महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य: १ कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा टे.स्पून लोणी, २ टे. स्पून मैदा, अर्धा कप फ्लॉवरचे तुरे, अर्धा कप किसलेले गाजर, पाव कप किसलेले बीट, १ कप किसलेला कोबी, अर्धा कप ओला वाटाणा, १ कप दूध अर्धा कप घोटलेली मलई वेळ: ३० मिनिटे `चवीपुरते मीठ, मिरे पावडर, साखर व थोडे अमूल बटर.
कृती: प्रथम लोणी पातेल्यात गरम करावे व त्यात कांदा परतून जरा तांबूस झाला की मैदा परतावा. मैदा खमंग भाजावा व त्यात वरील भाज्या घालून थोडे परतावे व एक-दोन कप पाणी घालावे. भाज्या थोड्या मऊ कराव्यात. फार शिजवू नयेत. नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यावे. त्यात दूध व कमी-अधिक दाटपणा येण्यासाठी आवश्यक असेल तेवढे पाणी घालावे. मिश्रण उकळत ठेवावे व मीठ, साखर, मिरेपावडर चवीपुरती घालावी व सूप तयार करावे. त्यांत घोटलेली मलई घालावी, सूप ढवळावे व गॅस बंद करावा. गरमागरम सूप वाढताना त्यात वरून अमूल बटर घालावे.
September 10, 2026
साहित्य: मसूर पाव वाटी, २ मध्यम बारीक चिरलेले कांदे, हळद, तिखट, धणे जिरे पावडर, मीठ, गूळ, कांदा, खोबरे वाटण, दालचिनी तुकडा, आमसुले तीन ते चार तेल, हिंग तळला मसाला साहित्य: उभा चिरलेला कांदा, खोबऱ्याचा किस, थोडे धणे दालचिनी तुकडा, लवंग, मिरे ४ ते ५, १ बडी वेलची, १ तलामपत्र
कृती: कांदा तेलात चांगला तपकिरी रंगावर करणे नंतर खोबरे लालसर भाजून घेणे.धणे, दालचिनी,मिरे, लवंग, बडीवेलची तमालपत्र भाजून घेणे. मिक्सर मधून बारीक वाटणे. भांड्यांत तेल टाकून त्यावर मोहरी, जिरे, दालचिनी तुकडा व हिंग टाकणे. त्यावर बारीक चिरलेला कांदा घालणे तो गुलाबीसर झाल्यावर त्यात हळद, तिखट, धणे, जिरे पावडर टाकणे व परतणे त्यात मसूर टाकून चांगले परतणे. मसूर बुडेपर्यंत पाणी घालणे झाकण ठेवणे. मसूर शिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ, गूळ, तळलेला कांदा, खोबरे वाटण, आमसुल घालणे उकळी येऊन देणे त्यावर कोथिंबीर घालणे.
-सौ. रेश्मा सचिन हजरनिस
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
गहू ७-८ तास भिजत घालावे. नंतर ते उपसून १५ मिनिटे ठेवावे. त्या गव्हाला उकड द्यावी. चांगले बोटचेपे झाल्यावर ते चाळणीत उपसून ठेवावे. पातेलं चांगले तापवून घेउन त्यात तेल घालावे. तेल चांगले तापले की त्यात फोडणीला दालचिनी, लवंग टाकावी. नंतर तमालपत्र व शहाजिरे टाकावे. त्यानंतर त्यात हिंग टाकून थोडासा कांदा टाकावा. त्यावर हळद, तिखट टाकावे व नंतर बाकीचा कांदा, गहू, वाटलेला मसाला घालून चांगले परतावे. त्यानंतर गहू बुडतील एवढे उकळते पाणी घालावे. त्यात थोडासा गुळ घालावा आणि उकळून द्यावे. पाणी आटत आले की त्यात मीठ घालावे. काजू व अक्रोडचे तुकडे घालावे. नंतर ते सगळे मिश्रण चांगले घाटावे व त्यावर झाकण ठेउन चांगली वाफ येउन द्यावी. नंतर झाकण काढून मसालेभातावर नारलाचे दूध घालून झाकण ठेवावे. थोडा वेळ गॅस बंद करुन २ मिनिटांनी परत त्याला चांगले घाटून झाकण ठेउन पुन्हा एक वाफ द्यावी व गॅस बंद करावा.
February 17, 2016
टॉमेटोला चिरा द्याव्यात, कांद्याचे मोठे तुकडे करावे, टॉमेटो, कांदा, कोथिंबीर काड्या, लसूण एकत्र करून वाटीभर पाणी घालून कुकरमध्ये १ शिटी करून वाफवून घ्यावे, पाण्यातून उपसून मिक्सर / ब्लेंडर मध्ये बारीक वाटून घ्यावे, चाळणीतून गाळून घ्यावे, भांड्यात तूप गरम करून त्यात हिंग, जिरे, दालचिनीची फोडणी करावी, त्यावर गाळलेले मिश्रण घालून त्यात शिजविण्यासाठी वापरलेले पाणी घालावे, मीठ घालून १ उकळी आणावी.
March 9, 2017
काजूचे पकोडे – Recipe
September 11, 2026
हादग्याची ताटभर फुले चिरून (फुले चिरत असतांना फुलांच्या आतला केसर काढुन टाकावा शक्यतो. तो बरेचवेळा कडवट असतो) ,दोन कांदे चिरून,एक टोमॅटो बारीक चिरून ,चवीनुसार हिरव्या मिरच्या ,मीठ व साखर, मोहरी, चिमूटभर हिंग,हळद,दोन टेबलस्पून बेसन पीठ.
January 21, 2017
मंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते.
April 29, 2017
सुक्या मिरच्यांचे तुकडे साधारण एक तासभर पाण्यात भिजत घालावेत. मग ह्या भिजवलेल्या सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे.
January 16, 2017
मैदा, चिमूटभर मीठ घेऊन दुधात घट्ट भिजवा. दीड दोन तास ठेवा. मग खूप कुटून घ्या. त्याच्या लाडवाएवढ्या गोळ्या करा. त्या लाटा. व त्यावर तांदूळ पिठी पेरत जा. एका भांड्यात तूप कोमट करा. ते या लाटलेल्या पोळीवर पसरवा. त्यावर अशीच केलेली दुसरी पोळी उलटी घाला. याची घडी घाला. पुन्हा लाटा. ही पोळी थोडी जाडसर ठेवा. त्याची चौकोनी वळकटी करा. याचे आडवे, चौकोनी तुकडे कापा. ते थोडे लाटा. गरम तूप असताना, आच मंद करुन त्यात हे चिरोटे सोडा. तळा. झार्याने आजूबाजूचे तूप यावर घालत राहा. फुगल्यावर बाहेर काढा. हे चिरोटे थंड झाले की मध्ये थोडे फोडा व त्यात थोडा पाक घाला.
September 23, 2013
दसऱ्याचे दुसरं नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस. दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे दागिने केले जातात.
नवे व्यवसाय चालू केले जातात. ह्या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची. त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते ही ह्याच दिवशी.
आपट्याच्या पानाला सोन्याचं मोल का आणि कसं आलं ह्याबद्दल जी एक कथा सांगितली जाते, ती अशी की
फार फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरू आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांचेकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता. एकदा काय झालं. गुरू वरतंतू ह्यांचेकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले – गुरूजी!
तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले. शहाणे केले, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी? त्यावर गुरु वरतंतू म्हणाले, “बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा !” पण कौत्स मात्र ऐकेनाच, सारखा मी काय देऊ? असे विचारू लागला मग गुरु म्हणाले, “मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे.”
कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू पण प्रत्यक्षात ते जमेना. मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना चौदा कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजानं कौत्साला ‘तू तीन दिवसांनी ये’ असं सांगितलं. रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना, मग रघुराजाने युद्धाची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळली. इंद्र घाबरला, त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली.
दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्यानं स्वतः त्या मुद्रांचा ढीग पहिला. दारी आलेल्या कौत्साला ‘हवं तेवढं धन घे’ म्हटलं पण त्याने गुरुदक्षिणे पुरतेच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता.
नऊरात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा. सोने लुटण्याचा. दस-याच्या दिवशी लोक एकत्र येतात. आपटा व शमीच्या पानांमुळे अर्जुन योग येतो. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला सोने लुटले जाते. आपण दसऱ्याला नेहमीच श्रीखंड पुरी हा मेनु करतो. या वेळी जरा वेगळा मेनु करू या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कॅप्सिकम राईस
साहित्य:- दोन मोठ्या पिवळ्या रंगाच्या ढोबळ्या सिमला मिरच्या,१ कांदा, अर्धी वाटी बासमती तांदूळ
फोडणीसाठी. आले-लसून, मेथीचे दाणे, मोहरी, उडीदाची डाळ, तीळ, जिरे, बडीशेफ, कढीपत्ता, हळद.
कृती:- सर्वात प्रथम तांदूळ धुवून १५ ते २० मिनिट भिजात टाका. दोन मोठ्या पिवळ्या ढोबळ्या सिमला मिरचीच्या मध्यम आकाराच्या फोडी चिरुन घ्यायच्या, नंतर कांदा, आले-लसून, मेथीचे दाणे, मोहरी, उडीदाची डाळ, तीळ, जिरे, बडीशेफ, कढीपत्ता, हळद यांची नेहमीप्रमाणे खमंग फोडणी करुन घ्यायची. पांच मिनिटे परतून घेऊन मग चिरलेल्या सिमला मिरचीच्या फोडी फोडणीत घालायच्या आणि नीट एकजीव करुन घायच्या. गॅसची आच शक्य होईल तेवढी मंद करुन घ्यायची. पातेल्यावर एका ताटात पाणी घालून ते ताट झाकण ठेवावे. शिजून या भाजीला पाणी सुटले की त्यात फक्त तांदूळ वैरावेत. पाणी घालायचे नाही. खरे तर भाजीच्या पाण्यात तांदूळ बसतील इतकेच तांदूळ अंदाजे भिजवायचे. आता झाकण न ठेवता मंद आचेवर हा भात शिजू द्यायचा. भात शिजत आला की कडेकडेने साजूक तूप सोडायचे. हा भात चवीला तर छान होतोच, शिवाय रंग वगैरे पण एकदम छान दिसतो आणि पाणी घातले नाही म्हणून भाताला एक वेगळीच चव येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
April 15, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti