महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य : दोन पिकलेली (सालीवर काळे ठिपके पडलेली) केळी, दोन वाटया भरून तापवून थंड केलेले दूध, चहाचे तीन चमचे भरुन साखर, वेलदोडयाची पूड असल्यास ती चिमूटभर.
कृती : एका पातेलीत दूध घेऊन त्यात साखर घालून ती विरघळेपर्यंत हलवावी. एका बशीत केळी सोलून ती हाताने खूप कुस्करावीत. कुस्करलेली केळी नंतर साखर घातलेल्या दूधात घालून नीट मिसळावीत व सर्वात शेवटी त्यात वेलदोडयाची पूड घालवून हलवावे. झाले शिकरण तयार.
टीप : हे शिकरण लगेच संपवायचे आहे. फ्रीजमध्ये ठेवले तर काळे पडते. याबरोबर ३-४ पोळया सहज खाता येतात.
August 3, 2018
तीन केळी, एक वाटी अननसाचे तुकडे, एक वाटी संत्र्याचा रस, चवीप्रमाणे पिठीसाखर, पाऊण वाटी थंड दही.
February 28, 2017
साहित्य: १ पॅकेट मश्रूम पातळ स्लाइस करून, २ कांदे पातळ उभे चिरून, १ कप दूध, २ टीस्पून बटर, २ टीस्पून कणीक, मीठ-मिरपूड चवीनुसार
कृती: १ टीस्पून बटरवर कांदा परता. पारदर्शक झाला की त्यात मश्रूम घाला. जरासं परतून त्यात कपभर पाणी घालून शिजवा. थंड करून मिक्सरला वाटून घ्या. १ टीस्पून बटरवर कणीक भाजा. खमंग वास आला की त्यात हळूहळू दूध घाला. गुठळ्या होऊ देऊ नका. हा सॉस मश्रूमच्या मिश्रणात ओता. मीठ-मिरपूड घाला. उकळा.
September 2, 2018
जिन्नस : मेथीची मोठी १ जुडी, लाल तिखट पाव चमचा, धने जिरे पूड पाव चमचा, चवीपुरते मीठ, २ ते ३ चमचे डाळीचे पीठ, २ ते ३ चमचे चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या चिरलेल्या २, १ ते २ मिरचीचे लहान तुकडे, फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, हळद.
कृती : मेथी निवडून धुवून घ्या. कूकरमध्ये शिजवून घ्या. कूकर गार झाला की त्यातली शिजलेली मेथी बाहेर काढा व त्यात डाळीचे पीठ मिक्स करा. मिक्स करताना त्यात गुठळी होऊन देवू नका. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ घालून डावेने भाजी एकसारखी करून घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. नेहमी फोडणी करतो त्यापेक्षा जरा जास्त तेल घालावे. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. फोडणीमध्ये चिरलेली मिरची, लसूण व कांदा घाला. कांदा लसूण बारीक चिरा. आच कमी करून हे सर्व जिन्नस थोडे परतून घ्या. नंतर त्यात मेथीचे तयार केलेले मिश्रण घाला. व थोडे पाणी घाला. भाजी ढवळा. एकसारखी करा. नंतर त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा. गॅस बंद करा. मेथीची भाजी तयार झाली आहे. कांदा लसूण फोडणीत घातल्याने एक छान चव येते. पोळीपेक्षाही ही भाजी गरम भाकरीशी जास्त छान लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 17, 2017
फळे आणि भाजीपाल्यापासून तयार केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणार्या रासायनिक पदार्थाना “परिरक्षक” (प्रिझर्व्हेटिव्ह) म्हणतात.याचे दोन प्रकार असतात.
October 23, 2015
गौरी गणपतीची आरास, त्यांची मिरवणूक,गणपतीसाठी केले जाणारे गोडधोडाचे पदार्थ यांना जसे अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच ऋषीपंचमीच्या दिवशी घराघरात केल्या जाणाऱ्या ऋषीच्या भाजीचेही. हा दिवस साजरा करण्यामागे किंवा हि भाजी तयार करण्यामागे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. वेगवेगळ्या गुणांनी युक्त अश्या भाज्यांचा आस्वाद घेता यावा,त्यातून चव आणि पौष्टिक आहार अश्या दोन्ही गोष्टी साधता याव्यात हादेखील हेतू असतो.
या दिवशी बैलाच्या श्रमातून तयार झालेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन या दिवशी करू नये असे संकेत आहेत.वर्षभर बैलांकडून माणूस श्रम करून घेत असतो,या दिवसाच्या निमित्ताने आपल्या परसात पिकवलेल्या भाज्यांचा समावेश करून हि भाजी तयार करणे हा यामागचा खरा उद्देश. अर्थात शहरात हे शक़्य नाही म्हणून भाज्या विकत आणून त्यापासून ऋषीची भाजी तयार करतात.
साहित्य.
भाज्या: लाल भोपळा,पावसाळी काकडी,दोडके,भेंडी, कंदमुळे किंवा सुरण,रताळी,लाल माठाचे देठ,अळू, मक्याची कणसे,ओल्या वाटण्याचे दाणे,भुईमुगाचे दाणे,चवळीच्या कोवळ्या शेंगा,पडवळ,हिरव्या मिरच्या.
सोबत खोवलेला नारळ, मिरपूड, मीठ, कोळलेली चिंच यांचाही समावेश करावा.
कृती:
भोपळा,काकडी,दोडके,दुधी, अश्या लवकर शिजू शकणाऱ्या भाज्यांचे मोठे काप व शिजायला वेळ लागणाऱ्या भाज्यांचे लहान कांप करा. पानांचे बारीक तुकडे तर माठ तसेच अळूच्या देठांचे लांब तुकडे पाडा. भेंडी वगळता इतर भाज्या मोठ्या पातेल्यामध्ये घालून त्या बुडतील एवढे उकळते पाणी ठेवा व कमी आचेवर शिजायला ठेवा. सुरण,रताळे किंवा कंदाच्या फोडी मऊ झाल्यावर त्यात मीठ,मिरपूड,नारळ,चिंचेचा कोळ टाका व नंतर भेंडीही चिरून घाला. थोडावेळ उकळल्यानंतर भाजी तयार होईल. हि वऱ्याच्या तांदळा बरोबर व दही यासोबत खाता येते.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२२३०१७३३
September 6, 2016
फ्लॉवर-मटार करंजी
साहित्य:- २५० ग्रॅम फ्लॉवर बारीक चिरुन , २५० ग्रॅम ताजे कोवळे मटार , फोडणीसाठी तेल,मोहरी,तिखट,हळद चवीनुसार मीठ,वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबिर,ओला नारळ अर्धी वाटी,तीन वाट्या कणीक, एक वाटी बेसन, एक चमचा जीरे.
कृती:- गॅसवर एका कढईत फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल तापवून मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यावर बारीक चिरलेला फ्लॉवर आणि मटार घालावे. त्यात चवीनुसार तिखट, हळद, मीठ घालून, बेताचे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी. मटार नीट शिजले की ओला नारळ घालून परतावे. भाजीतील सर्व पाणी आटले पाहीजे. मग त्यावर भरपूर (आवडी नुसार) कोथिंबीर घालून, नीट मिसळून, भाजी खाली उतरवावी. कणीक व बेसनात हळद, जीरे व चवीनुसार तिखट, मीठ, घालून पाणी घालून पीठ भिजवावे. गॅसवर एका कढईत तळणीसाठी तेल तापत ठेवावे.
कणीक-बेसनाची एक पुरी लाटावी.. त्यात २ टेबलस्पून फ्लॉवर मटारची भाजी भरून पुरीच्या दोन्ही कडा जुळवून घ्याव्यात. त्याची कडा नीट बोटाने चेपून सीलबंद करून कातण्याने काताव्या.
आता ही करंजी मध्यम आंचेवर तळून घ्यावी. ह्या करंज्यांबरोबर इतर काही लागत नाही. थोडा बदल हवा असेल तर सारणात उकडलेला बटाटा कुस्करून घालता येईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पातीकांदा बटाटा करंजी
साहित्य:- ६ ते ८ पातीकांद्याच्या काड्या, १ मध्यम बटाटा, १ चमचा तेल फोडणीसाठी, १/४ चमचा जीरे, १/४ चमचा हिंग, १/२ चमचा चाट मसाला, १/२ चमचा धणेपूड, १/४ चमचा जिरेपूड, १/२ चमचा लाल तिखट, २ चिमटी गरम मसाला, २ हिरव्या मिरच्या बारीक चीरून, चवीपुरते मीठ, किसलेले चीज, तळण्यासाठी तेल,
पारीसाठी:- १ वाटी मैदा, १ चमचा कणिक, १ चमचा तेल मोहनासाठी, २ चिमटी मीठ.
कृती:- बटाटा उकडून सोलून घ्यावा. सुरीने अगदी बारीक तुकडे करावे. कांद्याची पात आणि त्याचा कांदा दोन्ही बारीक चिरून घ्यावे. पारीसाठी मैदा, कणिक आणि मीठ एकत्र करावे. त्यात १ चमचा गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात जीरे आणि हिंग फोडणीस घालावे. त्यात मिरची घालून परतावे. नंतर पाती कांदा आणि मीठ घालावे. परतून मंद आचेवर २-४ मिनिटे वाफ काढावी. नंतर बटाटा घालून मिक्स करावे. आच बंद करून त्यात चाट मसाला, धणे-जिरेपूड, लाल तिखट, गरम मसाला घालून मिक्स करावे. पारीच्या दिड इंचाचा गोळ्या बनवाव्यात. लाटून त्यात अर्धा ते एक चमचा सारण घालावे. १ चमचा चीज घालावे. पारी बंद करून करंजीचा आकार द्यावा. तेल गरम करून त्यात करंज्या मध्यम आचेवर तळून घ्याव्यात. टॉमेटो केचप बरोबर सर्व्ह कराव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ब्रेडची करंजी.
साहित्य : १ वाटी खोवलेला ओला नारळ, पाव वाटी साखर, पाव वाटी बारीक चिरलेला खजूर, चिमुटभर वेलची पावडर, १ चमचा काजू-बदामाचे तुकडे, ६-७ ब्रेडच्या स्लाइस, १ चमचा मैदा, तळण्यासाठी तेल किंवा तूप. (प्रत्येकी पाउण वाटी तेल आणि तुपाचं मिश्रणही छान लागतं.)
कृती : नारळात साखर घालून मिश्रण ढवळून ठेवावं. १०-१५ मिनिटांनी जाड बुडाच्या पातेल्यात मिश्रण दोन मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवावं. नंतर गॅस बारीक करावा. अधून मधून मिश्रण ढवळत राहावं. साखरेचा पाक होऊन मिश्रण सैलसर झालं की वेलची पावडर, काज-ूबदाम, खजुराचे तुकडे घालून मिश्रण ढवळून घ्यावं. मिश्रण थोडं कोरडं वाटलं की गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावं. मैद्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची घट्टसर पेस्ट बनवून ठेवावी. ब्रेडच्या कडा काढून टाकाव्यात. ब्रेड किंचित ओलसर करून घ्यावा. त्यावर मधोमध दोन चमचे सारण ठेवावं. कडांना मैद्याची पेस्ट लावून ब्रेड त्रिकोणी आकारात दुमडून (फोल्ड करून) कडा जुळवून व्यवस्थित दाबून घ्यावं. तयार करंजी लगेच गरम तेला-तुपाच्या मिश्रणात लालसर रंग येईपर्यंत तळून व्यवस्थित निथळूृन घ्याव्यात. करंज्यांचं सारण आदल्या दिवशीही करून ठेवता येऊ शकतं. सारण तयार असलं तर करंजी खूपच झटपट होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
April 17, 2017
साहित्य:- १ कप मका आटा, १/२ कप मैदा, १ चमचा तेल, १/२ चमचा मीठ, तेल.
इतर लागणारे साहित्य:- १ टोमॅटो, १ मोठा कांदा, १ उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १/४ कप हिरवी चटणी, चिंचेची चटणी स्वादानुसार, मीठ, तिखट व जिरे पूड.
कृती:- टाको तयार करण्यासाठी मक्याच्या कणकेत मैदा आणि मीठ मिसळावे. यात तेल व आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून कणीक भिजवावी. या कणकेच्या गोळ्याला १/२ तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर त्याला डायमंडशेपमध्ये कापून तळून घ्यावे. कांदा, टोमॅटो, बटाटा बारीक चिरून घ्यावे. एका मोठ्या बाउलमध्ये टाकोला हाताने कु्स्करून त्यात टाकावे व बाकी उरलेले सर्व साहित्य घालून लगेचच सर्व्ह करावे. ही मॅक्सिकन भेळ खाण्यात फारच रुचकर लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
December 21, 2016
साहित्य व कृती :- कलिंगड कापल्यावर त्याच्या साली किसून त्यातील पांढरा भाग काढून घ्यावा. डोसे, उत्तप्पे, आप्पे यांचे पीठ वाटताना पाणी घालण्याऐवजी त्यात कलिंगडाचा पांढरा भाग घालावा.
कलिंगडाच्या बिया वेगळ्या काढून घ्याव्या. त्या स्वच्छ धुऊन वाळवाव्या. शेंगदाणे भाजतो त्याप्रमाणे भाजाव्यात. तडतड आवाज आला, की त्या गरम असतानाच त्यावर मिठाचे पाणी शिंपडावे व बिया ढवळाव्यात. या प्रकारे खारवलेल्या बिया छान लागतात. त्या गार झाल्यावर पांढरट दिसतात. अशा बिया जास्त असतील, तर बाटलीत भरून ठेवाव्यात. चण्या- फुटाण्यासारख्या लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
February 4, 2017
पोटॅटो वेजेस – Recipe
September 11, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti