(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • mixed-fruit-juice

    मिक्सड् फ्रूट सरबत

    संत्री, मोसंबी व अननसाचा रस काढून घ्यावा. जेवढा रस त्याच्या दीडपट साखर घ्या. साखरेच्या निमपट पाणी घालून एकतारी पाक करा. पाक निवल्यावर त्यात फळांचा रस घाला. बाटलीत भरा.

      November 9, 2016


  • पेरूचा ज्यूस

    साहित्य:- फोडी उकडून काढलेला गाळलेला रस किमान एक लीटर, एक किलो साखर, दोन लिंबांचा रस.

    कृती:- पेरूचा रस आणि साखर एकत्र उकळा. गार झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण तयार करा. पेरूचा ज्यूस ग्लासमध्ये देताना नेहमी चिमूटभर मीठ घाला, त्यामुळे पेरूची चव अप्रतिम लागते. गुलाबी रंगाच्या पेरूचा वापर केल्यास अधिक चांगले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२०१७३३

      January 18, 2017


  • इंडीपेंडन्स मायक्रोब्रूअरी

    पुण्यात बरेच ठिकाणी मायक्रोब्रूअरी रेस्टोबार झालेत. अशाच एक मायक्रोब्रूअरी मधे मध्यंतरी गेलेलो. मुंढव्यात.
    मुंढवा एरिया म्हणजे जवळपास अमेरिका आहे. मोठमोठे रस्ते. स्वच्छता. चकाचक बिल्डिंग्स. एकदम खास.
    काही ठिकाणी अजूनही ग्रामीण भाग मधेच येतो. पण कोरेगाव पार्कातून येऊन उजवीकडे वळल्यावर क्रोम स्टोअर कडे जाणारा रस्ता चकाचक. इथेच इंडीपेंडन्स शेजारी झहीर खानचं 'झेडकेज'ही आहे.

    मायक्रोब्रूअरी म्हणजे मद्य बनवायचा कारखाना.
    इंडीपेंडन्स मधे बियर बनवली जाते आणि बफे बरोबर सर्व्ह केली जाते.
    इथलं वैशिष्ट्य हे, की इथे आठ प्रकारच्या बियर मिळतात.

    तुम्हाला फारशी प्यायची सवय नसेल, तर तुम्ही फक्त शंभर रुपयात (taxes extra) इथल्या वेगवेगळ्या बियर्स ट्राय करून पाहू शकता.
    याला म्हणतात ‘बियर फ्लाईट’ !
    ‘बियर फ्लाईट' म्हणजे सगळ्या प्रकारच्या बियर्स ३० एमएल मापात आणून दिल्या जातात.

    डावीकडून उजवीकडे एक ते आठ अशा क्रमाने ग्लासेस ठेवले जातात.
    सगळ्यात डावीकडे एकदम लाईट बियर. सगळ्यात उजवीकडे डार्क. डावीकडून उजवीकडे बियर्स डार्क होत जातात. नंबर चार म्हणजे बाहेर कॉमनली मिळणारी रेग्युलर लागर.

    शंभर रुपयात फक्त आठ टाईप चे ३० एम एल प्रत्येकी. (एकूण २४० एम एल)
    यानंतर,पूर्ण भरलेल्या ग्लास प्रमाणे पैसे देऊन आपण, जी आवडेल ती निवडून पिऊ शकतो.

    या आठ बियर्स खालीलप्रमाणे -

    १. हनी लव्हेंडर एल - मध आणि लव्हेंडर याच्या मिश्रणापासून बनलेलं एल. सुंदर लागतं. बडलाईट लाईम बियर सारखं.

    २. रासबेरी पाय - ब्रूइंग करताना भरपूर प्रमाणात रासबेरी घालून बनवलेली चक्क गुलाबी रंगाची बियर !

    ३. बेल्जियन विट – ओट, पिल्सनर बियर, गहू याच्या मिश्रणापासून बनवलेली बियर. याला संत्र्याचं साल आणि कोथिंबिरीचा हलकासा स्वाद असतो.

    ४ फोर ग्रेन सीझन – बार्ले, गहू,राय आणि ओट हे यीस्ट घालून फरमेंट केलं जातं. याला प्लम आणि पेअरचा प्रॉमिनंट स्वाद असतो.
    ही बियर बाहेर कुठेही मिळणाऱ्या लागर बियर सारखी लागते.

    ५. बेल्जियन डबेल – ही पण जवळपास फोर ग्रेन सीझनचीच बहीण. यात थोडासा गूळ वापरलेला असतो.

    ६. इक्सककाओ – कोकोच्या बिया आणि बोरबॉन व्हॅनिला घालून ही बियर बनवली जाते.

    ७. अॅव्हेगेडॉन – व्हाईट IPA म्हणजे बियर ब्रूइंग करतानाच्या विशिष्ट अमेरिकन आणि बेल्जियन पद्धतीचं मिश्रण. या व्हाईट आयपीए मधे होप्स मिसळले जातात. ही किंचित गोड पण मुख्यत्वेकरून कडूझार असते.

    ८. मेथड टू मॅडनेस IPA V१.० – तमाम वूडी, सायट्रस, फ्लोरल आणि फ्रूटी अशा सगळ्या स्वादांचं मिश्रण करून बनवलेली माल्ट आय पी ए.
    भयंकर कडू. जीभ एकदम ठार होते :)

    जर तुम्ही बफे विथ ड्रिंक्स घेतलात तर, तुम्हाला वर वर्णन केल्याप्रमाणे ‘बियर फ्लाईट’ तर मिळतेच. पण सोबत कुठलीही बियर, स्टार्टर्स आणि मेन कोर्स अनलिमिटेड मिळतो.

    जर तुम्ही वेगन असाल, ड्रिंक्स घेऊ इच्छित नसाल तर तुमच्याकरता व्हेज स्टार्टर आणि मेन कोर्स असतोच.
    फूड क्वालिटी आणि व्हरायटी उत्तम आहे.

    बियर आवडणाऱ्या लोकांना इथे प्रचंड व्हरायटी मिळेल.
    मला स्वतःला रासबेरी आणि इक्सककाओ या बियर्स त्यांच्या वेगळेपणा मुळे प्रचंड आवडल्या.
    सवय अजिबात नसल्याने तीन ग्लासच्या वर पिऊ शकलो नाही :)
    याचं जरा वाईट वाटलं :)

    याशिवाय, या बियर्स बनत असताना तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता.
    स्टीलचे छानदार व्हेसल्स इथे आहेत. बारले, होप्स आत टाकताना तुम्ही पाहू शकता. मॉनिटर वर रिअॅक्टर्स मधे आत काय चाललंय ते पाहू शकता. गम्मत वाटते. एकदा मजा म्हणून जायला हरकत नाही.
    लाईट बियर्सच्या चाहत्यांना रासबेरी बियर होल-हार्टेडली रेकमेंडेड.

    -- From WhatsApp. I liked this so hared with you. I do not know the original author. 

      July 1, 2017


  • coconut-mint-cool-300

    कोकोनट मिल्की कूल

    नारळाचे दाटसर दूध फ्रिजमध्ये ठैवून थंड करुन घ्या. या दुधात अननसाच्या फोडी सोडून सर्व पदार्थ घालून चांगले मिसळून घ्या. तयार सरबत ग्लासात ओतून वरुन त्यात अननसाच्या थोड्या थोड्या फोडी घाला. आणि प्या.

      November 9, 2016


  • खिम्याची अळू वडी

    साहित्य : १२ अळूची पाने, अर्धा किलो खिमा, २ वाट्या बेसन, पाऊण वाटी भाजलेल्या सुख्या खोबऱ्याचे वाटण, चिंच १ चमचा गरम मसाला, ३चमचे लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा हळद, १०-१२ लसूण पाकळ्या, १ इंच आले, कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस चवीपुरते मीठ, तेल प्रथम खिमा (मटण) स्वच्छ धुऊन त्याला आले, लसूण, कोथिंबीरीचे वाटण लावून चोळावे.
    हळद, तिखट, मीठ व लिंबूरस टाकावा. हे सर्व लावलेला खिमा १ तास बाजूला ठेवावा.

    कृती : पातेल्यात १ टे. स्पून तेल टाकून त्यात खडा मसाला (२ तमालपत्र, ३ लवंग, बडी वेलची २, मिरे ७-८) टाकणे . त्यात वरील मसाला लावलेला खिमा टाकून चांगला परतावा आणि शिजवून घ्यावा. एकदम चांगले कोरडे करुन घ्यावे. एका वाडग्यात बेसन घेऊन त्यात शिजवलेला खिमा सुख्या खोबऱ्याचे वाटण, गरम मसाला चवीपुरते मीठ टाकून चांगले एकजीव करावे.

    साधारण घट्ट (थुलथुलीत) भिजवावे. अळूची पाने स्वच्छ करुन लाटण्याने थोडी लाटून वरील शिरा काढाव्यात. त्या पानाला चिंचेच्या कोळाचे पाणी लावावे. त्यावर वरील खिम्याचे मिश्रण लावावे. सर्व बाजूला सारखे पसरवावे. परत त्यावर दुसरे पान ठेऊन वरील प्रमाणे करावे अशी एकावर एक ५-६ पाने लावावीत. मग त्याची गुंडाळी करावी ही गुंडाळी घट्ट करावी आणि मोदकपात्रात अर्धा तास वाफ काढावी.
    थंड झाल्यावर जाड वड्या पाडाव्यात आणि तळाव्यात कुरकुरीत होतात.

    - सौ. शुभा देशपांडे

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • मटार पराठा

    साहित्य:- दोन वाट्या ताजे मटार, तीन ते चार ओल्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी - जास्त घ्या) कोथिंबीर, 1 चमचा आले पेस्ट, साखर, लिंबू, मीठ, तेल, 1 वाटी कणीक व 1 वाटी मैदा, मीठ व तेल घालून भिजवून घेणे. तेल व तांदूळाची पिठी.

    कृती : प्रथम तेलावर जिरे - हिंग - आले पेस्ट घालून परतून घ्या. त्यात कोथिंबीर व शिजवून मऊ केलेले मटार घाला व परता. मीठ -लिंबू -साखर घाला. नंतर गार झाल्यावर वरील मिश्रण मिक्स रमधून बारीक करून नीट सारखे करून घ्या. भिजलेल्या कणकेच्या गोळ्यात वरील सारण घालून छोट्या फुलक्या प्रमाणे लाटून घ्यावी. तव्यावर तेल सोडून मटार - पराठे करून घ्यावेत. हे छोटे - छोटे पराठे दही व लोणच्याबरोबर सर्व्ह करावेत. मध्य प्रदेशात या पराठ्यांना मटार कचोरी म्हणतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      December 26, 2016


  • भरले पेरू

    साहित्य:- मोठा पेरू १ नग, १ लहान कांदा, १०० ग्राम अळंबी, तेल, मोहरी, हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे,हळद,मीठ, दाण्याचे कूट, मोहरीची डाळ,कोथिंबीर, मीठ.

    कृती:- भरले पेरू करताना पेरू भरण्यासाठी पेरू मधोमध चिरून त्याच्या वाट्या कराव्यात. कढईत तेल तापवून बारीक चिरलेला कांदा त्यात परतावा. बारीक चिरलेली अळंबी या कांद्यात घालून वाफ द्यावी. दोन्ही मऊ झाल्यावर परतून पाणी आटवावे. गार झाल्यावर मीठ, मिरची- कोथिंबीरीचे वाटण एकत्र करावे. पेरूची वाटी बिया काढून रिकामी करावी. त्यातील गर कांद्याच्या मिश्रणात मिसळावा. या मिश्रणाने वाट्या भराव्यात. कढईत तेल तापवून त्यावर एक एक करून या वाट्या रचाव्यात व झाकण ठेवून वाफ द्यावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२०१७३३

      January 21, 2017


  • आंब्याची कोय आणि पैशांची सोय

    आंब्याचा वापर केल्यानंतर आपण कोय फेकून देतो. मात्र, त्या कोयीचे काय करायचे, याचा विचारसुद्धा करत नाही. तसे न करता ती कोय वापरात आणून त्याच्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनवण्याचा उद्योग  सुरू करून पैशांची कमाई करता येते.

      January 31, 2022


  • वडापावाचा इतिहास….

    आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी ‘वडापाव’ खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ?

      November 28, 2024


  • साबुदाणा वडे

    साहित्य :

    १ कप साबुदाणे
    ३ ते ४ मध्यम जाडीचे बटाटे
    १/२ कप शेंगदाणे
    १ चमचा जिरे
    १ ते २ बारीक चिरलेल्या मिरच्या.
    १ चमचा आल्याचे बारीक कापलेले तुकडे.
    २ चमचे लिंबाचा रस.
    बारीक कापलेली कोथिंबीर
    दिड चमचा साखर
    ३ चमचे शिंगाड्याचे पीठ
    चवीप्रमाणे मीठ.
    तळण्यासाठी तूप

    कृती :

    १. साबुदाणे कमीतकमी ५ तास किंवा आदल्या रात्री भिजत ठेवणे, जेणेकरून साबुदाणे नरम व मुलायम होतील.
    २. साबुदाण्यातील पाणी संपूर्ण निथळावे
    ३. बटाटे उकडून घ्यावेत. साले काढून ती सोलून घ्यावीत
    ४. साबुदाणे व बटाटे एकत्रित कुस्करून घ्यावेत.
    ५. तव्यावर किंवा सपाट फ्राईंग पॅनवर शेंगदाणे खुशखुशीत भाजणे
    ६. शेंगदाणे थंड करून त्याचे जाडसर कुट करणे.
    ७. शेंगदाण्याचे कुट, मीठ साखर, आले, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, लिंबाचा रस, शिंगाड्याचे पीठ आणि पाणी - ह्या सर्वांचे चांगले मिश्रण करावे.
    ८. मिश्रणाचे हाताने छोटे-छोटे वडे बनवावे.
    ९. हे वडे भरपूर तेलात तांबूस होई पर्यंत तळावेत
    १०. चटणी किंवा दही ह्या बरोबर साबुदाणा वड्यांची मजा घ्यावी.

      August 18, 2015