(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लाल बडीशेप

    साहित्य:-१०-१५ कपुरी पान, ५० ग्राम बडीशेप, २५ ग्राम पिसलेला कत्था, थोडी साखर आणि पाणी

    कृती:- कपुरी पानाला २-३ दिवस उन्हात वाळवून घ्यावे. मग मिक्सरमधून काढून त्याच पावडर तयार करावे. आता बडीशेपमध्ये कत्था, साखर, आणि थोडा पाणी टाकून मिक्स करून २ दिवस ठेवावे. मग परत २ दिवस या मिक्स केलेल्या सामग्रीला उन्हात वाळवावे. नंतर कापुरी पानाचे पावडर आणि बडीशेप एकजूट करून एअरटाइट बरणीत ठेवावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      December 26, 2016


  • rawa-cake-300

    बिनाअंड्याचा रवा केक

    दही व साखर मिसळून घ्यावे. साखर विरघळली की नंतर त्यात दूध, रवा, वेलचीपूड, चारोळी, मीठ, लोणी, रंग व सोडा क्रमाने घालून चांगले मिसळावे. तासभर झाकून ठेवावे. नंतर तुपाचा पातळ हात सारवलेल्या भांड्यात मिश्रण ओतावे. मध्यम गरम ओव्हनमध्ये अर्धा तास हा केक भाजावा. गार झाल्यानंतर खा.

      November 9, 2016


  • लुक्मीव

    साहित्य:- २ वाट्या मैदा, १ वाटी रवा, साजूक तूप, २ वाट्या खवा, दीड वाटी पिठीसाखर, केशर-वेलची पूड, १ वाटी सुकामेवा पूड.
    कृती:- मैदा, रवा, मीठ व अर्धा चमचा पिठीसाखर एकत्र करावी. त्यात अर्धी वाटी तुपाचे मोहन घालून कालवून घ्यावे व नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून घट्ट कालवावे. 2 वाट्या खवा तांबूस परतून त्यात पिठीसाखर मिसळून छान मऊसर करून घ्यावा. त्यात वेलची पूड, केशर व काजू-बदामाची जाडसर पूड मिसळावी. रवा - मैदा तासभर भिजल्यावर पुन्हा चांगले मळून घ्यावे. लुक्मीी चौकोनी आकाराची असते. पुरीला घेतो तेवढीच लाटी घेऊन लांबट लाटावे. अर्ध्या भागात सारण भरून दुसरा अर्धा भाग त्यावर दाबून चौकोनी आकार द्यावा. नंतर लुक्मी साजूक तुपात तळून गरमागरम वाढाव्यात.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      August 15, 2018


  • p-2018-apple-rabri

    अॅपल रबडी

    एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस किंवा सायट्रीक अॅलसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा. सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. ते वरील पाण्यातच किसा. आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल.

      June 11, 2017


  • watermelon-cool

    वॉटरमेलन कुल

    कलिंगड स्वच्छ धुऊन पुसून घ्या. कापून साली व त्यातील बिया काढा. गर काढा. नंतर सर्व पदार्थ मिक्सरमधून काढा. भांड्यात ओता. ग्लास भरा. वरुन बर्फाचा चुरा घाला. फ्रिज असेल तर थंड करुन प्यायला द्या.

      September 8, 2016


  • टोफू टिक्का

    साहित्य:- टोफू २५० ग्रॅम, दही घट्ट १ वाटी (नसल्यास दही कापडात बांधून पाणी काढून घेणे.), आलं लसूण पेस्ट २ चमचे, धणे-जिरे पावडर २ चमचे
    तिखट, मीठ चवीनुसार, हळद, कस्तुरीमेथी चवीनुसार, चाटमसाला थोडा, तेल २ ते ३ चमचे, मैदा किंवा कणीक १ ते २ चमचे, सिमला मिरची, टोमॅटो, कांदे (मोठय़ा तुकडय़ांमध्ये)
    कृती:- दह्यात सगळे मसाले कणीक घालून एकजीव करावे. नंतर त्यात टोकू शिमला मिरचीचे तुकडे टोमॅटो, कांदे घालावे. ३० ते ४० मिनिटे ते तसेच ठेवावे. नंतर एका सळईला प्रथम कांदा, मग टोकू - सिमला मिरची, टोमॅटो, परत टोकू या क्रमाने टोचून रुंद कोळश्याच्या भट्टीवर किंवा गॅसवर भाजून थोडा तेलाचा हात लावून चाटमसाला टाकून चटणी कचुंबरबरोबर सव्‍‌र्ह करावे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 27, 2017


  • p-2711-mix-kaddhanya-chivda

    मिश्र कडधान्यांचा चिवडा

    साहित्य - गव्हाच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, धानलाह्या, मूग डाळ, मसूर डाळ, मटकी, हरभरा डाळ, हिरवे वाटाणे, काबुली चणे, शेंगदाणे, काजू, बेदाणे, खोबर्यावचे काप, तेल, मीठ, लाल तिखट, हळद, सायट्रिक अँसिड, साखर, गरम मसाला, हिंग, खसखस, कढीपत्ता आणि मोहरी.

    कृती - एक-एक वाटी तिन्ही प्रकारच्या लाह्या, इतर धान्य अर्धी अर्धी वाटी किंवा आपल्या आवडीप्रमाणे घेऊन भिजत घालावी, ८-१0 तासांनी पाण्यातून काढून कापडावर घालून कोरडे करावे, कढईत तेल तापवून डाळी आणि धान्यं तळून घ्यावी तसेच शेंगदाणे, काजू तळावे. तळलेले जिन्नस आणि लाह्या एकत्र करावे. एक वाटीभर तेल तापवून त्यात कढीपत्ता, मोहरी, हिंग, हळद, खसखस घालून जरा परतावं. त्यात वरील मिश्रण घालून मीठ, लाल तिखट, गरम मसाला, खोबर्या चे काप आणि बेदाणे घालून सर्व जिन्नस खाली-वर करावं. सायट्रिक अँसिड आणि साखर बारीक करून सर्वात शेवटी टाकावी. गॅस बंद करून सर्व जिन्नस चांगलं एकत्र करावं. हा चिवडा व्यवस्थित गार झाल्यावर डब्यात भरावा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      July 6, 2017


  • p-2561-rainbow-sandwich

    रेनबो सॅण्डविच

    चक्का काटय़ानं थोडा फेटून घ्यावा. त्यात चिज, मिरची, लसूण, इटालिअन हर्बज, पिझा मसाला आणि मीठ घालून हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यावं.

      June 10, 2017


  • soya-chunks-bhakri-300

    सोया चंक्सची भाकरी

    एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत,मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा.

      November 9, 2016


  • p-2274-puranpoli

    बटाट्याच्या पुरणपोळ्या

    बटाटे उकडून, साले काढून कुस्करून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून बटाटे खमंग भाजून घ्यावेत. नंतर त्यामध्ये खवा घालून १-२ मिनिटे भाजून घ्यावे. नंतर साखर, वेलचीपूड, केशर घालून मंद विस्तवावर थोडा वेळ ठेवून मोकळा झाला की उतरवावे. सारणाचे एकसारखे चार भाग करावेत.

      March 11, 2017