भाजी बाजारात गाजर आणि वाटाणे भरपूर असतात. गाजर आणि वाटण्याची कोरडी भाजी मस्तच लागते. पण गेल्या रविवारी सौ. ने विचारले. गाजर, मटर (वाटाणे) घालून उपमा करू का? मी म्हणालो, उपम्याच्या जागी यांचे परांठे केले तर कसे लागतील. सौ.ला ही कल्पना आवडली.

    साहित्य: गाजर २५० ग्रम, मटार (वाटाणे) १ वाटी, चुकुंदर(बीट) १ मोठे. , हळद, हिरवी मिरची २, लसूण, अदरक, तिखट २ चमचे (चवीनुसार), गरम मसाला (१ चमचा), कसूरी मेथी (२ चमचे) शिवाय कणिक (किती परांठे बनवायचे, याचा अंदाज घेऊन (आम्ही दिल्लीकर परांठ्यात भरपूर मिश्रण भरतो, मुंबईकर बहुतेक कमी भरतात) मळून घ्यावी. शुद्ध गायीचे तूप किंवा लोणी पराठ्यांवर लावण्या साठी. अदरक, लसूण, हिरवी मिरचीचे पेस्ट करून घ्यावे. मीठ चवीनुसार.

      March 3, 2015


  • आजचा विषय मायक्रोवेव्ह ओव्हन

    दिवाळीला, काय नवीन खरेदी करायची हा प्रश्न पडतो. परवा एअर फ्रायर झाला आज या दिवाळीला मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करणार असल्यास आज मायक्रोवेव्ह ओव्हनची माहिती व काही कृती.
    आजकाल घरोघरी मायक्रोवेव्ह असतो, पण त्याचा वापर अन्नपदार्थ गरम करण्यापुरताच केला जातो. खरंतर आपले रोजचे कितीतरी अन्नपदार्थ मायक्रोवेव्हमध्ये करता येतात. मायक्रोवेव्ह ओव्हन वापरून हेच पदार्थ अगदी सहजपणे करता येतात. फारसे कष्ट न करता हे पदार्थ उत्तम होतात.आपल्याकडे आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे तळलेले पदार्थ. आपण तळलेले पदार्थ खूप मोठय़ा प्रमाणात खातो. ओव्हनमुळे तेलाचा खूप कमी वापर होतो, वर पदार्थाच्या चवीमध्ये कुठेही फरक पडत नाही. तेल-तूप खूप कमी वापरल्यामुळे प्रकृती उत्तम राहते. मायक्रोवेव्ह ओव्हनचा शोध १९४६ मध्ये डॉ. परसी स्पेन्सर यांनी लावला.गृहिणींना मायक्रोवेव्ह ओव्हनबद्दल बऱ्याच शंका असतात.शिजणाऱ्या पदार्थातील पोषणमूल्ये तशीच राहतात का ? हो.
    मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मेटल का वापरू नये?
    मेटलमधून करंट जातो. त्यामुळे भांडय़ातील पदार्थाना उष्णता मिळणार नाही.मायक्रोवेव्हिंगने तयार केलेले पदार्थ शरीराला अपायकारक असतात का?
    नाही.
    मायक्रोवेव्ह कूकिंगचे फायदे
    शिजायला खूप कमी वेळ लागतो.पदार्थातील पोषणमूल्ये तशीच राहतात.पॉवर कमीजास्त वापरण्याच्या पद्धतीमुळे वीज कमी लागते.पदार्थ आधी शिजवून ठेवून आयत्या वेळी गरम करून खायला घेऊ शकता.तेल-तूप कमी वापरले जाते.कुरडया, पापडय़ा न तळताही यक्रोवेव्हमध्ये चांगल्या फुलतात.कुरकुरीत होतात.मायक्रोवेव्हमध्ये वापरावी लागणारी भांडी मायक्रोवेव्ह प्रूफ काचेची, प्लास्टिकची किंवा सिरॅमिक भांडी वापरावी. प्लास्टिकची भांडी री-हीटिंगला वापरावी.
    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ: लोकप्रभा

    मायक्रोवेव्ह वापरण्याच्या टिप्स : १०० टक्के पॉवरवर पदार्थ री-हीट करू नका.पॉवर ५० टक्क्य़ांवर आणून पदार्थ दोन-तीन मिनिटं री-हिट करा. पदार्थ अगदी ताजा बनविल्यासारखा दिसतो. कुठलाही पदार्थ री-हीटिंग करताना पदार्थावर स्प्रिंकलरने पाणी शिंपडून री-हीट करा. त्यामुळे पदार्थ ताजा वाटतो. उदा. शिजवलेला भात, तयार भाजी, कुठलीही रस्सा भाजी व कुठलाही मटणाचा रस्सा, शेंगदाणे भाजण्यासाठी शेंगदाण्यांवर थोडे पाणी शिंपडून जर अर्धा किलो शेंगदाणे असतील तर १०० टक्क्य़ांवर २ मिनिटे शेंगदाणे भाजा. परत मायक्रोवेव्हचे दार
    उघडून शेंगदाणे चमचाने हलवून परत १०० टक्के पॉवर एक मिनिट द्या व बंद मायक्रोवेव्हमध्ये थोडा वेळ दाणे राहू द्या.दही करायचे असेल तर अर्धा लिटर दूध १०० टक्के पॉवरवर एक मिनिट गरम करून त्याला विरजण लावा. एक ते दीड तासांत दही तयार होते. मायक्रोवेव्हमध्ये फोडणी करू नका.
    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ: लोकप्रभा

    मायक्रोवेव्ह मध्ये केलेले काही पदार्थ.
    कांदेपोहे
    साहित्य : एक वाटी भिजवलेले पोहे, एक टीस्पून तेलाची फोडणी (तेलाची फोडणी- मोहरी, जिरे, मिरची व कढीपत्ता घालून तयार करून ठेवा), एक कांदा चिरलेला, एक टीस्पून लिंबाचा रस, साखर, मीठ, चिरलेली कोथिंबीर.
    कृती : काचेच्या पसरट भांडय़ात चिरलेला कांदा घेऊन त्यावर फोडणी घालून हलवा. झाकून १०० टक्के पॉवरवर ३ मिनिटे ठेवा. बाहेर काढून त्यात पोहे, मीठ, साखर, लिंबूरस आणि कोथिंबीर घालून चांगले मिसळा.
    झाकण ठेवून १०० टक्के पॉवरवर दीड मिनिटे ठेवा. तीन-चार मिनिटांनी बाहेर काढून, हलवून पुन्हा थोडी कोथिंबीर पाहिजे असल्यास घाला. पोहे खायला तयार.
    टिप्स : १) फोडणीचे प्रमाण वाढवू शकतो. / २) एक वाटी पोहे या प्रमाणात पॉवरची मिनिटे दिली आहेत. पोह्यचे प्रमाण वाढल्यावर मिनिटेसुद्धा वाढतील.
    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    साबुदाणा खिचडी
    साहित्य : एक वाटी भिजवलेला साबुदाणा, दोन चमचे तुपाची फोडणी (जिरे, मिरचीचे तुकडे घालून फोडणी गॅसवर करून घेणे), अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट, मीठ, साखर, लिंबूरस, ओले खोबरे, कोथिंबीर.
    कृती : सर्व गोष्टी एकत्र करून चांगल्या मिसळा. झाकण ठेवा. १०० टक्के पॉवरवर एक ते दीड मिनिटे ठेवा. दोन-तीन मिनिटांनी बाहेर काढा. हलवून हे खायला द्या. टिप्स : १) गार झालेली खिचडी री-हीट करताना पाणी किंवा दुधाचा हबका मारून १ मिनीट १०० टक्के पॉवरवर गरम करा. २) खिचडी करताना जास्त शिजवू नका, साबुदाणा चिवट होतो.३) खिचडीचे सर्व कच्चे साहित्य एकत्र करून हे मिश्रण ३-४ दिवस फ्रिजमध्ये राहते. पाहिजे तेव्हा फोडणी घालून वरीलप्रमाणे ताजी खिचडी तयार करू शकता.
    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

      July 23, 2018


  • steamed-modak1-300

    गणपतीसाठी मोदक प्रिय म्हणूनच नैवद्याला मोदक करतात का

    गणपतीसाठी मोदक प्रिय म्हणूनच नैवद्याला मोदक करतात का?..उत्तर : नाही.. यामागे फक्त गणेशाला प्रिय एवढेच त्याचे महत्त्व नाही. भाद्रपद महिना हा वास्तविक पावसाळ्याचा जोर संपत येत शरद ऋतूतील ऊष्म्याकडे घेऊन जाणारा काळ.

      February 3, 2017


  • अनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र!

    काही ठराविक किंमतीत अनलिमिटेड बुफे लंच/डिनर हा प्रकार तुम्ही कित्येकदा अनुभवला असेल. जेवणाचा प्रकार (शाकाहारी, मांसाहारी इ.) कोणता आहे यावरून बुफेच्या किंमती थोड्याशा बदलतात, पण जास्त फरक नसतो. प्रत्येक बुफे हा अर्थशास्त्रीय भाषेत surplus साठीच छोटेखानी युद्ध असते. Consumer Surplus जितका कमी करता येईल तितका हॉटेलचा फायदा असतो; आणि मोजक्या पैशात जितके जास्त अन्न खाता येईल (थोडक्यात consumer surplus वाढवता येईल) तितका ग्राहकाचा फायदा असतो. आणि या सगळ्या अर्थशास्त्रीय युद्धाला वैद्यकाच्या काही नियमांची जोड असते. कसे ते पाहूया!

      June 22, 2026


  • निनांव

    साहित्य : चार वाटी डाळीचे पीठ, दोन चमचे गव्हाचे पीठ, ३ वाटी नारळाचे दूध, दोन चमचे साय, ४ वाटी गूळ, वेलवी जायफळ पूड, साखर ४ चमचे, ४ चमचे तूप, चिमूटभर मीठ

    कृती : प्रथम जाड बुडाच्या भांड्यांत चार चमचे तूप घालून तूप तापल्यावर त्यात डाळीचे पीठ व गव्हाचे पीठ घालून भाजून घ्यावे व थंड करावे. नारळाचे दूध काढावे व थंड झालेल्या पीठात नारळाचे दूध व चिमूटभर मीठ घालावे. साखर घालावी, गुळ किसून घ्यावा व पीठात घालून मिक्स करणे, हे मिश्रण मिक्सरमधून काढावे. म्हणजे पिठात गुठळ्या राहात नाही. त्यांत वेलची, जायफळ पूड घालावी व गॅसवर भांडे ठेवावे व सतत ढवळत रहावे. गुठळी होता कामा नये. कालण्याला जड लागले की भांड्याखाली जाड तवा ठेवावा त्यावर भांडे ठेवावे. त्यावर (मिश्रणावर) सर्व बाजूने साजूक तूप सोडावे. वरती घट्ट झाकण ठेवावे. झाकणावर छोटा खल किंवा वरवंटा ठेवावा. चांगले होऊन द्यावे. कालथा घालून पाहावा. कालथ्याला मिश्रण चिकटत नाही हेपाहणे. वरती पीठाला तकतकी येते व भांड्याच्या बाजूने सुटले की निनांव तयार झाले. व झाल्यावर त्याच्या जाड वड्या पाडाव्यात.

    - सौ. प्रिती अमित मेढेकर

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • फळापासून विविध पेये – १

    फळांपासून तयार केल्या जाणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये पेयांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा पेयांचे आहारमूल्यसुध्दा चांगले असते. फळांच्या रसापासून सरबते, स्क्वॅश, सिरप, कॉर्डियल, भुकटी इत्यादी वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात.

      October 25, 2015