महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
मिनी ऑमलेटस् – Recipe
September 11, 2026
उडदाच्या डाळीचा रवा १ वाटी, पालकाची पेस्ट अर्धीवाटी, मीठ चवीनुसार, सोडा १ चमचा, कोथिंबिरीची पेस्ट पाव वाटी, ते तळायला, घोटलेले घट्ट दही २ वाटय़ा, चाट मसाला १ चमचा.
March 19, 2017
साहित्य - एक वाटी मटार, दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, मिरच्या आले लसूण क्रश करून प्रत्येकी १ चमचा, फक्त आले पेस्ट अर्धा चमचा, धने, जिऱ्याची पूड प्रत्येकी एक चमचा, बडिशेप पूड पाव चमचा. लिंबू साखर, मीठ तळण्यासाठी तेल, एक ते दीड वाटी मैदा - मीठ व दोन मोठे चमचे तेल घालून कणकेप्रमाणे भिजवून घ्यावा.
कृती - प्रथम मटार उकडून व कुस्करून त्यातच उकडलेला बटाटा कुस्करून घाला. तेल गरम असताना प्रथम आले लसूण मिरची पेस्ट व मग मटार व बटाटे घाला. नंतर मीठ, धने - जिरे पूड, पाव चमचा गरम मसाला, बडिशेप पूड, साखर चिमूटभर व मीठ व लिंबू पिळून छान सारण करून घ्या.
नंतर भिजवलेल्या कणकेची लिंबाएवढी पोळी करून घ्या. त्याच्या तीन ते चार पट्ट्या काढा (सुरीने) प्रत्येक पट्टीवर त्रिकोणी खणप्रमाणे आकार द्या. सामोसाचा आकार द्या. त्यात सारण भरून सामोसा नीट बंद करून घ्या व कढईत तेल घालून त्यात सामोसे गुलाबी रंगावर तळून घ्या. चिंचेच्या आंबट-गोड चटणीबरोबर व हिरव्या चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करा. प्रयत्नाने सामोशाचा आकार छान येतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
December 27, 2016
साहित्य :- १ कप बटाटे :- उकडून, साले काढून आणि फोडी करुन, १/२ कप उकडलेले कॉर्न (मका दाणे), १/२ कप डाळिंबाचे दाणे, १/२ कप बारीक कापलेल्या सफरचंदाच्या फोडी, १/२ कप बारीक कापलेल्या संत्र्याच्या फोडी, १/४ कप उकडलेले शेंगदाणे, १/४ कप किसलेले गाजर, २ कप कुरमुरे, १ कप शेव, १/२ कप खजूर, चिंचेची चटणी, २ टेबल स्पून हिरवी चटणी, मीठ चवीनुसार.
कृती :- वरील सर्व पदार्थ एकत्र व्यवस्थित कालवून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
December 6, 2016
बटाटे उकडून घ्या. ते कुस्करून घ्या, ताजा कुटलेला गरम मसाला, चवीप्रमाणे आलं, लसूण, मिरची यांचे एकजीव मिश्रण करा. हे मिश्रण कुस्करलेल्या बटाटयांत चांगले मिसळा. एक चवदार व एकजीव मिश्रण तयार होईल याची काळजी घ्या. वेगवेगळया आकाराचे पॅटिसचे साचे बाजारात मिळतात. शंकरपाळी, बदाम यासारखा आकार या मिश्रणाला द्या. पॅटिसचा साचा नसेल तर घरी देखील आपण निरनिराळे आकार देऊ शकतो. मिश्रणाला आकार दिल्यावर सुक्या पावाचा कुस्करा करा. त्यात थोडा रवा देखील मिसळला तरी चालेल किंवा आवडीप्रमाणे रव्याचाच लेप कच्च्या पॅटिसला बाहेरून द्या.
March 7, 2017
सर्व ऋतूंत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना सर्वाधिक काय खायला आवडते, असा प्रश्नइ जर विचारला, तर त्याचे एकच उत्तर मिळेल आणि ते म्हणजे आइस्क्रीम व कुल्फी. कुल्फी हा पदार्थच मुळी असा आहे की भारतात कोणत्याही भाषेत, कुठल्याही व्यक्तीसाठी प्रियच आहे. थंडगार, गोड, मजेदार, चविष्ट, वेगवेगळ्या अशा कुल्फीचा उल्लेख केल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहात नाही. त्यात जर उन्हाळ्याचे दिवस असतील, तर काही विचारूच नका. हल्ली कुल्फी खाण्यासाठी आता कोणी खास उन्हाळ्याचीच वाट पाहात नाही. बाराही महिने अगदी थंडी-पावसातसुद्धा आइस्क्रीमची चव चाखली जाते.
ड्राय फ्रूट्स कुल्फी
साहित्य : एक लीटर दूध, १०-१२ काजू पाकळ्या, १०-१२ पिस्ते, १०-१२ बदामाचे काप,१०-१२ बेदाणे, २-३ सुक्या अंजिर, २-३ खजूर,७-८ केशराच्या काड्या,एक चमचा विलायची पावडर, एक कप कंडेन्स मिल्क ,एक वाटी खवा,अर्धी वाटी फ्रेश क्रीम, दोन टेबलस्पून साखर,चिमूटभर मीठ,एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर.
कृती : सुके अंजीर व खजूर पाण्यात भिजत घालून ठेवा. एक तासानंतर खजूर व अंजिराचे छोटे छोटे तुकडे करून घ्या व पेपर नॅपकिनवर पसरून टाकून कोरडे करून घ्या. कॉर्नफ्लोर अर्धी वाटी थंड पाण्यात मिसळून एका बाजूला ठेवा. दूध १५-२० मिनिटे उकळून घ्या. उकळत असतांना एकसारखे ढवळत रहा. मग त्यात कंडेन्स मिल्क व खवा घालून चांगले ढवळून मिक्स करून घ्या. नंतर त्यात कॉर्नफ्लोर घातलेले थंड पाणी घालून एक सारखे ढवळत राहून पुन्हा उकळी येईस्तोवर गरम करून घ्या. उकळी येईल असे वाटताच त्यात फ्रेश क्रीम घालून ३-४ मिनिटे उकळून घ्या. आता त्यात विलायची पावडर,केशर,खजूर व अंजिराचे तुकडे,बेदाणे घाला व मिक्स करून घेऊन दोन मिनिटांनी गॅस बंद करा. गॅसवरून उतरून घेऊन जरासे गार झाल्यावर त्यात चिमूटभर मीठ घालून रुम टेंपरेचरला थंड करून घ्या. मग त्यात बदाम,काजू व पिस्ते यांचे काप घाला व मिसळून घ्या. हे मिश्रण १०-१२ कुल्फी मोल्ड्समध्ये ओता. वर पुन्हा थोडे ड्राय फ्रूट्सचे तुकडे घालून झाकण लावून कुल्फी मोल्ड्स स्टँडवर ठेवून सेट होण्यासाठी ८-१० तास डिपफ्रिजमध्ये ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तिरंगी कुल्फी
साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धा लहान चमचा केशर, दहा-बारा भिजवलेले पिस्ते वाटून, पंधरा-वीस कापलेले पिस्ते.
कृती : दूध उकळून निम्मं झाल्यावर कॉर्नफ्लोअर, साखर व वेलची पूड टाकून उकळा. उकळी आल्यावर ढवळत चार-पाच मिनिटं शिजवा. याचे तीन भाग करा. एकाच पाण्यात विरघळलेलं केशर, एकात पिस्त्यांची पेस्ट व चिरलेले पिस्ते टाका व एक भाग सफेदच राहू द्या. कुल्फीच्या साच्यात खाली पिवळ्या रंगाच्या दुधाचा एक भाग टाका. तो थोडा घट्ट झाल्यावर त्यावर सफेद दुधाचा भाग व तो भाग घट्ट झाल्यावर पिस्ता टाकलेल्या दुधाचा हिरवा भाग टाकून फ्रीजरमध्ये सेट करून द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चॉकलेट चिप्स कुल्फी
साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, अर्धा प्याला चॉकलेटचे कापलेले तुकडे, अर्धा प्याला चॉकलेट सॉससाठी, एक मोठा चमचा प्रत्येकी लोणी, कॉर्नफ्लोअर व कोको पावडर, दोन मोठे चमचे साखर, अर्धा प्याला दूध.
कृती : सॉस बनवण्यासाठी लोणी गरम करा. त्यात कॉर्नफ्लोअर व कोको पावडर मिसळा. थोडं परतून दूध टाका आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. साखर टाकून थंड करा. दूध निम्मं होईपर्यंत उकळा. त्यात साखर व कॉर्नफ्लोअर मिसळून घट्ट होऊ द्या. थंड झाल्यावर चॉकलेटचे तुकडे टाका आणि साच्यात टाकून सेट करा. चॉकलेट सॉस टाकून खायला द्या. हवं तर चॉकलेटचा कीस टाकून सजवू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काजू बदाम कुल्फी
साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा हिरव्या वेलचीची पूड, प्रत्येकी वीस चिरलेले काजू व बदाम.
कृती : दूध घट्ट होईपर्यंत उकळा. निम्मं झालं की त्यात साखर, वेलची व कॉर्नफ्लोअर दोन चमचे पाण्यात विरघळून दुधात टाका. ढवळत उकळी येईपर्यंत शिजवा. मग मंद आचेवर 3-4 मिनिटं ढवळत शिजवा. थोडं थंड होऊ द्या. आता कुल्फीच्या साच्यात बदाम व काजूसह भरा. फ्रीजरमध्ये आठ-दहा तास ठेवा आणि सेट होऊ द्या. प्लेटमध्ये काढून थोडे आणखी बदाम व काजूने सजवून सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
जेली कुल्फी
साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धे पाकीट लाल रंगाची जेली.
कृती : जेली गरम पाण्यात घोळवून फ्रीजरमध्ये सेट करून घ्या व तुकडे कापा. थोडी जेली बाहेरच
ठेवा. दूध उकळून निम्म झाल्यावर साखर व कॉर्नफ्लोअर टाका. उकळी आल्यावर चार-पाच मिनिटं शिजवा. थंड झाल्यावर जेलीचे तुकडे मिसळा. साचे फ्रीजरमध्ये थंड करून त्यात विरघळलेली जेली टाकून सेट करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ताज्या फळांची कुल्फी
साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, चिमूटभर दालचिनी पूड, एक संत्रं, एक सफरचंद, वीस चिरलेली हिरवी द्राक्षं.
कृती : दूध उकळून निम्मं झाल्यावर पाण्यात घोळवून कॉर्नफ्लोअर, साखर व दालचिनी टाका. उकळी आल्यावर ढवळत चार-पाच मिनिटं शिजवा. थंड झाल्यावर फळं मिसळा आणि साच्यात सेट करा. संत्रं व सफरचंदासह सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 2, 2017
साहित्य :- अडीच वाट्या मैदा, अडीच वाट्या रवा, पाच चमचे तुपाचे मोहन, चिमूटभर मीठ, बर्फाचे गार पाणी, तळण्यासाठी तूप.
साट्यासाठी :- चार चमचे तूप चांगले फेसून त्यात तीन चमचे मैदा, तांदळाची पिठी फेटून मिश्रण हलके बनवावे.
पाकासाठी :- तीन वाट्या साखरेत पाऊण वाटी पाणी घालून पक्का पाक बनवावा.
कृती :- मैदा व मीठ चाळून घ्यावे. तूप पातळ करून मैद्याला नीट चोळून घ्यावे. त्यात चाळलेला रवा मिसळावा. बर्फाच्या गार पाण्याने पीठ भिजवून घ्यावे. तीन-चार तास पीठ झाकून ठेवावे. समप्रमाणात गोळे बनवून पोळ्या लाटाव्यात. पहिल्या पोळीला साटा लावावा. दुसरीने झाकून तिला साटा लावावा व घट्ट रोल बनवावा. त्याचे एक सेंटिमीटर जाडीचे तुकडे कापून डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवावेत. मैद्यावर चपटे, चौकोनी लाटावेत. गरम तुपात अलगद सोडून सोनेरी रंगावर तळावे. मग हे चिरोटे पाकात घालून ठेवावेत. दुसरा घाणा तयार झाल्यावर पहिले चिरोटे पाकातून बाहेर काढून ठेवावेत. आवडत असल्यास वरून काजू-पिस्त्याचा चुरा भुरभुरावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मसाला चिरोटे
साहित्य:- तीन वाट्या मैदा, पाव वाटी तुपाचे मोहन, दोन चमचा जिरेपूड, एक चमचा मिरेपूड, मीठ चवीनुसार, तूप.
साट्यासाठी:- अर्धी वाटी तूप फेसून त्यात दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालून हलके मिश्रण तयार करावे.
कृती:- मैदा व मीठ चाळून घ्यावे. त्यात जिरे व मिरेपूड मिसळावी. तुपाचे मोहन घालून मिश्रण नीट मिसळून करून पाण्याने पिठाचा गोळा मऊसर भिजवून घ्यावा. त्याचे समप्रमाणात गोळे बनवून घ्यावेत व पोळ्या बनवाव्या. पहिली पोळी लाटून त्यावर साटा पसरावा. त्यावर दुसरी पोळी ठेवून तिच्यावर साटा लावावा. दोन्ही पोळ्यांचा घट्ट रोल करावा. त्याचे दीड सेंटिमीटरचे तुकडे कापून डब्यात फ्रिजमध्ये ठेवावेत. एक तासानंतर त्याचे फुलाच्या आकारात म्हणजे कापलेला भाग वर घेऊन चिरोटे लाटावे. गरम तुपात अलगद सोडावे. तूप उडवत उडवत पाकळ्या मोकळ्या करून चिरोटे एका बाजूने सोनेरी झाले की उलटून दुसरी बाजू तळावी. वर थोडा चाट मसाला किंवा आमचूर पावडर भुरभुरावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
अननसाचे चिरोटे
साहित्य:- १ वाटी मैदा, १ वाटी बारीक रवा, तळण्यासाठी तूप, साखर, साटय़ासाठी तांदळाचे पीठ, अननसाचे तुकडे, दूध.
कृती:- रवा व मैदा परातीत घेऊन त्याला चोळून चोळून तूप लावावे. प्रत्येक कणाला तूप व्यवस्थित लागले पाहिजे. किंचित मीठ घालून रवा व मैदा घट्टसर भिजवावा व तासभर ओल्या मलमलच्या कपडय़ात गुंडाळून झाकून ठेवावा. पिठाचा गोळा बाहेर काढला की चांगला तिवावा किंवा बत्त्याने कुटावा व मुलायम करून घ्यावा. वाडग्यात मैदा किंवा तांदूळ पीठ घेऊन त्यात तूप घालून चांगले फेसाळ व साटा करून घ्यावा. पातेल्यात साखर घेऊन ती बुडेल इतके पाणी घालावे. त्या अगोदर अननसाचे बारीक तुकडे करून ठेवावे व ते पाकात घालावे. स्वादिष्ट पाक तयार होईल. पिठाची पोळी लाटून मध्ये साटेा लावून एकावर एक दोन पोळ्या ठेवाव्या व गुंडाळी करून त्याचे काप काढावेत व ते हलक्या हाताने चौकोनी लाटावे व तुपात मंद आचेवर तळावेत. चांगले पदर सुटतात. ते गरम असतानाच गार पाकात टाकावेत. दुसरे तळले की पहिले काढून डीशमध्ये ठेवावेत.
टिप्स:- रवा व मैदा दूधात भिजवावा किंवा पाण्यात, चिरोटय़ावर अगदी बारीक बारीक तुकडे वर यायला हवेत. संत्रे, टोमॅटो, डाळिंबाचा रस किंवा रोझ सिरपने लाल रंग येतो, पाकात गुलकंद टाकला तर गुलाबाचा टाकावा, पाकात लिंबूरस घालू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आयुर्वेदामधील चिरोटेची कृती
गोधूमधूमसी चाल्य घृतेनाक्ताक जलेन च ।
यित्वा तु तस्याश्चृ ग्राह्यं पूगप्रमाणकम् ।।
गोलकं वेल्लयित्वा तु तस्य कुर्याच्च पोलिकाम् ।
द्वितीया च तृतीया च कृत्वा स्थाप्यास्तथोपरि ।।
एकां गृहीत्वा तस्यां तु घृतं दत्वा द्वितीयकाम् ।
तस्याश्चोतपरि संस्थाय एवं स्थाप्या तृतीयका ।।
द्वयंगुलान् खण्डकान् कृत्वा वेल्लयित्वा घृतेपचेत् ।ते घृते पाचिता नाम्ना चिरोटे इति विश्रुताः ।।
गव्हाचे अगदी बारीक पीठ घ्यावे व त्यात तूप घालून चोळावे. नंतर पाणी घालून मळून कुटून कुटून मऊ गोळा करावा. त्याची सुपारीएवढी गोळी करून कागदासारखी पातळ पोळी लाटावी. अशा एकूण तीन पोळ्या कराव्या. पहिल्या पोळीवर तूप लावून त्यावर दुसरी पोळी ठेवावी. दुसऱ्या पोळीवर तूप लावून त्यावर तिसरी पोळी ठेवावी. तिसऱ्या पोळीलाही वरून तूप लावावे. हे सर्व दुमडून पट्टी तयार करावी. या पट्टीचे दोन बोट जाडीचे तुकडे कापावेत. ते पुन्हा हलक्याू हाताने लाटावेत. पूर्वीप्रमाणे या पुऱ्या तूप लावून एकावर एक ठेवून परत हलक्याा हाताने लाटून चौकोनी आकाराचा चिरोटा करून तुपात तळून साखरेत घोळावा व खावा.
ते तु शर्करया चाद्या वृष्या बल्यास्तु शुक्रलाः ।गुरवः पित्तवातघ्ना श्चो्क्ताा पाकविशारदैः ।।
चिरोटे शुक्रधातूसाठी पोषक असतात, ताकद वाढवितात, पित्त-वातदोष शमवतात, पचायला मात्र थोडे जड असतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
August 12, 2018
मैदा १ कप, बेकिंग पावडर १ चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा, अमूल बटर पाव कप, पायनापल इसेन्स पाव चमचा, कन्डेन्स्ड मिल्क २०० ग्रॅम, पिठीसाखर १ मोठा चमचा.
December 30, 2016
साहित्य: ६ राजेळी पिकेलेली केळी, २ वाट्या गूळ, २ वाट्या नारळाचेदूध, २ वाट्या ओल्या नारळाच चव, १ चहाचा चमचा खसखस, जयफळ, वेलची पावडर स्वादाकरिता
कृती: खसखस थोडी भाजून घ्यावी. त्यात खवलेले खोबरे आणि गुळ घालून घट्ट होईपर्यंत हलवावे. त्यात जायफळ व वेलची पावडर घालावी.
पिकलेली राजेळी केळी सोलून घ्यावीत. मध्ये उभी चीर घ्यावी. त्यात वरील चव भरावा. एका पसरट भांड्यात भरलेली केळी ठेवावीत. त्यावर नारळाचे दूध व उरलेला चव घालावा आचेवर झाकण ठेवून शिजत ठेवावे. सर्व बाजूंनी गुलाबी रंगाची केळी झाल्यावर शिजली असे समजावे.
- सौ. नयना वैद्य
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
साहित्य :
५०० ग्रॅम राजमा
१ कप ताजे दही
३ कांदे
३ इंच आले
४ हिरव्या मिरच्या
१ चमचा धणे पावडर
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा तिखट
अर्धा चमचा गरम मसाला
२ चमचे क्रीम
तीन चमचे तेल
मीठ
कोथिंबीर
पाककृती :
राजमा रात्र भर पाण्यात भिजवून ठेवा. पाण्यात चिमूटभर सोडा मिसळा. याच पाण्यात सकाळी राजमा उकळा. नंतर पाणी काढून टाका. पातेल्यात तूप गरम करा. त्यात आले. कांदा, हिरवी मिरची गरम करा. आता त्यात दही आणि राजमा टाका. थोडा वेळ भाजा नंतर पाणी टाकून उकडा. एक दोन उकळ्या आल्यावर गरम मसाला व क्रीम टाका. कोथिंबीर टाकून चूली वरून उतरून घ्या.
May 2, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti