महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य:- फोडी उकडून काढलेला गाळलेला रस किमान एक लीटर, एक किलो साखर, दोन लिंबांचा रस.
कृती:- पेरूचा रस आणि साखर एकत्र उकळा. गार झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण तयार करा. पेरूचा ज्यूस ग्लासमध्ये देताना नेहमी चिमूटभर मीठ घाला, त्यामुळे पेरूची चव अप्रतिम लागते. गुलाबी रंगाच्या पेरूचा वापर केल्यास अधिक चांगले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
January 18, 2017
बटाटे उकडून, साले काढून कुस्करून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून बटाटे खमंग भाजून घ्यावेत. नंतर त्यामध्ये खवा घालून १-२ मिनिटे भाजून घ्यावे. नंतर साखर, वेलचीपूड, केशर घालून मंद विस्तवावर थोडा वेळ ठेवून मोकळा झाला की उतरवावे. सारणाचे एकसारखे चार भाग करावेत.
March 11, 2017
सर्वप्रथम बटाट्याचा किस, ताक व लालसर कडा काढलेल्या ब्रेडचा चुरा एकत्र करुन या मिश्रणात अंदाजानुसार आणि चवीप्रमाणे हिंग, हळद, तिखट, मीठ घालून गॅसवर मंद आचेवर शिजत ठेवावे. गोळा पातेल्यात फिरायला लागला की लगेच उतरवावे. ताटात कापड टाकून त्यावर वरील मिश्रण घाला व पातळ थापावे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, मीठ, ओले खोबरे, लिंबाचा रस व चिमूटभर साखर घालून याचे सारण तयार करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद घालुन केलेली फोडणी घालावी. व हे सर्व थापलेल्या वड्यांवर पसरवावे. त्यावर सुरीने उभ्या चिरा पाडून गोल गुंडाळ्या कराव्यात. अशाप्रकारे ब्रेडच्या सुरळीच्या वड्या तयार. या वड्या आपण हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करु शकतो.
September 28, 2013
चार टोमॅटो बारीक चिरून घ्या. त्यात मटकीची डाळ घाला. त्यात मीठ व साखर घाला. वरून तेलाची जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यावर ओता. टोमॅटोच्या रसात मटकीची डाळ छान भिजेल. ही कोशिंबीरसुद्धा चवीला छान लागते.
June 5, 2017
लसुण, जिरं, मोहोरी, कडिपत्ता, हिंगाच्या फोडणीत शेपू वाफऊन घ्यायचा. शिजला कि तुरीचं शिजलेलं वरण, तिखट, मिठ, गोडा मसाला, पाणी घालुन उकळु द्यायचं. ५-१० मि वरण तयार.
November 29, 2016
साहित्य : चार चमचे मोड आलेली मेथी, एक वाटी किसलेले गाजर, एक वाटी बारीक चिरलेली भोपळी मिरची, एक वाटी कॉर्न, एक वाटी डाळिंबाचे दाणे, मेयोनीज, मिरेपूड, लिंबाचा रस.
कृती : मेथी, गाजर, भोपळी मिरची, कॉर्न व डाळिंबाचे दाणे एकत्र कालवा. त्यात आवश्य कतेनुसार मेयोनीज घाला आणि चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड व लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 21, 2017
काचेच्या मोठय़ा भांडय़ात सर्व भाज्या, फोडणी व पाण्यासकट तांदूळ, अख्खा गरम मसाला, मीठ सर्व एकत्र करून अर्धवट झाकण लावून १०० टक्के पॉवरवर ४ मिनिटे शिजू द्या.
June 5, 2017
फळांपासून तयार केल्या जाणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये पेयांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा पेयांचे आहारमूल्यसुध्दा चांगले असते. फळांच्या रसापासून सरबते, स्क्वॅश, सिरप, कॉर्डियल, भुकटी इत्यादी वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात.
October 25, 2015
प्रथम रवा चांगला भाजून घ्यावा. एका कढईत तेल तापवत ठेवावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, कडीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. १ लहान चमचा मीठ घालावे व कांदा चांगला शिजू द्यावा. कांदा नीट शिजला की त्यात रवा घालावा.
दुसर्या भांड्यात पाणी तापवत ठेवावे. रवा थोडावेळ कांद्याबरोबर परतावा. पाणी उकळले की भाजलेल्या रव्यात ओतावे. नीट मिक्स करावे. त्यात साखर व आवश्यकतेनुसार मीठ घालावे. एक वाफ काढावी. अशाप्रकारे तिखट मीठाचा सांजा तयार. यावर सजावटीसाठी आपण कोथिंबीर व खोवलेला नारळ घालू शकतो.
April 30, 2016
साहित्य : १ टोमॅटो, १ कांदा, ६ ते ७ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर, २ मिरच्या.
कृती : कुकर मध्ये २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, किंचि तिखट घालून त्यात टोमॅटो कांद्याचे वाटण घालणे व चांगले परतणे. मग त्यात अर्धा तास भिजवलेले, १ वाटी तांदूळ, २ वाट्या मिक्स पाच डाळी घालून परतणे. अर्धा चमचा गरम मसाला आणि १ चमचा धणे जिरे पावडर घालणे. मस्त ५ मिनिटे परतणे. त्यात दुप्पट पाणी घालून १ शिट्टी करून गॅस १० मिनिटे मंद आचेवर ठेवून मग बंद करणे. वरुन कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालून गरम गरम खिचडी वाढणे.
August 21, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti