(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मेथीच्या वड्या

    साहित्य- एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून पाच-सहा हिरव्या मिरच्या व ७-८ लसूण पाकळ्या वाटून घेणे. एक चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, मीठ, साखर 2 वाट्या बेसन, थोडे तांदळाचे पीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, तेलाचे मोहन दोन चमचे.

    कृती- चिरलेली मेथी, मिरची-लसूण वाटण, धने-जिरेपूड, चवीनुसार मीठ, साखर हे सर्व एकत्र करून त्यात मावेल त्याप्रमाणे बेसन व थोडे तांदळाचे पीठ घालावे. चिमूटभर खाण्याचा सोडा व तेलाचे मोहन घालून सर्व कालवून घ्यावे. हे मिश्रण ताटलीत पसरून घालून कुकरमध्ये शिटी न लावता उकडून तेलात तळून घ्याव्यात. या वड्या न तळता नुसत्या फोडणीत घालूनही छान लागतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 20, 2017


  • p-4163-rava-mutter-momos-300

    इंडीयन रवा मटार मोमोज

    आज एक आगळी वेगळी डिश.

    रवा म्हटलं की सामान्यत: बऱ्याच लोकांची परिसीमा ही शीरा, उपमा इतपतच असते. पण हाच रवा 'कवा कवा' असंही रूप धारण करू शकतो..
    ही डिश आहे मटार आणि रव्याचे देशी मोमोज...
    ते ही तेलाचा थेंबभरही वापर न करता. ही डिश काहीजणांना ठाऊक नसेल तर काहींना ठाऊक असेलही. ज्यांना ठाऊक नाहीयं त्यांच्या सेवेत हा एक छोटासा प्रयत्न. बघा जमलाय का !!

    कृती :
    एका बाऊलमधे वाटीदीडवाटी रवा घेऊन तो भिजेल इतपतच पाणी टाकून, मळून ५/७ मिनिटासाठी झाकून ठेवा.
    मिक्सरमधे अर्धी वाटी ओले मटार, इंचभर आले, २/३ हि. मिरच्या, ३/४ लसूण पाकळ्या ग्राईंड करून घ्याव्यात. ही पेस्ट एका बाऊलमधे घेऊन त्यात मीठ, हिंग व जिरे टाकून पेस्ट एकजीव करावी. हे झाले आपले स्टफींग तयार.
    नंतर रव्याचे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यावे. त्याचा लिंबाएवढा गोळा करून तो पुरीच्या आकाराचा लाटून, त्यात मटारचे स्टफींग भरावे व चारीबाजूने बंद करून हलक्या हाताने दाबून घ्यावे.
    दुसरीकडे पँनमधे पाणी उकळत ठेवावे व या पाण्यात वरील स्टफींग भरलेले मोमोज अलगद सोडावेत. ४/५ मिनिटाने त्याची दुसरी बाजूही तेवढ्याच वेळेसाठी शिजवावी. मग हे मोमोज एका डिशमधे काढून मधोमध कापावेत. वरून अगदी प्रेमाने कुटलेली काळी मिरी शिंपडावी. केचअप याचा जोडीदार असेल बरं !!
    आपले इंडीयन रवा मटार मोमोज मग खायला तयार..

      September 18, 2018


  • Tandoori-chicken

    तंदुरी चिकन

    चिकन स्वच्छ धुवुन अख्या चिकनला सुरीने चिरा द्याव्यात. लसुन आले वाटुन घ्यावे. त्यात लिंबाचा रस घालुन हलवावे. वाटण, दही व हळद, तिखट सर्व मसाला लावून चिकन चार तास तसेच मुरत ठेवावे. हे मुरलेले चिकन ओव्हनमध्ये किंवा गॅस तंदूरमध्ये भाजावे. कोळशाच्या शेगडीवरही सळईत चिकन घालुन भाजता येते. साधारणपणे २० मिनिटात चिकन सगळीकड़ुन बाजू बदलत भाजावे.

      June 16, 2017


  • p-2992-daal-bati-churma

    दाल बाटी

    लागणारे जिन्नस:

    बाटीसाठी -

    ३ कप गव्हाचे पीठ१/२ कप रवा१ टेबलस्पून दही१ टीस्पून ओवाचिमुटभर खायचा सोडा१ टीस्पून मीठ१/२ कप तूप

    डाळीसाठी -

    १/४ कप मुग डाळ१/४ कप उडीद डाळ१/४ चणा डाळ१ कप तूर डाळ१ मध्यम कांदा१/२ टीस्पून हळद१ इंच आलं बारीक कापून१ टीस्पून जीरंचिमुटभर हिंग२ सुक्या मिरच्या३-४ लवंगा२ हिरवी वेलची१ इंच दालचिनी१ पमालपत्रं५-६ कडीपत्ता२ टोमॅटो२-३ हिरव्या मिरच्यामीठ२ टेबलस्पून तेलअर्ध लिंबू

    क्रमवार पाककृती:

    डाळ -
    सर्व डाळी अर्धा तास भिजवून ठेवा. त्यानंतर हळद घालून शिजवून घ्या.
    पॅनमध्ये तेल तापवून त्यावर जीरं, हिंग, सुक्या मिरच्या, कडीपत्ता ची फोडणी करा. त्यावर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं, तमालपत्रं, लवंगा, वेलची, दालचिनी, बारीक चिरलेले टोमॅटो घालून परतून घ्या. कांदा तांबूस झाला

    की शिजवलेली डाळ घाला आणि चांगली उकळी काढा. वरून लिंबू पिळून, बारीक चिरलेली कोथंबीर घाला.

    बाटी -
    भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, मीठ, खायचा सोडा, दही, ओवा आणि तूप घ्या. पुरेसं पाणी घालून चांगलं मळून ठेवा. (पीठ पोळीसाठी मळतो त्या पेक्षा थोडं घट्टं)
    ओव्हन १८०°C ला प्री-हिट करून घ्या. बेकींग-ट्रे ला तुपाचा हात फिरवून घ्या. पीठाचे लिंबापेक्षा थोडे मोठया आकाराचे गोळे करून बेकिंग-ट्रे वर ठेवल्यावर ओव्हनमध्ये २०-२५ मिनिटे १८०°C वर बेक करून घ्या. २०-२५ मिनिटाने बाटी परतून

    साधारण १० मिनिटे बेक करून घ्या. बाटीचा रंग खरपूस तांबूस होईल.
    बाटीला थोडे तडे गेले म्हणजे पीठ बरोबर जमून आले आणि बाटी आतापर्यंत बेक झाली समजावे.

    बाटी थोडी कोमट होऊ द्या, मग हाताने तोडून वर थोडे तूप आणि भरपूर गरम डाळ घालून, थोडी मऊ, थोडी कुरकुरीत बाटीचा आस्वाद घ्या!!!

      July 19, 2018


  • p-33418-Coriander-300

    आजचा विषय कोथिंबीर

    जेवणाचा स्वाद वाढविणारी, रुचकर, सुगंधी कोथिंबीर स्वयंपाकात वापरली जाते. अनेक पदार्थाच्या सजावटीसाठीसुद्धा कोथिंबीरीचा वापर केला जातो. कोथिंबीरीचा गंध भूक वाढवितो, मन प्रसन्न करतो.

      February 9, 2017


  • गाजर टोफू पराठा

    साहित्य :- १५० ते २०० ग्राम टोफू, १ गाजर किसलेले, दोन वाटय़ा कणीक (गरजेनुसार कमी-जास्त लागू शकते.), दही, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरून, १/२ चमचा धणेजिरे पूड, १/४ चमचा हळद, चवीपुरते मीठ, पराठे भाजण्यासाठी तेल किंवा बटर
    कृती :-टोफू हलक्या हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाकावे. परातीत किंवा खोलगट भांडय़ात घेऊन टोफू कुस्करून घ्यावा. त्यात कणीक घालून हलकेच मिक्स करावे. नंतर किसलेले गाजर, मिरच्या, धणे जिरेपूड, हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून चांगले मळावे आणि गरजेप्रमाणे दही घालून पराठय़ासाठी कणीक मळून घ्यावी. खूप घट्ट मळू नये त्यामुळे पराठे कोरडे होऊ शकतात. मळलेले पीठ १० मिनिटे झाकून ठेवावे. नंतर तेलाचा हात घेऊन २ ते अडीच इंचाचे समान गोळे बनवावे. कोरडी पीठ लावून पराठे लाटावेत आणि मध्यम आचेवर पराठे भाजून घ्यावेत. पराठे भाजताना कडेने थोडे तेल किंवा बटर घालावे त्यामुळे खमंग स्वाद येतो आणि पराठे मऊ राहतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 23, 2017


  • p- 90 - puneri-misal-300

    पुणेरी मिसळ

    साहित्य :-

    १. एक वाटी वाटाणे तासभर भिजत घालून कुकरमध्ये ३ शिटया देणे
    २. एक वाटी मोड आलेली मटकी घेऊन कुकरमध्ये ३ शिटया देणे
    ३. दोन बारीक चिरलेले कांदे
    ४. एक बारीक चिरलेला टोमॅटो
    ५. छोटी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
    ६. एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून ठेवणे
    ७. मध्यम आकाराचे २ बटाटे उकडून, सोलून, मध्यम आकाराच्या फोडी करणे
    ८. एक वाटी नायलॉन चे पोहे
    ९. एक वाटी तिखट जाड शेव
    १०.एक वाटी फरसाण
    ११. डावभर तुरीची शिजवलेली डाळ

    कृती :-

    पोह्यांचा चिवडा: कढईत १ छोटा टीस्पून तेल गरम करण्यास ठेवावे.
    त्यात १ टीस्पून मोहोरी , २ सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, १ टीस्पून डाळं, चिमुटभर हिंग, २ टेबल्स्पून दाणे, २ काड्या कढीपत्ता घालून फोडणी करावी.
    बर्नर बंद करून कढई खाली उतरवावी, त्यात थोडी हळद, चवीनुसार, वाटीभर नायलॉन चे पोहे, नखभर तिखट घालून कालवून घ्यावी. यात १ टीस्पून MTR ची चटणीपूडी पावडर कालवावी.

    तेलावर मोहोरी, हिंग व काळ्या मसाल्याची फोडणी देऊन, १ टीस्पून लाल तिखट व चवीप्रमाणे मीठ घालून, त्यावर शिजवलेली डाळ घालून २ वाट्या पाणी घालून उकळवून घ्यावी, व बाजूस काढून ठेवावी.

    १ टेबल्स्पून तेलावर चिमुटभर हिंग, १ टीस्पून तिखट, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा घालून परतणे. नंतर १ वाटी शिजलेले वाटाणे, अर्धी वाटी चिरलेला टोमॅटो, अर्धा टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद घालून एक उकळी आणून बाजूस काढून ठेवावे.

    उसळः तेलावर मोहोरीची फोडणी घालून मटकी, १ टीस्पून कच्चे जिरे, चिमुटभर हिंग, अर्धा टीस्पून तिखट, १ टीस्पून काळा मसाला, लहान सुपारीइतका गूळ, १ आमसुल आणि १ टेबल्स्पून भाजलेले शेंगदाणे घालून नेहेमीप्रमाणे उसळ शिजवावी.

    शिजवलेल्या डाळीचे पाणी वेगळे काढून ठेवून डाळ वाटाण्यात मिसळावी.

    तर्री वेगळे काढून ठेवलेले पाणी १ टीस्पून तेलात (आवडत असल्यास २ लसणाच्या पाकळ्या घालून) पाव टी स्पून तिखट व अर्धी वाटी टोमॅटो घालून उकळत ठेवावे.

    एका प्लेट मध्ये १ डाव कढत वाटाणे-डाळ घालावी. त्यावर उकडलेल्या बटाट्याच्या ४-५ फोडी घालून, वर एक डाव कढत उसळ घालणे, त्यावर एक डाव नायलॉनच्या पोह्यांचा चिवडा घालून, एक डाव जाडी शेव भुरभुरणे, १ टेबल्स्पून कच्चा कांदा व आवडीप्रमाणे कोथिंबीर घालावी. सर्व्ह करतांना पळीभर तर्री घालावी. हवे असल्यास वरून थोडे लिंबू पिळावे.

      April 30, 2016


  • मिनी सामोसे

    मिनी सामोसे – Recipe

      September 11, 2026


  • p-2369-batatapuri

    बटाटापूरी

    १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.

      May 8, 2017


  • p-1765-green-smoothie

    हिरवी स्मूदी

    दोन कप साखर, टरबूज कापून घेणे, अर्धा कप काकडी सालासकट, पुदिन्याची १२-१३ ताजी पाने. दोन टे.स्पून लिंबाचा रस, एक टी.स्पून मध.

      February 28, 2017