महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
कोथिंबीर निवडून घ्या. लहान, कोवळी देठे पण घ्या. कोथिंबीर धुवा आणि चाळणीत ठेऊन निथळून घ्या. पाणी निथळल्यावर कोथिंबीर चिरून घ्यावी. तेल आणि पाणी वगळता कोथिंबीर आणि सर्व साहित्य परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे. १ टेबलस्पून तेल गरम करून मिश्रणात ओतावे. चमच्याने मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालावे आणि छान एकत्र मळून गोळा बनवा. त्याचे २ भाग करून लंबगोल आकाराचे गोळे/उंडे करा. भांड्याला आतून थोडे तेल लाऊन घ्या, त्यात ते गोळे ठेवा.
February 9, 2017
सामग्री
५ ब्राऊन ब्रेड के स्लाइस,
१ कटोरी मलई,
१ कटोरी सूजी,
१/४ कटोरी सिमला मिर्च के टुकड़े,
१/४ कटोरी गाजर के टुकडे,
१/४ कटोरी स्वीटकॉर्न के दाने,
१/२ चम्मच मिरी पावडर,
१/२ चम्मच चिली फ्लेक्स,
५ चीज क्यूबज
नमक स्वाद अनुसार
विधी
१) एक बड़ी कटोरी में मलई लेकर उसे अच्छे से फेंट ले၊
२) अब उसमें सूजी और बाकी की सब सब्जियाँ और सामग्री
मिलाकर (चीज छोडकर) , अच्छे से मिक्स कर ले और
पंधरा मिनट तक वैसे ही रख दे၊
३) अब ब्रेड स्लाइस लेकर उसके उपर ये मिश्रण लगा दे और
उपर से चीज कद्दूकस करके डाले၊
४) अब नॉनस्टिक तवे को गरम करके उसके उपर एक चम्मच
घी डाले और ब्रेड के स्लाइसेस को उसके उपर रख दे और
धीमी आंच पर रखकर टोस्ट बना ले၊
५) हल्दी सॅन्डविच टोस्ट टमाटर के सॉस के साथ परोसे
July 19, 2018
साहित्य: १ कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा टे.स्पून लोणी, २ टे. स्पून मैदा, अर्धा कप फ्लॉवरचे तुरे, अर्धा कप किसलेले गाजर, पाव कप किसलेले बीट, १ कप किसलेला कोबी, अर्धा कप ओला वाटाणा, १ कप दूध अर्धा कप घोटलेली मलई वेळ: ३० मिनिटे `चवीपुरते मीठ, मिरे पावडर, साखर व थोडे अमूल बटर.
कृती: प्रथम लोणी पातेल्यात गरम करावे व त्यात कांदा परतून जरा तांबूस झाला की मैदा परतावा. मैदा खमंग भाजावा व त्यात वरील भाज्या घालून थोडे परतावे व एक-दोन कप पाणी घालावे. भाज्या थोड्या मऊ कराव्यात. फार शिजवू नयेत. नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यावे. त्यात दूध व कमी-अधिक दाटपणा येण्यासाठी आवश्यक असेल तेवढे पाणी घालावे. मिश्रण उकळत ठेवावे व मीठ, साखर, मिरेपावडर चवीपुरती घालावी व सूप तयार करावे. त्यांत घोटलेली मलई घालावी, सूप ढवळावे व गॅस बंद करावा. गरमागरम सूप वाढताना त्यात वरून अमूल बटर घालावे.
September 10, 2026
फळातील गराच्या रंगावरून प्रामुख्याने सफेद पेरू व गुलाबी पेरू अशा दोन जाती दिसून येतात. महाराष्ट्रात सरदार या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते. या जातीची फळे आकाराने मोठी व गोलसर असून बियांची संख्या कमी असते. फळातील गर चवीस गोड असून तो पांढऱ्या रंगाचा असतो.
November 10, 2016
साहित्य:
५ कप चिकन स्टॉक, दीड कप क्रीम ऑफ कॉर्न (टिन), १ ਟੀ स्पून मीठ, १ टी स्पून अजीनोमोटो, १ टीस्पून साखर, पाव टीस्पून मिरेपूड, ३ ते ४ टे.स्पून कॉर्नफ्लोअर, १ अंडे (फक्त पांढरे) ३ टे. स्पून शिजलेले चिकन श्रेडस्.
कृती: वेळ: २० मिनिटे प्रथम चिकन स्टॉक उकळत ठेवावा. त्यात क्रीम ऑफ कॉर्न घालावे व चांगले उकळू द्या. नंतर मीठ, साखर व मिरे पावडर घाला. दोन मिनिटे उकळू द्या. एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घ्यावी व हळूहळू उकळत्या सूपात ही पेस्ट घालून दुसऱ्या हाताने चमच्याने ढवळत राहा. चार-पाच मिनिटे चांगले उकळले की अंड्याचे पांढरे बलक चांगले फेटून घ्यावे व तेही या सूपामध्ये वरून बारीक धार सोडून ओतत राहा व दुसऱ्या हाताने ढवळत राहा. गॅस लगेच बंद करावा.
हे सूप पुन्हा पुन्हा गरम करू नये. सर्व्ह करताना वरून चिकन श्रेडस् घालावेत. टीप: हे सूप शाकाहारी करायचे असल्यास, त्यात थोडी फरसबी आणि पातीचा कांदा बारीक चिरुन घाला. चिकन स्टॉकऐवजी व्हेज स्टॉक वापरा.
बाऊलमध्ये थोडे शिजलेले वाटाणे व बारीक चिरलेली सेलरी घालून त्यावर हे गरम गरम सूप ओता. वरून किसलेले चीज घाला.
September 10, 2026
पातेल्यात तूप गरम करून त्यात प्रथम शहाजिरे, खडे मसाले व आलंलसूण पेस्ट खरपूस भाजल्यानंतर लाल मिरचीचे वाटण व अक्रोडाचे वाटण घालावे. नंतर थोडेसे पाणी, घोटलेले दही घालून हे मिश्रण शिजवावे. मिश्रणाला तूप सुटल्यानंतर चवीला मीठ घालून गॅस बंद करावा.
February 3, 2017
साहित्य: पाव किलो काबुली चणे२ ते ३ कांदे, (किसून)४ ते ५ टोमॅटोचवीपुरता चिंचेचा रसदोन तमालपत्रतीन टेबल स्पून तेलएक टेबल स्पून जिरेदोन चमचे पादेलोण (काळं मीठ)दोन चमचे तिखटअर्धा चमचा गरम मसाला१ टिस्पून आले पेस्ट३ लसूण पाकळ्यांची पेस्ट१ टिस्पून आमचूर पावडर१ टिस्पून धणेपूडपाव चमचा हळदअर्धा चमचा कसूरी मेथीकोथिंबीरएक चमचा आले-लसूण पेस्टचवीनुसार मीठभटूरेमैदा ४ वाट्यारवा अर्धी वाटीदही अर्धी वाटीमीठ चवीनुसारसाखर एक छोटा चमचाबेकिंग सोडा पाऊण चमचातळण्यासाठी तेल.
पाककृती: आदल्या दिवशी भरपूर पाण्यात काबुली चणे भिजत टाकावेत. दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये चणे नरम शिजवून घ्यावेत.जिरे, काळे मीठ जरा गरम करून बारीक पावडर करावी.तेल तापवून तमालपत्र टाकून किसलेला कांदा टाकून चांगला नरम करा. आले-लसूण पेस्ट टाकून थोडा वेळ परतावे.बारीक चिरलेला टोमॅटो टाकून बराच वेळ परतून घ्यावे. कांदा-टोमॅटो एकजीव झाला पाहिजे.त्यात हळद, तिखट, थोडे मीठ, जिरे व काळे मीठ, धनेपूड टाकून परतून घ्यावे. नंतर शिजवलेले चणे टाकावे.चणे परतून त्यात एक-दोन वाटया पाणी टाकावे व मंद आचेवर शिजवावे. कोथिंबीर व कसूरी मेथी चुरून टाकावी .भटुराएका भांड्यात मैदा आणि रवा चाळून घ्यावा.मैद्यात 2 चमचे तेल, मीठ, बेकिंग सोडा, दही आणि साखर घाला.कोमट पाणी घालून पीठ चांगले भिजवून घ्यावे.भिजवलेले पीठ 2 तास उबदार जागी झाकून ठेवा.दोन तासांनी कढईत तेल गरम करून घ्या.लिंबाएवढ्या आकाराचे गोळे करून त्याच्या पुऱ्या करून गरम तेलात तळून घ्या.
July 19, 2018
साहित्य : मध्यम आकाराच्या ६ चिंबोऱ्या, चणाडाळ अर्धा (मध्यम आकाराचा) पेला, रवा (मध्यम आकाराचा) अर्धा पेला, चिंचेचा कोळ २ चहाचे चमचे, कांदे बारीक चिरलेले हळद, तिखट, मीठ चवीनुसार, आलं-लसुण वाटणं ३ चहाचे चमचे, तेल १ मध्यम वाटी
मसाला : कांदे २ मध्यम आकाराचे उभे चिरलेले, अर्धी वाटी भाजलेले सुके खोबरे, धणे ४ चहाचे चमचे, बडिशेप १ चहाचा चमचा, शहाजिरे १ चहाचा चमचा, १ चहाचा चमचा मिरे, लंवगा ,दालचिनी २ इंच.
कृती: भरडा - चणाडाळ चांगली खमंग भाजून घेणे, नंतर जाडसर दळुन घेणे (भरडा)
मसाला : तेलावर उभा चिरलेला कांदा लालसर भाजून घेणे नंतर त्यात धणे घालून भाजणे नंतर उरलेला मसाला (बडिशेप,जीरे, शहाजिरे, लवंगा, दालचिनी) घालून थोडा वेळ भाजणे, सर्वात शेवटी खोबरे घालून गॅस बंद करणे, थंड झाल्यावर सर्व मसाला बारीक वाटून घेणे. चिंबोरीचे पाय वाटून गाळून घेणे.
मुख्य कृती : प्रथम चिंबोरी साफ करुन घेणे कवच व पेंदा वेगळा करुन लाख असल्यास वेगळी काढून कवच साफ करुन ठेवणे. पेंदा व नांग्याना, आर्धी आलं-लसूण पेस्ट व हळद, तिखट, मिठ, लाऊन ठेवणे. चिंबोरीच्या पायाचा रस, चिंचेचा कोळ, वाटलेला मसाला, उरलेली आलं-लसूण पेस्ट एकत्र करणे. त्यात डाळीचा भरडा व रवा कालवणे. चवी नुसार हळद, तिखट, मिठ, घालून कालवणे (पाणी घालू नये) वरील मिश्रण भज्यांच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असावे.
मिश्रणाचे ६ भाग करुन घेणे चिंबोरीच्या कवचात मसाला भरुन त्यावर पेंदा ठेऊन कच्चा दोऱ्याने गुंडाळणे. अशा रीतीने प्रत्येक चिंबोरी भरुन घेणे.
पसरट पातेल्यात तेल तापवून घेणे, त्यात हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेणे, आता त्यात एकेक चिंबोरी, पेंदावर येईल अशा रितीने ठेवणे. नांग्या व उरलेला मसाला घालून एक वाफ आणणे. नंतर चिंबोऱ्या आसडून पाठी कडील बाजू वर येईल अशा करणे. आता पातेल्याखाली तवा व झाकणावर पाणी ठेऊन ८ ते १० मिनीटे गॅस बारीक करून ठेवणे. नंतर झाकणावरील पाणी फेकून देऊन परत पातेल्यावर झाकण ठेवणे व गॅस बंद करणे.
हा पदार्थ र्स्टार्टर म्हणून खाऊ शकतो. चपाती, भाकरी बरोबर खायचा असल्यास थोडासा रस्सा ठेवावा.
-संगीता अमोल कोपर्डे (फणसे)
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
१६ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्तभ राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून १९७९ पासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. हंगेरीचे माजी कृषी आणि अन्न खात्याचे मंत्री डॉ. पल रोमानी यांनी अन्न आणि कृषी संघटनेच्या २० व्या परिषदेमध्ये यासंदर्भातील संकल्पना सर्वप्रथम मांडली आणि जगभरात हा दिवस साजरा केला जावा हा विचार पुढे आणला. तेव्हापासून जवळपास १५० देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.
अन्नदिनाच्या निमित्ताने गरीबी आणि भूकमारी विषयी जागरूकता वाढवण्यावर आणि त्यासंदर्भातील उपाययोजनांवर भर देण्यात येतो. १९८१ पासून जागतिक अन्नदिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक वेगळी संकल्पना मांडली जाते. यंदाच्या वर्षी “हवामान बदलाचे शेती आणि अन्नावर होणारे परिणाम अशा आशयाची संकल्पना मांडण्यात आली आहे. जगभर विविध इतर दिन उत्साहाने साजरे केले जातात. त्यापैकी अन्न दिन महत्त्वाचा मानावा लागेल, कारण त्याचा थेट मानवी जीवनाच्या अस्तित्वाशी संबंध आहे.
अन्न सुरक्षेबाबतची एकंदर परिस्थिती पाहता अन्न दिनाबाबत जागरूकता वाढीस लागण्याची गरज आहे. अन्नधान्य मुबलक मिळायला हवे, मात्र ते स्वस्तातच हवे अशी अपेक्षा दारिद्य्ररेषेखालील माणसांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचीच असते. मध्यमवर्गीयांना तर बाकी काही महागले तरी चालते, पण अन्नधान्य मात्र स्वस्तातच मिळायला हवे असते. आपल्याला पगार भरपूर मिळावा, मात्र वर्षानुवर्षे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याने मात्र पंधरा-वीस वर्षांपूर्वीच्याच भावात अन्नधान्य द्यावे असे या वर्गाला वाटत असते.
बाजारभावाच्या निम्म्याहून कमी पैसे शेतकऱ्याच्या हातात पडतात हे वास्तवही त्यांना नीट माहीत नसते, किंबहुना ते जाणून घेण्याची निकडही त्यांना भासत नाही. तापमानवाढ, मोसमी पावसाची अनियमितता, रोग-किडींचा वाढता प्रादुर्भाव, खते-बियाण्यांसह अन्य कृषी निविष्ठांची अपुरी उपलब्धता, बाजार यंत्रणेकडून होणारी फसवणूक अशी अनेक आव्हाने खांद्यावर घेऊन शेतकरी काळ्या आईची सेवा मनोभावे करतो आहे. तो नवी आव्हाने पेलण्यासही समर्थ आहे, पण किमान पाठीवर हात ठेवून "लढ' म्हणण्याइतके औदार्य समाजाने दाखवायला हवे.
सरकारी यंत्रणेनेही त्याच्याप्रती असलेले औदासीन्य सोडायला हवे. निविष्ठांपासून ते पीक कर्जापर्यंत साऱ्या बाबींची वेळेत पूर्तता करून द्यायला हवी. "अन्नदाता सुखी भव' म्हणून आपण यजमानांना दुवा देत असतो, पण खरा अन्नदाता शेतकरी आहे याचा विसर सर्वांनाच पडलेला असतो. या जगाच्या पोशिंद्याचे कल्याण करायचे असेल तर त्याने पिकवलेल्या मोत्यांना वाजवी किंमत देण्याची दानतही समाजाने अंगी बाळगली पाहिजे.
जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने हे आपण लक्षात घ्यावयास पाहिजे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट /विकीपीडीया
October 16, 2017
दही व साखर मिसळून घ्यावे. साखर विरघळली की नंतर त्यात दूध, रवा, वेलचीपूड, चारोळी, मीठ, लोणी, रंग व सोडा क्रमाने घालून चांगले मिसळावे. तासभर झाकून ठेवावे. नंतर तुपाचा पातळ हात सारवलेल्या भांड्यात मिश्रण ओतावे. मध्यम गरम ओव्हनमध्ये अर्धा तास हा केक भाजावा. गार झाल्यानंतर खा.
November 9, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti