(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • Butter-Chicken-300

    बटर चिकन

    बेसिक रेड ग्रेव्ही दोन वाटय़ा, बटर दोन चमचे, फ्रेश क्रीम दोन चमचे, चिकन, आंबट चक्का किंवा घट्ट दही एक वाटी, हळद छोटा अर्धा चमचा, धनेजिरे पावडर दोन चमचे, कस्तुरी मेथी दोन चमचे, आलंलसूण पेस्ट चार चमचे, मीठ, तिखट, साखर चवीनुसार, मदा भाजलेला छोटा एक ते दीड चमचा, रेड ऑरेंज रंग. छोटा पाव चमचा.

      February 3, 2017


  • चिंच, खजुराची टिकाऊ चटणी

    चिंच, खजुराची टिकाऊ चटणी

    साहित्य:- अर्धी वाटी चिंच, शंभर ग्रॅम लाल बिनबियांचा खजूर, दीड वाटी गूळ, दीड मोठा चमचा तिखट (बडगी किंवा कश्मीरी ), एक मोठा चमचा धने,जिरेपूड, दोन मोठे चमचे रिफाइंड तेल, एक मोठा चमचा व्हिनेगर, चवीनुसार मीठ.

    कृती:- चिंच आणि खजूर स्वतंत्रपणे धुऊन बेताच्या पाण्यात भिजत घालावेत. चिंच कोळून घेऊन चिंचेचा कोळ आणि खजूर एकत्र बारीक वाटावं.त्यात गूळ चिरून घालावा. जाड बुडाच्या भांडयात तेल तापवून त्यात धने:-जिरंपूड, तिखट आणि चिंच:-गुळाचं मिश्रण घालून उकळावं. चवीनुसार मीठ घालावं. मिश्रण घट्टसर झालं की, व्हिनेगर घालून चटणी उतरवावी. पूर्ण गार झाल्यावर बाटलीत भरावी . पंधरा,वीस दिवस चांगली राहते. दही वडा, कचोरीबरोबर ही चटणी देता येते, किंवा याच चटणीत पाणी घालून थोडी पातळ करून ओली भेळ करता येते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      December 24, 2016


  • p-1938-Fresh-juices

    आजचा विषय सरबते

    सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. उन्हाळ्यात जेव्हा बाह्य वातावरणातील तापमान वाढते, त्यावेळी शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीरात अनेक क्रिया घडत असतात.

      March 6, 2017


  • मेथीचे घावन

    साहित्य:- २ वाट्या ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी डाळीचे पीठ (बेसन), २ जुड्या मेथी, १ चमचे तिखट, २ चमचे मीठ, तेल.
    कृती:- दोन्ही पिठे तिखट व मीठ घालून पाणी घालून ३० मिनिटे भिजवून ठेवावी. मेथी धुवून बारीक चिरावी व त्यात घालावी. पाव चमचा सोडा घालावा. पीठ थलथलीत असू द्यावे. तव्यावर तेल सोडून धावन करावे. मेथीऐवजी कोथिंबीर किंवा कोबी किसूनही असेच घावन करता येतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 17, 2017


  • पेरूचा जॅम

    साहित्य : पेरूचा गर १ वाटी, साखर १ वाटी, लिंबाचा रस अर्धा चमचा, मीठ चिमूटभर.

    कृती : पेरूचे दोन तुकडे करून बियांसकट गर काढून वाफवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्यात २ वाटय़ा पेरूच्या गराला १ वाटी साखर, अर्धा िलबाचा रस घालून मिश्रण घट्ट शिजवावे. मिश्रण चकचकीत होत आले की समजावे ते व्यवस्थित शिजले. नंतर बाटलीत भरून ठेवावे. पेरूचा गर काढण्याआधी त्यातील बिया काढून उरलेला पेरू मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा. एका पॅनमध्ये साखर व पेरूचा गर घालून घट्ट होईस्तोवर शिजवून घ्यावे. सर्वात शेवटी त्यात िलबाचा रस, चिमूटभर मीठ व जिलेटिन घालून मिश्रण थंड करून बाटलीत भरावे.

    टिप: जिलेटिन टाकण्यापूर्वी थोडय़ाशा पाण्यात गरम करून विरघळून घ्यावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२०१७३३

      January 22, 2017


  • मिक्स परांठा- गाजर+ वाटाणे+ चुकुंदर (बीट)

    हिवाळ्यात भाजी बाजारात गाजर आणि वाटाणे भरपूर असतात. गाजर आणि वाटण्याची कोरडी भाजी मस्तच लागते. पण गेल्या रविवारी सौ. ने विचारले. गाजर, मटर (वाटाणे) घालून उपमा करू का? मी म्हणालो, उपम्याच्या जागी यांचे परांठे केले तर कसे लागतील. सौ.ला ही कल्पना आवडली.

    साहित्य: गाजर २५० ग्रम, मटार (वाटाणे) १ वाटी, चुकुंदर(बीट) १ मोठे. , हळद, हिरवी मिरची २, लसूण, अदरक, तिखट २ चमचे (चवीनुसार), गरम मसाला (१ चमचा), कसूरी मेथी (२ चमचे) शिवाय कणिक (किती परांठे बनवायचे, याचा अंदाज घेऊन (आम्ही दिल्लीकर परांठ्यात भरपूर मिश्रण भरतो, मुंबईकर बहुतेक कमी भरतात) मळून घ्यावी. शुद्ध गायीचे तूप किंवा लोणी पराठ्यांवर लावण्या साठी. अदरक, लसूण, हिरवी मिरचीचे पेस्ट करून घ्यावे. मीठ चवीनुसार.

      March 3, 2015


  • मोठ्या कोलंबीचे (झिंग्याचे) कालवण

    साहित्य : अर्धा किलो मोठी कोलंबी (झिंगे), २ कांदे, २ चहाचे चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, ४ टे. स्पून तेल, एक मोठ्या लिंबा एवढी चिंच, अर्धी वाटी किसलेले, भाजलेले सुखे खोबरे, १ मोठा कांदा, उभा चिरुन तेलात परतलेला, ७-८ लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ चमचा मीठ वाटण नं. १: लसूण, कोथिंबीर चाटण नं. २: कोलंबीचे पाय (लहान नांगडे) वाटून गाळून त्याचा रस चाटण नं. ३: तळलेला उभा कांदा, भाजलेले सुखे खोबरे घ्यावी.

    कृती : प्रथम कोलंबी साफ करुन (कवच काढणे) पाय तोडून वाटून ठेवणे. कोलंबीला वाटण नं. १ चोळून लावणे. त्याला हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ लावणे. एका भांड्यात तेल टाकून तापवणे. त्यात २ चिमूट हिंग टाकणे, नंतर त्यात खूप बारीक चिरलेला कांदा टाकणे. कांदा ब्राऊन झाल्यावर त्यामध्ये मसाला लावलेली कोळंबी चांगली घालून सवताळून चाटण नं. २ घालून परतत रहावी. मधून मधून चिंचेच्या कोळाचे पाणी घालून सवताळत रहावी. झाकण ठेवू नये. मंद आंचेवर झिजत ठेवावी. शिजल्यावर वाटण नं. ३ (तळलेला मसाला) व गरम मसाला टाकावा. पांच मिनिटे उकळी येऊ द्यावी. गॅस बंद करावा. उतरल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

    - सौ. दिप्ती देशपांडे

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • मेथी-मटार पुलाव

    साहित्य- दोन वाट्या बासमती तांदूळ, एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, दोन तमालपत्रे, एक इंच दालचिनी, 10-12 मिरे, चार लवंगा, दोन-तीन वेलदोडे, दोन चमचे आले, लसूण व हिरवी मिरची पेस्ट, एक चमचा धने-जिरेपूड, एक वाटी मटार, चार चमचे साजूक तूप, चवीनुसार मीठ, साखर, दोन कांदे तळून व थोडे काजू.

    कृती- तांदूळ धुवून अर्धा तास निथळत ठेवावेत. जाड बुडाच्या पातेल्यात चार चमचे तूप घालून त्यात तमालपत्र-दालचिनी-मिरे, लवंगा, वेलदोडे घालून परतावे. नंतर चिरलेली मेथी व मटार घालून परतावे.
    त्यात आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट व धने-जिरेपूड घालावी. नंतर धुवून ठेवलेले तांदूळ घालून परतावे. अंदाजे मीठ व चवीला थोडी साखर घालावी. नंतर चार वाट्या आधण पाणी घालून पुलाव शिजवून घ्यावा. (हवे तर कुकरमध्ये शिजवून घ्यावे) पुलाव वाढताना वर तळलेला कांदा व तळलेले काजू घालावेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 20, 2017


  • मिनी सामोसे

    मिनी सामोसे – Recipe

      September 11, 2026


  • केळफुलाचे उपवासाचे कटलेट

    केळफुलाचे उपवासाचे कटलेट

    साहित्य : बारीक चिरलेले व वाफवलेले एक वाटी केळफूल, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी सुरणाचा वाफवलेला कीस, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा साखर, एक चमचा लाल तिखट, शिंगाडय़ाचे पीठ एक वाटी, थोडेसे तेल किंवा तूप.

    कृती : सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळावे व आवडीच्या आकाराचे कटलेट बनवून तव्यावर तेल किंवा तूप सोडून शॅलो फ्राय करावे

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

      March 9, 2017